नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
अनुया :बघितलं असेल तर ते तूला सकाळी मेसेज करणारच नाहीत.
नेहा :गीतिका!! प्लीज तू रडू नकोस... हे बघ आम्ही तुझ्या सोबत आहोत.
गीतिका एकदम आश्चर्याने😳 नेहा कडे बघायला लागली..
अनुयाने होकारार्थी मान हलवली आणि गीतिकाला म्हणाली बरं झालं, बला टळली.... नाहीतर आज आपण सरांना भेटायला जाणार होतो.....
गीतिका : मी तर पुरती गोंधळली आहे....
सायली : काही नाही गीतिका!! हे नुसतं आकर्षण होतं...बरं झालं वेळेवर सगळं कळालं....
नेहा : हो ना.... गीतिका!! आणि असल्या फालतू माणसासाठी रडण्याची काहीच गरज नाहीये.... आता हुशारीने राहायचं बस्स...
गीतिका : हुशारीने राहायचं??🤔 फक्त ईतकंच.... मग मला सोडून तो माणूस आणखी एखादी गीतिका पकडेल..... अजून एखाद्या मुलीला त्याच्या जाळ्यात अडकवेल.....
नेहा : बरं झालं त्यांनी आपल्याला पाहिलं नाही....
गीतिका : पाहिलं की नाही हे तर आपल्याला कळेलच....सरांनी मला तिथे पाहिलं असेल तर उद्या good मॉर्निंग चा मेसेज येणार नाही....पण मला आता ईथेच नाही थांबायचं....
अनुया :😳 म्हणजे? काय करणार आहेस तू....
गीतिका : त्या सरांना चांगली अद्दल घडवणार....
सायली : अगं कश्याला??🤔 उगाचच डोक्याला ताप...
गीतिका : सायली!! डोक्याला ताप कसाकाय??🤔तू विचार कर आपल्याला ईतकं सिनियर मुलांनी सांगितलं... तू देखील वारंवार मला सावध करत होती तरी मी मला जे काय करायचं तेच केलं ना...
नेहा : हो, मग....
गीतिका : मग मला असं काही करायचं आहे की सर परत असले पाऊल उचलणार नाही आणि माझ्यासारख्या अजून काही मूर्ख मुली असतील त्या देखील सावध होतील....
सायली :अगं आता कश्याला त्या फंदात पडतेस.... आपण भलं नी आपला अभ्यास भलं....
नेहा : नाही सायली!! गीतिका बरोबर बोलत आहे......
अनुया : मला पण गीतिकाचं पटतंय.... पण गीतिका तू आता काय करणार??
नेहा : मला वाटतं आपल्याला गीतेश सरांच्या चारही बायकांना गाठावं लागेल.... त्यांनी सरांना का घटस्फोट दिला ह्याचे कारण समजून घ्यावे लागेल....
गीतिका : exactly, मला पण हेच वाटत होते.... पण त्यांचा adress आपल्याला कसा मिळणार?🤔
नेहा : इच्छा तिथे मार्ग.... अजून काय...
अनुया : बरं ऐका ना.... गीतेश सरांच्या विषयाने जरा डोकं जड पडलं आहे.... आता तो विषय बदला ना.... काहीतरी छान गप्पा मारू....
नेहा : हूं... बरं गीतिका!!तूला मॅगी करू का... रडून रडून तूला भूक लागली असेल ना 😉
गीतिका : करा करा मस्करी करा 😏आणि हो त्याच्यासोबत मॅगी देखील करा😍....
अनुया: हे बघ हे काय आहे??
सायली : डेबिट कार्ड अजून काय??
अनुया : अं हं... डेबिट नाही क्रेडिट कार्ड आहे... डॅडा ने आता आपल्याला सोडताना दिला...
सायली : क्रेडिट कार्ड??🤔 कश्यासाठी... आपल्याला त्याची गरज नाही भासत... तरीपण....
