नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
अनुया : ... पण तू अंजलीला गीतेश सरांबद्दल का सांगितलंस?? तू बघितलं नाही का तीने आपल्या ग्रुपला कसा धोका दिला होता...
गीतिका :अगं!! मी स्वतःहून नाही सांगितलं... पण आपल्या इलेक्शनच्या दिवशी मला गीतेश सर जे खुणावत होते ते तीने बघितलं... पण तू सांग ना....तू माझ्यासोबत येणार आहेस का??
अनुया : अच्छा.... हो, हो मी येते.... तू अंजलीला काही विचारू नकोस....
गीतिका : ओ अनुया !!थँक्स अ लॉट😍... लव्ह यू डिअर.... अगं तू तयार असल्यावर मला अंजलीची काय गरज आहे...
अनुया :अगं आपण बेस्ट फ्रेंड्स ना😍... तितकं करायला नको... बरं ऐक ना.... तूला गीतेश सरांनी त्यांच्या सगळ्या लग्न आणि घटस्फोटा बद्दल काय काय सांगितलं गं....
गीतिकाने,गीतेश सरांनी जे सांगितलं होतं ते सर्व काही अनुयाला सांगितले.
अरे बापरे 😳गीतेश सरांनी तर सगळे एकसे बढकर एक कारण दिले आहेत.... अश्याने तर कुणालाही विश्वास बसायचा..... मग ही गीतिका काय चीज आहे... चला गीतिकाच्या निमित्ताने का होईना या गीतेश सरांना भेटण्याचा योग येत आहे... बघुयात तर खरी हा माणूस कश्यापद्धतीने भुरळ पाडतो ते..... 🤔
गीतिका : अगं अनुया !! कुठे हरवलीस... मी गीतेश सरांना आपल्या भेटीची वेळ चार वाजताची सांगू का?? 🤔
अनुया : अं, हो सांग.....
अनुयाला ह्यातलं काहीच आवडत नव्हतं... तीला गीतेश सरांना अश्याप्रकारे बिलकुल भेटण्याची ईच्छा नव्हती. पण आपली मैत्रीण सुरक्षित राहावी म्हणून तीने गीतिका सोबत हॉटेल मध्ये जाण्यासाठी होकार दिला होता.
सकाळी कीर्तीने देखील दुसरा हार्ड sabject खूप सोपा करून सांगितला.... draw करण्यासाठी काही स्पेशल स्किल्स सांगितल्या.... त्या मुळे आता दोन्हीही अवघड विषयांची टेस्टची तयारी झाली....
सायली : खरंच आपले सिनियर्स किती छान आहेत ....बघ आपले दोन अवघड विषय पक्के करून घेतले....
नेहा : हो ना....सुरुवातीला आपल्याला ह्यांचा किती राग😡 आला होता ना....
अनुया : खरंय....
बोलत बोलत नेहा तयार होत होती..
प्रज्वललाच भेटायला जायचं ना... मग ही ईतकी का तयार होत आहे🙄....अनुया टक लाऊन नेहा कडे बघत होती.
नेहा : चल अनुया !! मी जरा जाऊन येते.... बघते प्रज्वलला काय ईतकं महत्वाचे बोलायचं आहे....
अनुया : नेहा !! ऐक ना... चार वाजता मला गीतिका सोबत जायचं आहे...मला जाम टेन्शन येत आहे गं...
नेहा : dont worry अनुया !!आपण गीतिकाच्या चांगल्यासाठी हे करत आहे.... असं समज की ही आपली एक मिशन आहे....
अनुया : हूं...
नेहा प्रज्वलला भेटण्यासाठी निघून गेली.......
दुपारी अनुया आणि गीतिका गीतेश सरांना भेटण्यासाठी तयार झाल्या....
एकदम अचानक अनुयाला तिच्या मम्माचा फोन📳 आला....
अनुया : मम्माचा फोन 📳?? ओह कालपासून फोन 📳करेन म्हटलं आणि मी फोन📳 केलाच नाही....hi मम्मा!!
अनुयाची मम्मा : अगं अनुया!! तू कुठे बाहेर जाणार आहेस का?🤔
अनुया : 😳 का? गं....
