डॉ यशवर्धन चं नेमकंच post graduation झालं होतं....
md peadiatrics मध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं ..
त्या मुळे त्यांचं सगळीकडे कौतुक चालू होतं...
डॉ यशवर्धन च्या वडिलांना आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटत होता...
डॉ यशवर्धन ने शेजारच्या गावी प्रॅक्टिस करावी असं त्यांचं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं...
डॉ यशवर्धनला देखील त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते...म्हणून त्या साठी त्यांनी शेजारील गावामध्ये शिफ्ट होण्याचं ठरवलं...
शेजारील गावामध्ये बोटावर मोजण्याइतके बालरोग तज्ञ असल्यामुळे लवकरच डॉ यशवर्धन च्या प्रॅक्टिस ने जोर पकडला...
गावातील बाकी डॉक्टरांशी त्यांची घट्ट मैत्री देखील झाली...
डॉ यशवर्धनचा स्वभाव मोकळा असल्यामुळे लवकरच रूळले..
.गावातील डॉक्टर पाटील हे डॉ यशवर्धनचे खास मित्र....
डॉक्टर पाटील ने डॉ यशवर्धनला जर प्रॅक्टिस संदर्भात काही मदत लागली तर मला नक्की सांगा.....असं सांगितलं...
डॉक्टरांचा आता जम चांगला बसला होता ....
अश्यातच एक अतिगंभीर रुग्ण 11वर्ष वय मुलाला त्याचे वडील डॉ यशवर्धनच्या दवाखान्यात घेऊन आले....
रुग्ण पाहताच डॉक्टरांनी त्याला तपासले.... तो त्यांचा नियमित येणारा रुग्ण होता....
त्या मुलाला हृदयाचा जन्मजात आजार होता..
.तो ही अति गंभीर...
त्याच्या जन्माच्या वेळेसच हे बाळ हे जास्त दिवस जगू शकणार नाही याची त्याच्या वडिलांना कल्पना दिलेली होती.....आणि तसंच झालं तो मुलगा शेवटचा श्वास घेत होता....
शेवटचा प्रयत्न म्हणून डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी काही इंजेक्शन दिली पण तो मुलगा दगावला....
आपला मुलगा अश्या आजाराने मरणार हे माहिती असून देखील त्याच्या वडिलाने धिंगाणा सूरू केला...
गावातील काही राजकारणी सदस्य व काही पत्रकार बोलावून घेतले....
शे दोनशे चा मॉब जमा झाला....
सगळे लोकं डॉक्टरच्या अंगावर चवताळून मारण्यासाठी धावायला लागले....
आता या मॉब समोर आपलं काही चालणार नाही हे त्या डॉक्टरच्या लक्षात आलं....
शेवटी इच्छा नसताना देखील चूक नसताना देखील डॉक्टरांनी बोली सूरू केली... ठीक आहे दोन लाख रूपये देतो....
दोन लाखात काय होणार आहे... तुम्ही चुकीचे इंजेक्शन टोचले तुम्ही चार लाख दिले तर इथून मी बॉडी हलवतो...
काही वेळापूर्वी माझा मुलगा,माझा मुलगा करणारे वडील चक्क त्याला बॉडी म्हणून उद्देशू लागले...
डॉक्टरांना तो एक मोठा इमोशनल शॉकच होता...
त्यांनी असा भावनांचा खेळ कधी बघितला नव्हताच व टाळूवरचं लोणी खाणे काय प्रकार आहे ह्याची प्रचिती देखील त्यांना आली....
चार लाख... मला शक्य नाही... एकतर मी चूक केली नाही... मी कसलाही गुन्हा केला नाही.... तुम्ही सर्व जण माझ्या अंगावर धावून येत आहात म्हणून मी कसं बसं तयार झालो...
ते ऐकून तिथला मॉब अजूनच चवताळला... व डॉक्टरांना काही बाही बोलायला लागला...
तिथली काही तोडफोड करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलताच तिथल्या नगरसेवकाने तो मॉब थांबवला...
काय वेड्यासारखं करताय...
तोडफोड कशाला करता...
