समायरा : तुषार !! उद्या तूला सुट्टी घ्यावी लागेल ना??
तुषार : नाही, आजच अर्ज टाकून हाल्फ डे घेत आहे..
समायरा :आणि नलिनी??
तुषार : ती काय बाबा, मनाची राणी..... ती उद्या सुट्टी घेणार आहे... तसंही तिने आठ दिवसांचं काम चारच दिवसात केल्याने आशिष आणि दिवाकरने सहजच सुट्टी देऊन टाकली....
समायरा : अच्छा... मग तयारी सुरु असेल ना?
तुषार : तयारी हो... म्हणजे विशेष असं काही नाही.. पण माझे काका त्यानी काही गोंधळ घालू नये म्हणजे झालं??
समायरा : म्हणजे??
तुषार :अगं!! माझे वडील गेले... घरी शेती होती... काय दोघांच्याही नावावर दीड दोन एक्कर असेल.... आईने वाद नको म्हणून त्यांना देऊन टाकली.... तसंही माझ्या आईला वडिलोपार्जित जमिनीपेक्षा स्वकमाईच सगळं असावं असं वाटत होतं...पण मग माहिती नाही का? तरीही ते आमच्यावर जळायचे..... तसं माझ्या आईने त्यांना मान दिला आहे... पण सांगता येत नाही हा कार्यक्रम होईपर्यंत काय गोंधळ घालतील ते...
समायरा : थोडक्यात त्यांना तूमचा आनंद बघवत नाही, हो ना??
तुषार : हो...
तितक्यात तुषारच्या फोन📳 ची बेल वाजली... तुषारने फोन📳 बघितला... आईचा फोन?? आता
तुषार : बोल आई !! काय?? 😳 काका येणार नाहीत... काहीतरी दुसरं काम निघालं म्हणत आहेत.... मला वाटलंच हा माणूस इतका सहजासहजी कसा तयार झाला... मग आई, आता नलीनीच्या बाबांना निरोप कसा देणार??
तुषारची आई : तुझे काका म्हणाले मी फोन📳 करून सांगतो पण मला खरंच त्यांचा काही भरवसा वाटत नाही...
तुषार : नलिनी तर सांगत होती की त्यांनी साग्रसंगीत भोजनाचा कार्यक्रम ठरवला आहे...
तुषारची आई : तू एक काम कर मला नलीनीच्या आईचा फोन नंबर दे मी त्यांना बोलते....
तुषार : अगं आई मी नलिनीला मागून फोन नंबर देईन पण त्यांना तू काय सांगशील फोन नंबर कुठून मिळाला ते...
तुषारची आई : मग आता काय करायचं??
तुषार : आई !!तुझ्या कडे नलिनीचा biodata आला होता ना.... मागे त्यांनी तूला whatsapp केला होता बघ... त्यात आहे फोन नंबर.... मी एकदा पाहिला होता....
तुषारची आई : हो, हो सापडला... मी लागलीच नलिनीच्या आईला फोन लावते.....
तुषारच्या आईने फोन📳 ठेवला....
तुषार : समायरा !! मी म्हणालो होतो ना हे काका काही ना काही प्रॉब्लेम करतील... बघ खरं झालं ते....
समायरा : तुषार !!आजपर्यंत च्या अनुभवाने मला जितकं कळतं त्यावरून मी सांगते "जे होतं ते चांगल्यासाठीच होतं"...
तुषार : हं, देवालाच माहीती.....
हॅलो येऊ का आत??
समायरा :😍 टोनी....
तुषार : सुहास !! तूला कश्याला परवानगी लागत आहे आत येताना....
सुहास : अरे बाबा !!नवराबायकोच्या केबिन मध्ये डायरेक्ट घुसणं बरं दिसतं का 😉
तुषार : नवरा बायको, काय?? मला लिकर चेक करायला पाठवतोस काय?? सरळ सरळ कटवायचं ना....
सुहास : मला माझ्या सरप्राईज मध्ये किंतू नको होता ना म्हणून😊...
तुषार : आशिष ईकडे येत आहे...
सुहास : मी बघत होतो की तुमचं काम कसं चालू आहे... मॅम मला तुमच्या ऍनिमेशनचं फोल्डर दाखवा....
आशिष :सुहास !!अरे तू ईथे काय करत आहॆस...
सुहास : मी काल सहजच आपल्या कंपनीचं सोशल मीडिया वरचं पेज बघत होतो... मला त्यात ऍनिमेशनच्या जाहिराती दिसल्या... नंतर कळालं की त्या अगदीच नाममात्र खर्चात तयार केल्या होत्या... म्हणून ते बघण्यासाठी आलो होतो....
आशिष : हो ही समायरा, टॅलेंटेड आहे एकदम.....
सुहास : अच्छा🤔....
