सकाळ झाली.... तुषारची आई अजूनही उठली नव्हती🛌.... तुषार जवळ गेला, त्याने हात लावून पाहिलं तर तुषारची आई एकदम तापाने फणफणली होती. लागलीच तुषारने ऍम्ब्युलन्स 🚑 बोलावली आणि आईला हॉस्पिटलला घेऊन गेला.. दवाखान्यात ऍडमिट 🏥केलं....
नंतर तुषारने समायराला फोन📳 केला...
समायरा : बोल तुषार !!काय ऍडमिट केलं... ओह तू ऑफिस कामांची चिंता करू नकोस मी ते सगळं सांभाळून घेईन.... तूला अजून काही हवं आहे का??
तुषार : नाही... सध्या काही नको....
समायरा : बरं काही लागलं तर नक्की सांगशील....
काय म्हणतोय तुषार?? फोन 📳वरचं संभाषण ऐकून समायराचे बाबा बोलले...
समायराने तुषारच्या घरची परिस्थिती तिच्या बाबांना सांगितली....
समायराची आई : अगं समु !!काल नलीनीला बघायला पाहुणे येणार होते ना... ठरलं का तिचं ??
हो आई!!पाहुणे तर जाणार होते... .. पण त्या नंतर नलिनीचे आणि माझे बोलणे झाले नाही... तोंड लपवत समायरा म्हणाली...
समायराचे बाबा :कुसुम !! मला आज जाम भूक लागली आहे जरा नाश्त्याचं बघतेस का?? तूम्हा मायलेकींना गप्पा तर काय संध्याकाळी पण मारता येतील.. ...
समायराची आई नाश्ता तयार करण्यासाठी किचन मध्ये घुसली
समायराच्या बाबा:समु बेटा !! काय झालं गं... तू त्या तुषारशी हॉस्पिटल वगैरे काहीतरी बोलत होतीस...
समायरा : काल घडलेली गोष्ट तुषारच्या आईने फार मनाला लाऊन घेतली.... त्यांना खूप ताप आला आहे... हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं... त्या बेशुद्ध झाल्या होत्या...
समायराचे बाबा :तूम्ही असा अविचारी पणा करता आणि भोगावं आम्हाला लागतं...
समायरा : बाबा !! कसं सांगू तुम्हाला... मला सांगा ना तुषारचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम आहे.... त्याने तिच्या नियमित औषधोपचारासाठी हे सगळे केले... मान्य आहे की वाट चुकीची होती... पण त्या वेळेस तोच एक पर्याय आमच्यासमोर होता.... यात आम्ही कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी देखील घेतली....
समायराचे बाबा : हो... पण माझं पुन्हा पुन्हा असंच म्हणणं आहे की या अश्या गोष्टीमुळे तूम्हाला काही भोगायला नको...इतकंच...
समायरा : बाबा !!तूम्ही आधी काळजी करणं सोडा बघू.... तूम्ही काळजी करावी म्हणून मी हे तुम्हाला नाही सांगितलं.... मी तुम्हाला सांगितलं, कारण तूमचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला त्याला तडा जाऊ द्यायचा नाहीये...
समायराचे बाबा : बरं बाई !!नाही करत मी काळजी.... पण या पूढे मला एक न एक गोष्ट माहीती झाली पाहीजे...
समायरा : हो बाबा !!🙄
पण तरी देखील टोनी बद्दल समायरा तिच्या बाबांना सांगू शकत नव्हती.... कारण तीला तिच्या बाबांना एकाच वेळी दोन झटके द्यायचे नव्हते....
समायरा आज एकटीच ऑफिसला पोहोचली....
रजनी : काय समायरा !!आज एकटीच😏...
समायरा : तुषारच्या आईला दवाखान्यात ऍडमिट केलं आहे... त्यांची तब्येत ठीक नाही...
रजनी : मग तू ईथे काय करतेस?? तुझ्या सासूबाई आहेत ना त्या??
समायरा :सासूबाई 🤔 हो ...अगं इथलं काम पण खूप असतं ना...
रजनी : आम्ही काय सांभाळून घेतलं नसतं का?? मागे सांभाळून घेतलंच की?
समायरा : रजनी !! तशीच वेळ आली तर नक्की सांगू... पण परवा तूझी एंगेजमेंट आहे ना?? तूलाच कदाचीत त्यासाठी सुट्टी घ्यावी लागेल ना...
रजनी : हो...
