किती सांगायचं मला (भाग 37)

ऑफिस सुटल्यावर तुषार आधी घरी जाऊन छान फ्रेश झाला... एक ब्लॅक कलरचं टी शर्ट घातला... तो टी शर्ट त्याला एकदम खुलून दिसत होता... तुषारचा रंग गोरा असल्याने तो अधिकच हॅन्डसम दिसत होता... 

आईची परवानगी घेऊन ठरल्याप्रमाणे तुषार स्नॅक्स अँड कॉफी हॉटेल मध्ये गेला.. त्याने ऑलरेडी टेबल रिजर्व केला होता.

हुश्श, नलिनी अजून पोहोचली नाही.. बरं झालं मी घरी जाऊन फ्रेश होऊन आलो असा विचार करत तुषार त्याच्या रिजर्व केलेल्या जागेवर जाऊन बसला.... 

बसल्या बसल्या तुषारने आधी समायराला फोन 📳लावला... तिच्या वडिलांच्या तब्यतीची चौकशी केली.... तिच्या वडिलांची तब्येत ठीक आहे म्हटल्यावर तो ही थोडा निवांत झाला... 

नलिनी देखील ऑफिस मधून लवकरच घरी गेली होती... त्यामुळे छान तयार झाली होती... एक गुलाबी कलरचा टॉप आणि आकाशी कलर ची सलवार घालून दोन्हीही रंगाची शेड असलेली ओढणी एका साईडने पिन केली होती... लांबसडक केस बॅकपिन लाऊन मोकळे सोडले होते.... चेहऱ्यावर अगदीच नकळत, हलकासा मेक अप केलेला होता... नेहमीपेक्षाही आज छान वेळ देऊन तयार झाल्याने तिचं सोंदर्य अधिकच खुलून दिसत होतं... 

नलिनी तयार होऊन निघाली... तितक्यात नलीनीच्या बाबांनी तीला पाहीले...नलिनी इतकी तयार होऊन घराबाहेर पडत आहे.ही कधीच अशी घराबाहेर पडत नाही... त्यामुळे नलिनी दिसताच त्यानी तीला थांबवले... 

नलीनीचे बाबा : नलिनी !! कुठे निघालीस... 

नलिनीला तीचे बाबा सहसा बाहेर निघताना कधीच टोकत नसत.. पण पहिल्यांदा असं टोकल्याने नलिनीला वेगळाच अंदाज आला.... म्हणून नलीनीने हुशारीने उत्तर दिले.. 

नलिनी : नवीन प्रोजेक्ट मिळाल्याचं मी आणि काही फ्रेंड्स सेलेब्रेशन करत आहोत. म्हणून बाहेर चालले आहे... 

नलिनीचे बाबा : ठीक आहे, पण जरा लवकर घरी या...

बाबाचा होकार मिळताच नलिनी तिथून पटकन सटकली... 

दहा मिनिटात नलिनी स्नॅक्स अँड कॉफी हॉटेल मध्ये पोहोचली.... 

तुषार तिथे टेबल वर वाट पहात होता .... तितक्यात त्या हॉटेल मधल्या वेटरने हॉटेल चे दार अगदीच अदबीने  उघडले... नलीनीला वेलकम करून तुषारचा टेबल दाखवला....

नलिनी तुषारकडे जात होती... दोघांचीही एकमेकांकडे पाहण्याची नजर 🤩बदलली होती.. दोघेही एकमेकांसाठी तयार होऊन आले होते.... तुषारने दुरूनच तीला स्मित😊 केलं... नलिनीने पण स्मित 😊केलं आणि लाजून मान खाली घातली.

नलिनी टेबल जवळ गेली की एकदम औपचारिक पद्धतीने तुषारने नलिनी ला बसण्यासाठी खुर्ची मागे केली... 
त्यामुळे नलिनी अजून😍 लाजली....  

दोघेही समोरासमोर बसून इकडे तिकडे बघत होते कधी कधी एकमेकांकडे बघून स्मित करत होते.... दोघांचेही डोके एकदम ब्लॉक झाल्यासारखे झाले होते.... 

कदाचीत त्या दोघांच्याही मनातली घालमेल तिथल्या वेटरने ओळखली होती.... लागलीच एक टॅब घेऊन तो वेटर ऑर्डर घेण्यासाठी म्हणून आला... 

तुषार : नलिनी !! तू काय खाणार आहॆस... 

नलिनी : मला काहीपण चालेल,फक्त जरा हलकं फुलकं असावं... 

तुषार : गार्लिक ब्रेड चालेल??

 नलीनीने होकारार्थी मान हलवली  

तुषार :एक गार्लिक ब्रेड आणि एक ग्रिल्ड वेजिटेबल सँडविच.... बाकीची ऑर्डर नंतर देऊ.... 

वेटर ऑर्डर घेऊन निघून गेला.... 

तुषार : नलिनी !!...(.you are looking beautiful.. हे वाक्य फक्त मनातच बोलला )

नलिनी : काय?? 

तुषार : नलिनी !! तू ऑफिस मधून आज लवकरच घरी गेलीस... 