अनुया : अगं परवा माझा बर्थडे आहे ना... बर्थडे सेलेब्रेशन चांगलं कर म्हणाले....चांगला ड्रेस, त्यावर काही मॅचिंग ज्वेलरी वगैरे घेण्यासाठी आणि जमलं तर ईथे हेरिटेज मध्ये सेलेब्रेशन करन्यासाठी म्हणून डॅडाने हे कार्ड दिलं आहे ...
नेहा : अरे वा, म्हणजे आता तूझा बर्थडे एक चांगला फाईव्हस्टार इव्हेंट होणार असं दिसतंय....
अनुया : नाही गं मी ईतका खर्च नाही करणार... मला वाटतं एखादा कॅफे आपण बूक करू आणि पूर्ण क्लासला बर्थडे पार्टी देऊ... खूप मज्जा येईल....
नेहा : are you sure?? पण प्रज्वल तर आपला बॅचमेट नाही ना... मग त्याला बोलावणार नाही का
बोलवायचं तर आहे 🤔... पण तो येईल का?? आणि आजकाल तर फार नेहा नेहा चालू आहे त्याचं 😏... तीला भेटतो काय?? काय ईतकं महत्वाचे बोलायचं असतं कुणास ठाऊक....अनुया मनातच विचार करत होती...
नेहा :अगं अनुया!!कुठे हरवलीस?? मी तुझ्याशीच बोलत आहे....
अनुया : अं, काही नाही....त्या दिवशी बघू...
प्रज्वल सतत नेहाला या ना त्या कारणाने भेटत आहे हे रोहनच्या देखील लक्षात आले होते...त्या वरून प्रज्वलला नेहा आवडते असा अंदाज रोहनने बांधला होता....
तसं तर एकदाचं प्रज्वलला विचारून टाकावं असं रोहनला वाटत होतं पण कितीही मैत्री असली तरी एक सिनियर आणि ज्युनियर ची पुसटशी रेषा त्याच्या नजरे समोर त्याला दिसत होती....
दुसऱ्या दिवशी सकाळीच गीतिकाला गीतेश सरांचा गूड मॉर्निंग मेसेज आला.... तो मेसेज 😡पाहून गीतिकाला गीतेश सरांचा खूप राग आला... तीने रागातच 😡तो मेसेज सायली ला दाखवला....
सायली : किती निर्लज्ज आहे हा माणूस... त्याला कसलीच भीती नसेल का गं...
गीतिका : थांब मी चांगली शिव्या देते....हा माणूस समजतो काय स्वतःला??
सायली : अगं गीतिका!! थांब... तू तसं काहीच करू नकोस.... उलट तू त्यांना त्यांच्या वडिलांच्या तब्येतीबद्दल विचारपूस कर....बघ तर किती खोटं बोलतात ते....आणि जोपर्यंत आपण त्यांच्या आधीच्या बायकांना भेटत नाही तोपर्यंत तूला त्यांच्याबद्दल कळालय हे त्यांच्या लक्षात पण येऊ देऊ नकोस.....
गीतिका : हं बरोबर... मी आता तसंच करते..
gm sir... आता तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे??
गीतेश सर : आता बरी आहे.... काल खूप क्रिटिकल होते... ICU त होते... मी दिवसभर त्यांच्या जवळ होतो.... जेव्हा त्यांना बरं वाटायला लागलं तेव्हाच मी तिथून हललो....
बापरे 😳 कसलं धडाधड खोटं बोलतोय हा माणूस.. असं वाटतंय की त्याला म्हणावं तुमच्या वडिलांना काय हेरिटेज हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं की काय??😡😡 👊 पण नाही माझं आता इतक्यावर भागणार नाही ना....
गीतिकाने तिचं गीतेश सरांसोबतचं चॅटिंग अनुया आणि नेहाला देखील दाखवलं....
नेहा : गीतिका!!आता तर या माणसाला सोडायचं नाहीच... त्याला वाटलं पाहीजे की आपण आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी किती चुकीच्या व्यक्तीची निवड केली आहे.😡....
अनुया : चला तर मग मिशन गीतेश सर started....
नेहा : एक दो तीन चार, चारो मिलके साथ चले तो करदे चमत्कार 😍😍
क्रमश :
भाग 28 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या