कॉफी घेऊन तुषार निघाला.. निघताना त्याने सुहासच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला... पण तुषारच्या बोलण्याने सुहास खूप डिस्टर्ब 😒 झाल्यासारखा वाटत होता... त्याच्या चेहऱ्यावर राग 😡स्पष्ट दिसत होता.... म्हणून नंतर काहीच न बोलता तुषार तिथून निघून गेला....
तुषार त्याच्या रूमवर गेला... समायरा शांत झोपी गेलेली त्याला दिसली🛌.....
तुषारने रूमवर जेवण मागवले... जेवण करून तो मग खाली टाकलेल्या गादीवर पहुडला....
गादीवर पडल्या पडल्या तो सुहासच्या मनात आता काय चाललं असेल आणि नंतर तो काय रिऍक्ट होईल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करू लागला... पण काही केल्या त्याला सुहासच्या मनात काय चाललं आहे याचा थांगपत्ता लागेना.... विचार करत करत तुषारला झोप लागली...
सकाळ झाली☀️... सूर्याची कोवळी किरणे समायराच्या🌄 गोऱ्या चेहऱ्यावर खिडकीतून डोकावत होती... जणू काही समायराला ती एक सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत होती.... समायराने आळस झटकला आणि फ्रेश होऊन गॅलरी मध्ये येऊन बसली... गॅलरीमधून ती उटीचं सोंदर्य बघत होती... तितक्यात तिथे तुषारही आला...
तुषार : गुडमॉर्निंग समायरा....
समायरा : गुडमॉर्निंग तुषार, सॉरी रात्री मी खूप थकले होते कधी झोप लागली हे कळलंच नाही....
तुषार : let it be, रात गई बात गई....
आज थकवा नाही ना?तुषार अंदाज घेण्याच्या सुरात म्हणाला
समायरा : no no, not at all.... उलट ईथे बसल्यावर आज खूप छान आल्हाददायक आणि शांत वाटत आहे... इथलं सोंदर्य नुसतं बघावंसं वाटत आहे....
तुषार आणि समायराने मग बसल्या जागीच चहा आणि नाश्ता मागवला... त्यांचा साईट सीन ठरला होता कुन्नूर.... आता दोघेही ड्रॉयव्हरची वाट पहात होते...
आपण काल सुहासला जे काही सांगितलं आणि त्याची त्यावर होणारी प्रतिक्रिया जर उलटी असेल तर समायरा मला कधीच माफ करणार नाही.... असा विचार सतत तुषारच्या मनात येत होता....
तितक्यात तुषारला हॉटेल मॅनेजरने फोन करून बोलावून घेतले.... सुहास सरांनी ही तुमच्यासाठी चिट्ठी ठेवली आहे.असं सांगितलं....
तुषार : सुहास सर कुठे आहेत??
हॉटेल मॅनेजर : सर सकाळीच त्यांची बॅग घेऊन... निघून गेले
तुषार : निघून गेले?? कुठे??
हॉटेल मॅनेजर : मोठे लोक आपल्याला थोडीच सांगतात कुठे चालले आहे ते....
तुषारने चिठ्ठी उघडली त्यात एक ऑर्डर लिहिली होती ती अशी तिथल्या एका प्रिन्स हॉटेल मध्ये डुप्लिकेट लिकर🍻 चा वापर होतो आहे... अशी माहीती मिळाली आहे.... ते खरं आहे का खोटं हे पाहण्यासाठी सुहासने तुषारला जाऊन खात्री करण्याची ऑर्डर दिली होती....
ती ऑर्डर घेऊन तुषार रूमवर आला आणि समायराला ती ऑर्डर दाखवली....
समायरा : लिकर🍻 "ओरिजिनल की डुप्लिकेट "तू काय सगळे लिकर चव घेऊन बघणार??
तुषार : समायरा !! अगं त्यांची पॅकिंग,त्याच्यावरचे लेबल आणि आता आपल्या अत्याधुनिक युगात आलेला QR कोड बघावा लागेल बस्स... जर त्याच्यात काही शंका वाटली तर मग आपलं डील कॅन्सल करावं लागेल... त्या साठी मला हे काम दिलं आहे बहुतेक...
समायरा : अच्छा, पण तरीही चव वगैरे घेऊन बघू नकोस बरं😇🙄...
तुषार : समायरा !! तू इतक्या दिवसापासून माझ्या सोबत आहेस कधीतरी तूला असं वाटलं का की मला असल्या काही सवयी आहेत...
समायरा : नाही, मी फक्त जोक😇 करत होते...
तुषार : तरीपण... अगं लहान वयात माझ्यावर पडलेल्या जबाबदारीने मला खूप काही शिकवलं आहे.... त्या मुळे मी स्वतः खूप संतुलित राहायला शिकलो आहे...
