किती सांगायचं मला (भाग 76)

टोनी : मॉम !! असं का म्हणतेस??😢 तूला मला ऑफिसला जॉईन करून नसेल घ्यायचं तर नको घेऊस...
 पण तू एकदा तरी तुषार आणि समायराची बाजू ऐकून घ्यायला हवी होती.... निदान असं नौकरीवरून डायरेक्ट काढण्याआधी एक नोटीस📃 तरी द्यायची होती.... 

मार्था : ईतका मोठा विश्वासघात केल्यावर?? 😠🤔मी तर चांगली जेलची हवा खायला घालणार होते.... पण तू त्यांना सामील होता म्हणून मला हे करता नाही आलं... आणि तू मला नको शिकवू की मी काय करायला पाहीजे ते... 

टोनी : मॉम !! 

मार्था : हे बघ टोनी !!मला काहीच स्पष्टीकरण नको आहे शेवटी धोका हा धोकाच असतो... मला खूप काम आहेत तू आता येऊ शकतोस.... 

मार्थाने टोनीला एकदम परकं केल्यासारखी वागणूक दिली होती.... 

टोनी त्यामुळे दुखावला गेला.... पण कितीही चिडली तर माझी मॉम माझ्यावर  दोन दिवसांपेक्षा जास्त नाराज राहूच शकत नाही याची त्याला खात्री होती.....पण आता शांत राहण्याचा पर्याय त्याला योग्य वाटला.... 

टोनी ऑफिसमधून निघून गेला.... आशिष आणि दिवाकरनी बाकीच्या एम्प्लॉयीच्या नकळत छोटंसं कