नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
हॉटेल हेरिटेज ला पोहोचल्यावर हॉटेलला पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या....
सायली : अबब किती भव्य आहे हे हॉटेल??🤔
नेहा : होना, हॉटेल बघून माझे तर डोळेच दिपून गेले आहेत.....
अनुया : खरंच खूप छान हॉटेल आहे हे... आणि खूप छान मेंटेन पण करतात..... इथलं जेवण देखील अप्रतिम आहे.
गीतिका मात्र तीचा चेहरा पाडून बसली होती... गीतेश सरांना भेटण्यासाठी ती खूप उत्सुक होती... पण तीचा आता मूड खराब झाला होता....
हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर reception देखील खूप भव्य दिव्य होतं.... तिथे इंपोर्टेड सोफ्याची व्यवस्था केली होती....
एका सुंदर दिसणाऱ्या,पांढरी स्कर्ट मिडी घातलेल्या आणि चेहऱ्यावर पूर्ण मेकअप असणाऱ्या मुलीने स्मित 😊करून या सर्वांना वेलकम केलं....
त्या मुलीशी अनुयाचे डॅडा काहीतरी बोलले... तीने एका वेटरला आवाज देऊन मिटिंग चे ठिकाण दाखवायला सांगितले....
आणि या सगळ्यांना ती मुलगी हॉटेलच्या एका बाजूला घेऊन गेली... तिथे खूप सुंदर लॉन होती.... झाडांचे वेगवेगळे आकार होते आणि तिथेच विविध आकाराचे बेंचेस होते तिथे बसण्याची सोय होती.... आणि तिथेच हॉटेल वाल्यानी हाय टी ची सोय केलेली होती....
सायली :खरंच ईथे आल्यावर तर आपण हॉस्टेलला राहतोय याचा विसर पडत आहे... खूपच सुंदर ambience आहे....
गर्ल्स आज आपल्याला हॉस्टेलला परत जायला उशीर होणार आहे... चहा घेऊन झाल्यावर अनुया म्हणाली...
अनुयाची मम्मा : dont worry बेटा!!तूझ्या डॅडाने परमिशन काढली आहे.... त्या मुळे एंजॉय करा 😊....
अनुया : ओ मम्मा!!किती छान....
नेहा : हो काकू!! तूम्ही फक्त अनुयाला नाही तर आम्हालाही ईथे आणलं.... थँक्स काकू...
अनुयाची मम्मा :अरे तूम्ही तिच्या खास मैत्रिणी ना आणि आता तर रूम पार्टनर, एका फॅमिली सारखं, उलट एकटी अनुया आली असती तर बोर झाली असती.....मी तिथे एका बाकावर बसते तुम्हाला हॉटेल मध्ये फेर फटका मारायचा असेल तर मारून या.....
नेहा, सायली आणि गीतिका!! तुम्ही तिघी फिरून या... मी मम्मा जवळ थांबते.... मम्मासोबत जरा गप्पा मारते.हे बघा,त्या तिथे साईडने जा, तिथे स्विमिंग पूल आहे... समोर बोट दाखवत अनुया म्हणाली....
सायली : बरं ठिक आहे... गीतिका आणि नेहा चला गं .....
गीतिका :तूम्ही दोघीच जा... माझा मूड नाहीये...😒
अनुया : गीतिका!!तू ऐक माझं तिथे खूप सुंदर गार्डन पण आहे... गार्डन पाहून तूझा मूड नक्कीच बदलेल....
सायली :गीतिका!!जास्त भाव खाऊ नकोस .... चल सोबत..,
गीतिका : बरं बाई मी आले
असं म्हणून तिघी जणी स्विमिन्ग पूल च्या दिशेने निघाल्या...
नेहा :गीतिका!! काय झालं??🤔 तूझी तब्येत बरोबर नाही का??
गीतिका : नाही गं तसं काही नाही....बस असंच बोर होत आहे...
सायली : अनुया!! म्हणाली ते खरं आहे.
😳काय? गीतिका एकदम घाबरून म्हणाली...
सायली : किती सुंदर गार्डन आहे हे... पण गीतिका!! तू का ईतकी घाबरलीस 🤔
गीतिका : अं, काय?? काही नाही....
नेहा : अरे तिथे कसला प्रोग्राम चालू आहे... बघ टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत आहे.....
सायली : चल आपण बघू तरी काय चालू आहे ते??🤔
गीतिका : ए जाऊ द्या ना.... दुसऱ्यांचे कार्यक्रम चालू आहेत आपण त्यात जाणं बरं नव्हे...
नेहा :🤦♀️ अगं गीतिका!!आपण फक्त काय कार्यक्रम चालला आहे ते बघू... त्यांच्या मध्ये जायचं नाही.....
