तुषार आणि नलीनीच्या आयुष्यातला आज सुवर्ण क्षण होता... तर समायराच्या??
समायराच्या आयुष्यातील आजचा दिवस म्हणजे परिस्थितीमुळे एक ठाम निर्णयाचा होता.
समायरा आईवडिलांसोबत घरी आली... आता टोनीला काहीतरी कारण सांगून नकार द्यायचा किंवा सध्या तरी टोनीला टाळायचं काहीच बोलायचं नाही, भेटायचं नाही असा एक ठाम निश्चय केला....
टोनीने समायराला hi असा मेसेज केला.... समायराने तो ignore केला.... बघितलाच नाही....
थोडा वेळ वाट पाहून टोनीने समायराला कॉल केला....
ईच्छा नसताना समायराने तो फोन जड अंतःकरणाने कट केला....
समायराने फोन कट केल्याने टोनी अजूनच परेशान झाला...
त्याने पुन्हा फोन केला.....
समायराची आई : अगं समु !! तूझा फोन किती वाजत आहे...
समायरा : अगं आई कंपनीचा फोन येत आहे... spam रिपोर्ट केलं तर दुसऱ्या नंबरवरून कॉल करत आहेत....
समायराची आई : जाऊदे फोन सायलेंट करून टाक... हॉस्पिटलच्या वातावरणातून आल्याने हा फोनचा आवाज किरकिर वाटत आहे...
समायराने ते ऐकल्यावर टोनीचा नंबर ब्लॉक करून टाकला.. त्याला मेसेंजरवर ब्लॉक केलं....
टोनी मात्र फोन आणि मेसेज करून हतबल झाला...
मला माहिती नाही समायरा !!पण तुझ्या नजरेत मी माझ्यासाठी प्रेम😍 पाहिलं आहे.... तू मला कितीही ब्लॉक कर..... तू माझीच होणार आहॆस....तुला माहित नाही समायरा, मी किती जिद्दी आहे ते..... असा टोनी मनोमन म्हणाला...
तितक्यात पुन्हा फोन वाजला.... समायराने तीचा फोन चेक केला.... नलिनीचा फोन होता....
नलिनी : हॅलो समायरा !! कशी आहॆस??
तुषार सांगत होता की तू खूप टेन्शनमध्ये होतीस म्हणून....
समायरा : तुषार?? आणि तूला.... नलिनी congrats 😍😍 तूला तुषारने प्रपोज केलं ना??
नलिनी : समायरा !! म्हणजे तूला माहीती होतं?? तसं म्हणावं तर आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलं😍🤩...
समायरा : wow, किती छान😍....
नलिनी : समायरा !! ते जाऊदे तू मला सांग तूला काय झालं आहे....
समायरा : नलिनी !! आज तूझा खूप आनंदाचा दिवस😊 आहे... त्यात विरजण नको... आपण या विषयावर नंतर कधीतरी बोलू... तसंही हा विषय फोनवर 📳बोलण्यासारखं नाहीये.....
नलिनी : ठीक आहे, तूला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सांग... पण लवकर सांगशील....
समायरा : ठीक आहे नलिनी !! तू पण आता माझा जास्त विचार करू नकोस..... तू तूझा आनंद एन्जॉय कर....
नलिनी : काकांची तब्येत कशी आहे आता?? अचानक काय झालं होतं त्यांना....
समायरा : अगं दुपारी थोडं अस्वस्थ वाटत होतं आणि मग छाती दुखत होती... त्यामुळे आई जास्त घाबरली होती... पण बरं झालं फक्त उलट सुलट खाण्याने अपचन झाले होते... पण कदाचीत मला काहीतरी धडा शिकवण्यासाठी हे घडले असावे....
नलिनी : म्हणजे??
समायरा : जाऊदे, भेट झाली की बोलू आपण... आता ठेवते फोन....
असं म्हणून समायराने फोन ठेवला...
इकडे तुषार त्याच्या घरी पोहोचला.....
काय तुषार !! होकार ना... तुषारच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून तुषारची आई म्हणाली....
तुषारने होकारार्थी मान हलवली..... i love you आई😍 त्याच्या आईला बिलगून म्हणाला.....
तुषारची आई : मग काय म्हणाली माझी लाडकी सून...
तुषार : आई !! तीला सुद्धा मी आवडतो पण वडील कडक असल्यामुळे रीतसर मागणी घालावी लागेल....
तुषारची आई : ठीक आहे....... मी तुझ्या काकांना निरोप पाठवायला सांगते.....
तुषार : ठीक आहे आई....
तुषारने नलिनीला मेसेज केला....
तुषार : नलिनी !! घरी पोहोचलीस ना व्यवस्थित....
नलिनी : हो....
तुषार : कसं वाटत आहे??
नलिनी : परीकथेसारखं.👩❤️👨..
