खेळ कुणाला दैवाचा कळला( भाग 8)

वृंदा स्कुटीवर होती खरी.... पण तिचं मन सैरभैर झालं होतं...मनात असंख्य विचाराचं काहूर माजलं होतं... 
का बोलावलं असेल.... तेही इतक्या गडबडीत.... जय ला सांगू नको पण म्हणाल्या.... मला भेटीत थोड्याश्या नाराज देखील वाटल्या होत्या..... देवा सगळं ठीक असावं... 
असा विचार करत वृंदा गावाच्या वेशीबाहेर असणाऱ्या टेकडीवर पोहोचली.... बघते तर काय वैभव पण जयच्या आई सोबत होता.... 
वृंदा : वैभव तू इथे??  
तिने असे विचारताच वैभव वृंदा जवळ आला आणि तिच्या गळ्यात पडून रडायला लागला... 
जयची आई : हे बघ वैभव बाळा रडू नकोस, ताई आली ना आता सगळं ठीक होईल... पण बेटा आत्महत्या सारखा भ्याड मार्ग नाही.... असा अविचारीपणा कसंकाय केलास तू?? 
वृंदा: वैभवला स्वतःपासून दूर करत.... काय??? तू आणि आत्महत्या ?? 
जयची आई : अगं टेकडीवरून उडी मारत होता तो... योगायोगाने मी इथल्या जवळच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते तेव्हा याला पाहिले... आणि थांबवले.... तेव्हा मला कळालं की हा तूझा भाऊ आहे.... 
वृंदा :एकदम गोंधळलेल्या अवस्थेत वैभवकडे बघत होती 
जयची आई :
वृंदा त्याच्यावर चिडू नकोस.... तो आधीच घाबरलाय 
वैभव : ताई मला नीट मध्ये मनासारखे मार्क भेटले नाही.... मला  मेडिकलला govt सीट मिळण्याची शक्यता आता खूप कमी आहे.... प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा खर्च आपण नाही करू शकत.... मला आता जगावेसे वाटत नाहीये... वैभवने पुन्हा अश्रूना वाट मोकळी करून दिली. 
जयची आई : वृंदा करू शकते ना खर्च. 
वृंदाने एकदम आश्चर्याने जयच्या आईकडे बघितले.... 
जयची आई : वैभव बेटा तू जरा तिकडे माझ्या गाडीत बसतोस का? मला तूझ्या ताईशी बोलायचं आहे.... 
वैभव तिथून निघून गेला 
जयची आई : हे बघ वृंदा मला घुमवून फिरवून बोलायला आवडत नाही.... मी स्पष्टच बोलते.... मला तुझं आणि जयचं नातं मान्य नाही... मला माझ्या माहेरची मुलगी सून करायची आहे... infact मी मुलगी बघून ठेवलेली आहे... 

ती परिस्थितीने देखील आमच्या परिस्थितीशी मिळती जुळती आहे.... 
जय थोडा इमोशनल आहे... मी जर त्याला नकार दिला तर त्याच्या नजरेत मी वाईट ठरेल... मला ते परवडणारं नाहीये... 
हे बघ मी तूला विनंती करते तू त्याला नकार दे मी तुझ्या भावाचा मेडिकलचा पूर्ण खर्च करते....
वृंदाला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता..... 

तीचे डोळे अश्रुने डबडबले.... तिला हा व्यवहार मान्य नव्हता पण तिच्या जवळ सध्या काही पर्याय नव्हता... 
वृंदा : ठीक आहे, मला तूमचा व्यवहार मान्य आहे... पण माझी एक अट आहे... जो खर्च तूम्ही माझ्या भावावर कराल तो लिहून ठेवा मी लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करेल... 
जयची आई :खरं तर पैसे परत करण्याची गरज नाही पण ठीक आहे... जशी तूझी इच्छा... 
वृंदाने वैभवला हाक मारली.... 
वृंदा :वैभव चल उगाचच टेन्शन घेतलंस तू....मी घेऊ शकते ना तुझं मेडिकलचं ऍडमिशन.... 
वैभव :खरं ताई?? 
वृंदाने अश्रू ओघळल्या चेहऱ्याने खोटं स्मित करत होकारार्थी मान हलवली.... 
दोघेही स्कुटीवर निघाले.... निघता निघता उद्यापासून तुमच्या मनासारखं होईल असं ती जय च्या आईला म्हणाली... 
वृंदा :वैभव अरे किती मूर्खपणा हा..... आमचं काय झालं असतं याचा विचार केला नाहीस ना 
वैभव :सॉरी गं ताई, मला वाटलं आता सगळं संपलं... मी कधी डॉक्टर नाही होऊ शकत... माझं स्वप्न भंगल्या सारखं वाटलं... 
वृंदा :बरं आता ऐक, आईला काही सांगू नकोस.... ती हात पायच गाळून बसेल.... कशी बशी सावरतीये आपल्याकडे बघून.... 
स्कुटीवरून घरी येईपर्यंत वृंदाने वैभवला समजावलं.... 
दोघेही घरी आले..... तो हातात पेढ्याचा बॉक्स घेऊनच... 
वृंदा :आई आता आपला वैभव डॉक्टर होणार.... हे घे पेढे.. 
वृंदाची आई :वैभव आधी देवाजवळ ठेव पेढे.. 
वृंदा :आई मी खूप थकले, मी रूम मध्ये जाऊन आराम करते... असं म्हणत वृंदा रूम मध्ये आली आणि दबक्या आवाजात आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली... 

घडलेली एक एक गोष्ट आठवत वृंदा खूप रडत होती.... 
वृंदाला सगळ्यात मोठे टेन्शन होते ते आता जयला काय सांगून नकार द्यायचा... 
इकडे जयचे वृंदाला मेसेजेस चालू होते... त्याचा रिप्लाय येत नाही हे बघून तो कॉलही करत होता... पण वृंदाने काही फोन उचलला नाही.... तीने फोन सायलेंट करून ठेवला.... 
इकडे वृंदा रिप्लाय करत नाहीये फोनही उचलत नाहीये सुरुवातीला त्याला खूप राग आला पण नऊ ते दहा कॉल केल्यावर जेव्हा तीने फोन उचलले नाही तेव्हा तिची काळजी वाटायला लागली.... 
वृंदाच्या घरी जावं का? असा विचार करत त्याने घड्याळाकडे पाहिले... साडे अकरा ! उद्या बघतोच हिची.... का असं वागली ते....झोपली असेल का?? 

जाऊ दे उद्या बघू असा विचार करत जय झोपायला गेला.... 
वृंदा मात्र रात्रभर तळमळत होती.... जयला आता नकार कसा द्यायचा याचा विचार करत होती.... पण तीला काही कारणच सुचत नव्हतं..... 
क्रमश :

भाग 9 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

https://www.swanubhavsaptarang.com/2020/05/9.html

©® डॉ सुजाता कुटे 


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या