खेळ कुणाला दैवाचा कळला (भाग 4)


जय घाबरून गाडीच्या बाहेर निघाला....

 त्या लोकांनी वृंदा आणि ड्राइवरला पण गाडीच्या बाहेर निघायला सांगितले... 
दोघेही घाबरतच बाहेर निघाले..... 
तितक्यात जय त्यांना म्हणाला हे बघा माझ्याकडे थोडीच कॅश आहे... पण तूम्ही माझे हे सोन्याचे ब्रेसलेट आहे, चैन आणि अंगठी आहे ते तूम्ही घेऊन जाऊ शकता.... 
ते सगळे गुंड जोरजोऱ्याने हसायला लागले... 
तितक्यात एक गुंड वृंदा जवळ गेला आणि म्हणाला तुमच्याजवळ एवढा माल असताना तूम्ही काय सोन्याचं आमिष दाखवता आम्हाला.... एवढ्याने काय होणार... 
त्याची अशी बडबड ऐकून वृंदाने खणखणीत एक झापड मारली.... त्या गुंडाला एकदम झाँज आली... 
आता तर जय पूर्णपणे घाबरला... तो वृंदाजवळ काही बोलण्यासाठी जाणार तितक्यात दुसऱ्या गुंडाने तिच्यावर हल्ला चढवला.... तितक्याच शिताफीने वृंदाने त्याचा प्रतिकार केला.... 
आता जयला लक्षात आले अरे हे तर काहीतरी वेगळेच आहे..... 
वृंदा मात्र आरामशीर त्या गुंडांशी दोन हात करत होती... आणि त्या गुंडाना मारता मारता म्हणत होती.... तुमचं नशीब खराब की तूम्ही एका स्टेट लेवल ब्लॅकबेल्ट चॅम्पियनला भेटलात.... बरं झालं बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस नव्हती.... आज झाली.... 
वृंदाच्या अनपेक्षित प्रतिकाराने गुंड मात्र बावचळले... आणि तिथून पळून गेले.... 
जय आणि त्याच्या ड्राइवरने वृंदाच कौतुक म्हणून टाळ्या वाजवायला सुरवात केली.... 

 

वृंदा एकदम लाजली.... आणि म्हणाली चला सर नाहीतर आपल्याला उशीर होईल... 
पुन्हा त्यांचा प्रवास सुरु झाला... घडलेला घटनाक्रम सतत आठवून जय मात्र मनोमन स्मित करत होता.... त्याला एकीकडे खूप आनंदही झाला होता आणि एकीकडे स्वतःशीच मनोमन बोलत होता.... जयराव जरा जपून बरं का?? हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही.... 
जय : वृंदा तू कधी सांगितले नाहीस की तू कराटे.. ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहेस.. 
वृंदा :सर कधी गरजच नाही पडली.... आणि खरं सांगू का आता कराटे ची प्रॅक्टिस सुटून दोन वर्ष झाली असतील.... माझ्या जबाबदारीच्या ओझ्याखाली हे सगळं विसरून गेले होते मी.... पण आज त्याचा उपयोग झाला... खूप छान वाटलं.... 
जय :म्हणजे तू आज सोबत आहेस हे आमचं नशीबच म्हणावं लागेल.... 
वृंदा पुन्हा लाजली.... आणि म्हणाली थँक यू सर..... 
थोड्याच वेळात ते दिल्लीला पोहोचले... हॉटेल मध्ये आपल्या आपल्या रूम अलॉट करून घेतल्या....
जय :वृंदा फ्रेश होऊन तासाभरात कॅफेटेरिया मध्ये ये... आज संध्याकाळी विशेष असं काही नाहीये... उद्यापासून मात्र आपल्याला स्ट्रिक्टली सगळे lectures अटेंड करावे लागतील..... 
वृंदा :हो सर म्हणून वृंदा आपल्या रूम मध्ये गेली 
 वृंदा छानपैकी तयार झाली... तीला साजेल अशी चॉकलेटी रंगाची तीने साडी नेसली... लांबसडक केस मोकळे सोडले फक्त एका साईडला गुलाब माळला... डोळ्यात काजळ, लायनर, फिक्कट अशी लिपस्टिक असा साजेसा मेकउप तीने केला.... 
आणि कॅफेटेरीया मध्ये जाऊन बसली.... 
तितक्यात तिथे जय आला... आधीच जय ची विकेट पडली होती.... पण तिचं आताचं रूप पाहून तर जय अजूनच अस्वस्थ झाला... कधी एकदा स्वतःच्या भावना तिच्याकडे व्यक्त करतोय असे त्याला झाले... 
तितक्यात वृंदाचे डोळे मागणं कुणीतरी बंद केले.... 