अरे जेवताना तरी तो फोन 📳बाजूला ठेवावा... नलीनीच्या बाबांचा आवाज आला....
नलिनीने पटकन फोन📳 बाजूला ठेवला.....
तुषारने अजून काय?? असा मेसेज केला होता पण बराच वेळ नलिनी ऑनलाईन पण दिसली नाही आणि रिप्लाय पण आला नाही.......
काहीतरी अडचण असेल असं समजून घेऊन तुषारने बाय, gn असा मेसेज करून टाकला.... जेणेकरून नलिनी देखील नंतर वाट पाहणार नाही....
दुसऱ्या दिवशी एका ठाम निश्चयाने समायरा तयार होत होती... तिच्या डोक्यात सतत टोनीचा सामना कसा करायचा हेच सत्र चालू होते..
तुषार आणि समायरा नेहमीप्रमाणे बस स्टॉप वर भेटले....
समायराचे वागणे आज नेहमीपेक्षा जरा वेगळे होते... ती स्वतः खूप खूष आहे असा अविर्भाव आणत होती... तुषारला ती गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली...
तुषार : समायरा !! कशी आहॆस??
समायरा : मला काय झालं आहे?? मी छानच आहे....
तुषार : अगं काल तू खूप टेन्शन मध्ये होतीस ना म्हणून विचारलं आणि आता बाबांची तब्येत कशी आहे??
कालच टेन्शन कालच संपलं.... बाबांची तब्येत एकदम छान आहे..... बरं आता चल लवकर, नाहीतर आपल्याला वेळेवर येऊनही ऑफिसला उशीर होईल विषय बदलण्यासाठी समायरा म्हणाली... ..
असं म्हणून दोघेही ऑफिसला आले.....
आल्या आल्या समायराला गणेशने चॉकलेटचा बॉक्स दिला....
समायरा : गणेश !! हे काय??
गणेश : सुहास बाबा ने दिलेत....
समायरा ते ऐकून मटकन खाली बसली.... काय 😳, सुहासला (टोनी )कळाले की काय?? मी इथे नौकरी करते ते... असं कसं शक्य आहे.... क्षणभरात तिच्या नजरेसमोरून शंभर एक विचार येऊन गेले.....
गणेश : मी काल तुषार साहेबाजवळ दिले होते पण तेच म्हणाले की उद्या तुमच्या हातात द्या म्हणून....
तुषार : अगं सुहासने सगळ्या एम्प्लॉयीच्या नावाचे बॉक्स आणले होते... तू काल निघून गेली ना... त्यामुळे तो बॉक्स तसाच राहिला..... मी गणेशला म्हणालो... हा आमच्या मॅडमच्या नावाचा बॉक्स आहे ना मग त्यांच्याच हातात मिळायला हवा....
समायराने ते ऐकून सुस्कारा सोडला पण आपण समजलो ते सगळेच गैरसमज होते हे समजल्यावर त्याचं दुःखही झालं.......
गणेश तिथून निघून गेल्यावर समायरा तुषारला म्हणाली.... काय मग?? कशी झाली कालची date.. ..
तुषार : एकदम लाजून....🥰 अगं date काय?? दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलं.....
अरे बाप रे !!😳 तूला लाजता पण येतं..... माझ्यासमोर तर मला कधी लाजताना दिसला नाही.... डायरेक्ट लग्न करतेस का म्हणून विचारलं... समायराने तुषारची फिरकी😇 घेण्याच्या अंदाजाने विचारले....
तुषार :समायरा !! अशी फिरकी😇 नको घेऊस ना🙄.... तेव्हा मनात काही नव्हते म्हणून बोलू शकलो... पण खरं सांगू का मनात असल्यावर मनातली गोष्ट ओठावर येणं खूप अवघड असतं😊.....
समायरा : हो, ते ही खरंच आहे म्हणा.... पण मला आता तुमच्या दोघांकडून पार्टी पाहिजे.....
तुषार : नक्की 👍
तितक्यात कस्टमरची रेलचेल सुरु झाली.... दोघेही त्यांचे कस्टमर करण्यात व्यस्त झाले..... लग्नांचा सिझन असल्यामुळे समायरा आणि तुषारचे काम चार पटीने वाढले होते.... त्यांचे पॅकेज फार लवकर फूल होत होते.... पण कंपनीची app नसल्याने त्यांना उपलब्ध असलेल्या हॉटेल्सची माहिती मिळायला जरा वेळ लागत होता...त्यामुळे या दोघांनाही एका एका कस्टमरच्या वेळेस वेळ लागत होता......
क्रमश :
भाग 39 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
6 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNext blog taka na.
उत्तर द्याहटवाWaiting.......
आज खूप busy आहे मी... आजच टाकेल पण उशीर होईल 👍
हटवाAjun kiti vel. 🙄
उत्तर द्याहटवाटाकला भाग 👍
हटवा