किती सांगायचं मला(भाग 65)

नलिनीने समायराला औपचारिक हॅलो केलं... सगळ्यांसमोर तीला हा दिखावा करावा लागत होता... 
पण तुषारला मात्र ती जाणूनबुजून टाळत होती... 

तुषारने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला... पण नलिनी?? .. नलीनीने त्याला टाळणेच योग्य समजले.... 
सगळ्या लोकांच्या पार्टी मध्ये छान गप्पा सुरु होत्या... हसणे खिदळणे चालू होते.... 
पण तुषारचा मूड मात्र खराब😒 होता.... टोनीच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाही... 

सगळ्यांनी आपापली ताटं वाढून घेतल्यावर टोनी, "नलिनी" जवळ गेला... 

टोनी :Excuse me, नलिनी !!मला तुझ्याशी काही बोलायचं आहे... 

टोनी नलिनीशी बोलतोय... ते ही ओळख नसताना... ऑफिसमधल्या सगळ्या लोकांच्या नजरा टोनीकडे 😳 वळल्या.... 

मार्था देखील ते पाहून अचंबित झाली.... 

टोनी मात्र तुषार आणि नलिनीचं बोलणं कसं करता येईल या साठी नलिनीला बोलत होता.... 

नलिनी : काय बोलायचं आहे??

टोनीने नलिनीला lawn च्या दुसऱ्या बाजूला बोलावले... सोबतच तुषार आणि समायराला खुणेने बोलावून घेतले...

Lawn मध्ये एका साईड ला असलेल्या टेबलवर चौघे जेवण घेत बसले ... ऑफिस मधले बाकीचे लोक पण जेवणामध्ये आणि गप्पा मध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना हे चौघे जरा दूर थांबले हे लक्षात आले नाही... 

पण आशिष?? आशिषचं मात्र या चौघांच्या हालचालीकडे लक्ष होतं.... तो त्यांच्या न कळत तुषारचा पाठलाग करत....  त्या चौघांचे संभाषण ऐकण्यासाठी म्हणून बरोबर त्यांच्या मागे एका झाडाच्या बंचच्या मागे थांबला.... 

तुषार : नलिनी !!काय झालं आहे तूला?? .... तू माझ्याशी अशी काय वागत आहे.... 

तुषारचं ते वाक्य ऐकून आशिषला खूप मोठा धक्का😳 बसला...

म्हणजे तुषार आणि नलिनीची आधी पासून ओळख आहे की काय?? 🤔 पण हा टोनी?? ... आपल्या गुप्तहेराने देखील सांगितले होते समायरा आणि टोनी सोबत कारमध्ये 🚗बसून  गेले ते .... 

नलिनी : तुषार !! मला काहीच समजत नाहीये रे? ... पण मला इतकं कळतं की माझ्या बाबांचा माझ्यावर खूप जीव  आहे... 

तुषार :अगं मी कुठे नाही म्हणतो.... पण तू असं मला टाळू नकोस ना... 

टोनी :समु !! आपण थोडं बाजूला येऊ... त्यांना एकदाचं बोलून घेऊ दे... 

समु 😳?? आशिषला लागलेला हा दुसरा धक्का होता.... हे काय?? तुषार नलिनीशी चार प्रेमाच्या गोष्टी करतो काय?? आणि टोनी समायराला चक्क" समु "नावाने संबोधतो काय?? नेमका काय प्रकार आहे हा 🤔 आशिषला आता त्यांच्याविषयी जाणून घेण्याची जास्त उत्सुकता लागून राहिली होती.... 

समायरा :टोनी!! अरे ईथे  कश्याला अजून बाजूला थांबायचं.... खरं तर आपण चौघे देखील ईथे येणं योग्य नाही.... सगळे काय म्हणतील... 

टोनीने सगळीकडे नजर फिरवली....ते बघ समु !!सगळे जण गप्पा आणि जेवणात व्यस्त आहेत... कुणाचंच ईकडे लक्ष नाहीये.... 

तुषार :टोनी, समायरा !!तूम्ही ईथेच थांबा... मी तुमच्यासमोर नलिनीशी बोलू शकतो.... नलिनी !!अगं आपण तूझ्या बाबांना समजावून सांगू ना, की माझं लग्न झालेलं नाहीये ते.... 

बापरे अजून मोठा धक्का 😳...पण हा तुषार खरं बोलत आहे काय?? आता हा सगळा काय प्रकार आहे हे माहिती करावेच लागेल म्हणून अजून कान देऊन आशिष त्यांच्या गप्पा ऐकू लागला.... 

