नलिनी : हे बघ तुषार !!पाच दिवसांचा तर प्रश्न आहे.... पाच दिवसात इतकं काय बदलणार आहे...तसंही आपल्या मध्यमवर्गीयांना असं कुठे फिरायला मिळतं.....
तुषार : नलिनी !! किती समजूतदार आहॆस गं तू... पण तूला कळतं का?? हनिमून पॅकेज आहे ते.....
नलिनी : तुषार !!पून्हा तेच... अरे मी म्हणाले ना की तूम्हा दोघांवर माझा विश्वास आहे.... आणि काही स्पॉट्स आपल्यासाठी पण बघून ठेव🥰😍....
नलीनीच्या त्या वाक्याने तुषार जरा खूष झाला🙂.... त्याचा ताण थोडा कमी झाला....
नलिनी : तुषार !! आज मला लवकरच जायचं आहे... app च्या कामात काही बदल करायचे आहेत....
तुषार : बदल करायचे म्हणजे...
नलिनी : अरे कधी कधी आशिष आणि दिवाकर गोंधळ घालतात... मी आधी तयार केलेली गोष्ट अमान्य करतात... स्वतःचे काही पॉईंट ऍड करतात आणि मग शेवटी परत मी जे केलं तेच ऍड करायला सांगतात... असा अनुभव मला दोन तीन वेळेस आला.....
तुषार : काहीतरी फ्रॉड करता येते का याचा विचार करत असतील....
नलिनी : असू शकतं... म्हणून आता मी जरा डुप्लिकेट प्रोजेक्टचं काम सुरु केलं आहे.... म्हणजे त्यांच्यासमोर ते म्हणतात तसं करायचं... पण घरी आपला आपला प्रोजेक्ट चालू ठेवायचा.....
तुषार : बापरे, 😳मग तर तूला डबल काम पडत असेल....
नलिनी : प्रत्येक वेळेस पाहिल्यापासून करण्यापेक्षा आता फक्त file ट्रान्सफर चं काम ठेवलं आहे मी... आता थोडा वेळ लागेल पण काही दिवसांनी माझ्यासाठी सोप्प होईल...
तुषार : ठीक आहे चला आता....
तितक्यात नलिनीने तुषारला एकदम झाडाच्या आड ओढले...
तुषार : how रोमँटिक.🤩...
नलिनी :🤦♀️, तुषार !! शैतान का नाम लिया शैतान हाजीर... तिथे त्या कोपऱ्यावर आशिष आला आहे....
तुषार : हो, का?? तुषारने हळूच खात्री केली... अरे हो की??
नलिनी :🤷♀️
तुषार : नलिनी आपण या मागच्या गेट नी चालले जाऊ... चल निघ लवकर....
तुषार आणि नलिनी तिथून सटकले.... हुश्श करून आपापल्या गाडीवर बसले आणि तिथून निघून गेले .....
पोहोचल्यावर नलीनीने तुषारला घरी व्यवस्थीत पोहोचल्याचा मेसेज केला....
ऑफिस मधून घरी पोहोचल्यावर समायराने तिच्या आईला सांगितलं... 15 तारखेला मला ऑफिस कामासाठी उटीला जावं लागणार आहे...
समायराची आई : उटी!! इतक्या दूर?? नाही गेलं तर चालणार नाही का? तरण्याताठ्या पोरीने असं एकटं गेलेलं बरं दिसत नाही...
समायराचे बाबा : कुसुम !! तू पण ना, कुठल्या जमान्यात वावरतेस.... मला माझ्या लाडक्या लेकीवर विश्वास आहे... समु बेटा तू जा उटीला....
समायरा : थँक्स बाबा, खरं तर जाण्याची माझी पण तितकी ईच्छा नव्हती पण आमच्या बॉसने... जावच लागेल असं म्हटलं आहे...
समायराची आई : आणि वापस कधी??
समायरा : वीस तारखेला....
समायराची आई : जाणार कसं?? ...
समायरा: ✈️ विमानाने .... सगळा खर्च बॉस करणार आहे...
अमोघ :अरे वा ताई !! तू विमानाने ✈️जाणार.... मज्जाच...
समायरा : हं.... अमोघ आई बाबांची काळजी घेशील बरं का??
अमोघ : हो गं ताई....
घरातील एकंदर वातावरण उत्साहाचं होतं....समायराने पॅकिंगला सुरवात केली...
टोनीने आता gps tracker च्या मदतीने समायराचा नंबर track करायचं ठरवलं जेणेकरून समायरा कुठे राहते कुठे जाते काय करते हे त्याला माहीती करायचं होतं... पण त्यासाठी समायराच्या फोनची परवानगी लागत होती त्या मुळे फोन ट्रॅक करणं जमत नव्हतं..
पण मग टोनीला आठवलं की त्याचा एक मित्र हॅकर आहे.... त्याने त्याची मदत घ्यायचं ठरवलं...
टोनीने वेळ न दवडता त्याला फोन लावला... व समायराच्या फोन्स चे डिटेल्स दिले.......
तुषारच्या घरी नलीनीच्या बाबांचा निरोप आला... नलिनीशी चर्चा करून त्यानी बावीस तारीख रविवार बघण्याचा कार्यक्रम ठेवला .... सगळं काही व्यवस्थित फिक्स झाल्याने तुषार ही जरा निवांत झाला होता ....
