उटीला जाण्याच्या दिवस उजाडला....
गंगाबाईने दारावरची बेल दिल्याने तुषार आणि तुषारची आई उठले....
तुषार : आई !!मी तयार होतोय फक्त चहा ठेव... असं म्हणून तुषार तयार व्हायला लागला....
तुषार तयार होऊन हॉल मध्ये आला.....
तुषार : तूम्ही आहेत का गंगा मावशी?? ... माझ्या आईची काळजी घ्या... एकटीला सोडू नका....तसंही आमच्याकडे तूम्ही येत आहात तेव्हापासून आईच्या तोंडून नुसतं तुमचंच नाव ऐकत आहे....
गंगाबाई : हो दादा, तूम्ही बिनधास्त जा.... इथली काही काळजी करू नका.....
तुषारने कॅब बुक केली..
समायरा देखील तयार झाली.. आई बाबांच्या पाया पडली... अमोघने कोपऱ्यावरून ऑटो आणला आणि अमोघ समायराला ऑटो मध्ये बसून सोडवायला गेला....
अमोघ : समु ताई उटीला तू एकटीच जात आहॆस की so called" भाऊजी" 🙄पण सोबत येत आहेत....
समायरा : अमोघ !! 🤦♀️तुषार नाव आहे त्याचं... हो तो पण येत आहे...
अमोघ :अच्छा
समायरा नी अमोघ एअरपोर्ट वर पोहोचले... तुषार आधीच पोहोचला होता....
तुषार : अमोघ आला काय सोडायला... गुड... समायरा !!चेक ईन करायचं आहे... तुझं आधार कार्ड वर काढून ठेव...
समायरा : अच्छा... अमोघ तू निघ आता... आई बाबांची काळजी घे.... असं म्हणत समायरा सामान ठेवण्याच्या ट्रॉली घेण्यासाठी गेली... ट्रॉली घेऊन त्यावर दोघांचेही सामान ठेवून दोघेही चेक ईन साठी गेले.....
दोघांचाही विमानाचा पहिलाच प्रवास असल्यामुळे दोघेही थोडेसे गांगरून गेले होते.... पण वेळोवेळी येणाऱ्या मोबाईल मेसेज आणि जागजागी लावलेले डिजिटल दिशादर्शक तक्ते त्या मुळे दोघेही व्यवस्थित विमानात बसले....
विमानात हवाई सुंदरीने सांगितलेली माहीती.... सीट बेल्ट लावल्यावर विमान टेक ऑफ घेतानाची होणारी धडधड सगळंच काही कुतुहल देऊन जाणारं होतं
प्रवास जवळ जवळ तीन तासाचा होता....
दिवसा प्रवास असल्यामुळे, समायरा विन्डो सीट वर असल्याने ती ढगातून फिरण्याचा मस्त आस्वाद घेत होती.... तर तुषारलाही जमेल तसे दाखवत होती....
समायरा : कधी कधी काही गोष्टी किती टेन्शनमय असल्या तरी आपणास आनंद देतात... हो की नाही तुषार??
तुषार : हो.... बघ तो वैमानिक काय सांगत आहे... किती छान बोलत आहे तो....
समायरा : काय??
तुषार : तो सांगत आहे आपण जमिनीपासून कितीतरी हजार फीट उंच आहोत..... आणि हवामान चांगलं आहे.....
समायरा :अच्छा... हे घे chewing gum.... विमान लँडिंग होताना चघळायचं नाहीतर कान दुखतील.....
तुषार :अच्छा.....
समायरा : lake view च्या हॉटेल मालकाला आपण निघाल्याचा मेसेज करून टाकायचा असता.... म्हणजे ते गाडी पाठवतील....
तुषार : त्यानी ड्रॉयव्हरचा देखील नंबर पाठवला आहे मी त्याला सांगून ठेवलं आहे..... तो 11 वाजेपर्यंत तिथे असणार आहे....
समायरा : चला म्हणजे सगळं व्यवस्थित प्लॅन झालं आहे तर.....
विमानाची लँडिंग झाली... तुषार आणि समायरा एअरपोर्टच्या बाहेर पडले तोच त्यांच्या नावाचा फलक घेऊन उभा असलेला ड्रॉयव्हर त्यांना दिसला.... त्याच्याकडे बोट दाखवून मग दोघेही कार मध्ये येऊन बसले....
रस्त्याने जात असताना उटीचे अवर्णनीय सोंदर्य बघून दोघेही खूप खूष झाले... डोंगराळ भाग... उंच उंच झाडे .... आणि हत्तीचा असणारा मुक्तसंचार... त्यांना एक एक गोष्ट अगदी विस्मयचकित करून जात होती....तेथील निसर्गसोंदर्य इतकं मनाला भावणारं होतं की दोघांनाही आपापले फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही....
दोघेही हॉटेल लेकview ला आले.... त्या हॉटेल मालकाने एक पुष्पगुच्छ देऊन दोघांचेही स्वागत केले..... आणि त्यांना रूमची चावी दिली.....