तू ते नंतर बघ... अरे किती दिवसांनी भेटतो आहॆस... घरी पण आला नाहीस.... मला तुझे UAS चे किस्से सांग ना...असं म्हणून त्याने सुहासला ओढून नेलं...
समायराला मनातून आशिष चा खूप राग येत होता... पण
काय करणार 🤷♀️ तिच्याकडे शांत राहण्याशिवाय कुठलाच पर्याय नव्हता ....
ईकडे तुषारच्या आईने biodata वरचा नलीनीच्या आईचा फोन नंबर घेतला आणि काही महत्वाच्या कारणांमुळे काका येऊ शकत नाहीत असा निरोप दिला... आणि बघण्याच्या कार्यक्रमाचे काय करायचे अशी विचारणा केली...
नलीनीच्या बाबांनी नलीनीच्या आईला, जर तुषार आणि तुषारची आईच येत असेल तरी चालेल असा निरोप तुषारच्या आईला द्यायला सांगितला...
आम्ही उद्याच्या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे... तूम्ही दोघे येऊन जा असा निरोप मग नलिनीच्या आईने तुषारच्या आईला दिला....
तुषारच्या आईने लागलीच तुषारला फोन लाऊन उद्याचा कार्यक्रम फिक्स आहे असा निरोप दिला....
तुषार :समायरा !! मी जरा मार्था कडे जाऊन येतो... उद्याचा हाल्फ डे घ्यावा लागेल ना....
समायरा : ओ हो, उद्याचा कार्यक्रम फिक्स मग....
हो, असं म्हणून तुषारने अर्ज लिहिला आणि मार्थाला भेटायला गेला....
तुषार : मे आय कम इन मार्था??
मार्था : ये बेटा तुषार !!कसा झाला टूर....
तुषार :छान झाला...
मार्था : तुझ्या आईला भेटले... तुझं आणि समायराचं खूप कौतुक आहे तुझ्या आईला....
तुषार : माझं आणि समायरा 🙄 थँक्स मार्था
मार्था : बोल, कसं येणं केलंस...
तुषार : मला उद्याचा हाल्फ डे पाहीजे आहे... समायरा येणार आहे... म्हणून हा अर्ज??
मार्थाने अर्ज घेऊन त्यावर एंडोर्समेंट केली... आणि गणेश जवळ अर्ज देऊन ऑफिस मध्ये जमा करायला सांगितला...
थँक्स अ लॉट मार्था... येतो मी... आज पण भरपूर कस्टमर आहेत. .. असं म्हणून तुषार तिथून निघून गेला....
तुषार केबिन कडे जात असतानाच त्याला नलिनी ऑफिसच्या मुख्य दरवाजातून येताना दिसली....
इतक्या दिवसांनी त्याला नलिनी दिसली😍... आजूबाजूचं भान देखील राहिलं नाही असंच काहीसं नलीनीच्या बाबतीत देखील झालं दोघेही नुसते एकमेकांकडे बघत 😍🤩उभे राहीले....
तितक्यात सुहासचा खाकरण्याचा आवाज आला आणि तुषार जवळ आला आणि म्हणाला... ये पब्लिक है सब जानती है😍🤩🥰....
ते ऐकून तुषार भानावर आला गोड हसला😊 आणि त्याच्या केबिन कडे वळाला....
येतो आशिष !!म्हणून जोरात समायराला ऐकू येईल असं बोलून सुहास तिथून निघाला....
समायराने आतूनच होकारार्थी मान हलवली....
समायरा आणि तुषार कामामध्ये व्यस्त झाले.... त्यांना रफ रजिस्टर वरच्या नोंदी दोन ठिकाणी घेण्याचं डबल काम लागलं होतं एक त्यांचा मुख्य रजिस्टरवर आणि दुसरं लॅपटॉपवर....
समायरा : तुषार !! मी हे रजिस्टर आज घरी घेऊन जाते... घरी पण काम करते... म्हणजे हे काम दोन दिवसात पूर्ण होईल....
तुषार : सॉरी समायरा ईच्छा असूनही मी तूला मदत करू शकत नाहीये....
this is not fair, तू पण घरी हे काम करू शकतोस ना?? ईच्छा तेथे मार्ग... समायराने मुद्दाम फिरकी घेतली 😇
तुषार :🙄 बरं ठीक आहे... मला काय करायचं ते सांग...
समायरा : काही नाही फक्त आज जरा मेन्स पार्लर मध्ये जा...
तुषार : समायरा !! तुम्हाला माझी फिरकी 😇घेतल्याशिवाय करमत नाही वाटतं...
समायरा :😂😂 best of luck
भाग 54 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे .
©®सुजाता.स्वानुभव/सप्तरंग
2 टिप्पण्या
Khupch chan nehmi sarkhi aahe part
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा