आशिष आणि दिवाकरने प्लॅन केल्याप्रमाणे सगळं काही आमलात आणलं होतं आणि त्याचा परिणाम देखील त्यांना हवा होता तसाच दिसत होता...
मार्था तुषार समायरा आणि टोनी तिघांवरही खूप चिडली होती....
मार्था :आता घरी गेलं की पहिले टोनीला झापते...
आशिष : नको नको आँटी !!घरी गेल्यावर नको झापू....
मार्था : अरे ईतका मोठा विश्वासघात केला आहे त्याने, अन तू म्हणतोस झापू नको म्हणून....
आशिष : तसं नाही.... टोनी लागलीच समायराला सांगून देईल.... मग तुषार आणि समायरा सावध होतील... अश्यात त्यांनी दुसरंच काही पाऊल उचललं तर?? ....
मार्था : मग कसं करायचं??
आशिष :उद्या त्याला ऑफिसला येऊ देऊ.... मग हे सगळं क्लिअर करू... पण आँटी तूला जमेल ना.... नाही म्हणजे या मुळे टोनी खूप दुखावला जाऊ शकतो..
मार्था : दुखावला जाऊ शकतो.... त्याने विचार केला होता का फ्रॉड करणाऱ्या लोकांची साथ देत असताना.....
आँटी नको गं ईतकी रागावू त्याच्यावर....अजून आपला टोनी लहान आहे... आशिष आगीत तेल ओतण्यासाठी मुद्दाम तसं बोलला...
लहान?? सत्तावीस वर्षे झाली आहेत... अजून किती वर्ष त्याला लहानच ठरवायचं.... ठीक आहे उद्या ऑफिस मध्ये येईपर्यंत मी जरा शांत बसते.... मग बघू....
मार्था : गणेश !!ऑफिस व्यवस्थित लॉक कर.. चाव्या सांभाळून ठेव.... सकाळी सगळ्यांच्या आधी तुलाच हे ऑफिस उघडायचे आहे....
जेव्हापासून गणेश नौकरीला लागला होता.... मार्था न चुकता रोज ऑफिस सुटायच्या वेळेला ही सूचना देत असे... गणेश ला देखील ती सूचना ऐकल्याशिवाय ऑफिस सुटले असे जाहीर होत नसे....
मार्था घरी गेली.... टोनी घरी तीची वाटच पहात होता....
टोनी : मॉम !!एक गुड news आहे.... फायनली माझी इंटर्नशिप कम्प्लिट झाली.... थोडया वेळातच माझं कंप्लिशन येईल....
ते तर कंप्लिट होणारच होतं🙄.... त्यात विशेष असं काय आहे?? मार्था जरा कोरडेपणाने बोलली..
मॉम आपल्यावर कुठल्यातरी कारणाने चिडली😠 आहे... याची जाणीव टोनीला झाली....
टोनी काहीतरी मार्थाला विचारणार, इतक्यात मी खूप थकले आहे, मी बेडरूम मध्ये जाते... मी आराम करणार आहे... मला डिस्टर्ब करू नका... रात्रीचं जेवण देखील बेडरूम मध्ये पाठवून द्या अशी ताकीद देऊन मार्था तिच्या बेडरूम मध्ये गेली....
टोनीला मार्थाशी ऑफिस जॉईन करण्याविषयी चर्चा करायची होती... पण मार्थाचा असा पवित्रा पाहून टोनीला काही समजतच नव्हतं..... उद्या ऑफिस मध्ये जाऊ आणि बघुयात "मॉम "काय म्हणते ते.... असा विचार त्याने केला
आणि "तो दिवस उजाडला "
समायरा मात्र टोनी आजपासून ऑफिस जॉईन करणार या मुळे खूप आनंदात 😊होती.... चला आता सर्व काही ठीक होईल.... टोनी ऑफिस जॉईन करेल, मग मी बाबांना टोनी आणि माझ्या बद्दल 👩❤️👨सांगेन.... टोनी देखील मार्थाला विश्वासात घेईल.... तुषार आणि माझ्याबद्दल मार्थाला सांगेन.... पण "मार्था " आम्हाला इतक्या सहजा सहजी माफ करेल?? 🤔 करेलही किंवा करणारही ही नाही....पण एक गोष्ट चांगली होईल आम्हाला त्याच्या नंतर खोटं बोलण्याची वेळ येणार नाही....
तुषार आणि समायरा ऑफिस मध्ये आले... आशिष दिवाकर आणि मार्था हे तिघेही ऑफिस मध्ये आधीच आलेले होते....
