आमच्यासारखे आम्हीच (भाग 22)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

कळत न कळत अगदी सख्ख्या मैत्रिणी थोडं एकमेकींच्या मनापासून दूर चालल्या होत्या... 

गीतिकाला अंजली जवळची वाटत होती..... तर अनुयाला प्रज्वल मुळे नेहाचा राग 😡येत होता.... 

नेहाला नुकताच प्रज्वल चा फोन📳 येऊन गेल्यामुळे अनुया थोडी डिस्टर्ब झाली. 
ठरल्याप्रमाणे गीतिकाशी बोलण्याचाअनुयाचा चा मूड निघून गेला होता...

सकाळी सकाळी पुन्हा गीतिकाने तीचा मोबाईल डाटा ऑन करून मेसेंजर ऑन केलं.... हे काय अजूनही काहीच मेसेज नाही.... किती बोर करत आहेत गीतेश सर 😒

तितक्यात गीतेश सरांचा मेसेज आला.... दोन images होत्या पहिल्या image मध्ये सॉरी चा मेसेज तर दुसरा गुड मॉर्निंगचा मेसेज होता. 

मेसेज बघताच गीतिका आनंदाने नाचायला 💃💃लागली.... 

सायली : गीतिका !! काय झालं?? काय आनंदाची बातमी आहे... 

गीतिका : अं, काही नाही असंच... बरं चल उठ आवर लवकर... नाहीतर अंघोळीला थंड पाणी मिळेल... 

अनुया मात्र थोडी हिरमुसलेली होती. 
पण आता नेहा आणि प्रज्वल एकाच पॅनलचे उमेदवार असल्यामुळे प्रज्वलने नेहाला फोन 📳केला असेल आणि आपण उगाचच जळत 🔥आहोत अशी स्वतःचीच समजूत काढून अनुया झोपी गेली होती.... 

नेहा : चल अनुया !!लवकर तयार हो...थोडं पाच मिनिट आधीच जायचे आहे... प्रज्वल भेटणार आहे ना... 

अनुया : तो मला थोडाच भेटणार आहे😥.. त्याने तूला फोन📳 लावला होता.... 

नेहा : जेलसी ओहो🔥.... अनुया !! ईतकी जेलसी 🔥चांगली नव्हे... 

नेहमीप्रमाणे चौघी सोबत कॉलेज मध्ये गेल्या..... 

प्रज्वल नेहा ची कॉलेज कॅम्पस मध्ये वाट पाहत उभा होता... 

प्रज्वल : नेहा !!थांब... मला तुझ्याशी एकटीशी जरा महत्वाचे बोलायचे आहे... 

अनुया :  तसंही आम्ही काही ऐकणारच नव्हतो 😏....सायली, गीतिका चला गं.... 

गीतिकाची नजर देखील कॉलेज कॅम्पस मध्ये सैरभैर झाली होती.... गीतेश सरांना शोधत होती.... तितक्यात गीतेश सर एका कोपऱ्यात काही विद्यार्थ्यांशी बोलताना दिसले😍.... गीतेश सर दिसताच गीतिकाला धडधड व्हायला लागलं... हृदयाची स्पंदने ❤️वाढलेली जाणवू लागली.... तीने एकदम सायलीचा हात दाबला.... 

सायली : गीतिका !!  काय झालं?? 

अं काही नाही.. गीतिका एकदम लाजून 🥰म्हणाली.... बापरे 😳सरांना बघूनच आपल्याला ईतकं धडधड होत आहे... भेटल्यावर काय हाल होतील ... असा विचार गीतिकाच्या मनात 🤭आला. 

तितक्यात प्रज्वल शी बोलून नेहा देखील परत आली... नेहाच्या चेहरा खूप खुलला😊 होता.... 

अनुया : काय म्हणाला गं प्रज्वल?? 🤔

नेहा : अं, काही नाही.... 