समायरा उटीला जाण्याच्या आधी तीची एकदा भेट घेऊन तीला कसले टेन्शन आहे ते बघायला हवे.... मला जेव्हा गरज असते तेव्हा ती कधीपण माझ्यासाठी हजर असते आणि मी.... स्वतःच्याच तंद्री मध्ये.... नाही आज तिला नक्की भेटायचं..... असं आज नलीनीने ठरवलं..... पण समायरा कदाचीत टाळेलही... कारण तीला वाटत आहे आपल्या आनंदात विरजण कश्याला... काहीतरी ठरवून नलिनी आपल्या कामाला लागली .....
समायरा आणि तुषार ऑफिसला पोहोचल्यावर सगळेच त्यांना हनिमून गिफ्ट मिळाल्याने अभिनंदन करत होते...
दोघांनाही एक खोटा आनंद चेहऱ्यावर 😊आणावा लागत होता आणि थँक्स म्हणावं लागत होतं...
रजनी : क्या बात है, तुषार आणि समायरा बॉसवर काय जादू केली आहे तूम्ही?? जेव्हा पाहावं तेव्हा तुम्हाला गिफ्ट मिळत राहतं.... मला एक वर्ष झालं जॉईन करून... ना कुणी मी जॉईन झाल्याची पार्टी दिली.... ना अजून असं एखादं स्पेशल गिफ्ट मिळालं 😏
तसंही मला जाण्याची ईच्छा नाही तू जातेस का 😡 समायरा पून्हा रागात येऊन बोलली..
समायरा !!🤫तुषारने हळूच खुणावलं
रजनी : समायरा !! हनिमून पॅकेज आहे ते.... मी कसं जाणार... तसंही मी दुसऱ्या कुणाचं गिफ्ट घेत नसते😏...
मग काम करून मिळवायचं.... असं म्हणून समायरा ताड ताड निघून तिच्या केबिन मध्ये गेली....
समायरा : काय यार?? सकाळी सकाळी सगळा मूड खराब.......
तुषार : समायरा !! तूला किती वेळेस सांगितलं तू त्या रजनीच्या नादी नको लागूस....
समायरा : मग काय मूग गिळून बसू.... तीला काय करायचं आहे?? प्रत्येक वेळी ती मला कुचकट बोलते... मला नाही सहन होत ते....
तुषार : समायरा !! ती कुचकट बोलते कारण ती तुझ्यावर जळते... हे बघ कुणी कुणावर कश्यामुळे जळतो... कारण त्या व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं असतं.... तू रजनीच्या कुचकट वागण्याला पॉसिटीव्ह घे.... ती जे वर्षभरात करू नाही शकली ते तू काही महिन्यात करून दाखवलं... साहजिकच तीचा जळफळाट होणार.....
समायरा : तुषार !! आधीच एकामागे एक येणाऱ्या संकटाना तोंड देऊन नाकीनऊ येत आहे. त्यात ही रजनी??
तुषार : अरे बापरे, आज तर तूला खूपच राग आलेला😡 दिसत आहे....
समायरा : हो मग ,
खरं तर समायराच्या मनात सगळं दुःख साठवलं गेलं होतं... त्याचा हा स्फोट झाला होता..... कुणाजवळही ती स्वतःचं मन मोकळं करू न शकल्याने आज ती अशी वागली होती...
तुषार : गणेश !! दोन कॉफी आण बरं??
समायरा : गणेश !! थांब नको आणूस, तुषार !! नियम तो नियम... इथे self service आहे ना... चल आपण कॉफी रूम मध्ये कॉफी घेऊ....असं म्हणून दोघेही कॉफी रूम कडे निघाले....
कॉफी घेऊन दोघेही थोडे रिलॅक्स झाले.... कॉफी घेई घेई पर्यंत कस्टमरची रांग लागली होती.....
तुषार आणि समायरा आपापल्या जागेवर बसले आणि कस्टमरशी डील करू लागले.... त्यातील एक दोघे जण अती हुशार होते ते समायराला म्हणाले...तूमची एवढी मोठी कंपनी, एवढं काम चालतं अन कंपनीची साधी app नाही....
ते काय आहे ना... आम्हाला तुम्हाला डायरेक्ट सर्विस देण्यात जो आनंद मिळतो तो app ने थोडीच मिळणार आहे.... तसंही वाढता व्याप बघता काही दिवसात app येईलच.... समायरा स्मित 😊करून म्हणाली....
कस्टमर समायराच्या बोलण्याने खूष झाला आणि त्याने अजून थोडं महागडं पॅकेज बुक केलं...
तुषार :अरे वा समायरा !! मला वाटलं की तू त्याच्यावरही चीडशील....
समायरा : त्या कस्टमरचा प्रश्न म्हणजे टोमणा नव्हता... त्याची शंका होती .... त्याचं निरसन करणं गरजेचे होते...
तुषार :ग्रेट 👍
क्रमश :
भाग 42वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
2 टिप्पण्या
Khupch chaan story....woww..mla ya website ne vachayla milte purn mast...thanks☺️
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा