किती सांगायचं मला (भाग 51)

काय तुषारला फोन लावला होता ना?? नलीनीच्या मागून तुषारच्या आईचा आवाज आला... 

नलिनीला छातीत एकदम धस्स झालं.... तुषारच्या आईने काही ऐकलं तर नसेलना?? 🙄 बापरे तसं असेल तर काहीच खरं नाही.... 

तुषारची आई : बाकी नलिनी !! बरं झालं तू आलीस😊.... काय जादू केली आहे गं तुझ्या बॉसवर?? सारखी तूमची सून किती हुशार, किती चांगली आहे असं म्हणत होत्या... 

नलिनी उत्तर तरी काय देणार?? तिने फक्त तुषारच्या आईकडे पाहून स्मित केलं😊..... 

तुषारची आई : तूला तुषारने पाठवलं असेल ना🤔... मार्था घरी येत होत्या म्हणून?? 

नलिनी : हो आई... मला आता घरी जायला उशीर होत आहे... मी निघू का? बाबा वाट पहात असतील... 

तुषारची आई : ठीक आहे बेटा.... हळूच जा... तसंही दोन दिवसांनी  आम्ही येणार आहोतच😊.... 

नलिनी एकदम लाजली 🥰 तुषारच्या आईच्या पाया पडली..." येते आई "म्हणून निघून गेली.... 

टोनीच्या मित्राचा कार्यक्रम संपला... टोनीने सहजच त्याचा फोन चेक केला.... बापरे 😳 समायराचे जवळ जवळ दहा miss कॉल?? काय झालं.... लागलीच टोनीने समायराला फोन लावला.... 

टोनी : हॅलो समायरा !! काय झालं?? सॉरी गं मी प्रोग्राम मध्ये होतो मला मोबाईल रिंगटोनच ऐकू आली नाही.... 

समायरा : टोनी !!टोनी !! Just चील... सगळा प्रॉब्लेम solve झाला आता...

टोनी : प्रॉब्लेम?? कसला प्रॉब्लेम?? 

समायरा : मार्था,  तुषारच्या घरी गेल्या होत्या.... आणि मग समायराने घडलेला सारा प्रकार टोनीला सांगितला... 

टोनी : omg, थोडक्यात बला टळली..... नलिनी गेली म्हणून सगळं परफेक्ट घडून आलं..... चला आता सगळं व्यवस्थित झालं ना.... बाकी काय चाललं... टोनीने जरा रोमँटिक मूड मध्ये विचारलं.... 

बाकी काहीच नाही.. असं म्हणून समायरा शांत बसली.... 

समायराला प्रायव्हसी हवी होती हे तुषारच्या लक्षात आले...

 मी जरा हॉटेलला फेरफटका मारून येतो असं म्हणून तुषार तिथून निघून गेला.... 

टोनी : चांगलाच हुशार आहे गं तुषार... त्याला न सांगता कळालं की आपल्याला बोलायचं आहे ते.... 

हूं 🥰समायरा तिच्या गालावर आलेल्या बटासोबत खेळत टोनीशी गप्पा मारत होती... मध्येच आकाशातील चंद्राकडे तिचं लक्ष गेलं.... जणू काही टोनीचं प्रतिबिंब त्या चंद्रावर ती पहात होती.... टोनी आता नाही करमत रे... असं वाटतं की मी कधी तूला पुन्हा भेटते.... 

टोनी : समु !! बस्स आजची रात्र... उद्या सकाळी तर तूम्ही येणारच आहात ना... 

समायरा : काय म्हणालास ?? "समु " टोनी खूप छान वाटलं तुझ्या तोंडून ऐकायला... तूला माहिती आहे टोनी माझ्या आई, बाबा व्यतिरिक्त फक्त तूच ती व्यक्ती आहॆस ज्याची मी समु 🥰आहे.... 

तासभर झाला तरी टोनी आणि समायराच्या गप्पा चालू होत्या... तुषारचा फेरफटका झाला होता... जेवणाची वेळ झाली.... शेवटी जेवणासाठी म्हणून जरा जड अंतःकरणाने समायराने फोन ठेवून दिला आणि दोघेही  जेवायला गेले....

समायरा : तुषार !!आजचा दिवस कधी एकदाचा संपतो आणि कधी एकदा आपण परतीच्या प्रवासाला लागतो असं झालं आहे...

तुषार : हो ना.... 

तितक्यात हॉटेल मॅनेजर तिथे आला.... 

हॉटेल मॅनेजर  : काय?? कसा वाटला टूर?? आणि आमचे इव्हेंट
समायरा : एकदम छान.. तुमच्या सर्व्हिसला आम्ही नक्कीच फाईव्ह स्टार देऊ... 

हॉटेल मॅनेजर : तरी तूम्ही कॅन्सल केल्यामुळे आम्ही तुम्हाला वॉटरपार्कच्या इव्हेंट मध्ये नाही घेऊ शकलो.. 
तिथे तूम्ही खूप एन्जॉय केलं असतं... 

तुषार :त्यात काय पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच येऊ तेव्हा त्याचा लाभ घेऊ.... (खऱ्या साथीदारासोबत तुषार तोंडातल्या तोंडात बडबडला )ते फक्त समायराला कळालं... 