रूमची चावी मिळाल्यावर दोघेही एकदम भानावर आले... अरे हे काय?? आपण तर हनिमून पॅकेज साठी ईथे आलो आहोत.... समायरा मटकन तिथल्या सोफ्यावर बसली....
समायराला डिस्टर्ब पाहून तुषार देखील अस्वस्थ झाला आणि तो सामान घेऊन एकटाच रूम कडे गेला....
रूम बघताच तुषार खूप खूष झाला आणि समायराकडे येऊन म्हणाला....
तुषार : समायरा !! आपली काळजी मिटली.... ईथे कॉटेज आहे.... आपल्या कॉटेजमध्ये एक हॉल आणि एक बेडरूम आहे....
तुषारचे ते वाक्य ऐकताच समायराच्या जीवात जीव आला..... आणि समायरा त्यांच्या रूम मध्ये गेली.....
समायरा आणि तुषारने मग आपापल्या घरी उटीला व्यवस्थित पोहोचल्याचे फोन करून सांगितले....
समायरा : तुषार !! नलिनीला सांगितलं की नाही, आपण इथे व्यवस्थित पोहोचलो आहे ते??
तुषार : अगं तिला पोहोचल्या पोहोचल्या मेसेज केला मी.... आतापर्यंत बघितला असेल......
असं म्हणून तुषारने चेक करण्यासाठी फोन हातात घेतला....
दोघेही फ्रेश झाले... त्यांना लागलीच लंच साठी आमंत्रित केले गेले.....
अगदी खूप सारे veg आणि नॉनव्हेज पदार्थ उपलब्ध होते.... दोघांनीही भरपूर जेवण केले... त्या नंतर त्या हॉटेलचा मॅनेजर येऊन त्यांना भेटला.....
हॉटेल मॅनेजर : सर तूम्ही आता रेस्ट करा, चार वाजता जवळ एक साईट सीन आहे... तिथे हा कार ड्रॉयव्हर तूम्हाला घेऊन जाईल... तूम्ही फिरून आल्यावर मी तुम्हाला आपल्या हॉटेलच्या किचन पासून ते हॉटेलची प्रत्येक गोष्ट दाखवतो.... आपल्या event मॅनेजरने हे साईट सीन प्लॅन केलेले आहेत...
रात्री हनिमूनच्या जोडप्यासाठी विशेष स्पर्धा आणि कार्यक्रम असतात...ही आपल्या हॉटेलची स्पेशालिटी आहे.... खरं तर मी काय सांगणार तुम्हीच आम्हाला सुचवलेली स्पेशालिटी आहे.... त्या मुळे खूप लवकरच आपलं हे हॉटेल प्रकाश झोतात आले......
तुषार : ठीक आहे... आम्ही आता आराम करतो.. असं म्हणून दोघेही रूमकडे वळाले.... तुषारने एका रूम सर्व्हिस वाल्या माणसाला पकडले....एका जास्तीच्या गादीची मागणी केली...
आराम झाल्यावर जवळच असलेल्या तलावाकडे त्यांना नेण्यात आले.... तिथे बोटिंग केल्यानंतर त्यांना त्यांच्या कॉटेजला सोडण्यात आले....
आतापर्यंतचा दोघांचाही प्रवास खूप आल्हाददायक झाला होता....
संध्याकाळी फ्रेश झाल्यावर दोघांनाही एका बँक्वेट हॉल मध्ये बोलावण्यात आले .....
बँक्वेट हॉल जागजागी लाल दिल असलेल्या फुग्यांनी सजवला होता.... हॉल मध्ये एंट्री करत असताना प्रत्येकाच्या हातात एक लाल गुलाब दिला जात होता
सगळीकडे धूसर प्रकाश ठेवला होता... त्यामुळे त्या हॉल ला एक विशिष्ट वातावरण प्राप्त झालं होतं...
त्या हॉल मध्ये अंदाजे पंधरा जोडपी होती... त्यातील जवळ जवळ बारा जोडपी अगदीच नवविवाहित जोडपी असतील आणि बाकीची वयस्कर पण दोघेच... मूल बाळ कुणीही सोबत नाही... अशी जोडपी होती.....
संध्याकाळी पाऊस पडल्यामुळे खूप थंड वातावरण होतं..... त्यामुळे त्या हॉल मध्ये रूमहिटर लावलेलं होतं.....
तुषार आणि समायराने दिवसभरात दुपारी उन्हाळा, संध्याकाळी पावसाळा आणि रात्री हिवाळा असे तीन ऋतू एकाच दिवसात अनुभवले होते.....त्यांना प्रत्येक गोष्टीचे कुतूहल वाटत होतं....
क्रमश :
भाग 45 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
5 टिप्पण्या
Chan 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाAajcha blog
उत्तर द्याहटवासॉरी आज खूप busy होते मी आज उशिरा टाकेल, उद्या वाचा 👍
हटवा?????
उत्तर द्याहटवा