खेळ कुणाला दैवाचा कळला (भाग 2)


जय अगदी अर्धातास आधीच ऑफिसला पोहोचला.. कळत नकळत दर पाच मिनीटांना त्याची नजर वृंदाच्या टेबल कडे जात होती...  थोडया वेळाने अचानक त्याच्या हृदयाची धडधड वाढली समोरच त्याला वृंदा दिसली  इतक्या दिवसात आजच त्याने वृंदाला न्याहाळून बघितले होते...  वृंदा खूप सुंदर दिसत होती.... आजवर त्याने कधी तिच्याकडे अश्या नजरेने पाहिलेच नव्हते..  वृंदा आल्या आल्या आपला टेबल आवरू लागली... तिच्या टेबलवर काही नवीन फाईल्स येऊन पडल्या होत्या त्या बघत असताना नकळत तीचे लक्ष जयकडे गेले...  दोघांची नजरानजर झाली... वृंदालाही एकदम धस्स झालं.. तीने एकदम मान खाली केली...  वृंदाला वाटलं की चुकून नजरानजर झाली असेल... असा विचार करून पून्हा आपल्या फाईल्स चाळण्यात व्यस्त झाली...  तब्बल दहा मिनिटांनी पुन्हा वृंदाने मान वर केली तो जय तिला घुरून बघत आहे हे तिच्या लक्षात आले  आजचा दिवस काहीतरी वेगळाच आहे हे आता वृंदाने हेरले होते...  जय काहीतरी वेगळे वागत आहे हे एव्हाना तीला लक्षात आले होते...  पण वृंदा थोडी प्रॅक्टिकल विचार करणाऱ्यातली मुलगी होती... ती स्वतःची समजूत घालायला लागली कुठे जय... आपला बॉस आणि कुठे आपण आपल्याच परिस्थितीने बेजार आहोत....  आपल्या बॉस जयच्या मागे तर खूप सुंदर सुंदर मूली असतील... तो कश्याला आपला विचार करेल??  वृंदा मॅडम आपली पायरी ओळखा आणि आपल्या कामाला लागा.... नको काही विचित्र विचार करायला...असा विचार करत ती कामाला लागली.  ती काम करायची पण चुकूनही तीचे लक्ष जयकडे गेले की तो तिला न्याहाळताना दिसायचा.... मग वृंदा कावरी बावरी व्हायची...  इकडे जय मात्र पूर्ण पणे कामातून गेल्यासारखं वागत होता... हातातील एकही काम त्याने पूर्ण केले नव्हते... आज त्याने त्याचा लॅपटॉपही उघडला नव्हता... महत्वाच्या ई-मेल देखील त्याने पाहिल्या नव्हत्या....  जय फक्त वृन्दाकडे एकटक बघत होता.... ऑफिस सुरु होऊन दोन तास झाले तरी कामाला सुरुवात नाही....  शेवटी जयच्या केबिनमध्ये त्याचा असिस्टंट अमित आला... जयला त्याचा लॅपटॉप उघडून महत्वाच्या ई-मेल चेक करायला लावल्या... ई-मेल बघताच जय ने एकदम उडीच मारली.... जयला दिल्लीला एका महत्वाच्या कॉन्फरन्स साठी दिल्लीला जाण्यासाठी निघावे लागणार होते...  मी आता कसं राहू.... मी नाही राहू शकणार..वृंदा शिवाय   पण कॉन्फरन्सला तर मला परवाच जायचं आहे.  नंतर वोर्कशॉप ही आहे तेही पूर्ण दहा दिवस...  जय खूप परेशान झालेला होता. काय करावे हे त्याला कळत नव्हते... जयने स्वतःच्या मनाची घालमेल त्याच्या असिस्टंट मित्र अमितला सांगितली.. अमित म्हणाला इतकेच ना.... मी आता तुझ्यासोबत दिल्लीला येणार आहे... निघताना ऐनवेळी मी आजारी पडल्याचे नाटक करतो... तू मग ऐनवेळी तिला सोबत येण्याची विनंती कर.... तिला यावेच लागेल....  अमित :पण मित्रा एक गोष्ट लक्षात ठेव.....  वृंदा खूप सिनसियर आहे...  ती सेन्सिटिव्ह पण वाटते....  तिला तू जर डायरेक्ट प्रपोज केलेस तर ती तूला नकार देऊ शकते.... 

तूला आधी तीचे मन जिंकावे लागेल.... 

तिच्या मनात काय चालले याचा अंदाजा घे.... 

आणि मगच तिला प्रपोज कर.... घाई करू नकोस..  अजून एक गोष्ट वृंदा ही मध्यमवर्गीय आहे... तूझ्या घरच्या लोकांना हे नाते मान्य होईल का?  जय :अमित अरे मलाही माहिती नव्हतं वृंदा मला आवडते ते...तिच्या कामांची सवय झालेली...कळत न कळत तिचीच सवय झालेली... 

काल तीचा कोण तो मित्र आला अनिकेत नावाचा आणि पूर्ण ऑफिसमध्ये चर्चा झाली... 

मला अचानक असुरक्षित वाटायला लागलं कुणीतरी आपलं आपल्यापासून दूर जात आहे की काय याची भीती वाटायला लागली.......  

 क्रमश :

भाग 3 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लीक करा 👇

https://www.swanubhavsaptarang.com/2020/04/3.html?m=1

©®डॉ सुजाता कुटे 


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या