किती सांगायचं मला (भाग 66)

आशिष अस्मि आणि दिवाकर सोबतच घरी जाण्यासाठी निघाले... 

आशिष :बाबा थोडा वेळ माझ्यासोबत घरी चला मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे.... 

दिवाकर : महत्वाचे?? ईतके काय महत्वाचे बोलायचे आहे... 

अस्मि :काही नाही हो बाबा... घेण्याची 🍻हुक्की आली असेल... 

दिवाकर :आता जेवण वगैरे झाल्यावर?? 🤔

आशिष : नाही बाबा!! खरं तसं काही नाही... अस्मि काही घेण्याची 🍻हुक्की वगैरे नाही... तूझ्या हातचा च☕️हा घेऊ... मग तर झालं? 

अस्मि : मग चला बाबा!! खरंच तितकं महत्वाचे काम असेल... 

 अस्मि, आशिष आणि दिवाकर सोबतच आशिषच्या घरी गेले... 

अस्मि : तूम्ही बोलत बसा.... मी थोडया वेळाने चहा☕️ करते .. ...

दिवाकर :बोला आशिषराव !!

आशिष : बाबा !!तूम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही अशी गोष्ट माझ्या हाती लागलं आहे..... 

दिवाकर :काय?? 🤔

आशिष : समायरा आणि तुषारचं लग्न झालेलं नाहीये.... 

दिवाकर :काय 😳?? 

आशिष : आहे ना मोठा बॉम्ब?? ... 

दिवाकर :पण कसं शक्य आहे... आपण आपल्या ऑफिसच्या interview च्या वेळी सगळे डोकमेंट्स घेतलेले आहेत... infact मी स्वतः चेक केले आहे.... 

आशिष : बाबा !!कागदपत्रे तर त्यांनी तयार केली असतील ना...  मी स्वतः माझ्या या कानांनी त्यांचं बोलणं ऐकलं आहे....पुढे एका तर अजून दुसरा बॉम्ब .... 

दिवाकर : काय 🤔? 

आशिष :नलिनीची  तुषार आणि समायराची ओळख आहे.... 

दिवाकर : 😳 शॉकिंग... 

आशिष : अजून एक धक्का.... नलिनी आणि तुषार👩‍❤️‍👨 मध्ये काहीतरी सुरु आहेच... पण आपला टोनी आणि समायराचं सूत जुळलेलं 👩‍❤️‍👨आहे... 

दिवाकर : काय 🤔.... ईतके एकामागून एक धक्के.... तुम्हाला कसं कळालं?? 

आशिषने सगळ्या गोष्टी कश्या ऐकल्या... आणि कसं ऐकलं ते सर्व सांगितलं.... 

दिवाकर : शाब्बास !! ही खूप मोठी बातमी आणली आहे .... पण तूम्हाला बरं सुचलं त्यांच्या जवळ जायचं आणि तितक्या त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या गप्पा ऐकायचं ..... 

आशिष : मी ठरवलंच होतं.... आता चान्स सोडायचा नाही... त्या गुप्तहेरावर अवलंबून राहायचं नाही.... आणि पहा मला केवढं घबाड मिळालं?? 

तितक्यात अस्मि चहा ☕️घेऊन हॉलमध्ये आली.... 

चहा☕️ घेऊन दिवाकर घरी जाण्यासाठी निघाला.... 

आशिष : थांबा बाबा !!खूप उशीर झाला आहे मी तूम्हाला घरी सोडतो.... 

आशिष : अस्मि !!मी बाबाला घरी सोडून येतो गं...

 दरवाजा लाऊन घे.... असं सांगून आशिष आणि दिवाकर घराबाहेर पडले..... 

तुषार आणि  समायरा तिच्या घरी गेले... .. 

समायरा :तुषार !! ये ना... आत ये, तुझी आईबाबांची ओळख करून देते.... 

तुषार घरात आला.... 

समायरा : आई, बाबा !!हा तुषार.... माझ्यासोबत काम करतो... 

समायराचे बाबा : अच्छा हा आहे का,  तुषार?? 🤔

समायराची आई : हा आहे का, म्हणजे?? 

समायरा : अगं आई !!आम्ही दोघे एकाच युनिटला काम करतो ना... मी बाबाला आधी सांगितलं होतं..... 

समायराची आई : अच्छा असं आहे का?? मला तर दुसरंच काहीतरी वाटलं होतं... 

समायराची आई दोघांना सोबत बघू लागली....तसं जोडा छान दिसतोय नाही... अगदीच लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटत आहे.... असा विचार समायराच्या आईच्या डोक्या🤩 चमकून गेला.... 

समायराचे बाबा : अगं कुसुम !! बघत काय बसली आहॆस... जरा चहा पाण्याचं बघ ना.... 

तुषार : नाही नको.... मला घरी जायला आधीच उशीर झाला आहे.... आई घरी एकटीच आहे... काळजी करत असेल.... 

समायराची आई : असं कसं... तू पहिल्यांदाच घरी आला आहॆस... 

