आल्या आल्या टोनीची भेट आणि दुरूनच दिसलेलं आपलं घर समायराला एक परमोच्च आनंद देत होतं 😍💃💃...
तिने दार ठोठावले....
आईने दरवाजा उघडला.... आईला पाहताच समायराला😊 एक आपलेपणाचे नेत्रसुख मिळाल्यासारखे वाटायला लागले.... बाबा आणि अमोघही घरी होते.... सगळ्यांच्या चेहऱ्यावर समायरा घरी आल्याचा आनंद😊 ओसंडून वहात होता....
समायराची आई : समु बेटा, तुझ्या लग्नानंतर तुझ्या बाबाचं काहीच खरं नाही...
समायरा : म्हणजे??
समायराची आई : बाबाने हजार वेळेस तुझ्या नावाचा उल्लेख केला असेल... समु नाही तर करमतच नाही... समु नाही तर घर कसं खाली खाली लागतंय....
अमोघ : हं आमची नसती बूवा इतकी आठवण काढली.
समायराने मग मुद्दाम अमोघ कडे पाहून स्वतःच्या ड्रेसची कॉलर वर केली...
समायरा : हे घे आई उटीची स्पेशालिटी चहा आणि हे तेल....
समायराची आई : अरे वा??
अमोघ :माझ्यासाठी काय आणलं आहे....
अरे सॉरी अमोघ🙄 मला वेगळी खरेदी करण्यासाठी वेळच नाही मिळाला.... समायरा मुद्दाम खोटं बोलली...
अमोघ : जा आता मी नाही बोलणार तूला... मी आता माझ्या मित्रांना काय सांगणार... माझी ताई विमानाने✈️ उटीला गेली आणि रिकामे हात हलवत आली😒...
समायरा :🤣😂😂... हे घे म्हणून.. एक छानसा जर्किन तिने त्याच्यासमोर केला....
अमोघ : अरे वा ताई माझ्यासाठी... खूप भारी आहे हा मला कॉलेजला देखील कधी वापरता येईल....
समायरा : हो म्हणूनच तूला जर्किन, आईला शाल आणि बाबा तुम्हाला हा स्वेटर आणला आहे...
समायराचे बाबा : बेटा मला कश्याला??
समायरा : बाबा !! तूमचा आधीचा स्वेटर आता तूम्हाला येत पण नाही.... किती जुना झाला आहे... आणि काय झालं मी जर घेतला तर...
समायराचे बाबा : बरं बाई !!माफ कर ... खूप छान आणला आहॆस स्वेटर....
समायराची आई : शाल पण भारीची दिसत आहे.. कश्याला ईतका खर्च गं.. अमोघ पुरतं आणलं असतं तरी चाललं असतं... आम्हा म्हाताऱ्यांना काय करायचं घरच्या घरी...
समायरा : अगं आई !!!आता तू सुरु केलं का?? अन ईथे कोण म्हातारं झालंय... काहीतरीच काय?? अगं संपूर्ण टूर मध्ये एक रुपया खर्च झाला नाही आणि ईतक्या दूर गेल्यावर काहीतरी तिथली आठवण म्हणून घ्यावी लागणार ना... बरं एरवी कुठे मी असा काही खर्च करते... एखाद्यावेळेस चालतं गं....
समायराची आई : अगं समु बेटा !!आता तुझ्या लग्नासाठी साठवावे लागतील ना.... म्हणून म्हटलं
समायरा : आई !!आता लग्न कुठून आलं मध्ये... मला चांगला श्रीमंत मुलगा शोधावा लागणार.... असा सहजा सहजी कसा मिळेल??
समायराची आई : समु बेटा!! अंथरून पाहून पाय पसरावे गं... श्रीमंत मुलगा. म्हणजे मागण्या जास्त... आपण काय पूर्ण करणार...
समायरा : आई !! जाऊदे आपण शाली पासून मुलाच्या मागण्या पर्यंत पोहोचलो.....
मला खूप भूक लागली आहे चला जेवणाचं बघूया समायराने मुद्दाम विषय बदलला...
ईकडे तुषार देखील त्याच्या घरी गेला....
त्याने त्याच्या आईसाठी साडी आणि शाल खरेदी केली होती आणि गंगाबाई साठी एक स्वेटर दोघेही त्यांच्या हातात दिले...
स्वेटर पाहून गंगाबाईच्या डोळ्यात एकदम अश्रू तरळले...
तुषार : गंगाबाई !! काय झालं?? तुमच्या डोळ्यात अश्रू...
गंगाबाई : गेली कित्येक वर्ष झाली असतील कुणी. माझ्यासाठी काही घेतलेलं मला आठवत नाही... तूमची माझी बरोबर ओळख पण नाही पण तूम्ही माझ्यासाठी हे आणलं....
तुषार : गंगाबाई !! तूम्ही दिवसरात्र माझ्या आई सोबत होतात की... केवढी मोठी गोष्ट आहे ती ...
गंगुबाई : दादा !!नलिनीताई खूप छान आहेत बरं का?? तूमचा जोडा एकदम लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसतो.....
