(strength )नारीशक्ती

एकीकडे बाईपण भारी देवा सारखा चित्रपट येतो ज्यात स्त्रियांच्या विविध छटा दाखवलेल्या गेल्या आहेत. स्त्रीचं आयुष्य संसाराच्या जबाबदाऱ्या पेलण्यात कसं निघून जातं. आणि ज्या वेळेस त्या स्वतः साठी काही क्षण जगायचं ठरवतात तर त्यांना चक्क बंडखोरी करावी लागते.

तर दुसरीकडे मी ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करते त्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बल चे ट्रैनिंग घेण्यासाठी चक्क 220स्त्रिया आलेल्या आहेत.त्यातल्या काही कुमारी आहेत तर काही लग्न झालेल्या आहेत.

त्यांना मिळणारं ट्रेनिंग म्हणजे. ट्रेनिंग देणाऱ्या व्यक्ती अतिशय शिस्तबद्ध ग्राउंड ऍक्टिव्हिटी सकाळी सहा वाजता सुरू होणार तर हे ट्रेनी सकाळी पाऊणे सहा वाजता हजर...

ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जर परफेक्ट बनवायचे तर स्वतः देखील परफेक्ट राहण्यासाठी शिकवताना स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवत राहायचं...

मध्ये मध्ये हलके फुलके टोले मारून वातावरण तर हलकं करायचं पण सोबत मुलींना न दुखवता त्यांच्या चुका निदर्शनास आणून देणं...आणि मुलींनीही त्या चुका हसत हसत सुधारणा करणं..

काही मुलींना अवघड जात आहे हे ट्रेनिंग.. त्यात पूर्णतः त्यांचाही दोष नाही..

स्त्री म्हटलं कि मासिक पाळी आली व मासिक पाळीमुळे होणारे विविध आजार तरी त्या आजाराला जुमानत नाहीत..विशेष म्हणजे माघार घेणं त्यांना माहिती नाही... आधीच्या दोन batch मध्ये पहिल्या दोन तीन दिवसातच दोन ते तीन मुले पळून जातात.. पण आजपर्यंत एकाही मुलीने पळवाट काढली नाही. हे कौतुकास्पद आहे.

 तात्पुरता आराम करतील पण लागलीच जोमाने उभ्या राहतील... आणि आता तर त्यांच्या ट्रेनिंगची सुरुवातच आहे.. फक्त पहिला आठवडा झाला आहे... आज त्यांचं हे attitude आहे तर विचार करा 45 दिवसाचं ट्रेनिंग झाल्यावर त्या किती एक्स्पर्ट असतील...

हे सर्व इथे मांडायचे तात्पर्य म्हणजे सध्यस्थीतीत स्त्रिया कुठेच कमी नाहीत...फक्त आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. आणि मला तर वाटतं ज्या दिवशी स्त्री असं, स्त्री तसं असा विचार कुणाच्याही मनात येणार नाही... आणि कुठलाही स्त्री पुरुष भेदभाव नसेल तो दिवस खऱ्या अर्थाने सर्वासाठी समसमान असेल..

©®डॉ सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या