खेळ कुणाला दैवाचा कळला (भाग 3)


अमित : तरी माझं ऐक जय.... तू जे काही करायचं आहे ते विचार करून कर... घाई करू नकोस.. 

ठरल्याप्रमाणे अमितने दिल्लीला जाण्याच्या आधल्या दिवशी रात्री बरोबर अकरा वाजता वृंदाला फोन केला..  वृंदा: इतक्या रात्री कुणाचा फोन आहे?? अमित सर आता यांनी कश्याला फोन केला असेल?? प्रश्नार्थक चेहऱ्याने वृंदाने आपला फोन कानाला लावला...  अमित : जरा खोकतच... वृंदा तूला उद्या जय सरांसोबत दिल्लीला जावे लागेल... मी जाणार होतो... पण अचानक मी आजारी पडलो... आणि कॉन्फरन्स मध्ये जे पेपर प्रेझेंट करायचे आहेत त्याचे डिटेल्स फक्त मला नी तूलाच माहिती आहे... त्यामुळे तूला विनंती करतोय.  वृंदा :अहो सर पण मी माझ्या आईला आणि भावाला सोडून  अमित :कळकळीची विनंती करतोय तूला... तेही मी आजारी पडलो म्हणून... तूला फक्त तयार व्हायचंय... 

जय सरांची गाडी आहे... ती सकाळी सात वाजता घ्यायला येईल आणि कॉन्फरन्स आणि वर्कशॉप संपले की घरी आणून सोडेल.... मी इथे तूझ्या आई आणि भावाकडे लक्ष देईल.... मग तर झालं...  वृंदा निरुत्तर झाली  अमित :मग मी तूझा होकार समजू ना??  वृंदा... हं  वृंदाची आई :इतक्या रात्री कुणाशी बोलत आहेस गं?? ..  वृंदाने फोनवरील सगळा वृत्तांत सांगितला...  वृंदाची आई :हे बघ त्यांची मजबुरी आहे म्हणून त्यांनी तूला विनंती केली... तू बिनधास्त जा... आम्ही काही लागलं तर तो अमित की कोण आहे त्याला त्रास देऊ...  वृंदाचे मुख्य टेन्शन आता मिटले होते. वृंदाने रात्रीच पॅकिंग केली.  इकडे वृंदाचा जयसोबत दिल्लीला जाण्यासाठी होकार मिळाल्याने जय खूप मनोमन आनंदला होता... झोप काही यायचं नावच घेत नव्हती. सकाळी बरोबर सात वाजता जय त्याची गाडी घेऊन वृंदाच्या दारात आला  गाडीच्या आवाजाने वृंदाच्या चाळीतील लोकं बघायला आले.. लोकांची कुजबुज सुरु झाली...  कालपरवाच नौकरीला लागलेली पोर ही.... काय बाई बॉस घ्यायला आला हिला...  थोडीशी कुजबुज निघता निघता वृंदाच्याही कानावर पडली.. पण वेळे अभावी वृंदाने शांत राहणे पसंत केले...  वृंदा गाडीत बसली...जय आणि वृंदाचा दिल्लीचा प्रवास सुरु झाला... तब्बल सात तासांचा प्रवास...  वृंदा थोडी अस्वस्थ होती... जय मात्र हवेत होता  जयने वृंदाची अस्वस्थता जाणली...  जय : वृंदा be confirtable... खूप मोठा प्रवास आहे... आरामशीर बस..  वृंदा :हो सर, मी आतापर्यंत कधी आई आणि भावाला सोडून कुठेच गेले नाही.... पहिलीच वेळ आहे म्हणून जरा अस्वस्थ वाटत आहे...  जय :इतकंच ना... जयने गाणे असलेला पेन drive लावला.. ...  सर्वच गाणे वृंदाच्या आवडीचे होते... त्यामुळे वृंदा खूप खूष झाली... वृंदा आता थोडं confirtable झाली होती...  तीन तास प्रवास केल्यानंतर जयने त्याच्या ड्राइवरला त्याची गाडी थ्री स्टार हॉटेल समोर थांबवायला सांगितली... दोघेही जेवणासाठी उतरले.... जयने ड्राइवरला देखील जेवायला सांगून दोघे जण जेवणासाठी हॉटेल मध्ये शिरले......  जेवण झाल्यावर पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला...  हॉटेल पासून पंधरा किलोमीटर अंतरावर ह्यांची गाडी जाते ना जाते तोच चार ते पाच लोकांचा घोळका समोरून धावत आला...  त्यांनी एकदम गाडी थांबवली..... त्या लोकांना पाहून तिघांचेही धाबे दणाणले.....  ते वाटमारू होते..... त्यांच्या जवळ चाकू सारखी धारदार शस्त्रे होती... काठ्या होत्या  क्रमश :

भाग 4 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

https://www.swanubhavsaptarang.com/2020/04/4.html

 

©®डॉ सुजाता कुटे 

 


 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या