समायरा नंतर कस्टमर करण्यात इतकी busy झाली की तीला तुषारला फोन करायला देखील वेळ मिळाला नाही.... तिला सतत तुषारचीआणि नलिनीची चिंता वाटत होती...
कारण नलिनी देखील आज ऑफिस ला आली नव्हती... तब्येत ठीक नाही म्हणून तिने आशिषला कळवले होते...
ऑफिस सुटलं समायराला टोनीचा फोन आला....
टोनी : समु !!आज कॅफे मध्ये नको भेटायला आपण रोज गार्डन मध्ये भेटू....
आज टोनीने venue का बदलला असेल 🤔 असा समायराविचार करू लागली...
ठरल्याप्रमाणे दोघेही रोज गार्डनला पोहोचले...
पोहोचल्या पोहोचल्या समायराने टोनीला तुषारच्या आईबद्दल सांगितले....
टोनी : बापरे 😳 !!इतकं सगळं घडून गेलं... तुषार तर खूप परेशान असेल मग 🤔
समायरा : हो ना.... मला आताच तुषारच्या आईला भेटून सांगावसं वाटतंय....
टोनी : आणि काय सांगणार... मी तीच समायरा आहे जिच्यामुळे तुषारचं लग्न मोडलं....
समायरा : म्हणून तर मी अजून काहीच विचार करू शकत नाहीये.... पण शांत बसून बघत राहणे पण मला योग्य वाटत नाहीये....
टोनी : आपण लवकरच काहीतरी नक्की करू.
समायरा : टोनी !!तूला अजून एक गोष्ट सांगायची आहे....
टोनी : काय??
समायरा : मी माझ्या बाबांना तुषार आणि माझ्याबद्दल सांगितलं??
टोनी : इतक्या लवकर 🤔... काय म्हणाले बाबा मग??
समायरा : माझ्यावर खूप नाराज झाले आणि त्या दोघांचं काय संभाषण झालं ते त्यांना सांगितलं...
टोनी ते ऐकून थोडा समायरावर चिडला... समु !!अगं तू आताच सांगून कशाला गुंता वाढवला... थोडे दिवस थांबायचं असतं ना....
समायरा : टोनी !!तुझं सगळं खरं आहे.... पण माझं जरा ऐकशील का??
टोनी :काय??
समायरा : नलीनीच्या घरी इतका सगळा गोंधळ झाला... पण माझ्या नशिबाने म्हणा की अजून काय माझं नाव कुठेच उघडकीस आलं नाही... समजा ते कळालं असतं तर... नलिनीच्या आईबाबांनी माझ्या घरी फोन लावला असता... आणि एका पाठोपाठ एक सगळं विचित्र घडत गेलं असतं....
टोनी : हो तुझं बरोबर आहे...मी असा विचारच नाही केला....
समायरा : ते माझे बाबा आहेत... फार तर फार दोन दिवस डिस्टर्ब होतील पण दोन दिवसांनी मलाच मदत करतील 😉
टोनी : हुशार आहॆस गं !!
समायरा : तसं नाही रे मी माझ्या लोकांना चांगलं ओळखते...
टोनी : आणि मला😉 मी तूझा नाही?? 🤔
समायरा : टोनी !! तू पण ना 🥰
टोनी : मला वाटतं मी आज हॉस्पिटल मध्ये जावं.... तुषारला काही मदत होते का ते बघतो....
समायरा :खरं तर, कालच्या प्रकारानंतर तुषारला फोन📳 करायची हिम्मत होत नाही... त्याच्या आईच्या तब्यतीविषयी तू एकदा फोन 📳करून विचार ना....
टोनी :हो हो लागलीच फोन 📳लावतो.. ..
असं म्हणून टोनीने तुषारला फोन 📳लावला...
टोनी : हॅलो तुषार !!
तुषार : बोल टोनी...
टोनी : कसा आहॆस तुषार?? काकूंची तब्येत कशी आहे आता... मला समायराने सगळं काही सांगितलं...
तुषार : मी ठीक आहे... आई रात्री न जेवता झोपली म्हणून तीची साखर कमी झाली होती... म्हणून बेशुद्ध झाली होती... आता ठीक आहे... पण माझ्याशी बोलतच नाहीये...
टोनी : हे बघ तुषार !! Dont worry... मी येत आहे हॉस्पिटलला आपण यातून काहीतरी मार्ग काढू.... मला तुमच्या हॉस्पिटलचं लोकेशन send कर... मी येतो....
असं म्हणून टोनी हॉस्पिटलकडे जायला निघाला...
भाग 59 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
2 टिप्पण्या
Bhari ch ki..
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा