खेळ कुणाला दैवाचा कळला (भाग 9)

वृंदा सकाळीच अंघोळ करून घराबाहेर पडली... 

वृंदा :आई मी जरा देवळात जाऊन दर्शन घेऊन येते... 
वृंदाची आई :आज कुठून सूर्य उगवला, तू आणि देवळात?? बरं लवकर ये, आपल्याला आत्याच्या घरी जरा चार दिवसासाठी जायचं आहे... 
वृंदा ते ऐकून जरा रिलॅक्स झाली... चला म्हणजे या चार दिवसात आपल्याला जयला टाळता येईल... स्पीड पोस्ट ने राजीनामा पाठवू... असा विचार करत वृंदा देवळात गेली.. 
वृंदा:देवा हे काय लिहिलं आहेस रे माझ्या दैवात?? माझं खूप प्रेम आहे जय वर आणि आता त्यालाच मी दुखावणार आहे.... त्याला नकार... मनात नसतानाही देणार आहे.... 

माझ्या आईला हे कळाले तर किती दुःख होईल... मला आधीच तिला दुखवायचे नव्हते..... 
हा छोटया पण इतका भावनाविवश होऊन असे काही पाऊल उचलेल असं वाटले नव्हतं.... देवा तू तरी असा का योगायोग केलास की सगळं आता माझ्यावर आलंय.... माझा स्वाभिमान दुखावला गेला तो वेगळाच.... छोटया पुढे हात टेकावा लागला.... 
वृंदा(मनात ):जय या पुढे मी तुझ्याशी वागेल ते माझ्या इच्छे विरुद्ध.... मला माफ करशील जय.... सो सॉरी 
तितक्यात वृंदाला जयचा फोन आला....... 
जय :अगं माझ्या मेसेजेसला रिप्लाय केला नाहीस तू?? रात्री फोनही नाही उचललेस?? 
वृंदा :हे बघ जय आजपासून तूझा माझा काही संबंध नाही... मला सारखं सारखं फोन करू नकोस.. 
जय :वृंदा काय?? जय एकदम घाबरून बोलला काय झालय वृंदा असं का बोलतेस?? माझं काही चुकलं का? 
वृंदा :तुझं काही नाही चुकलं माझंच चुकलं.... माझं तुझ्यावर प्रेम नसताना उगाचच होकार देऊन बसलेय.... मला आता हे नातं एकदम जबरदस्तीच वाटत आहे...
जय : वृंदा मी घरी येतोय.... 
वृंदा :नको येउस, आम्ही आमच्या मामाकडे जाणार आहे कायमस्वरूपी.... (इथेही वृंदा जयला मुद्दाम खोटं बोलली होती)...
आता मात्र जय खूप बावचळलला होता....परेशान झाला होता.... राग ही येत होता आणि दुखावला गेला होता.... तरी वृंदाला घरी गाठायचे असे ठरवून तो तिथून निघून गेला... 
इकडे वृंदा घरी आली आणि शेजाऱ्याना तिच्या आईच्या नकळत आम्ही मामा कडे चाललो असे सांगून... ते तिघेही वृंदाच्या आत्याकडे गेले... 
जय वृंदाच्या घरी पोहोचताच त्याला घराला कुलूप लागलेले दिसले.... जय ने शेजारी विचारपूस केली तर वृंदा तिच्या मामाकडे गेली आहे हे समजले.... 
जय सारखा सारखा वृंदाला फोन करत होता... तर वृंदाने त्याचा नंबरही ब्लॉक केला होता.... 
जय तितकाच जिद्दी होता.... त्याने बोलता बोलता तिच्या मामाच्या गावाचं नाव ऐकलेलं.... त्यामुळे तो त्या गावी गेला.... पण व्यर्थ... तीचे मामा त्या गावातून काही दिवसांपूर्वी शहरात राहायला गेलेले होते.... आता मात्र जय हताश झाला.... त्याला खूप रडू येत होतं.... 
जय घरी आला... खूप निराश झालेला होता.... त्याचे हातपाय गळून गेले होते.... वृंदाचा राजीनामा देखील त्याच्या कंपनीत स्पीड post ने आला होता.... 
जय आता सतत उदास राहू लागला होता.... कशातच मन लागत नव्हते.... 
जयची आई :आलास जय?? काय रे तू आणि वृंदाने लग्नाबद्दल काय विचार केलास?? 

