समायरा तिच्या घरी पोहोचली....
समायराची आई : समु नीट आलीस ना !! भिजली बिजली नाहीस ना....
समायरा : अगं आई बसने येते ना मी.....बरं झालं मी बस मध्ये बसल्यावर पाऊस सुरु झाला....इतकी काळजी करू नकोस गं माझी..... मी घेईल स्वतःची काळजी....
समायराची आई : अगं तू घेशीलच काळजी पण एखाद्या राजकुमाराच्या हातात हात देई पर्यंत तर आम्हाला काळजी करावी लागेल ना....
समायरा :काय गं आई !!तूला नुसती थट्टा मस्करी सुचतेय.... मी नाही लग्न करणार... मी इथेच राहणार??
अमोघ :हो का 😉 अमोघने समायराकडे बघून डोळा मारला
इकडे तुषार आणि नलिनी आपापल्या घरी पोहोचले...
दोघेही खूप खूष होते.... दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहात होता....जणू काही त्यांच्या आयुष्यातील तो एक सुवर्ण क्षण होता.... दोघानाही ती भेट अपुरी वाटत होती.... दोघांनाही काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं........
तुषार तर खूप विचलित झाला होता..त्याला घरी पोहोचल्यावर आईला मदत देखील करावीशी वाटली नाही.... फक्त नी फक्त नलीनीच्या प्रेमात बेधुंद झाल्यासारखं झालं होतं....
तुषारच्या आईला वाटले.... रोज रोज काम करून एक दिवस तुषारला कंटाळा आला असेल.... म्हणून तीने एकटीनेच लवकर स्वयंपाक उरकला......
दोघेही जेवायला बसले....आता जेवणातही तुषारचे लक्ष नाही हे त्याच्या आईला लक्षात आले होते....
तुषारची आई :तुषार !!अरे काय झालं आहे तूला....
तुषार : काय झाले आई??
तुषारची आई : अरे मी तू घरी आल्यापासून बघत आहे.तूझं कशातच लक्ष लागत नाही...
तुषार : काही नाही आई... आज काही करावंसं वाटत नाही...
तुषारची आई : तब्येत ठीक आहे ना तूझी??
तुषार :हो आई, तसं काही नाही... जेवण झालं की आराम करतो मग वाटेल बरं....
तुषारने कसं बसं जेवण उरकलं आणि त्याच्या फोन कडे पाहू लागला....आपल्याकडे नलिनीचा फोन नंबर असता तर??
लागलीच तुषारला एक कल्पना सुचली.... त्याने समायराला फोन लावला.....
तुषार :हॅलो समायरा !!
समायरा : बोल तुषार !!कसं काय फोन केलास....
तुषार :अगं नलिनीचा फोन नंबर मिळू शकेल का मला... माझ्या एका मित्राला app devoloper पाहीजे होता योगायोगाने मी त्याला नलिनीचे नाव सांगितले.... तर तो तिच्याकडून काम करून घेण्याचं म्हणत आहे....
समायरा : अच्छा असं आहे तर... पण नक्की तूझ्या मित्रालाच तीचा नंबर हवा आहे ना?? की तूला...
तुषार : हो हो माझ्या मित्रालाच हवा आहे.... मी असं करतो माझ्या मित्राचा नंबर तूला देतो... तूच मग त्याला नलिनीचा नंबर दे....
समायरा : बरं बाबा... राहू दे.... देते मी नंबर असं म्हणत तीने नलिनीचा नंबर पाठवला...
तुषार : थँक्स समायरा, ठेवतो फोन असं म्हणत फोन ठेवून दिला....
नंबर तर मिळाला पण आता फोन काय म्हणून करणार..असा विचार करत असताना तुषारला पुन्हा कल्पना सुचली.....
तुषारने नलिनीला फोन लावला....
नलीनीने फोन नंबर बघितला... "unknown number " truecaller वर.. तुषार नाव आलं....
