किती सांगायचं मला (भाग 24)

समायरा आणि तुषारची जणू मार्थासोबत एक छोटी मिटिंग झाली होती.... दोघेही ती मिटिंग संपल्यावर  त्यांच्या केबिन मध्ये येऊन बसले. 

या मिटिंगची कुणकुण आशिष आणि दिवाकरला लागली.... 

आशिष एकदम चिडून😡 तुषार आणि समायराच्या केबिन मध्ये आला..... 

आशिष :तुषार !! आपलं काय ठरलं होतं.... की app बद्दल सगळं मी बघणार म्हणून... मग तूम्ही कसाकाय मार्था जवळ तो विषय काढला..... 

तुषार : अरे आशिष, आम्ही फक्त कल्पना मांडली... याच्या पुढचं तर सगळं तुलाच बघायचं आहे ना... 
आता हे बघ तू जर एकटा किंवा तूम्ही दोघे म्हणजे दिवाकर आणि तू... दोघांनीच कल्पना मांडली असती तर इतकं एफ्फेक्टिव्ह झालं नसतं.... आता आम्ही दोघांनी ही कल्पना मांडली.... तूम्ही दोघेही जाऊन मार्थाजवळ विषय काढा.... म्हणजे तिच्यावर  bombardment होईल आणि तीला ते पटणारच...

जितक्या आवेशात येऊन आशिष तुषारला बोलायला आला तितक्याच शांततेने तो त्यांच्या केबिनच्या बाहेर पडला... 

समायरा : तुषार !! तूला एक गोष्ट स्ट्राईक झाली का??

तुषार :कुठली??? 

समायरा : मार्था ने आपल्याला तूझ्या आईची ख्याली खुशाली विचारण्यासाठी केबिनमध्ये बोलावलं होतं.... ही गोष्ट आपल्या पूर्ण ऑफिसला माहिती होती.... आपली मध्ये मिटिंग झाली हे तूला, मला आणि मार्था तिघांशिवाय अजून कुणाला माहीती होतं.... आपण आपल्या केबिनमध्ये येईपर्यंत त्याच्याकडे ही गोष्ट पोहोचली सुद्धा... तूला थोडं विक्षिप्त नाही का वाटलं.... 

तुषार : हो तू म्हणते त्यात तथ्य आहे.... कोण असेल.... 

गणेश !! दोघेही एकदम म्हणाले...... 

तुषार :या गणेश पासून सावध राहावं लागतं..... हा बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडे करतो..... 

तितक्यात एक कस्टमर आला दोघेही त्याला माहीती देण्यात गुंग झाले..... 

ईकडे आशिष दिवाकर जवळ आला.... दिवाकरला तुषारचं बोलणं सांगितलं.... 

दिवाकर : आशिष !! का, कुणास ठाऊक मला हा तुषार गरजेपेक्षा जास्तच हुशार वाटत आहे.... म्हणजे बघ ना तो त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटवून सांगतो... अन आपल्याला पटतेही...... 

आशिष :मला तर एक नंबरचा मूर्ख वाटतो तो कळत न कळत सगळं आपल्याच फायद्याचं बघतो....  

दोघांनीही आपापल्या परीने तुषार बद्दल अंदाज मांडले होते.... 

तितक्यात तुषार त्यांच्याजवळ त्या कस्टमरला घेऊन आला... 

तुषार : आशिष !!याला इंटरनॅशनल हनिमून पॅकेज बुक करायचं आहे...त्याला स्वित्झर्लंडला जायचं आहे....  मी जॉईन झाल्यापासून इंटरनॅशनल हनिमून पॅकेज एकही हॅन्डल केले नाही.... यांना मी दिलेली documents ची लिस्ट एकदा चेक कर.... काही कमी जास्त तर नाही ना.... 

आशिष :दोघांचेही पासपोर्ट, विजा,.... आणि बाकीचे सर्व documents.... good सगळं कव्हर केलं आहे यात...तुषार !!खर्च सांगितलास का?? लमसम चार ते पाच लाख लागू शकतो.... 

कस्टमर : तूम्ही पैशाचा विचार करू नका हो..... माझं हनिमून आम्हा दोघांनाही यादगार राहिलं पाहिजे... एवढं लक्षात ठेवा.... तुमच्या कंपनीचं नाव आहे म्हणून मी इथे आलो.... पैशाचा माज त्या कस्टमर च्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.... 