वृंदाने लगेच ओळखले अरे अनिकेत तू?? तू इथे कसा काय?? 
अनिकेत :काय गं मला वाटलं तू मला ओळखणार नाहीस 
वृंदा : असं कसं शक्य आहे?? पण तू तर govt. एम्प्लॉयीना मग तू इथे?? 
अनिकेत :अगं कॉन्फरन्स झाली की दोन दिवस मी तुमचे वर्कशॉप घेणार आहे... काही govt नियम आहेत आता privet कंपन्यांना ते लागू करायचे आहेत... त्याचं ट्रैनिंग मी देणार आहे... 

 

पण तू इथे म्हणजे कुणी सिनियर सोबत असेल ना?? 
वृंदा :अरे हो... हे आमच्या कंपनीचे मालक आमचे बॉस... जयसर....आणि सर हा माझा बालमित्र अनिकेत... 
जय :अनिकेतला बघून थोडा नाखूष झाला... त्याला दिसण्यामध्ये तो त्याच्यापेक्षा उजवा वाटत होता... तरी खोटं smile देत... nice to meet you म्हणत त्यांनी एकमेकांना शेकहॅन्ड केलं.... 
 जयचा खूप जळफळाट होत होता 
जय : वृंदा मला एक urgent फोन करायचा आहे.... you guys carry on म्हणून तिथून निघून गेला... 
वृंदालाही जयचे वागणे खटकले कारण कॅफेटेरीया मध्ये येऊन चहा कॉफी काहीच न घेता जय तिथून निघून गेला होता... 
अनिकेतने देखील जयची घालमेल त्याच्या नजरेवरूनच ओळखली होती.....
अनिकेत : वृंदा हा तूझा बॉस कसा आहे गं?? 
वृंदा : खूप चांगला, adorable, कामामध्ये तत्पर आणि वागणूकही व्यवस्थित.... तूला माहिती आहे अनिकेत?? माझा interview कसा झाला ते?? वृंदाने तीच्या interview ची कहानी त्याला सांगितली..... आता येताना प्रवासातही त्याने माझी व्यवस्थित काळजी घेतली.... तो चांगलाच आहे यात शंका नाही.... 
अनिकेत : अगं बस बस तू तर एकदम पोथी पुराण वाचल्यासारखं जयची स्तुती करत आहेस. 
वृंदा : तसं नाही अनिकेत तूला तर माहीती मी सहजा सहजी इंप्रेस होत नाही... but he is quite impressive 
अनिकेत : वृंदा जय इथून निघून गेला तूला विचित्र नाही वाटलं? 
वृंदा :हो थोडं वाटलं 
अनिकेत :बहुतेक त्याला माझं इथे येणे आवडले नाही.... 
वृंदा :म्हणजे?? 
अनिकेत : I think, he likes you..... त्याला तू आवडतेस 
वृंदा :काय?? काहीही काय? अरे त्याच्या मागे छप्पन मूली असतील.... त्याचं लक्षही नसेल माझ्याकडे..... 
अनिकेत :जे काही असेल ते.... सगळं चांगलंच होईल.चल पून्हा भेटू bye, take care म्हणून अनिकेत तिथून निघून गेला.... 
मग वृंदादेखील आपल्या रूम मध्ये आली.... 
क्रमश :

भाग 5 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇https://www.swanubhavsaptarang.com/2020/05/5.html

©® डॉ सुजाता कुटे 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या