तुषार आणि समायरा दोघेही प्रोजेक्टच्या तयारीला लागले...
ऑफिसमध्ये तर नियमित काम केलेच पण घरी देखील समायरा जाहिरातीचे काम करत असे आणि तुषार उरलेले प्रोजेक्टचे काम करत असे....
असं करत तीन दिवसातच त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण झाला....
हनिमून पॅकेजमध्ये सिल्वर, गोल्ड, प्डिलक्स सुपर डिलक्स अशी विभागणी केली...आधी देखील अश्या प्रकारची विभागणी होती पण तुषारचा कल अगदी सर्वसामान्य नवीन जोडप्याला देखील चांगल्या प्रकारचे पॅकेज मिळावे असा होता....
त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती.... काही नवीन थ्री स्टार हॉटेल्स होते त्यांच्यासोबत डील करण्याचे प्लांनिंग केले होते....
तसंच काही नवीन टॅक्सी कंपनी चा फायदा उचलण्याचे त्यानी ठरवले होते.....
आता फक्त या गोष्टीवर तुषार आणि समायराला प्रेझेंटेशन द्यायचं होतं..
तो दिवस उजाडला.... आपलं पहिलंच प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित झालं आहे असा तुषारला आत्मविश्वास होता तर मात्र समायराला भीती वाटत होती....
दोघेही लवकरच ऑफिसला पोहोचले.... दोघांनी मिळून प्रोजेक्टवर नजर टाकली....
तितक्यात मार्थाही हजर झाली.....
मार्थाने दोघांनाही गणेशमार्फत केबिन मध्ये बोलावले.... आशिषला देखील बोलवायला सांगितले...
आशिष अद्याप आलेला नव्हता... ते ऐकून मार्था चिडली....
मार्था : हा आशिष काय समजतो स्वतःला.... त्याला माहीती होतं ना प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनचा दिवस आहे आज... निदान आज तरी वेळेवर यायला पाहीजे होतं त्याने....
तुषार तू सुरु कर.... आशिष काही वेळेवर येत नाही आता
तुषारने लागलीच त्याचा लॅपटॉप उघडला आणि ज्या प्रकारे त्याने आकर्षक नावे देऊन पॅकेजची विभागणी केली होती ते सगळं मार्था समोर प्रेझेंट केलं...
आणि सांगितलं की आपल्या कंपनीतील पॅकेज मुळे अगदीच सर्वसामान्य couple पासून तर अगदीच गर्भश्रीमंत couples याचा लाभ घेऊ शकतील....
आणि हे करत असतानाच आपल्या कंपनीला त्याचा चार पट फायदा होईल.....
मार्था : तो कसा काय??
तुषार : मी कमीतकमी दहा हजार रुपये पॅकेजपासून सुरुवात केली आहे.... आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपये हे डोमेस्टिक लेव्हल ला आणि पाच लाख रुपये इंटरनॅशनल लेव्हलला अशी पॅकेजनुसार विभागणी केली आहे....
मार्था : दहा हजार रुपये फक्त !! तुषार तूला माहिती आहे ना की आपण फक्त थ्री स्टार, फाईव्ह स्टार आणि त्याच्या पेक्षाही जास्त स्टार असणाऱ्यांसोबतच डील करतो ते....
तुषार : हो !! मी अभ्यास केला आहे याचा.....मी थ्री स्टार हॉटेललाच वापरणार आहे फक्त ते नवीन असतील इतकंच... आपल्या कंपनीचं नाव इतकं आहे की ते आपोआपच आपल्याशी डील करायला तयार होतील.... आणि त्यांची क्वालिटी बघायला हवं तर मी एकदा स्वतः भेट देईन....
मार्था : गुड, समायरा तू काहीच बोलत नाहीयेस...
समायरा : मार्था मी प्रोजेक्ट च्या जाहिराती तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे....
मी एकदम कमीत कमी खर्चात ऍनिमेशन वापरून ह्या दोन जाहिराती बनवल्या आहेत...
तूम्हाला त्या आवडल्या तर मी पॅकेजनुसार सगळ्या जाहिराती तयार करेल.....
असं म्हणत समायराने जाहिरातीचा फोल्डर उघडला... व तयार केलेल्या दोन्हीही जाहिराती मार्थाला दाखवल्या....
मार्थाला त्या जाहिराती खूपच आवडल्या....
मार्था : खरंच खूप सुंदर कल्पना आहे ही ...
समायरा : मार्था ! मला अजून काही सुचवायचं होतं....
मार्था :बोल ना !!
समायरा : आपण या जाहिराती तयार करतो आहोत त्यांच्या पब्लिसिटी साठी मला एक सोशल मीडिया वर आपल्या कंपनीच्या नावाचे पेज तयार करावे लागेल त्यासाठी लेखी परवानगी हवी होती....
मार्था : दिली परवानगी !! मार्थाने लागलीच गणेशला सांगून स्टेनो मीराला बोलावून घेतले आणि परवानगीचे आदेश लिहायला सांगितले......
मार्था : अजून काही??
तुषार : सध्या तरी इतकेच...... आणखी चारपाच दिवसात आपल्या कंपनीच्या जाहिरातीला सूरूवात झालेली असेल...
त्या आधी जे लोक पॅकेजेस साठी येतील त्यांच्या जवळ mouth to mouth पब्लिसिटी करण्यात येईल... हे काम मात्र अगदीच आजपासून सुरु होईल याची आम्ही काळजी घेऊ...
मार्था : ठीक आहे चालेल !! And very nice project and presentation, keep it up 👍
थँक्स मार्था येतो आम्ही असं समायरा म्हणाली आणि दोघेही त्यांच्या केबिन मध्ये गेले...
तुषार : समायरा, तूला काही लक्षात आले का??
समायरा :काय??
तुषार : अगं हेच की जर आपल्यापैकी कुणीही ऑफिसला लेट आलं तर लागलीच आपल्याला नोटीस मिळते... पण आशिषच्या बाबतीत मार्थाने काहीच ऍक्शन घेतली नाही... म्हणजे, दाल मे कूछ काला है..... नक्कीच
समायरा : हो, असेल कदाचीत.... आपल्याही ताक फुंकून प्यावे लागेल....
क्रमश :
भाग 12 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©® डॉ सुजाता कुटे
2 टिप्पण्या
खूप छान कथा आहे
उत्तर द्याहटवामी दररोज वाचतो एक एक भाग
पण थोडे मोठं भाग असावे
कथा वाचायला मूड येतो आहे नेमकं क्रमशः असे येते.
सर तूम्ही इथून पुढे सलग भाग वाचू शकता... 56 भाग झाले आहेत... सुरवातीला part थोडे लहान आहेत नंतर मोठे केले आहेत
हटवा