किती सांगायचं मला (भाग 69)

टोनी : येऊ का आत, "मॉम".. 

मार्था : टोनी !! तू आणि ऑफिसला??" 😳गूड.... असंच लवकर ऑफिस जॉईन करा म्हणजे मी रिटायर होईल.... 

टोनी : असं कसं मॉम, मला तर तूझ्या हाताखाली शिकायचं आहे ना.... 

मार्था : ते तर मी मार्गदर्शन करेलच.... 

टोनी : बरं मॉम !!तसा आशिषदादा पण तूझ्या जागेवर बसू शकतोच ना.... 

मार्था : खरं तर मी हे सगळं त्याच्याच हवाली करणार होते... पण त्याचा बेजबाबदारपणा त्याला आड येतो... तू पाहिलंस का? तो कधीही ऑफिसला येतो कधीही निघून जातो.... जर बॉस असा वागत असेल तर एम्प्लॉयी कसे वागणार.... टोनी !! तुलाही मी सांगते तू जर असा बेजबाबदार वागलास तर मग तुलाही ईथे या चेअर वर बसता येणार नाही....

टोनी : मॉम !! मला एकदा ऑफिसला जॉईन तर होऊ दे... खरं तर मी अमेरिकेहून आल्या आल्या जॉईन होणार होतो ना... पण तूच तर म्हणाली नियमानुसार जॉईन हो....इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर.... 

मार्था : टोनी !!आपले काही तत्व माणसाने पाळलेच पाहीजे... तेव्हाच माणूस आयुष्यात यशस्वी होतो... 

टोनी : हो मॉम... मी तूझी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवेन...

 मार्थाच्या केबिन मध्ये गेलेला टोनी अजूनही का बाहेर आला नसेल याचा अंदाजा लावत समायरा मात्र सारखी सारखी मार्थाच्या केबिन कडे बघत होती... 

तर तुषार सतत नलिनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होता.... 

नलीनीचा चेहरा उतरलेला होता....

आज आशिष ईतकं काय वागत आहे की नलिनी खाली मान घालून उदास😒 बसलेली आहे .... 

तितक्यात टोनी  मार्थाच्या केबिन बाहेर आला.... तो तुषार आणि समायराच्या केबिन मध्ये डोकावून बघू लागला.... 

टोनी त्यांच्या केबिन मध्ये जाणार इतक्यात आशिषने टोनीला आवाज दिला... सुहास !!अरे तिकडे कुठे चालला आहॆस... 

काही नाही रे आशिषदादा म्हणून सुहास आशिष कडे वळाला... आणि आशिषने त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मुख्य दरवाजा पर्यंत टोनीला सोडायला गेला.... 

त्यामुळे टोनीला परत समायराकडे जाता आलं नाही.... 

समायरा मात्र टोनी आपल्या केबिन मध्ये येत आहे म्हणून खूप खूष झाली 😊 पण आशिषने त्याच्याकडे बोलावून घेतल्यमुळे हिरमुसली 😒 

आज काहीच का मनासारखं होत नाहीये?😒 असं समायरा मनोमन विचार करायला लागली....

रजनी : बघना प्रदीप !!सुहास किती उतावीळ झाला आहे😏... येतानाही नलिनीला भेटला आणि जातानाही... 

प्रदीप : बापरे रजनी 😳 किती लक्ष आहे तूझं?? मला तर तसं काही बिलकुलच वाटलं नाही..... 

रजनी : काही नाही रे प्रदीप !! मांजर असते ना ती डोळे😑 मिटून दूध पिते.... तीला वाटतं की आपण डोळे बंद केले😐 म्हणजे आपण कुणालाच दिसणार नाही.....

प्रदीप : हूं...

ऑफिस सुटल्यावर सगळ्यांचीच लगबग सूरू झाली... नलिनी मात्र अजूनही ऑफिस कामात होती.... आशिषने मुद्दाम तीला सहा वाजेपर्यंत इथून जायचे नाही अशी सक्त ताकीद देऊन ठेवली होती.... 

नलिनीला अजूनही ऑफिसला पाहून तुषारचा जीव टांगणीला लागला होता... काय करावं.... आज नेमकं असं काय घडलं खूप साऱ्या प्रश्नांनी तुषारला घेरून टाकलं होतं... 

समायरा : तुषार !! चल मला नेहमीच्या जागेवर पटकन सोड.... टोनीला पूर्ण ऑफिस मध्ये काय चर्चा चालू आहे ते मला सांगावं लागेल.... 

तुषार : हूं 😒

समायरा : काय हूं.... तुषार !!नको ईतकी काळजी करूस सध्या ती आशिषच्या तावडीत आहे. म्हणून आपल्याला कुणाला काही बोलता येत नाहीये.... 

तुषार : तसं नाही गं समायरा !! सध्या आमचे आनंदाचे दिवस कुणीतरी हिरावून घेतले आहेत असंच मला वाटत आहे... 

समायरा : तुषार !! मला पण टोनी जेव्हा मार्थाचा मुलगा आहे असं कळालं तेव्हा असच वाटत होतं... पण बघ टोनीने मला समजून घेतलंच ना.... तसंही तूझं होईल.... नलिनीचे बाबा तूला नक्कीच समजून घेतील... आपलं मन साफ आहे ना... तो वरती बसला आहे ना तो हे सर्व बघत असतो.... चल आता निघूया.... 

