आमच्यासारखे आम्हीच (भाग 24)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

नेहाला अनुयाची सांकेतिक भाषा कळाली.... 
आता वा एम चे लेक्चर 🙄विषय पुन्हा डोक्यावरून जाणार.... असे म्हणून लागलीच नेहाने विषय बदलला....
 
हॉस्टेल वर आल्यावर अनुयाने नेहाला गीतिका बद्दल सांगायला सुरुवात केली.... 

अनुया : नेहा !! आपली गीतिका, गीतेश सरांच्या जाळ्यात अडकली गं... 😥ईतकं सगळ्यांनी सावध करून काय फायदा गं...  जर तोच तो मूर्ख पणा परत कुठली ना कुठली मुलगी करते... असं काय आहे त्या सरांमध्ये?? 🤔

नेहा : अनुया !! कितीही नाही म्हटलं तरी या गोष्टीला त्यांच्या आजूबाजूचे वातावरण जबाबदार आहे... 

अनुया : म्हणजे?? 

नेहा : आमची घराची परिस्थिती एकदम साधारण त्या मुळे मला बरीच कामे बाहेरची करावी लागतात... ते करत असताना कधी कधी तर समोरच्या माणसाच्या नजरेहून मला अंदाजा येतो की तो चांगला आहे की वाईट.... 
"गीतिका "मात्र आईवडिलांच्या छत्रछाये खाली वाढलेली... कोण चांगलं कोण वाईट हे आतापर्यंत तीचे आईवडील तीला सांगत आलेले असणार... 
पण आता ह्याची जबाबदारी तिच्यावर पडली आहे  ....त्यातच चुकीच्या व्यक्तीला ती आपलं समजून बसली आहे... 

अनुया :पण नेहा !! आता कसं गं, हे तिचं खाजगी आयुष्य आहे... आपली खास मैत्रीण असल्या कारणाने आपल्याला गीतिकासोबत काही वाईट होऊ द्यायचे नाही.... आपल्याला यात काही करता येईल का?? 

नेहाने थोडावेळ विचार केला.... 🤔

नेहा :अनुया !! तू काय कर गीतेश सरांनी गीतिकाला त्यांच्या बायको बद्दल काही सांगितले का हे विचारून घे....आणि अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे... आजकाल अंजली गीतिकाला जरा जास्तच चिकटत आहे... तुझ्यावर गीतिकाचा आता विश्वास बसला आहे... तू तिच्यासोबत सावली सारखी रहा... आपल्या माघारी ती गीतेश सरांना चुकूनही भेटायला नको.....  

अनुया : जो हुकूम मेरे आका 😉...अंजली च्या बाबतीत  हे मात्र खरं आहे..मघाशी  अंजली, सारखं गीतिका, गीतिका करत होती... 

शनिवार, रविवार दोन दिवस कॉलेजला लागून सुट्टी आली. ठरल्याप्रमाणे या सहाही जणींना दिव्या एक विषय शिकवायला लागली.... 

दिव्याने अश्या काही ट्रिक्स सांगितल्या की आता सगळ्यांना लक्षात ठेवणं सोप्प  जात होतं.... 

गीतिकाचं लक्ष मात्र अधून मधून फोन 📳कडे आणि अधून मधून दिव्या कडे जात होते... 

गीतेश सर गीतिकाला हॉटेल मध्ये भेटण्यासाठी फोर्स करत होते. पण गीतिकाची हिम्मत होत नव्हती... 

शेवटी दिव्याचे शिकवून झाल्यावर अंजली किंवा अनुया दोघींपैकी एकिला विश्वासात घेऊन जावे लागेल असा विचार गीतिकाने केला....

सायली : दिव्या !! खूप खूप थँक्स, तू आम्हाला ईतकं छान शिकवलं....नाहीतर असं वाटत होतं की ह्या विषयात पास होऊ की नाही... 

दिव्या : अगं सायली !!याच अनुभवातून आम्ही गेलो... म्हणून तर तुम्हाला शिकवलं ना... बरं आता ऐका... उद्या कीर्ती किंवा मीना दोघींपैकी एक जण तुमचा दुसरा विषय घेईल.... कधी घ्यायचा.... 

नेहा : उद्या  सकाळी लवकरच घेऊन टाका.... मला अकरा वाजता एक महत्वाचे काम आहे.... 

ठरलं तर मग उद्या सकाळी नऊ वाजता ईथेच या साईड रूम मध्ये  जमा व्हायाचं.... असं म्हणून दिव्या निघून गेली 

अनुया : नेहा !! अकरा वाजता तूला काय काम आहे?? 🤔

नेहा : अगं प्रज्वलने मला भेटायला बोलावले आहे.... 

अनुया : काय 😳? 🔥 कुठे?? 

नेहा : रविवारी कुठे बोलावणार.... कॉलेजच्या लायब्ररी समोर😊...काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे म्हणे... 

अनुया : ए नेहा !!आजकाल फार प्रज्वल, प्रज्वल करत आहेस.... तो माझा क्रश आहे विसरलीस का?? 

नेहा : मी नाही विसरले... पण सारखं सारखं तोच मला बोलावतो🙄.... मी तरी काय करणार 😇

अनुया :पण तू त्याला टाळू शकतेस ना.... 

नेहा : तोच तर प्रॉब्लेम आहे की मी त्याला टाळू नाही शकत... 

अनुया : हूं... 

नेहा : बरं ते जाऊदे.... गीतिकाचे पुढे काय?? 

अनुया :गीतिकाशी या विषयावर अजून तरी परत काही बोलणं झालं नाही... 

नेहा : ठीक आहे लक्ष असू दे.... 

गीतिका : अनुया !! मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे ईकडे जरा बाहेर येतेस का?? 

अनुया : आलेच....

गीतिका :अनुया रागावणार नसशील तर एक विचारू... 

अनुया : गीतिका !! तू ईतकी फॉर्मल कधीपासून झालीस... 

गीतिका : अगं तसं नाही... पण गोष्टच तशी आहे... हे बघ गीतेश सर मला बाहेर भेटायचं म्हणत आहेत... 

अनुया : 😳 बापरे... गीतिका !! बाहेर.... अगं पणतूला भीती वाटत नाही का?? 

गीतिका : भीती कसली भीती 

 अनुया :आपण त्यांना बाहेर भेटलो हे त्यांच्या wife ला माहिती झाले तर.... 

गीतिका :ते गीतेश सर बघतील... आपल्याला काय करायचं.... तसंही सर म्हणत होते की त्यांचे आणि त्यांच्या बायकोचे बिलकुल पटत नाही...... 

अनुया : अगं गीतिका !! ते पण लव्ह मॅरेज होते ना... मग अजून सहा ते आठ महीने नाही झाले त्यांचे लग्न होऊन.... 

गीतिका : मला ते काही माहिती नाही... तूला माझ्यासोबत यायचे नसेल तर तसं सांग.😡.. मी दुसरं कुणी बघते... 

अनुया : अगं गीतिका!! ईतकी का चिडत आहेस ... मी फक्त संभाव्य धोका सांगत होते.... अन काय गं... दुसरं तूझ्यासोबत. कोण येऊ शकणार होतं?? 🤔

गीतिका : "अंजली " अजून कोण??

अनुया :😳 काय?? अंजली... तीला सगळं माहिती आहे?? 

गीतिका : हो... मग तू काय ठरवलं आहेस?? 

क्रमश :
भाग 25 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचायची असल्यास खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा,  माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या