तुषार : 😊, चल आई जरा फ्रेश होतो मी.. असं म्हणून तुषार बेडरूम मध्ये गेला....
किती जीव आहे तुषारचा माझ्यावर.. माझी काळजी घेतली म्हणून गंगुबाई साठी देखील तो काहीतरी घेऊन आला...असं तुषारच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून त्याची आई बघायला लागली होती....
गप्पा टप्पा हसत खेळत तुषार आणि समायराचा दिवस निघून गेला....
दुसरा दिवस उजाडला... समायरा आणि तुषार दोघेही नेहमीप्रमाणे ऑफिसला आले.... मस्टर वर सह्या झाल्या आणि दोघेही आपल्या केबिन मध्ये येऊन बसले...
तितक्यात आशिष त्यांच्या केबिन मध्ये आला...
आशिष : काय मग कसा झाला टूर??
तुषार : एकदम छान...
आशिष : तुषार !! हे श्रावण स्पेशल काय प्रकार होता?? ...
तुषार : कस्टमरला आकर्षित करण्याची स्कीम होती ती....
आशिष : पण हे उटीला जाण्याच्या आधीच करायची गरज काय होती...
जाहिरातीचा प्लॅन आधीच ठरला होता.म्हणून तो आमलात आणला... समायरा लॅपटॉप आशिष समोर करत म्हणाली...
आशिष : असू देत, असू देत... पण या पुढे मला टाचणी जरी पडली तर त्याचा आवाज माझ्या पर्यंत झाला पाहीजे... असं गोड आवाजात पण तिखट तंबी त्याने दिली आणि तिथून निघून गेला...
.
तुषार : समायरा !! आता हा जाम चिडलेला आहे.. पण मानलं गं त्याला इतका राग असून किती गोड बोलत होता तो... अन तू कुठला प्लॅनर त्याला दाखवत होतीस...
समायरा : कसला प्लॅनर आणि कसलं काय? मी फक्त बचावात्मक धोरण अवलंबलं...
तुषार : तूला कोपऱ्यापासून साष्टांग दंडवत 🙏 अन त्याने ते बघितलं असतं तर??
समायरा : तो असंही चिडणार होता आणि तसंही... पण प्रयत्न करून जर थोडा राग कमी केला तर काय वाईट??
तुषार : आता तुला मानलं... नाही म्हणता म्हणता खोटं बोलण्यात परफेक्ट झालो आहोतच आपण 😇
समायरा : चला आता इतक्या दिवसांच्या गॅप नंतर जरी कामाचा मूड होत नसेल तरी काय काय घडलं याचा अभ्यास करा....
तुषार : समायरा !! हे आपल्या ऑफिसचं रजिस्टर बघ😳.... 15 ते 20 दरम्यान एकही नोंद नाही....
समायरा : बघू, बघू चक्क ओपन फ्रॉड.... असं कसं शक्य आहे इतकं उघडपणे आशिष फ्रॉड नाही करणार....
रजनी : येऊ का आत??
तुषार : ये ना रजनी....
रजनी : हे एक रफ रजिस्टर आहे यात आम्ही 15 ते 20 या काळातील सगळ्या कस्टमरच्या नोंदी केलेल्या आहेत... तूम्ही प्लीज त्या फेअर करून घ्या.... तूमचा हिशोब काही चुकायला नको म्हणून मी आणि प्रदीप ने मिळून हे काम केले....
तुषार : तूम्ही दोघांनी मिळून केले😊.मग तर व्यवस्थितच असणार...
रजनी : मी तर नेहमीच व्यवस्थित काम करते...😏 समायराकडे बघून रजनी म्हणाली....
रजनी तर समायराच्या जाम डोक्यात गेली होती😡. त्यामुळे ती एक अवाक्षरही बोलली नाही... स्वतःच्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसली...
क्रमश :
भाग 53 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
12 टिप्पण्या
Chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKiti wait karayla lavta....
उत्तर द्याहटवासॉरी, duty मुळे होतं ईकडे तिकडे
हटवाड्युटी आठ वाजता संपली त्यानंतर हे लिखाण.. तरी इतक्या उशिरा वाचलं... धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवाKhupch sundar likhan aahe madam1no. Aani mala ya side chi mahiti dilyabaddal khup khup dhanyavad🙏🏿🙏🏿😊😊😊😊
हटवाKhupch sundar likhan aahe madam1no. Aani mala ya side chi mahiti dilyabaddal khup khup dhanyavad🙏🏿🙏🏿😊😊😊😊
हटवाKhupch sundar likhan aahe madam1no. Aani mala ya side chi mahiti dilyabaddal khup khup dhanyavad🙏🏿🙏🏿😊😊😊😊
हटवाKhupch sundar likhan aahe madam1no. Aani mala ya side chi mahiti dilyabaddal khup khup dhanyavad🙏🏿🙏🏿😊😊😊😊
हटवामॅम दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे....मस्त आहे गोष्ट...☺☺☺
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाधन्यवाद
हटवा