समायरा :बरं बाबा, ठीक आहे.... तसंही मला इथे बसल्या बसल्या खूप छान वाटत होतं.... कुन्नूर ट्रिप नकोशी वाटत होती तुझ्या या कामामुळे मला छान आरामात बसता येईल...
तुषार : ठीक आहे, तू कर आराम... मी जाऊन येतो असं म्हणून तुषार तिथून निघून गेला....
तुषार निघून गेल्यावर समायरा जरा आळसावली होती आराम करावा असा विचार करत असतानाच हॉटेल मॅनेजर चा रूमच्या फोन वर फोन आला...
हॉटेल मॅनेजर : समायरा मॅम !! सनराईज फाईव्ह स्टार हॉटेलच्या मालकीण बाईने तूम्हाला त्यांच्या हॉटेलला visit करायला सांगितली आहे...
समायरा : ठीक आहे, तुषार आला की मी त्याच्यासोबत जाईन..
हॉटेल मॅनेजर : मॅम तुषार सरांना वेळ लागणार आहे... आणि त्या मॅम ने गाडी पाठवली आहे.... dont worry मॅम ही सगळी सुरक्षित ठिकाणं आहेत.... वाटल्यास माझा हा नंबर जवळ ठेवा.... काही अडचण आलीच तर मला बिनधास्त कॉल करा....
समायराने थोडा विचार केला.... जाऊन तर बघू.... त्यानी गाडी पाठवली आहे.... ठीक आहे असं म्हणून समायरा तयार झाली....
मग त्या मॅनेजरने आलेली गाडी तिच्या कॉटेज कडे पाठवली....
समायरा त्या गाडीत बसली आणि हॉटेल सनराईजला पोहोचली....
त्या हॉटेलच्या दरवाजा समोर येताच एक मिनी स्कर्ट असलेली मुलगी हातात सुंदर फुलांचा बुके💐 घेऊन उभी होती...
"वेलकम मॅम "असं म्हणून ती समायराला सोबत घेऊन दरवाजाच्या अगदी विरुद्ध दिशेने असलेल्या गार्डन मध्ये ती घेऊन गेली...
त्या गार्डन मध्ये एका कोपऱ्यात मिनी गार्डन होतं... त्या मिनी गार्डनचं कुंपण हे विविधरंगी गुलाबाने 🌹🌹🌹सजवलं होतं...
फक्त त्या गार्डन च्या एंट्रन्स ला एक सुंदर असं ओपन gate होतं त्याच्या भिंतीवर हृदयाच्या आकारांच्या फुग्यांनी सजवलं होतं....
गार्डनच्या मधोमध एक बंगई होती तिला देखील फुलांचे डेकोरेशन करण्यात आले होते....
मॅम तूम्ही ईथे बसा... आमच्या मॅम येतीलच इतक्यात.. म्हणून ती मुलगी तिथून निघून गेली...
पाणी नाही विचारलं, काही हवं आहे का नाही ते नाही विचारलं आणि सरळ निघून गेली.... समायरा गोंधळून तिथेच बंगई वर बसली....
तितक्यात तिच्या उजव्या कानाच्या बाजूने आवाज आला... समायरा !!
समायरा : काय?? असं म्हणून समायरा बंगई वरून ताडकन उठली... आणि मागे वळाली...
समायरा : सुहास सर तूम्ही?? 😍
टोनी : सुहास सर नाही, टोनी फक्त तूझा टोनी... 😍😍
समायरा : पण मी.... माझी लायकी नाही...
तितक्यात टोनीने समायराच्या ओठांवर बोट ठेवले... म्हणाला!! काहीच नको बोलूस मला सगळं कळालं आहे... समायरा !!" i love you so much "do you love me??
समायरा : yes toni i do असं म्हणत ती त्याला बिलगली आणि रडायला लागली... तिचं रडणं जणू काही सांगत होतं... किती सांगायचं मला.. पण सांगता येत नव्हतं... परिस्थितीने माझे ओठ घट्ट शिवले होते....
पण टोनीच्या आश्वासक खांद्यावर तिचं मन आज जणू कृत कृत्य झालं होतं.... आता टोनीला सगळ्या गोष्टी माहिती असताना आपल्याला मार्थाला फसवल्याचा गिल्ट देखील येणार नाही... जे काय आहे ते.... टोनीला तरी सांगता येईल.... असा विचार देखील समायराच्या मनात डोकावून गेला....
टोनी : समायरा !! बघ मी म्हणालो होतो ना.... होणार तर तू माझीच आहॆस.....
समायराने डोळे पुसले आणि हो रे असं म्हणाली.....
क्रमश :
भाग 49 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® सुजाता.स्वानुभव/सप्तरंग
2 टिप्पण्या
Nice 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा