किती सांगायचं मला (भाग 17)

समायराचे आणि तुषारचे आता व्यवस्थित रुटीन सुरु झाले होते.... दोघेही आता कंपनीमध्ये बरेच सेटल झाले होते.... दोघांचीही पहिली पगार हातात पडली... दोघांनाही आता आपल्या घरातील अडचणीत हातभार लावणार याचा आनंद होत होता..... 

समायरा : आजच अमोघच्या हातात पैसे देते म्हणजे उद्या तो फीस भरू शकेल..... 

तुषार : माझ्या आईचं अजून दोन दिवसाचं मेडिसिन बाकी आहे... मग घ्यावं लागेल.... 

दोघांच्याही चेहऱ्यावर पहिल्या पगाराचा आनंद ओसंडून वहात होता.... तितक्यात अमोघ समायराला शोधत तिच्या कंपनीत आला.... 

अमोघने रेसेपशनिस्टला विचारले समायरा कुठे आहे?? 

तितक्यात तिथे उभ्या असलेल्या रजनीने अमोघला  तू कोण आहॆस?? असा प्रश्न विचारला?? 

अमोघ : मी तीचा भाऊ !!

रजनी : अच्छा ! तूझी ताई आणि भाऊजी त्या बाजूच्या केबिन मध्ये आहेत.... 

अमोघ : काय??  ताई आणि भाऊजी... 

अमोघ गोंधळून गेला..... जाऊदे केबिन मध्ये जाऊन बघू असा विचार करत तो तिथे गेला.. ...

समायरा एकदम आश्चर्याने 😳 : अमोघ तू इथे...

 अमोघ ला तिथे पाहून समायराला एकदम घाम फुटला.... याने काही घोळ तर नसेल केला ना असं समायराला वाटून गेलं.... 

अमोघ : अगं ताई !! आज सरांनी अर्जंट फीस मागितली.. परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे... दहा हजार रुपये भरायचे होते.... मला माहीती होतं की आज तूझी सॅलरी होणार... म्हणून मी इथे आलो.... 

समायरा :इतकंच ना !! मग मला फोन करायचास ना.... 

अमोघ : दहा तरी कॉल केले असतील... पण तू उचलशील तर शपथ !!

समायरा : फोन बघून, मिटिंगमध्ये सायलेंट केला आणि विसरून गेले... पैसे कुठे ट्रान्सफर करायचे आहे... 
अमोघने फीसचे अकॉउंट डिटेल्स दिले... 

अमोघ :बरं ताई !! मी बाहेर काय ऐकले... त्या मॅडम म्हणत होत्या की तुझे ताई अन भावजी आतमध्ये आहेत म्हणून...
अन हे काय ताई?? तूझ्या गळ्यात मंगळसूत्र?? 

समायरा : शु शु 🤫अमोघ !!  चल बाहेर एक मिनिट....

असं म्हणून समायराने अमोघला ऑफिस बाहेर नेले.... 

 समायरा : अमोघ ! हे बघ, मी घरी भेटल्यावर सगळं तूला सांगते... पण प्लीज आई आणि पप्पाला यातलं काहीच सांगू नको... तो पर्यंत मी इतकंच म्हणेन की तू काही गैरसमज करू नकोस.....

अमोघ : ठीक आहे पण खरं खुरं काय आहे ते सांगशील... 

समायरा : हो रे माझ्या लाडक्या भावा.... पण आता तू आरामशीर कॉलेजला जा... फीस भर..... संध्याकाळी बोलू... 
अमोघ : ठीक आहे ताई म्हणून अमोघ तिथून निघून गेला.. ..... 
समायरा तिच्या केबिनकडे निघाली.... मध्येच रजनीने तिला प्रश्न विचारला?? 

रजनी : काय समायरा ??तूझा भाऊ होता वाटतं?? 

 रजनीच्या अश्या अनपेक्षित प्रश्नाने समायरा गोंधळली आणि म्हणाली :हो !! माझा भाऊ, त्याला फीस भरायची म्हणून आला होता.... 

रजनी : अच्छा !! काय?? तुमचं काम आशिषला खूप आवडलं म्हणे... थोडंसं jalous वृत्तीने रजनी म्हणाली.... 

समायरा : हं.... आमचं नशीब चांगलं... चल रजनी मध्यान्हात बोलू... खूप काम बाकी आहे... असं म्हणून समायराने तिथून पळ काढला.... 

रजनी (स्वगत ):हो जसं की आम्ही रिकामटेकडेच 😏

असं म्हणून रजनी आपल्या कामात गुंग झाली.... 

समायरा : हुश्श, 😇वाचलोबुवा... 
मला वाटलं आता अमोघ कुठेतरी काहीतरी बोलेल... पण आपलं नशीब होतं म्हणून आपण वाचलो केबिनमध्ये पोहोचल्या पोहोचल्या समायरा बडबडली. 

तुषार : पण आता तूला अमोघला सगळं सांगावं लागेल... मलाही दीपकला सांगावेच लागले ना !!

समायरा : हो, ना... कोवळं वय त्याचं... तो कितपत मला समजून घेईल... देव जाणे.... 

तुषार :हं... जाऊदे बघुयात काय होतं ते.... यात जर माझी काही मदत लागली तर सांगशील.... 

समायरा : हो, होता होईस्तोवर तो समजून घेईल... नाहीच समजलं तर अडचण आहे... जाऊ दे !!आपण आता राहिलेली कामे पूर्ण करू..... 

तितक्यात कस्टमरचे फोन सुरु झाले.... 📳

कस्टमर फोनवर : तूमची हनिमून पॅकेजची जाहिरात बघितली... आम्हाला महाबळेश्वरचं पॅकेज हवं आहे... इतर कंपन्यांच्या तुलनेत तुमचं पॅकेज स्वस्त वाटत आहे... पण सोय तूम्ही जाहिरातीत दाखवल्याप्रमाणेच होणार का?? 

तुषार : तूम्ही एकदा जाऊन तर या... तुम्हाला कंप्लेंटचा चान्स मिळणार नाही... जर तूम्ही समाधानी नाही झाले तर अजून एक ट्रिप फुकट... पण मला खात्री आहे तशी वेळच येणार नाही.... 

कस्टमर : तुमचं सगळं खरं आहे हो...  पण मी हनिमूनला एकदाच जाणार आहे 😃😃😃 कस्टमर मिश्किलपणे म्हणाला..... 

तुषार :  तुमचं हनिमून एकदम यादगार बनेल... बोला कुठलं पॅकेज फायनल करू?? 

तुषार आणि समायराने आपल्या काम करण्याच्या पद्धतीने कंपनीमध्ये एक आगळे वेगळे स्थान मिळवले होते... 

क्रमश :
भाग 18 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा. 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
 

©® डॉ.सुजाता कुटे
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या