तुषार आणि समायरा नेहमीच्या जागेवर आले... तिथे टोनी थांबलेला होता... 

टोनी :अगं समु किती उशीर?? 

समायराने नजरेनेच तुषारला दाखवले... 

टोनी : काय झालं?? काही उलट सुलट घडले आहे का?? 

समायरा : उलट, सुलट.... सगळं 360 डिग्रीमध्ये फिरलं आहे.... 

टोनी : म्हणजे... 

समायराने ऑफिस मध्ये टोनी आणि नलीनीच्या अफेअरची👩‍❤️‍👨 चर्चा तर आशिष ने नलिनीला रडवले इथपर्यंत सगळं सांगितलं... 

टोनी : 😳 असं काल काय घडलं की या सगळ्यांनी माझे अफेअर👩‍❤️‍👨 करून टाकलं.... काल मॉम पण मला हेच विचारत होती... नलिनी आवडते का?? म्हणून.... मी फक्त नलिनीला सगळ्यांसमोर बोललो म्हणून?? किती narrow minded लोकं आहेत ना....

समायरा : पण चर्चा झालीच ना😏.... 

टोनी : तुषार !! You dont worry.. आशिषदादा ईतका वाईट नाहीरे की तो कुणाला रडवेल... तरी देखील मी नक्की बोलेन त्याच्याशी... मग तर झालं.... 

 ठीक आहे निघतो मी असं म्हणून तुषार तिथून निघून गेला..

तुषार थोडं पुढे जातो तोच तुषारचा फोन 📳वाजला... नलिनीचा फोन असेल असं समजून त्याने त्याची बाईक रस्त्याच्या कडेला लावली... 

त्याने फोन 📳बघितला... नलिनीचाच फोन📳 होता... 

तुषारने फोन 📳कानाला लावला.. हॅलो नलिनी !!

नलिनी नुसती फोनवर📳 रडायला लागली.... 

तुषार : नलिनी !! तू का ईतकी रडत आहॆस.... अगं दिवसभर पण तूझा मुड खराब 😒दिसत होता.... आशिष काही बोलला का?? 

आशिषचे नाव ऐकताच नलिनी अजून हुंदके द्यायला लागली... हो, तुषार !!आशिष सरांनी माझी जवळ जवळ रॅगिंग घेतली.... 

तुषार : म्हणजे?? 🤔 नलिनी !!आपण भेटू या का प्लीज... मला नाही करमत आहे... तूला असं दुःखी बघून.... 

सगळ्या गोष्टीने नलिनी ईतकी हतबल झाली होती की तीने तुषारला भेटायला लागलीच होकार दिला....
)
दोघेही स्नॅक्स अँड कॉफी हॉटेल मध्ये आले..... 

हॉटेल मध्ये एक कोपरा बघून तिथल्या टेबल जवळ दोघेही जाऊन बसले... जेणेकरून बाहेरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना ते दिसणार नाही.... 

दोन कॉफीची ऑर्डर देऊन दोघेही बोलत बसले.... 

तुषार : बोल नलिनी !!तू फोन वर काय म्हणत होतीस?? आशिषने तूझी रॅगिंग घेतली म्हणून??

नलिनी : तुषार !!सांग मला,  आज मी किती काम केलं असेल?? 

तुषार : म्हणजे?? नेहमी पेक्षा जास्त🤔.... 

नलिनी : मी आज काहीच काम केलं नाही... 

तुषार : कसं काय??😳 आज तर तू नेहमीच्या वेळेपेक्षा आधी आली होतीस ना.... 

नलिनी : हो ना... मी जे काही काम करत होते त्यात आशिषसर  उगाचच त्रुटी काढत होते.... मग मला ते म्हणण्यानुसार करावं लागत असे.... त्यालाही काही तरी थातुर मातुर चूक सांगून त्यात बदल करायला सांगत असे ..... बरं हे एक नाही दोन नाही आतापर्यंत चाललं..... त्यातल्या त्यात आशिष सर माझ्यावर दोनचार वेळेस ओरडले देखील.... मी काय त्यांची एम्प्लॉयी थोडीच आहे😡... प्रायव्हेट डेव्हलपर आहे.... लाथ मारून निघून जाऊ शकते😡.... पण ते माझ्या तत्वात बसत नाही ना.... 

तुषार : नलिनी!! तसा विचार चुकूनही करू नकोस..... हे लक्षात ठेव की त्यांनी तूझ्याकडून आधीच व्हावचर वर सह्या घेतल्या आहेत... उद्या तुझ्यावर तू पैसे घेऊन मधेच पळून गेली म्हणून क्लेम करू शकतात.... 

नलिनी : बापरे 😳मी तर हा विचारच केला नाही.... 

तुषार : मग मी कशासाठी आहे?? 😍😍

नलिनी :थँक्स तुषार !! 

तुषार : थँक्स??  ईतक्या लवकर ईतकं परकं करून टाकलं का?? 

नलिनी :तसं नाही रे, तू भेटलास म्हणून जरा बरं वाटलं.... 

तुषार : म्हणून तर म्हणतो मला नेहमी भेटत जा 😉

 हूं, चल निघावं लागेल... बाबा वाट पहात असतील.... असं म्हणून पुढ्यात असलेली कॉफी संपवून तुषार आणि नलिनी आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले....
क्रमश :
भाग 70 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या