तुषार : हो, तूम्ही इथे आलात ते योग्यच केलं.... तूमचा अपेक्षाभंग बिलकुल होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.... तूम्ही लवकरात लवकर जेवढे जमतात तेवढ्या documents ची पूर्तता करा.... उरलेले आम्ही बघतो..... 

कस्टमर : ठीक आहे मिस्टर तुषार, येतो मी म्हणत तिघांच्या हातात हात मिळवून तो निघून गेला..... 

तुषारने देखील त्याच्या पाठोपाठ तिथून काढता पाय घेतला..... 

तुषार त्याच्या केबिनमध्ये पोहोचला... इंटरमिशन ची वेळ झाली... नेहमीप्रमाणे समायराने तुषारच्या नावाचा डब्बा आणलेला होता... 
रिसेसमध्ये ऑफिस मधले सगळे सहकारी कॅन्टीन मध्ये जाऊन डब्बा खात असत.... 

रजनी : काय तुषार काय आणलं आहे डब्ब्यात..... 

तुषार : ते डिपार्टमेंट माझ्या बायकोकडे... मी कुठे पाह्यले काय घेतलंय ते.... तुषार एकदम साळसुदपणाचा आव आणून म्हणाला.... 

समायरा मनातच... कसला भयंकर चालू आहे तुषार 🙄... मला तर वाटलं इथेच पकडल्या जाऊ....असं म्हणून समायराने डब्बा उघडला.... 

रजनी :अरे वा, 😋धपाटे.... 

समायरा ( मनात ) डब्यात काय आहे ते मला तरी कुठे माहीती होतं... आईनेच तर भरून दिलेला 😊

हलक्या फुलक्या वातावरणात रजनी, दिवाकर, आशिष, प्रदीप, गणेश, समायरा नी तुषार यांचा रोज डब्बा खाण्याचा कार्यक्रम होत असे.... सगळे मिळून मिसळून डब्बा खात असत... डब्बा खाताना कामाचा विषय काढायचा नाही असा नियम करून ठेवलेला होता.... त्यामुळे कुणी कुणावर कामानिमित्त कितीही चिडलं असेल तरी डब्बाच्या वेळेपर्यंत सगळं विसरून जाई...... 

या अश्या वातावरणामुळे ऑफिसमध्ये सगळ्यांनाच काम करायला मज्जा येई..... 

रिसेस संपली... सगळे जण आपापल्या जागेवर जाऊन बसले.... 

समायरा : मस्त उत्तर दिलंस रजनीला.... 

तुषार : हो सुचलं एकदम.... 

समायरा : बरं आल्यापासून आपण busy च आहोत.... कालचा दिवस कसा गेला... समायराला टेन्शन हे उत्तर अपेक्षित होतं.... 

तुषार : लाजून, खूप छान.... 

समायरा : काय??  खूप छान.... माझा तर जीव नुसता कासावीस झाला होता..... 

तुषार : अं, हो तसं मलाही खूप टेन्शन आलं होतं पण बरं झालं तूझा वेळेवर फोन आला... 

समायरा : तुषार !! तूझं लक्षण मला काही ठीक दिसत नाही...

तुषार :काय झालं आता?? 

समायरा : काल नलिनी आली होती ना....समायराने  मुद्दाम  विषय छेडला... 

तुषार : असं काय करतेस?? तूच तर पाठवलं होतं ना तीला... 

समायरा : हो का?? अच्छा.... म्हणजे तूझा काहीच फायदा झाला नाही तर.... 

तुषार : असा कसा नाही.... मला कळालं होतं ना मार्था येणार म्हणून.... 

समायरा जितकं तुषारला नलिनी बद्दल विचारण्याचा प्रयत्न करत होती तितकंच शिताफीने तो टाळत होता.... 

 आपल्याला नलिनी आवडते हे कदाचीत समायराला लक्षात आलं आहे.. म्हणूनच ती असे प्रश्न विचारत असावी... ....असा विचार तुषार मनोमन करू लागला होता..... 
भाग 25 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇

आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्याकथासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे 

 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या