सायली : चला लवकर... नाहीतर कार्यक्रम संपून जाईल...
जसं जसं त्या तिघी त्या घोलक्याच्या जवळ जात होत्या तसं तसं लोकांचे काही वाक्य त्यांच्या कानावर पडत होते...
छे बाई या वीक मध्ये पण तेच कपल विनर आहे.... प्रत्येक संडेला येऊन या कपल ने कपल गेम्स मध्ये जिंकण्याचा अगदीच चंग बांधला आहे......पण काहीही म्हणा... प्रेम असावं तर या कपल मधल्या प्रेमवीरा सारखं.... तो त्याच्या बायकोचे किती लाड करतो...
नेहा : बापरे 🙄किती ते कौतुक... मला तर आता त्या कपलला बघायची उत्सुकता लागली आहे...
नेहा, सायली आणि गीतिका थोडं पुढे गेल्या आणि बघतात तर काय 😳 गुडघ्यावर बसलेले गीतेश सर त्यांच्या उभ्या असलेल्या बायकोला गुलाबाचं फूल देत होते....
नेहा : गीतिका!! ते बघ गीतेश सरच आहेत ना.... त्यांची बायको पण दिसायला किती सुंदर 🤩आहे ना🤔.. चला आपण त्यांना भेटायचं का??...
गीतेश सरांना अश्या पद्धतीने पाहून गीतिकाला एकदम घेरी आल्यासारखं झालं.... तिच्या पायाखालची जमीन सरकली.... आपल्यासोबत केवढा मोठा धोका झाला हे तिच्या लक्षात आलं... पण तिच्या माहितीप्रमाणे गीतिका आणि गीतेश सरांबद्दल,नेहा आणि सायलीला काहीच माहिती नव्हतं.....
भेटायचं का गीतेश सरांना.... त्यांना congrats करू... गीतिकाच्या उत्तरासाठी सायली वाट बघू लागली....
गीतिका : काहीच गरज नाही...😡.. चला परत... मला असल्या फालतू माणसाचं तोंडही बघायचं नाही....
आता गीतिकाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घातले गेले होते....
गीतिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.... वडील सिरीयस काय?? 🤔😡 किती विश्वास ठेवला मी या माणसावर ... त्यांना काय म्हणावं?? मीच मूर्ख.... नुसतं त्यांच्या दिसण्याला आणि गोड बोलण्याला भाळले....
तरी सगळे जण मला सावध करण्याचा प्रयत्न करत होते पण मी.... मी जणू आंधळी झाले होते....
गीतिका विचार करत करत अनुया जवळ पोहोचली....
तिला अश्रू अनावर झाले होते🥺.... पण अनुयाच्या मम्माला पाहून गीतिकाने तीचे अश्रू कसे बसे रोखले.....
तितक्यात अनुयाचे डॅडा मिटिंग संपवून आले.... थोडावेळ सगळ्यांसोबत गप्पा टप्पा झाल्यावर त्यांनी जेवण मागवले...
सर्वजण व्यवस्थित जेवले फक्त गीतिका मात्र बरोबर जेवली नाही... तिचं जेवणात लक्षच नव्हतं....
आपण गीतेश सरांमध्ये कशाप्रकारे अडकत गेलो ह्याचा वारंवार विचार गीतिका करत होती....
नेहा आणि सायली देखील गीतिकाचा पडलेला चेहरा बघून विचलित झाल्या होत्या😒.... आपली खास मैत्रीण दुखावली गेली आहे.. हे त्यांना बघवत नव्हतं...
दोघीनींही हॉटेलमध्ये अनुयाला गीतेश सरांबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला.... पण जमलं नाही....
जेवण झाल्यावर अनुयाच्या डॅडाने सगळ्यांना हॉस्टेलला सोडलं...
रूमवर आल्या आल्या गीतिका अनुयाच्या गळ्यात पडून रडायला😭 लागली... अक्षरश: हुंदके द्यायला लागली....
अनुयाला मात्र समजत नव्हते गीतिका का ईतकी का रडत आहे....
अनुयाने तिला थोडं रडू दिलं आणि मग तीला विचारलं काय झालं अनुया!!का ईतकी रडत आहेस??....
हॉटेल हेरिटेज गीतिकाने मध्ये काय बघितलं ते अनुयाला सांगितलं...
अनुया : हे कारण आहे तर??गीतिका!! मला तू सांग गीतेश सरांनी तूला बघितलं??🤔
गीतिका : बघितलं नसावं बहुतेक... नाही, नाही बघितलं....
क्रमश :
भाग 27 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या