नलिनी : हो आजचे माझे काम झाले होते... आणि इथे पण यायचे होते ना म्हणून... 

तुषार : नलिनी !! You are looking beautiful... 

नलिनी :🤩 थँक्स 

तुषार : नलिनी !! तू काही बोल ना?? 

नलिनी :  काय?? 

तुषार : तू पुढे काय विचार केला आहॆस?? 

नलिनी : पुढे म्हणजे?? 

तुषार : अगं तुझे भावी काही प्लॅनिंग असेल ना... काही स्वप्न असतील ना.... विशेष करून जोडीदारा बद्दल 

नलिनी : जोडीदार😇दिसायला हँडसम असावा, मला समजून घेणारा असावा. निर्व्यसनी असावा आणि श्रीमंत असावा (नलिनीने मुद्दाम तुषारची फिरकी घेण्यासाठी श्रीमंत असावा असा उल्लेख केला )

तुषारने नलिनीच्या अपेक्षा ऐकल्या आणि त्याचा चेहरा खाडकन उतरला 😒

नलिनीला तुषारचा हिरमुसलेला चेहरा पाहून एकदम कसं तरी झालं.... 

तितक्यात तिथे टेबलवर गुलदस्त्यात असलेला गुलाब🌹 नलिनीने घेतला आणि तुषारला म्हणाली.... तुषार !! माझा होशील ना?? 

तुषार : 😳, अगं पण मी श्रीमंत कुठे आहे... 

नलिनी :  मला नाही फरक पडत....मी तूझी गंम्मत केली..
तुषार : अशी जीवघेणी गंम्मत 🙄

नलिनी : कान पकडून... सॉरी... 

नलिनीचा कानावरचा हात हातात घेऊन तुषार नलिनीला म्हणाला.. नलिनी माझ्या या छोटयाश्या विश्वाचा तू एक भाग होशील का??  माझ्याशी लग्न करशील?? 

नलिनी : मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला... पण माझे बाबा खूप कडक आहेत... सगळं काही रीतसर व्हावं हा त्यांचा अट्टहास असतो... 

तुषार : मग मी आईला सांगून रीतसर मागणी घालतो... 

नलीनीने लाजून होकारार्थी मान हलवली.... 

तितक्यात त्यानी मागवलेले जिन्नस आले... तुषारने सोबतच थोडयावेळाने कॉफी पाठवा अशी ऑर्डर केली...

नलिनी आणि तुषारच्या चेहऱ्यावर खूप आनंद झळकत होता...  एकमेकांकडे सतत बघत आणि आलेले पदार्थ संपवत दोघेही नुसते स्मित करत होते.... दोघांचंही खाण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं.... फक्त एकमेकांना न्याहाळण्यातच दोघे मग्न होते.... 

तुषार : मी आजच आईला मागणी घालण्याविषयी बोलतो...

नलिनीने लाजतच होकारार्थी मान हलवली ... 

कॉफी घेऊन झाल्यावर नलीनीने मोबाईलवर वेळ बघितला.आणि म्हणाली चल निघू या... उशीर होत आहे.

तुषार  थांब ना थोडावेळ😍😍..... 

नलिनी : नको, आधीच बाबा लवकर ये म्हणाले होते... 

तुषार :बरं जशी तूझी ईच्छा, असं म्हणून त्याने दोन डेरीमिल्क 🍫🍫सिल्क काढल्या आणि नलीनीला दिल्या... 

भारी आहे हे, आज तर मला  एकदम सोळा वर्षाची झाली आहे असं वाटत आहे....🍫🍫चॉकलेट पाहून नलिनी म्हणाली.... 

तुषार : खरं तर मी काही गिफ्ट घेण्याचा विचार करत होतो पण काही सुचले नाही म्हणून शेवटी हे.... 

नलिनी : तुषार!! प्लीज यापुढे  नो फॉर्मॅलिटीज...

तुषार :ok ok 

दोघेही हॉटेलच्या बाहेर पडले, पुन्हा तुषारने नलिनीला आवाज दिला.... 

तुषार : नलिनी !! 

नलिनी : काय ?? 

तुषार :अगं समायराशी एकदा बोलून घेशील... 

नलिनी : हो, उद्या सांगते तीला... 

तुषार : अगं ते नाही... आज समायरा ऑफिसमध्ये खूप डिस्टर्ब होती..... रडत होती आणि नंतर तिच्या आईचा फोन पण आला होता.... तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली होती म्हणून.....  मी समायराला फोन करून विचारलं... तेव्हा तिच्या वडिलांची तब्येत आता चांगली आहे असं तिने सांगितलं... 
पण नलिनी !!ती तरी पण खूप उदास होती... बरोबर बोलली नाही... कदाचीत ती तूला मोकळं बोलेल..... 

नलिनी : हो का??  घरी गेली की मी पहिले तीला फोन करते... 

तुषार : चल निघतो बाय,..असं म्हणून तुषारने हेल्मेट घातले...

नलिनी : बाय म्हणून नलिनी देखील स्कुटीवर  घरी निघाली
क्रमश :
भाग 38 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 

©® डॉ. सुजाता कुटे .
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या