समायरा : हे बघ नलिनी !! तू ईतकी डिस्टर्ब होऊ नकोस.... कसं आहे ना... तुझे बाबा त्यांच्या जागेवर शंभर टक्के बरोबर आहेत... पण आम्हाला देखील परिस्थितीमुळे लग्नाचं नाटक करावं लागलं... तूला तर माहितीच आहे.... काही दिवस जाऊदे.... तूझ्या बाबांचा राग थंड होऊ दे .....मग आपण आपल्या पद्धतीने समजावून सांगू.... तुझे बाबा , माझे बाबा ह्यांचा आपल्यावर खूप जीव आहे गं.... ते आपल्याला आज ना उद्या नक्कीच समजून घेतील..... 

लग्नाचं नाटक?? 🤔आशिषला तर ज्या ठिकाणी उभा आहे तिथेच आनंदाने नाचावं वाटत होतं.... ईतक्या दिवसापासून आपल्या हाती काहीच लागत नव्हतं आणि आज तर घबाडच हाती लागलं होतं.... त्यात टोनी देखील त्यांना मिळालेला होता....पण ज्या प्रकारे टोनी समु, समु म्हणत होता नक्कीच यांच्यात पण काहीतरी चाललं असावं👩‍❤️‍👨 असा अंदाज येत होता..... 

नलिनी :हो, गं समायरा !! तू म्हणतेस तसं व्हावं... 

समायरा : बरं नलिनी !!चल आपण तिकडे जाऊ... सगळ्यांचे जेवण होत आलेले दिसत आहे.... 

नलिनी : तुषार !! तू असा परेशान होऊ नकोस.... नंतर मेसेंजर वर बोलू, चल बाय .... 

समायरा :टोनी!! सगळ्या लोकांच्या लक्षात येण्याच्या आत आम्ही सटकतो.... तुषार!! चल आपण रजनीची भेट घेऊ आणि निघून जाऊ .... 

असं म्हणून समायरा आणि तुषार सोबत चालायला लागले तर त्यांच्या मागोमाग टोनी आणि नलिनी रजनीजवळ जायला लागले.... 

 ऑफिसमधल्या लोकांना टोनी आणि नलिनी सोबत दिसल्यामुळे सगळे विस्मयचकित झाले होते.... ऑफिस मधला प्रत्येक जण त्यांना बघून आपापल्या परीने अंदाज बांधत होते.... कुणी त्यांना नवीन जोडपे 👩‍❤️‍👨समजत होते तर कुणी मित्रमैत्रीण👫..... कुणी नवीन ओळख झाली असेल असे समजून सोडून देत होते....  

समायरा :  रजनी !! चल निघतो आम्ही... छान झाली पार्टी... तूमची जोडी पण खूप छान आहे👫.... 

रजनी :अगं समायरा !!थांब आपला couple 👫फोटो बाकी आहे.... 

समायरा :couple फोटो 😳??  टोनी, तुषार नलिनी सगळेच गोंधळून गेले... 

तितक्यात टोनीने तुषारला आवाज दिला.... 

टोनी : तुषार !! तुझी बाईक थोडी रस्त्यात झाली आहे... माझी कार काढायला अवघड जात आहे...प्लिज एकदा बाईक काढून दे ना.... 

हो, हो आलोच म्हणून तुषार तिथून सटकला.... 

तुषार : थँक्स टोनी !! वाचवलंस.... 

रजनीसमोर तीचे बाकीचे नातेवाईक आले...गर्दीची संधी साधून समायराने रजनी !!येते मी... असं म्हणून काढता पाय घेतला.... 

रात्रीचे  दहा वाजून गेले होते.... समायरा आणि तुषार बाईक वर सोबत समायराच्या घरी जाण्यासाठी निघाले.. ...

 टोनी आणि मार्था कारमध्ये सोबतच जात होते.... 

मार्था : टोनी  !! ती ऑफिसची नवीन मुलगी... do you like her?? 😍

टोनी : कोण गं मम्मा?? 

मार्था : ती" नलिनी "ना अँप डेव्हलपर? 

टोनी : नाही गं मम्मा... तसं काहीच नाही.... तूला का असं वाटलं?? 

अरे सहजच... पण तसं काही असेल तर मला ती चालेल बरं का? .....मार्थाने अंदाज घेण्यासाठी विचारलं... 

टोनी : मम्मा !!! तसं काही असेल तर सगळ्यात आधी मी तूला सांगेन....

या रजनीच्या एंगेजमेंट पार्टीचा सगळ्यात मोठा फायदा आशिषला झाला होता.... त्याला खूप मोठं सिक्रेट माहिती झालं होतं.... भरीस भर म्हणून तुषार, नलिनी आणि टोनी समायरा ह्या जोडया देखील माहिती झाल्या होत्या.... 

कधी एकदा दिवाकरला पर्सनली भेटतो आणि कधी एकदा सगळ्या गोष्टी त्याला सांगतो असं आशिषला वाटत होतं....

क्रमश :
भाग 66 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या