मम्माला कळाले की काय?? की मी गीतिका सोबत गीतेश सरांना भेटायला जाणार आहे.... मी मम्माशी खोटं बोलू शकत नाही.... तिच्यापासून काही लपवत नाही म्हणून तर मला तिला स्वतः फोन📳 करण्याची हिम्मत झाली नाही....😒...
अनुयाची मम्मा : अगं आज sunday आहे ना... तूमची मेस संध्याकाळी चालू नसते म्हणून तूम्ही बाहेर जाणार असणार... तर मी हे सांगत आहे की बाहेर जाऊ नका आम्ही आता अर्ध्या तासात हॉस्टेलला पोहोचत आहे... तू आणि तूझ्या तिन्ही फ्रेंड्स तयार रहा.... आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे...
अनुया : बरं बरं... मी सगळ्यांना तयार राहायला सांगते...ठेवते फोन📳...
अनुया : नेहा!! घोळ झालाय... माझे मम्मा आणि डॅडा दोघेही आता अर्ध्या तासात ईथे पोहोचत आहेत.... आपल्या सगळ्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जाणार आहेत... आता गीतिकाचं काय करायचं??
नेहा : 😳 अरे बापरे.... अनुया!!बरं झालं तूम्ही बाहेर गेल्यावर ते आले नाही... नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक 🤔....
अनुया : नेहा!!मी जरा गीतिका सोबत बोलून बघते....
अनुया गीतिकाच्या रूम मध्ये गेली.... गीतिका तोंडावर चादर घेऊन तीला झोपलेली दिसली....
अनुया : सायली!! गीतिका तर तयार झाली होती ना...आता काय झालं तीला??🤔ही अशी का झोपली आहे.... गीतिका!!ए गीतिका!! उठ ना....
गीतिकाने तिच्या तोंडावरची चादर हटावली 😭तीने तीचे डोळे पुसले आणि बसून अनुयाला म्हणाली... आपला गीतेश सरांना भेटण्याचा प्लॅन फ्लॉप झाला😒....
अनुया :😳 कसा काय?? मी सांगायच्या आधीच हिला कळाले की काय??
गीतिका : गीतेश सरांचा मेसेज होता.... अचानक त्यांच्या वडिलांची तब्ब्येत बिघडली आहे. ते सिरिअस आहेत म्हणून सरांना दवाखान्यात जावे लागणार आहे....
अनुया :अच्छा हे कारण होतं... थँक गॉड...
गीतिका : थँक गॉड म्हणजे??🥺
अनुया : अगं माझे मम्मा आणि डॅडा येत आहेत... आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत...त्यांनी आपल्याला सगळ्यांना तयार व्हायला सांगितलं आहे....सायली!!तू पण लवकर तयार हो....
चौघी मैत्रिणी तयार झाल्या.... तितक्यात अनुयाचे मम्मा, डॅडा हॉस्टेलला पोहोचले....
अनुयाची मम्मा : अनुया!! बेटा आम्ही पोहोचलो... तूम्ही रेडी झाले का??
अनुया : हो मम्मा!!आलोच....
हॉस्टेलच्या बाहेर आल्या आल्या अनुयाने तिच्या मम्मा ला आणि डॅडाला मीठी मारली....
अनुया : मम्मा!! छान Surprise दिलंस....
अनुयाची मम्मा :तूझे डॅडा... तूला माहिती नाही का??
अनुयाचे डॅडा : चला गाडीत बसून बोलू....अगं अनुया!!माझा एक प्रोजेक्ट पुण्यात सुरु करणार आहे त्याची मिटिंग होती... तुझ्या मम्माला म्हटलं चल माझ्यासोबत योगायोगाने आज संडे पण आहे... माझी मिटिंग हेरिटेज फाईव्ह स्टार हॉटेलला आहे.... तिथेच सगळ्यांचं जेवण देखील होईल...
फाईव्ह स्टार हॉटेल 😳तेही पुण्याचं?? Wow मी पहिल्यांदाच फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाणार... असा विचार करत नेहा जरा सुखावली😊....
क्रमश :
भाग 26 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवाती पासून ऐकण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
.
0 टिप्पण्या