तुषार : काकू खरंच नको....नंतर मी निवांत तुमच्या हातचं जेवायला येईल.... पण आता मी निघतो....

असं म्हणून तुषार लागलीच बाईक वर बसून निघून गेला...... 

समायराचे बाबा : समु !! हा तुषार बिलकुलच थांबला नाही... 

समायरा : बाबा !! त्याची आई घरी एकटीच होती...त्या डायबेटिक आहेत.... अधून मधून बऱ्याचदा त्यांची शुगर लो होते ... त्या चक्कर येऊन पडतात म्हणून तो सहसा संध्याकाळी बाहेर जात नाही.... 

समायराची आई : आईवर खूप जीव दिसतोय लेकाचा.... 

मुलगा चांगला संस्कारी दिसतो.... समुसाठी विचार करायला काही हरकत नाही.. .. काय सांगावं दोघांनीही एकमेकांना पसंत पण केलेलं असावं..... आजच मी समुच्या बाबांशी बोलते... बघुयात काय म्हणतात ते....असा विचार 🤔समायराची आई करू लागली..... 

ईकडे नलिनी आता थोडी स्थीर झाली होती.... काहीही झालं तरी बाबांना आणि तुषारला दुखवायचं नाही दोघांचा सुवर्णमध्य साधायचा असं तिने मनाशीच ठरवलं.... 

तितक्यात तुषारचा मेसेज आला :Hi

नलिनी :Hi, बोल... 

तुषार :तू व्यवस्थित घरी पोहोचलीस ना? मी समायराला सोडून just आता घरी पोहोचलो.... 

नलिनी : हो... मी मघाशीच पोहोचले... झोपण्यासाठी बेडरूम मध्ये आली आहे.... 

तुषार : नलिनी !! तू मला जेव्हा जेव्हा टाळत होती ना.... तेव्हा तेव्हा मला जगावंसं वाटत नव्हतं 

नलिनी : हे तुषार !!काहीही नको बोलूस.... मी खूप संभ्रमात होते रे.... तू सांग ना.... तू माझ्या जागी असता तर काय केलं असतंस?? 

तुषार : हं... कदाचीत तूझ्यासारखंच वागलो असतो.... पण जाऊ दे आता संभ्रम दूर झाला ना?? 

नलिनी :संभ्रम दूर नाही झाला... पण आता काहीतरी सुवर्णमध्य साधायचं असं ठरले आहे... 

नलिनीचे बाबा : नलिनी !!बेटा नलिनी झोपलीस का गं?? 

नलिनी : नाही बाबा !!

तुषार :बाबा आले बाय... 

तुषार : बाय... 

नलिनीचे बाबा : तू मला सांगितलं नाहीस...कशी झाली एंगेजमेंट पार्टी?? ..... 

नलिनी : बाबा एंगेजमेंट पार्टीला मोजकेच लोकं बोलावले होते... पण तिथली व्यवस्था अगदीच चोख होती...ईतके कमी लोकं असताना देखील खाण्याचे पदार्थ अगदीच चाट, चायनीज पासून ते स्वीट डेझर्ट पर्यंत सगळं ठेवलं होतं.... 

नलिनीचे बाबा : अन तो तुषार, तो आला असेल ना?? 

नलिनी : बाबा !!ऑफिसचे सगळेच लोकं होते.... तोही आला होता... 

नलिनीचे बाबा : काही बोलण्याचा प्रयत्न केला असेल मग 

नलिनी : नाही बाबा, मी तर आशिष सरांच्या बायको (अस्मि )सोबत होते.... 

नलिनीचे बाबा : अच्छा... बाकी तू एंजॉय केलंस ना? .... 

नलिनी : हो,  बाबा... पार्टीला जाऊन जरा बरं वाटलं....

नलिनीचे बाबा : झोपा बेटा आता... उद्या लवकर उठायचे असेल ना.... 

नलिनी : हो बाबा !!

नलीनीच्या बाबांनी नलीनीच्या रूमचा लाईट बंद केला... आणि दरवाजा ओढून झोपण्यासाठी निघून गेले.... 

नलीनीने स्वतःचा फोन night मोड वर केला...तुषार ऑनलाईन आहे का ते पाहिलं... 

तुषार ऑनलाईनच होता.... 

नलिनी : Hi... 

तुषार : Hi, काय म्हणाले बाबा?? 

नलिनी : तू काही बोलण्याचा प्रयत्न केला का?? हे विचारत होते...तुषार !!मला पुन्हा खोटं बोलावं लागलं... खूप guilt येते असं खोटं बोलताना😒.... 

तुषार : हो गं... आता हे समायरा प्रकरण आईला आणि समायराच्या बाबांना माहिती झाल्यापासून मला घरी खूप मोकळं वाटत आहे....त्यावरून मी समजू शकतो... 

नलिनी : तेच ना.... देव करो आणि हे खोटं खोटं वागण्याचे आणि बोलण्याचे खेळ लवकर संपून जाओ... 

तुषार : नलिनी !! नको काळजी करूस... सर्व काही ठीक होईल....

नलिनी : हं.... 

क्रमश :
भाग 67 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या