किती सांगायचं मला(भाग 18)

अमोघ ऑफिसला येऊन गेल्याने तीला आता त्याला सगळं खरं सांगणं आवश्यक झालं होतं... समायराच्या मनाला ते बिलकुल पटलं नव्हतं.. कारण लहान भाऊ असून तो त्याच्या ताईकडे एक आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून बघायचा... तिच्या पाऊलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करायचा.... म्हणून त्याला कसं समजावून सांगावं हा तिच्यासमोर गहन प्रश्न होता.

ऑफिस सुटल्यावर समायरा खूप टेन्शन मध्ये आली... निघताना समायरा काहीच बोलत नाही हे तुषारच्या लक्षात आले.... 

तुषार : तूला अमोघचं टेन्शन येत आहे का?? समायरा 

समायरा : हो ना !! काय आदर्श ठेवू त्याच्यासमोर... सांग ना !!

तुषार : मी बोलू का? 

समायरा : तू कोण आहॆस??  I mean  तूझी आणि अमोघची काय ओळख आहे?? तो तुझ्यावर कश्याला विश्वास ठेवेल?? 

तुषार : अगं तूला टेन्शन आलं म्हणून मी बोललो....तूच बोल.... 

समायरा :हूं !! बोलावं तर लागणारच ना.... नाहीतर आई बाबांना ही गोष्ट कळायला वेळ लागणार नाही..... तुषार एक काम कर... मला आज बस स्टॉपवर नको सोडूस नलिनीच्या घराजवळ सोड... ती आज घरी एकटीच आहे... थोडंसं तिच्याशी बोलेल आणि मग घरी जाईल... 

तुषार :ok, exact कुठे सोडायचं?? 

समायराने सांगितलेल्या पत्त्यावर तुषार समायराला घेऊन गेला.... 

नलिनी तिच्या घराच्या बागेतच तिथल्या फुलझाडांना पाणी देत होती.... 
तुषारची नजर नलिनीवर पडली... नलिनी एकदम गोरीगोमटी,  मोकळे लाम्बसडक केस , फिक्कट गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस... झाडांना पाणी देण्यात मग्न होती. 

समायरा बाईक वरून उतरली.... आणि तुषारला म्हणाली थँक्स... मला इथे सोडल्याबद्दल... 

तुषार मनामध्ये : तू कशाला थँक्स, उलटा मीच थँक्स म्हणत त्याने आपला हेल्मेट काढला.... 

समायरा : ठीक आहे, तू येऊ शकतोस.... 

तुषार : ही तूझी मैत्रीण आहे का??नलिनी !! छान आहे... 

समायरा : तू इथे पण सुरु झालास का?? 

तितक्यात नलिनी समायरा आणि तुषारजवळ आली.. 

ती जशी जवळ आली तसं तुषारचे हृदयाची धडधड वाढली 

नलिनी : आलीस का समायरा?  आणि हा !!

समायरा : हा माझा नवरा !!तुषार... 

हे ऐकून तुषारचा चेहरा एकदम पडला.... 

ते पाहून दोघीही हसल्या 😂😂😂 

त्यांना तसं हसताना पाहून तुषार पार गोंधळून गेला... 

कारण त्याला नलिनी मनापासून आवडली होती... त्याला तीचे डोळे, तिच्या गालावर पडणारी खळी आणि तीची बोलण्याची पद्धत पाहून तिच्यावर तो एकदम लट्टू झाला होता.. 

तितक्यात, तूला उशीर होत असेल ना !!समायराच्या आवाजाने तुषार भानावर आला... 
तुषार :अ, हो... असं म्हणून तुषारने हेल्मेट चढवला आणि किक मारून निघून गेला.... 
नलिनी :हँडसम आहे गं !! बघ समायरा चांगला पण आहे तो... मी सगळी माहिती काढलीच आहे ना?

समायरा : नलिनी !! तूला एकदा सांगितलं ना तो माझ्या टाईप चा नाहीये... इतकाच चांगला वाटत आहे तर तुझ्यासाठी बोलू का?? 

नलिनी : इतना अपना नसीब कहा??  जाऊ दे बाई मी काही बोलत नाही.... 

समायरा : आता कसं बोललीस?? 
 
तुषार तिथून गेला खरा पण त्याचं मन तिथेच घुटमळत होतं... किती सुंदर आहे नलिनी... किती छान वाटत आहे तीला बघून... पण ही खडूस समायरा!! 😠माझी नवरा म्हणून ओळख करून दिली... नलिनीला आमच्याबद्दल माहीती असेल का??🤔 देव करो, सर्व माहिती असावं.... असा सतत विचार करत तुषार घरी पोहोचला....

घरी पोहोचल्यावर आईने मेडिसिनची आठवण केली.... 
तुषार : हं, बरं झालं आई तू आठवण केलीस... हा माझा नवीन जॉबचा पहिला पगार असं म्हणून त्याने पगाराचा चेक आईच्या हातावर ठेवला... आणि आईच्या पाया पडला... 

तुषारच्या आईने आता लवकरच बोहल्यावर चढा असा आशीर्वाद देत... हा चेक देवाला दाखवून तू नंतर बँकेत टाक असं सांगितलं... 

तुषार : आई तू पण ना !! तूझ्या या देवाच्या मनात असेल तर तूझी ही इच्छा पण पूर्ण होईल.....असं मनातल्या मनात म्हणाला... 

इकडे नलिनीसोबत थोडी चर्चा केल्यावर अमोघला विश्वासात घेऊन सर्व सांगायचे असे ठरवून समायराने तीचे मन घट्ट केले.... 
क्रमश :
भाग 19 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇


कथा आवडल्यास like करून comment करा. 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
 
©®डॉ.सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या