 हा प्रश्न ऐकताच जयच मनाचा ताबा सुटला आणि त्याच्या आईच्या गळ्यात पडून रडायला लागला.... 
जयची आई : जय काय झाले?? 
जय :आई सगळं संपलं गं.... वृंदा मला आता लग्नासाठी नाही म्हणत आहे?? 
जयची आई :काय कारण सांगितले तीने?? 
जय : काहीच नाही.... आता मला तूझ्याबद्दल काही वाटत नाही असं म्हणाली.... नातं जबरदस्तीच आहे, असे वाटत आहे म्हणाली.... 
जयची आई : जय, म्हणून मी म्हणत होते ओळखीच्या मुलीशीच लग्न केलेले योग्य असतं... अनोळखी लोकांचं काही खरं नसतं... पटलं ना तूला आता.. 
जय : हो आई, खरंच पटलं मला.... मला वृंदाचा खूप राग येतोय.... 
जयची आई :सोडून दे जय, विसरून जा तिला, एक वाईट स्वप्न समजून... 
जय :हं 
इकडे वृंदाला अनिकेतने फोन केला.... 
अनिकेत :वृंदा मी काय ऐकतो आहे? तू जयला नकार दिलास? 
वृंदा :तू बरोबर ऐकले आहेस, माझे त्याच्यावर कधीच प्रेम नव्हते... बरं झालं मला लवकर कळलं ते. 
अनिकेत :अगं वृंदा जय खूप चांगला मुलगा आहे... असा मुलगा शोधून सापडणार नाही.... जयला सोडण्याचा अविचारीपणा करू नकोस... 
वृंदा :हे बघ अनिकेत हा माझा खाजगी प्रश्न आहे.... तू नको यात पडू... 
इतका कडवटपणा कुठेतरी काहीतरी चुकतंय.....पण काय?? ही नेहमीची वृंदा नक्कीच नाहीये.... अनिकेत विचारात पडला...... 
वृंदाने फोन ठेवला... पळत गच्चीवर एका कोपऱ्यात गेली आणि हमसून हमसून रडली.... तीने स्वतःला इतकं असहाय कधीच समजलं नव्हतं.... आयुष्यात पहिल्यांदाच ती प्रेमात पडली होती आणि तीने खूप प्रेम केलं होतं जय वर...
 जय शिवाय जगणे म्हणजे एक निर्जीव पुतळा होऊन जगणे असं तिचं आयुष्य झालं होतं.... 
इकडे जयचे हाल देखील असेच झाले होते... अलीकडे ऑफिस ला देखील नीट जात नव्हता..... 

जयची आई :बेटा मग तू माझ्या माहेरच्या मुलीशी लग्न करशील का?? तूला अनामिका आठवते का? लहानपणी तूम्ही दोघे खूप खेळायचात..... 
जय :हो आठवते... तिचं काय?? 
जयची आई : अनामिका आता खूप सुंदर दिसत आहे.तूलाही ती आवडेल..
जय :आई तू जे म्हणशील ते.... मी तयार आहे...
जय अगदीच निर्विकारपणे म्हणाला.... 
दरम्यान तो वृंदाला फोन लाऊन बघायचा.... पण व्यर्थ... फोन ब्लॉकच.... 
शेवटी चिडून.... जय मनातच म्हणाला... जा वृंदा जा... मला आता तूझी गरज नाही.... तू नंतर पश्चाताप करशील पण.... पण... तूझ्याहाती काही लागणार नाही.... तू येशील माझ्याकडे आणि मग मी नकार देईन... i hate you वृंदा i hate you... असं म्हणत पून्हा एकदा जयने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.... 
जयची आई मात्र जाम खूष झाली होती.... सर्वकाही आता तिच्या मनासारखं घडत होतं.... हा चान्स आता कुठल्याही परिस्थितीत तिला गमवायचा नव्हता.... 
जयची आई :जय अरे जय जरा इकडे ये.... हे बघ माझ्या whatsapp वर अनामिकाचा dp दिसतो आहे... बघ किती सुंदर दिसते ती..... 
जय : काय आई.... फोटो बघून... हं 
जयची आई :काय हं?? अरे त्या वृंदा पेक्षा हजार पटीने उजवी आहे ती.... नीट बघ.... नाकीडोळी किती सुंदर आहे ती आहे ना 
जयने बघितल्यासारखं करून...होकारार्थी मान डोलावली.... 


क्रमश :

भाग 10(अंतिम )वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

https://www.swanubhavsaptarang.com/2020/05/10.html

©®डॉ सुजाता कुटे 


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या