नलिनीला तुषार नाव बघताच एकदम धडधड करायला लागलं.... तुषार आणि फोन... बाबा पण घरी आहेत... फोन घेऊन ती गॅलरीमध्ये गेली...
नलिनी : हॅलो ...
तुषार : हॅलो नलिनी मी तुषार बोलतोय....
नलिनी : बोल तुषार कसाकाय फोन केलास...
तुषार : तू busy नाहीस ना... मला थोडीशी माहिती हवी होती....
नलिनी : कसली माहीती....
तुषार : अगं तू app develper आहॆस ना त्या विषयी....
नलिनी : अच्छा, काय माहीती हवी होती...
तुषार : तिला तिच्या कामाविषयी सगळी माहिती विचारली आणि थँक्स म्हणून फोन ठेवून दिला....
नलिनीला आता लक्षात आले होते की माहिती तर हा एक बहाना होता... त्याला तिच्याशी बोलायचं होतं... तसंच नलिनीला देखील तुषारशी बोलावंसं वाटत होतं म्हणून ती ही खूप खूष झाली होती....
तितक्यात तिच्या वडिलांचा खाकरण्याचा आवाज तीला आला.... चला बाबा तूम्हाला मी जेवायला वाढते असं म्हणून नलिनी किचनकडे वळाली....
नलिनी आणि तुषार दोघांनाही झोप काही लागत नव्हती.... सारखं सारखं दोघांचंही लक्ष आता फोन कडे चाललं होतं....
नलिनीला वाटायचं तुषारने काहीतरी मेसेज करावा आणि तुषारला वाटायचं नलिनीने काहीतरी मेसेज करावा...दोघेही बराच वेळ ऑनलाईन.. पण मेसेज करायची हिम्मत काही होत नव्हती.... शेवटी कंटाळून नलिनीने तीचा मेसेंजर बंद केला....
नलिनी संध्याकाळी घडलेल्या गोष्टी आठवून आनंदी होत होती.... तर तुषार बैचेन होत होता.. ... तुषारला तर काहीच समजत नव्हतं काय करावं... सांगावं का नलिनीला... की समायराची मदत घ्यावी.... काहीच कळत नव्हते.....
नलिनीची तर समायरा एकदम जवळची मैत्रीण होती... नलिनी आणि समायरा कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवत नसत.... त्यामुळे तुषार तीला आवडायला लागला हे समायराला कधी एकदाची सांगते असं झालं होतं...
पण समायराचा ऑफिस टाईम 9 ते 5 असल्यामुळे मध्ये तर भेटता येत नव्हतं मग 5 नंतर समायराच्या बस स्टॉप वर तीला भेटू... म्हणजे तुषारची भेट होईल.... आणि नंतर समायरा सोबत गप्पाही करता येईल..... बस स्टॉप वर जाऊन दोघांनाही सरप्राईज द्यायचे ठरवले....
दिवसभरात नलिनी सारखं सारखं ड्रेसिंग टेबल कडे जात होती... आरश्यात स्वतःला न्याहाळत होती.... स्वतःलाच प्रश्न करत होती.... मी त्याला मनापासून आवडत असेल ना !! त्याचा टाईम पास तर नसेल ना... पुन्हा तिचं मन तीला म्हणायचं नाही नाही त्याच्या डोळ्यात मला सच्चेपणा दिसला होता.....
घड्याळीचे चारचे ठोके पडले तसं नलिनीला एकदम धडधड करायला लागलं... एक अनामिक भीती वाटायला लागली...
मग ती स्वतःची समजूत काढायला लागली... अगं नलिनी तू काही तुषारला प्रपोज करायला नाही चाललीस... तू समायराला सांगायला चालली... आता जरा कूल व्हा आणि तयारीला लागा... नाहीतर आपलं सरप्राईज, सरप्राईजच राहील.....क्रमश :
भाग 27 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लीक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
©® डॉ. सुजाता कुटे
2 टिप्पण्या
Chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा