नलिनी घाईघाईत निघून गेली पण तुषार आणि समायरा😊 नलिनीकडे कौतुकाने बघत होते....
समायरा : काय, एक नंबर काम केलं आहे ना नलीनीने😊👌👌👍👍....
तुषार : मला तर याचं कौतुक 😳आहे की तीने तिच्या बाबांची परवानगी घेऊन आपल्याला आधीच डेमो देऊन टाकला...
समायरा :आखिर दोस्त 👭किसकी है !
तुषार :दोस्त होगी तुम्हारी, पर पसंद 😍किसकी है !
समायरा : चला खूप उशीर झाला आहे.... साडेनऊ वाजून गेले आहे... मला कॅबने जावं लागेल...
तुषार : कॅबने कशाला... मी सोडतो ना....
नको... आता शेजारी पाजारी नको ते बोलायला लागले आहेत... असं म्हणून समायराने कॅब🚗 बुक केली....
आशिष आणि दिवाकर ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते तो दिवस उजाडला...."दहा तारीख "दोघांनीही नलिनीकडून डेमो घेतला आणि तीला चेक पेमेंट केलं... चेक मिळाल्याची नलिनीकडून एका रजिस्टरवर सही घेतली....
नलिनीचे काम संपले.... नलिनी तिथून निघून गेली.... जाता जाता तीने तुषार आणि समायराच्या केबिन मध्ये डोकावले... कस्टमरची खूप मोठी लाईन दोघांच्याही समोर असल्यामुळे त्यांचं लक्ष नलीनीकडे गेलं नाही....
जाऊदे नंतर बोलता येईल असा विचार करत नलिनी तिथून निघून गेली....
अँप हातात आल्यावर आशिष आणि दिवाकरचा पवित्रा एकदम बदलला....
आशिष मार्थाच्या केबिन मध्ये गेला....
आशिष, :आँटी !! येऊ का आत....
मार्था : अरे ये ना आशिष बेटा.... बोल काय म्हणतोस....
आशिष : उद्या सुहास आपलं ऑफिस जॉईन करणार आहे म्हणे....
मार्था : हो, अर्थातच त्याचं जर आज इंटर्नशिप कंप्लिशन मिळालं तरच....
आशिष : मला त्या आधी काहीतरी तूला सांगायचं आणि दाखवायचं आहे.... ऑफिस सुटल्यावर तू जरा वेळ थांबशील का??
मार्था : कामाचं असेल तर नक्कीच मी थांबेन....
आशिष : हो कामाचंच आहे.... म्हणूनच मी ईतकी विनंती करत आहे....
ऑफिस सुटलं सगळे जण आपापल्या घरी गेले.... आता ऑफिस मध्ये फक्त मार्था गणेश आशिष आणि दिवाकर इतकेच जण होते....
आशिषने कुणाला तरी फोन लावला आणि त्याला बोलावून घेतले....
मार्था :काय झालं आशिष !! तू काहीतरी फार महत्वाचे बोलणार होतास ना....
आशिष :हो आँटी !!जरा थांब... एक महत्वाची व्यक्ती येत आहे....
मार्था : अच्छा....
तितक्यात ती व्यक्ती आत आली....
आशिष : ये प्रमोद !!ये.... आत बैस...
मार्था : आता हा कोण आहे?? 🤔
आशिष :सांगतो सांगतो सगळं काही सांगतो... विथ प्रूफ सांगतो.... आँटी !!तूला तुषार आणि समायरा बद्दल एक खूप गोपनीय गोष्ट मी तूला सांगणार आहे....
मार्था : गोपनीय गोष्ट?? कसली गोपनीय गोष्ट....
आशिष : तुषार आणि समायराने मिळून तूला फसवलं आहे...
मार्था : फसवलं आहे... मला जरा क्लिअर सांगतोस का काय झालं आहे ते... त्यांनी फसवलं की नाही फसवलं ते मी ठरवणार..
.
आशिष : आँटी ईतका विश्वास ठेवणं चांगलं नाही.... तुषार आणि समायरा नवरा बायको नाहीत..... infact त्यांचं लग्नच झालेलं नाही....
मार्था :😳 काय?? कसं शक्य आहे.... त्यांनी documents तर सगळेच सबमिट केले असतील ना....
