मार्थाचे ते शब्द ऐकताच समायरा एकदम घामाघूम😢 झाली...
समायरा : मार्था !!बाहेर कस्टमर येणार आहे... आताच फोन आला होता..... मी माझ्या केबिन मध्ये थांबते....असं म्हणून समायराने काढता पाय घेतला....
समायरा गरबडीत तिच्या केबिनमध्ये गेली.... तीने लागलीच तुषारला फोन📳 लावला. समायराचे हात नुसते थरथरत होते....
ईकडे तुषार काही फोन उचलायला तयार नव्हता.... तुषारच्या आईला शांत झोप लागल्याने तुषारने त्याचा फोन सायलेंट करून ठेवला होता... रात्रीच्या जागरणामुळे तुषारचाही डोळा लागला होता.....
जवळ जवळ समायराने पन्नास तरी कॉल केले असतील.
पण तुषार काही फोन उचलत नव्हता.
समायराला तर तुषारच्या घराचा फक्त पोस्टल ऍड्रेस माहिती होता... ती एकदा सुद्धा त्याच्या घरी गेली नव्हती.... आता काय करणार ह्या तुषारला पण काय झालंय फोन उचलायला?? नलिनी अरे हो नलिनी मला आधीच कसंकाय नाही सुचलं.....
लागलीच समायराने नलिनीला फोन लावला..आणि तिला तुषारच्या घरी जाऊन निरोप द्यायला सांगितला.....
नलिनीने मागचा पुढचा काहीच विचार न करता तीची स्कुटी काढली आणि तुषारच्या घरी गेली.....
ईकडे तुषार आणि त्याची आई दोघेही आराम करत होते... तितक्यात तुषारला जाग आली... तोंड धुवून तुषारने त्याचा फोन चेक केला... 😱 चक्क पन्नास मीस कॉल... तेही समायराचे.....
तुषार समायराला कॉल बॅक करणार तोच तुषारच्या घराची डोरबेल वाजली....
तुषारने घड्याळीकडे बघितले... दोन वाजलेत
आता कोण आलं असेल असा विचार करत दरवाजा उघडला... 😳 नलिनी !! तुषार नुसता बघतच राहिला.... नक्की नलिनीच ना... तुषारने स्वतःला चिमटा काढला... हो हे खरं आहे....तुषार फक्त चक्कर 😇येऊन पडायचा बाकी होता....
डोरबेल वाजल्याने तुषारच्या आईला देखील जाग आली होती...
तुषारची आई: कोण आहे तुषार?? असं म्हणत बेडरूम मधून हॉल मध्ये आली....
तुषारची आई नलिनीला पाहून : तू इथे??आजही देशमुख भेटले नाही का बेटा तूला....
तुषारची आई नलीनीला ओळखते यांचं त्याला खूप आश्चर्य वाटलं.....
तितक्यात नलिनी म्हणाली, काकू !! माझी गाडी स्टार्ट होत नाहीये.... मला बाजूच्या छोटया मुलीने सांगितलं की तूमचा मुलगा घरात आहे म्हणून?? म्हणून मी पुन्हा एकदा मदतीसाठी तुमच्याकडे आले....
नलिनी (हळूच ):तुषार !!लवकर बाहेर ये मला तुला महत्वाचे बोलायचे आहे....
तुषार :ठीक आहे आलोच.....
म्हणून तुषार घाईघाईतच त्याच्या बेडरूम मध्ये घुसला दारावर लटकावलेला शर्ट चढवला आणि केस विंचरून बाहेर निघाला... त्याच्या मनात तेवढ्याच वेळेत खूप प्रश्न उद्भवले होते..... काय बोलायचं असेल नलीनीला?? .... एवढं मोठं सरप्राईझ.... तीला मी आवडतो की काय??
उत्साहाने तुषार घराबाहेर पडला.....
तुषार :बोल नलिनी !! काय महत्वाचे बोलायचे आहे....
नलिनी : अरे तुषार तूझा फोन कुठे आहे... समायराने किती फोन लावले तूला?? बरं ऐक मार्था घरी येणार आहे.... तुझ्या आईला भेटायला.....