पण नेहाचा खुललेला चेहरा 😊अनुया च्या नजरेतून सुटला नव्हता. 
फार तर फार काय प्रपोज केलं असेल... पण म्हणून असं मैत्रिणीपासून लपवायचं का 😏....
पण नेहाला प्रज्वल आवडत होता तर तीने मला सांगायचं ना. मी स्वतःहून त्यांच्या पासून दूर झाले असते 🥺.....अनुयाच्या डोळ्यात अश्रू होते... 

लेक्चर्स सुरु झाले... अनुया आणि गीतिकाचं काही लेक्चर्स मध्ये लक्ष लागत होतं तर काही लेक्चर्स मध्ये नाही... 

पण शिकवण्याच्या बाबतीत मात्र आता सगळे लेक्चरर, प्रोफेसर सिरीयस झाले होते.... टर्म exam ची तयारी करून घेत होते... अप्लाईड मेकॅनिक्स आणि इंजिनीयरींग ड्रॉइंग विषय मात्र सगळ्यांच्या डोक्यावरून जात होते.... 

नेहा : मला तर हे ए एम आणि ई डी विषय या वर्षी नक्कीच धोका देणार वाटतं.... 

सायली : हे विषय मला पण खूप अवघड वाटत आहे....
 
प्रॅक्टिस टेस्ट ची अनाऊन्समेन्ट झाली... 

गीतिका : बापरे 😳आता सिरियसली अभ्यास करावा लागेल.... 

अनुया मात्र अजूनही प्रज्वल नेहा ला काय बोलला असेल याचा विचार करत होती... 

पण आता कॉलेजच्या प्रत्येक कॉलेजच्या कार्यक्रमासाठी प्रज्वल आणि नेहाला एकत्र यावेच लागणार...
 मला त्याचं वाईट वाटलं नाही... 
परंतु खरंच प्रज्वल नेहाशी काय बोलला असेल🤔... 
नेहाला पण सांगायला काय होत होतं.🤔. .... 
मी अशी परेशान तर नसते झाले.... 
की प्रज्वल आणि नेहाl🤔... नाही नाही... नेहाला माहिती आहे ना की तो माझा.... पण ती आता बदलली असेल तर?? 🤔

अश्या असंख्य प्रश्नांची शृंखला अनुयाच्या डोक्यात चालली होती..... 

सायली :हॉस्टेलवर गेल्यावर आता अभ्यासाचे एक वेळापत्रक बनवावे लागेल... मला तर खूप टेन्शन येत आहे. 

सगळ्या मैत्रिणी खूप टेन्शन मध्ये आल्या होत्या....अवघड विषयांचा अभ्यास करायचा तरी कसा... बरं हे विषय सगळ्यांना सारखेच अवघड... 

यास्मिन तर ईतकी टेन्शन मध्ये आली... रूमवर आल्या आल्या रडायला लागली... तिचं रडणं दिव्याने पाहिलं... 

दिव्या : ए यास्मिन !!क्या हुआ.... क्यूँ रो रही हो... 

यास्मिनने दिव्याला अवघड विषयांबद्दल सांगितले... 

दिव्या : अरे यास्मिन बस इतनीसी बात पे तुम रो रही हो....तुम मत रो... मै समझा दूंगी... dont worry... 

दिव्याने यास्मिनची स्तिथी कीर्ती आणि मीनाला सांगितली... 

कीर्ती : दिव्या !!तूला आठवतं? आपली टेस्ट अनाऊन्स झाल्यावर मी पण अशीच रडत होते... पण आपल्याला आपल्या सिनियर्सनी काही ट्रिक सांगितल्या आणि आपण पहिल्याच attempt मध्ये पास झालो.... 

मीना : हो, आता आपल्याला देखील तेच करावे लागणार... 

आपण या saturday आणि sunday ला त्यांना हे विषय शिकवू... तसा निरोप आपण यास्मिन जवळ देऊ...असं  म्हणून दिव्याने यास्मिन जवळ वीकएंड ला ए एम आणि ई डी विषय सोपा करून सांगू असा निरोप दिला... 

गीतिका मात्र आता गीतेश सरांना हॉटेल मध्ये मैत्रिणींच्या नकळत कसं भेटायला जायचं.... याचा प्लॅन करत होती...

क्रमश :
भाग 23 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
 












.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या