समायरा हॉटेल मॅनेजरच्या नकळत हसली 😂.. दोघांचेही जेवण झाले आणि दोघेही कॉटेज कडे आले... 

ईकडे आशिष देखील कधी हे पाच दिवस संपतात आणि कधी तुषारची भेट होते याची वाट पाहत होता...

दरम्यान आशिषने ऑफिसच्या प्रत्येक व्यक्तीला तुषारबद्दल विचारणा केली पण तुषार समायराशिवाय दुसऱ्या कुणाशी कामाशिवाय काही बोलत नसल्याने आशिषच्या हाती विशेष असं काही लागलं नाही... 

दिवाकरने देखील त्याच्या सूत्रांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला... तो एका शहीद फौजीचा मुलगा आहे इतकीच माहीती तो काढू शकला..... 

ईकडे नलिनीच्या घरी नलीनीच्या बाबांची नलीनीला मुलगा बघायला येणार या साठी तयारी चालू होती.... मुलगा बघायला येणार तेव्हा कोण कोण येणार याची माहिती नलीनीच्या बाबाने तुषारच्या काकांना फोनवर विचारली.... 

तेव्हा तुषारचे काका, आई आणि तुषार इतकेच जण येतील असं सांगितलं  बोलता बोलता तुषारचे काका काय पेहराव घालतात याची माहीती देखील काढली... 

नलिनीचे बाबा :अहो नलिनीची आई!! ईकडे या जरा...

नलिनीची आई : हो, हो आले.... बोला.... 

नलिनीचे बाबा : तुषारचं स्थळ एकदम चांगलं आहे.... आपल्याला हातचं जाऊ द्यायचे नाही... चांगला साग्रसंगीत स्वयंपाक करा... मी जरा कपड्यांचं बघतो... तुषारच्या काकाला धोतरजोड घ्यावं लागेल आणि तुषारच्या आईला साडी.... उद्या तूम्ही थोडया वेळासाठी माझ्यासोबत मार्केटमध्ये चला.....एकदाची ही खरेदी उरकून टाकू.... 

नलिनी बेडरूम मध्ये होती पण तीचे कान नलिनीचे बाबा काय बोलतात याकडे लागलेले होते.... त्यांची चर्चा ऐकून आपलं स्वप्न सत्यात उतरत आहे याचा खूप आनंद होत होता.... 

दुसरा दिवस उजाडला समायरा नी तुषारने पॅकिंग केली... 
चहा, नाश्ता झाला... लागलीच दोघे कार ने एअरपोर्ट ला पोहोचले... येतानाचा अनुभव असल्यामुळे आता काही गोंधळ उडण्याचा प्रश्न नव्हता.... 

समायरा : आपल्या गावात, आपल्या घरी येण्याचा आनंद काही वेगळाच असतो.... नाही?? 

तुषार : हो... चला एक गोष्ट चांगली झाली आपला टूर व्यवस्थित झाला... ते ही सगळ्या अडचणींवर मात करत... 

समायरा : हो... 

तुषार: समायरा !! मी कॅब बोलावू ना तुझ्यासाठी?? 

समायरा : टोनी 😳

तुषार :अगं मी काय म्हणतो आहे.... 

समायरा : मी तेच सांगते आहे... समोर टोनी आहे... 

टोनी : hi तुषार, hi समायरा... चला मी सोडतो तूम्हा दोघांनाही.... 

तुषार : नको नको... मी कश्याला उगाचच कबाब मे हड्डी... 

टोनी : बस क्या dude... अरे काही हड्डी बिड्डी नाही... मी तूला आधी सोडतो... मग समायराला.... तेवढा वेळ आम्हाला सोबत मिळेलच ना... 

तुषार टोनीच्या त्या बोलण्यावर निरुत्तर झाला... आणि चुपचाप त्याच्या गाडीत जाऊन बसला....

मग गप्पा करत टोनीने तुषारला सोडलं.... 

टोनी : बोला mam काय म्हणता कश्या आहात?? 

समायरा : mam.... काय रे टोनी तू फिरकी घेतोस😇... 

नाही गं... तूला भेटून खूप छान 😊 वाटत आहे टोनी सामायराच्या हातात हात घेऊन म्हणाला... 

समायरा : इथून डावीकडे वळ .... मला थोडंसं अलीकडे सोडशील 

टोनी : ठीक आहे, तूला जसं योग्य वाटते तसं..... पण पुन्हा कधी भेटणार?? 

समायरा :भेटू लवकरच.... मला ईथे उतरू दे.... मी ईथुन पुढे पाई जाईल.... ते कोपऱ्यावर माझे घर आहे... ती परसबाग दिसते ना ते.... 

टोनी : अच्छा, ती आहे का माझी सासुरवाडी?? 

टोनीच्या त्या वाक्यावर समायरा एकदम लाजली.🤩🥰... 

टोनी : चल, बाय dear.... येतो मी... आता ईथे जास्त वेळ थांबणं योग्य नाही.... 

असं म्हणून टोनीने त्याची कार वळवली...

क्रमश :
भाग 52 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे .
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या