सगळे जण ऑफिस मध्ये आपापल्या कामाला लागले होते....
आज तर कस्टमरची रांग लागली होती... सगळे जण हा मार्थाचा पायगुण आहे असंच म्हणत होते.... त्यामुळे ऑफिस मध्ये काम करणारा प्रत्येकजण busy झाला होता....
तुषार आता नलिनीला प्रपोज करायचं कसं असा विचार करत होता...तर समायरा टोनी पून्हा भेटेल का याचा विचार करत होती... जणू काही, दोघांच्याही नशिबात एकाच वेळी एकाच प्रकारची भावना पण वेगवेगळ्या व्यक्तीसाठी चराचराने लिहून ठेवली होती ......
समायरा नी तुषार दोघेही विचलित मनाने पण कस्टमर जास्त असल्यामुळे काम रेटत पुढे नेत होते....
नलिनीने मात्र तिच्या app चे काम अगदी शिताफीने सुरु केले होते.... आणि एक एक टिपून घेतलेला बारकावा आपल्या सॉफ्टवेअर मध्ये घेण्याचा प्रयत्न करत होती..
आशिष तीचे काम बघून म्हणाला... नलिनी किती छान बारकावे घेत आहॆस तू.... सगळेच पॉईंट कव्हर करत आहेस ..
नलिनी : या आधी असेच काम केल्याने मला थोडं सोपं जात आहे.. तरी तुमच्या आणि त्यांच्या requirements मध्ये फार फरक आहे.... त्यामुळेच आपल्याला महिना ते दीड महिना लागू शकेल..
कस्टमर खूप असल्यामुळे दिवस कसा भर्रकन निघून गेला.... आज समायरा नलिनीजवळ तिचं मन मोकळं करणार होती....
तसं आजचा गप्पांचा विषय टोनी आहे ह्याचा थोडासा अंदाजा नलिनीला होता.....
तुषार : समायरा !! मी नलिनला लवकरच प्रपोज करणार आहे
समायरा : 😳, very good, go ahead..... पण कधी....
तुषार : आजच करू का??
समायरा : आज?? 😇🤔 ठीक आहे चालेल.... तसंही आम्ही आमच्या अड्डयावर भेटायचं ठरवलं आहे.... तू ही ये.... नलिनीला सरप्राईज देऊ .....
तितक्यात तुषारचा फोन खणखणला.....
तुषार : आईचा फोन?? ओ गॉड... आज फिजिशियनची अपॉइंटमेंट आहे.... समायरा !! मला डॉक्टरकडे जावे लागणार आहे.... मी नलीनीला प्रपोज करणार हे तिला सांगू नकोस प्लीज... 🤫
समायरा :🤐, चल मला आमच्या अड्डयावर सोड... तूला आमचा अड्डा कळेल, आणि नलिनी डायरेक्ट तिथे येणार आहे.मलाही तिथे वेळेत पोहोचता येईल....
नलिनी ऑफिस मधून बाहेर पडत असतानाच आशिष आणि दिवाकरने नलिनीला थांबवलं.... आता पर्यंत तीने किती काम केले याची समरी घेण्यासाठी.... त्याच वेळेस समायराने तीला कॉल केला.... नलिनीने घाबरून पटकन तो फोन स्विच ऑफ केला....
समायरा 🌅 बीचवर पोहोचली.... नलिनीची वाट बघत बसली.... एकदा फोन try केल्यावर स्विच ऑफ लागला होता... पण नलिनी येईल याची खात्री असल्यामुळे ती बेंचवर बसून वाट बघत बसली....
Hi supercute... बाजूने आवाज आला.....
समायराने मान वळवली.... टोनी 😳 (समायरा टोनीला पाहून खूप सुखावली होती, तिच्या मनामध्ये आनंदाने नाचत होती )
टोनी : yes, टोनी.. आज तू एकटीच?? ती तूझी फ्रेंड सोबत नाही का??
समायरा : तिचीच वाट पाहत आहे.... तू इथे कसाकाय?? आणि तूझ्या गर्लफ्रेंड्स??
टोनी :😂😂😂 काय म्हणालीस गर्ल फ्रेंड्स... अगं त्या माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहेत पण गर्ल फ्रेंड नाही... मी त्यांची नाही माझ्या मित्रांची वाट पाहत आहे.... तितक्यात मला तू इथे बसलेली दिसली... म्हटलं तेवढाच वेळ तुझ्याशी बोलावं....
समायरा : अच्छा.....
टोनी : बुट्टा खाणार?? असं म्हणत समोरच्या बुट्ट्या वाल्याला त्याने शिटी मारून आवाज दिला....
एक नमक मसाला निंबू लगाके बुट्टा दो भाई..... टोनीने तो बुट्टा घेऊन समायराला दिला....
समायरा : तू बुट्टा घे ना....
टोनी : अगं मी तूझ्यातलाच थोडा घेईल ... मला पूर्ण एक खाल्ल्या नाही जाणार....
समायरा मनात :how रोमँटिक, हे नक्की खरं आहे ना.... का बीच वर बसल्या बसल्या आपण जागे असताना स्वप्न बघत आहोत.... असा विचार करत समायराने स्वतःला चिमटा काढला.... हो हे सगळं खरं आहे....
समायरा : टोनी !! तू काय करतोस?
टोनी : मी सध्या सुट्टी एन्जॉय करतोय 😃..
समायरा : अच्छा....
टोनी :are you engaged??
टोनीच्या अश्या प्रश्नाने समायरा एकदम दचकली....
समायरा : म्हणजे?? 😳
टोनी :तूझा कुणी बॉयफ्रेंड आहे का??
समायरा : नाही
टोनी : असं कसं शक्य आहे... इतक्या सुंदर मुलीचा कुणीच बॉयफ्रेंड नाही??
समायरा : मला आतापर्यंत कुणी मनापासून आवडलंच नाही.... पण तू मला हे का विचारत आहेस ??
टोनी : हे बघ मला घुमवून फिरवून बोलायला आवडत नाही... i am intrested in you, i like you....
समायरा : काय?? 😳
टोनी : हो, मी उगाचच कुणाला supercute म्हणत नाही... मी तूला मॉल मध्ये पाहिलं तेव्हाच मला तू आवडली होतीस पण मला तुझ्या नावाशिवाय काहीच माहीती नव्हते... पण लकीली आज तू दिसलीस....
एकामागून एक धक्के बसल्याने समायरा एकदम स्तब्ध झाली होती....कुठे मी टोनीचा शोध घ्यायचा विचार करत होते आणि कुठे टोनी मला i like you म्हणतोय....
समायराला असं विचार करताना पाहून टोनी म्हणाला... हे बघ मला घाई नाही तू वेळ घे... पण गर्ल फ्रेंड तर माझी तूच होणार 😊.... मला तूझा नंबर दे ना... असं म्हणत दोघांनीही एकमेकांचे नंबर exchange केले....
टोनी : माझे मित्र आले आहेत... मी निघतो... आपण लवकरच भेटू 😉
तितक्यात तिथे नलिनी देखील आली....
नलिनी : सॉरी समायरा अगं मला दिवाकर आणि आशिष ने थांबवून ठेवलं होतं....
समायरा : अगं सॉरी का म्हणतेस?? उलट मीच थँक्स म्हणते तूला...
नलिनी : म्हणजे?? 🤔
समायराने टोनी भेटला आणि काय बोलला हे सर्व नलिनीला सांगितले....
नलिनी : अरे वा म्हणजे तुझ्या बाबतीत असं झालं की... किसी चीज को शिद्दत से चाहो तो वो खुद ब खुद अपने पास आजाती है 😂😂😂 दोघीही मनसोक्त हसल्या.....
हसता हसता समायराची नजर टोनीला शोधत होती.... टोनी मित्रांसोबत होता पण त्याचही लक्ष समायराकडे होतं... दुरूनच दोघांनीही एकमेकांना स्मित 😊 केलं....
तुषार नलिनीला प्रपोज करणार आहे हे तिला सांगावं की नको... नाही नको.... मला त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे...आणि तुषारने देखील आपल्याला विनंती केली आहे.... मी नलिनीला सांगितलं तर तो नेसर्गिक आनंद बघायला मी मुकेल... असा विचार करून समायराने तुषारचा विषय काढायच टाळलं....
आज तुषार नलिनीला प्रपोज करणार होता... पण टोनीने मला केलं 😊देवाच्या मनात नेमकं काय असतं देवच जाने 🤔
नलिनी : समायरा !! चला निघू या... मला आज घरी पण थोडं काम करावं लागणार आहे.. ....
समायरा : ठीक आहे नलिनी मला तू फक्त या समोरच्या ऑटो स्टॅन्ड पर्यंत सोड... मी ऑटोने जाईन.... तूझी आधीच आज खूप दगदग झाली आहे....
नलिनी : ठीक आहे... असं म्हणत नलिनीने समायराला ऑटो स्टॅन्ड पर्यंत सोडलं आणि तिच्या घरी निघाली....
समायराचा आनंद अगदीच ओसंडून वाहात होता💃💃... पहिल्यांदा आयुष्य खूप सुंदर 🥰😍🤩आहे याची जाणीव तीला झाली... जबाबदारीच्या ओझ्याखाली जणू ती जगणंच विसरून गेली होती.....
ऑटो मध्ये कित्येकदा स्वतःला चिमटे काढून बघत होती... राहून राहून मोबाईलवर टोनीचा नंबर चेक करत होती.... हो मी टोनीचा नंबर खरंच सेव्ह केलेला आहे... हे स्वप्न नव्हतंच मुळी... असा विचार करून समायरा स्मित😊 करत होती...
बाई इथेच ऑटो थांबवू का पुढे वळवायचा आहे ....
ऑटोवाल्याचा आवाज ऐकून समायरा भानावर आली...
समायरा :अं, थांबा थांबा... मी इथेच उतरते... म्हणून समायरा ऑटोतून खाली उतरली
भाग 35 वाचण्यासाठी निळ्या line ला क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
2 टिप्पण्या
Chan 👌👌👌👌@Swati Mohite
उत्तर द्याहटवाधन्यवाद स्वाती
हटवा