आशिषने त्याचा फोन काढला आणि फोनच्या गॅलरी मध्ये जाऊन सगळे documents मार्थाला दाखवले.... हे बघ आँटी !!हे undertaking दिलं आहे... फोटो दिले आहेत आणि लग्नपत्रिकेची एक प्रत......
मार्था :😳 बापरे.....
आशिष :आणि हा तो फोटोग्राफर.... ज्याने त्यांचे खोटे फोटो काढले... बोल प्रमोद तूच काढले होते ना हे फोटो....
आपल्या मित्राच्या विरोधात बोलण्याची प्रमोदची बिलकुल हिम्मत होत नव्हती पण आशिषने पोलीस केस करण्याची धमकी दिल्यामुळे त्याला बोलावं लागलं....
प्रमोदने तुषार आणि समायराच्या लग्नाचे खोटे फोटो काढल्याचं आणि लग्नपत्रिका तयार करण्याचं काम केलं याची कबूली दिली.....
मार्था : ओ my god ईतका मोठा फ्रॉड... मार्था अजून काही पुढे बोलणार ईतक्यात आशिष मध्येच बोलला...
प्रमोद!! तू आता येऊ शकतोस... पण खबरदार, जर तू ही गोष्ट तुषार किंवा समायराला सांगितलीस तर त्या दोघांसोबत तूलाही जेल मध्ये पाठवून देईन....
प्रमोदने त्यांच्यासमोर हात जोडले🙏... नाही सांगणार साहेब... पण मला यात अडकवू नका अशी विनंती केली.... आणि तिथून निघून गेला....
मार्था खूप चिडली😠 होती.... तीचा खूप मोठा विश्वासघात झालेला होता.... इतकं सगळं ऐकून तिचं मन सैरभैर झालं होतं.... या दोघांना पोलिसात 👮♂️दिलं पाहीजे.... चला पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू...
आशिष :आँटी !! तिथेच तर घोडं अडतंय ना....
मार्था : म्हणजे??
आशिष : आपला टोनी यांना मिळाला आहे....
मार्था :😳 टोनी?? .... काहीही काय बोलत आहे आशिष?? टोनीचा काय संबंध....
आशिष : संबंध आहे आँटी.... even....टोनी likes😍😍 समायरा.......
मार्था : तिसऱ्या news ने तर मार्था 😳मटकन तिच्या खुर्चीवर बसली...... आशिष!! किती धक्के देत आहॆस रे तू....पण हे सगळं नक्की खरं आहे का??
आशिष : सेंट पेरसेन्ट... मी तूला टोनीबद्दल असं काही का सांगेन....
मार्था : हूं...आता समजलं टोनी ईतका busy असताना ऑफिसला कसं काय येत होता...
हां 🤔ही समायरा देखील चांगली हुशार निघाली... आधी टोनीला आपल्याकडे करून घेतलं....म्हणजे त्यांनी केलेलं फ्रॉड कळालं की टोनी त्यांना वाचवणार.... पण त्यांना माहिती नाही ही मार्था काय चीज आहे ते.... मी टोनीला देखील माफ😡 करणार नाही.... अन ही जोडी??? फारच साळसुद पणाचा आव आणत होती..... तरी म्हटलं इतकं सरळ कुणी असतं का?? वाटतं त्या तुषारची आई पण त्याला मिळालेली होती.... मी मुलगा आणि सुनेचे कौतुक करत होते तर ती देखील हो ला हो करत होती
आशिष : उद्या तर टोनी आपल्या ऑफिसला जॉईन होणार आहे....
मार्था : मी जॉईन करून घेतलं तर ना🙄.... त्याने ईतका मोठा विश्वासघात केला आहे😠....
आशिष :पण उद्या आपल्या ऑफिस च्या अँपला लॉंच करायचं आहे..... अँप पूर्ण झाली आहे ना......
मार्था : अँप लॉन्चिंग तू कर... पण उद्या नको.... उद्या आधी या दोघांना नौकरीवरून काढून टाकू.... आणि मी जरा टोनीला बघते.......
क्रमश :
भाग 74 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
2 टिप्पण्या
O God. Mag Ata pudhe kay honar🤔🤦♀️
उत्तर द्याहटवात्यासाठी तुम्हाला पुढील भाग वाचावा लागेल 😊धन्यवाद
हटवा