तुषार आणि समायरा ऑफिस मध्ये आल्या आल्या मस्टर वर सही करण्याच्या आधीच मार्थाने त्यांना गणेश करवी केबिन मध्ये बोलावून घेतले....
या तुषार आणि समायरा या.... तुमचं स्वागत असो.. मार्था थोडी रागानेच 😠बोलली....
मार्था :आशिष !! जर एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल आणि विश्वासघात करत असेल तर त्या साठी कुठला कलम आहे....
IPC 420, आशिष एकदम कुत्सितपणे😏 म्हणाला....
मार्था असं का बोलत आहे.... प्रश्नार्थक चिन्हाने तुषार तिच्याकडे बघायला लागला🤔....
मार्था : मग तुषार !!आणि समायरा !! करायची का तुमच्यावर पोलीस केस.... 420 कलम लाऊन...
तुषारला आता थोडं क्लीक झालं.... आपलं खोटं नक्की मार्था समोर उघडं पडलं आहे हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.... तर समायरा मात्र पुरती गोंधळून गेली होती....
तुषार : मार्था !!आमचं चुकलं आम्हाला माफ कर.... आम्ही जे काही केलं ते आमच्या परिस्थितीमुळे केलं....
मार्था : एवढं मोठं खोटं अगदीच खोटे पुरावे जोडताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली.... कोण तो प्रमोद फोटोग्राफर त्याची मदत घेऊन तूम्ही as a प्रूफ फोटो, लग्नपत्रिका सबमिट केल्या.... कदाचित खोटं मॅरेज सर्टिफिकेट पण तयार करून घेतलं असतं....
हा सगळा प्रकार बघून समायराला एकदम घेरी आली.... ती मटकन तिथे असलेल्या खुर्चीवर बसली....
मार्था मात्र खूप रागात 😡होती.... आता हे घेरी वगैरे नाटकं नको आहेत मला... तूम्हाला चोरी करताना लाज नाही वाटली...
तुषार : मार्था !!आम्ही दोघांनीही हे मजबुरीने केलं.. मला माझ्या आईच्या औषध उपचारासाठी नौकरीची गरज होती तर समायराला तिच्या भावाची फीस आम्हाला दुसरा काही मार्गच दिसत नव्हता....
मार्था : ईतकीच गरज होती तर खरं बोलून नौकरीचा प्रयत्न करायचा होता....
तुषार : मार्था !!आम्ही चुकलो, पण आम्ही कंपनीच्या वृद्धीत हातभार लावला ना... तिथे काही चुकीचं केलं नाही....
मार्थाला तुषारचं म्हणणं पटायला लागलं.... ती विचार करू🤔 लागली......
आपली बाजू कमजोर पडत आहे ते बघून आशिष मध्येच बोलला...
आँटी अजून एक गोष्ट सांगायची आहे ती नलिनी आहे ना.... अँप डेव्हलपर.... ती यांना मिळाली आहे.... तू हे व्हॉउचार बघ.... तीने चक्क दहा लाख रुपये उचल केला आहे....त्या अँपची किंमत साधारण चार लाखांपर्यंत असेल
पण तीने अँप तयार झाल्यावर शेवटी ईतकी अमाऊंट मागितली....
ते ऐकून तुषार चिडला.... आशिष तू काहीही काय बोलत आहॆस? उलट तूच कोऱ्या व्हावचर वर सही घेतली.... तीला तर तूझ्या खात्यातून दोन लाखांचा चेक दिला होतास ना.....
आशिष : म्हणजे मी काय खोटं बोलत आहे??
तुषार : हो...
मार्था : स्टॉप इट.... मी तूम्हा दोघांना आज पासून नौकरीवरून काढून टाकत आहे.... बस्स... मलाआपल्या ऑफिस मध्ये असले फ्रॉड एम्प्लॉयी नको आहेत....
आशिष !! तूम्ही वकिलाद्वारे ती नलिनी अँप डेव्हलपर तीला नोटीस पाठवा.... तत्पूर्वी तिच्या अँपच ऑडिट करून घ्या.... आणि उरलेल्या रकमेची तीला पूर्तता करायला सांगा
क्रमश :
भाग 75वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
.
8 टिप्पण्या
Avghad ahe..
उत्तर द्याहटवाहो, धन्यवाद
हटवाKhup chan lihilay.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा73 bhag upload nhi kela ka
उत्तर द्याहटवाhttp://www.swanubhavsaptarang.com/2020/08/73.html
हटवाभाग अपलोड केला आहे.. लिंक पण दिली आहे
उत्तर द्याहटवाThanks
हटवा