थांबा मी जरा डॉक्टरांशी बोलून येतो...
असं म्हणून तो नगरसेवक डॉक्टरांना बोलायला आला ...
डॉक्टरसाहेब!!चार नाही तर तीन देऊन टाका अन हे प्रकरण मिटवा बरं ताबडतोब.... चला आम्हाला भरपूर कामं आहेत...
जास्त वेळ लावू नका नाहीतर ही पब्लिक तुमच्या दवाखान्याची वाट लावतील....
न केलेल्या गुन्ह्याची व जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याची एवढी मोठी सजा डॉक्टरांच्या मनाला हे मान्य होत नव्हतं तर बुद्धी म्हणत होती की पैसे देऊन टाक एकदाचे अन विषय मिटवून टाक....
झाला प्रकार आतापर्यंत पूर्ण गावभर पसरला... गाव छोटं असल्यामुळे डॉ यशवर्धन च्या हॉस्पिटल मध्ये काय घडलं याची बातमी डॉ पाटील पर्यंत पोहोचली... या क्षणाला आपली गरज डॉ यशवर्धन ला आहे हे डॉ पाटील ने ओळखलं...
वेळ न दवडता आपल्या एका मावस भावासॊबत ते डॉ यशवर्धन च्या हॉस्पिटल ला निघाले....व दहा मिनिटातच पोहोचले...
डॉ पाटील म्हणजे त्या गावातील प्रतिष्ठित प्रस्थ.... त्यांचा शब्द म्हणजे तो कोणी खाली पडू देणार नाही असं.....
डॉक्टर पाटील यांना बघताच मॉम मध्ये असलेले लोकं,पत्रकार व नगरसेवक सर्व जण खजिल झाले....
डॉ पाटील सोबत असणारा त्यांचा मावस भाऊ म्हणजे त्या गावातील गुंड प्रवृत्तीची माणसं देखील त्याला घाबरतील अशी त्याची ख्याती होती ...
त्याला बघून काही लोकांची चरकली...
डॉ पाटील : काय धिंगाणा करता राव.... तुम्हाला तरी हे शोभतं का... साऱ्या गावाला याचा पेशंट माहिती होता... होता की नव्हता? मग?? हा डॉक्टर एकटा आहे... आपल्या गावचा नाही.... म्हणून लागले लुटायला...
कुठे आहे रे तो त्या मुलाचा बाप?... डॉ पाटील चा मावस भाऊ एकदम करड्या आवाजात तिथे दम देऊ लागला... पैसे माघायला लाज नाही वाटत?... तुझा लेक गेला याचं तुला दुःख झालेलं दिसत नाही... थांब मी तुला दाखवतो?
नगरसेवक : पण सर तुम्ही?
डॉ पाटील :हो हो मीच... हे खास आमच्या मर्जीतले डॉक्टर आहेत.... माझे खास मित्र आहेत.... पण मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती... त्या मुलाचा बाप तर तुम्हाला माहिती आहे... किती स्वार्थी आहे तो.... पण तुम्ही जनतेचे रक्षक... तुम्हीच उलट त्या डॉक्टरच्या वतीने बोलायला हवे होते....
डॉक्टर पाटील च्या बोलण्यावर नगरसेवक निरूत्तर झाले....
पत्रकार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत होते बाकीचा मॉब आता हळूहळू पसार होऊ लागला होता....
क्षणार्धातच वातावरण निवळले....
डॉक्टर यशवर्धन : थँक्स... डॉक्टर पाटील!!तुम्ही अगदी वेळेवर आलात... नाहीतर मला माझ्या न केलेल्या गुन्ह्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली असती.....
डॉक्टर यशवर्धन डॉक्टर पाटीलच्या येण्याने वाचले....पण प्रत्येक ठिकाणी डॉक्टर पाटील सारखी मदत मिळेल हे शक्य नाही .... मग अशा वेळेस काय करायचं.... नाहक दंड भरायचा? तुम्हीच सांगा आता...काय करायच??
©®डॉ सुजाता कुटे
©®swanubhavsaptarang
0 टिप्पण्या