तुषार : काय?? आता मात्र तुषारचे धाबे दणाणले..... आपलं पितळ उघडं पडणार.... मार्था नाही तर आई कुणाला तरी खरं सांगावं लागणार....म्हणजे नलिनीला पण सर्व माहिती आहे तर !! तुषार विचारात गुंग झाला....
नलिनी : तुषार !!!
तुषार भानावर आला... अं, काय??
नलिनी :काय ठरवलं आहॆस?? यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल ना??
तुषार :तोच विचार तर मी करत आहे.... एकदा समायराशी बोलून घेतो... ती पण खूप टेन्शन मध्ये असेल असं म्हणून तुषारने समायराला फोन लावला....
समायरा : काय तुषार?? कुठे आहॆस?? किती कॉल केले मी....
तुषार :सॉरी सॉरी, अगं !मी फोन सायलेंट वर केला होता... ते जाऊदे... नलिनी आली आहे... ती सांगत आहे, मार्था माझ्या घरी येणार आहे.आईला भेटायला..
समायरा :हो ना !!सांग आता कसं करायचं?? म्हणत होते मी, अश्या भानगडीत पडायचं नाही....आता भोगा.😒...
तुषार : हे बघ समायरा !!तू शांत हो आधी... आपण यातून काहीतरी मार्ग काढू...dont worry... चल ठेवतो मी फोन... काहीतरी विचार करावा लागेल.....
नलिनी :चल तुषार येते मी.... मला समायराचा निरोप द्यायचा होता....माझं खूप काम बाकी आहे....
तुषार :ok बाय...
नलिनी तिथून स्कुटीवर गेली खरी, पण तुषार ने इतक्या टेन्शनमध्ये देखील तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघण्याची संधी सोडली नाही....
आईला कल्पना द्यावी का?? नको, आता नेमकंच तर आईला बरं वाटायला लागलं आहे.... आपल्या टेन्शनने अजून दुसरं काही व्हायचं... असा विचार तुषार राहून राहून करत होता....
ऑफिस सुटण्याची आता वेळ झाली होती.... पण तुषार कडून समायराला कसलाच सिग्नल मिळाला नव्हता....
त्यामुळे समायरा तुषारवर मनामध्येच सतत चिडत होती.....
तितक्यात तुषारने समायराला फोन केला....
समायरा : काय तुषार !!आज तू माझा जीव घेणार आहॆस वाटतं.... बोल आता पटकन....
तुषार :हे बघ मी तूला माझ्या घराचं लोकेशन send केलं आहे... मार्थाच्या driver ला दे... म्हणजे माझ्या घराच्या ऍड्रेस साठी तूला जास्त बोलावे लागणार नाही.... इथे मी माझ्या आईला विश्वासात घेऊन सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करतो....
समायरा : तू काहीही कर !! पण यातून काहीतरी मार्ग काढ.... मला खूप भीती वाटत आहे......
तुषार : हे बघ सर्व काही ठीक होईल.....चल ठेवतो फोन.... आईला बोलून बघतो....
तुषार :आई !! तूझी तब्येत ठीक नाही म्हणून आमच्या ऑफिसच्या बॉस तूला भेटायला येत आहेत....
तुषारची आई : हो का?? थांब मी किचन मधल्या सगळ्या सामानाकडे एक नजर फिरवते....असं
म्हणत तुषारची आई किचनकडे वळाली....
तुषार तिच्या मागोमाग किचनमध्ये घुसला आणि म्हणाला आई मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे....
तुषारची आई : अरे तुषार !! दूध नाही ना....तूझ्या बॉसला चहापाणी तर करावं लागेल....
तुषार : अगं आई !! तू आधी ऐक ना....
तितक्यात तुषारचा फोन वाजला..... तुषारने फोन हातात घेतला आणि बघितलं... समायरा?? ऑफिसवरून निघाले वाटतं असं मनात म्हणत तुषारने फोन कानाला लावला.
क्रमश :
भाग 23 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®डॉ.सुजाता कुटे
©® डॉ. सुजाता कुटे
क्रमश :
©®डॉ.सुजाता कुटे
4 टिप्पण्या
Thanks a lot.
उत्तर द्याहटवाNext 23
उत्तर द्याहटवाTommorrow, i am uploading daily one part
हटवाOk
उत्तर द्याहटवा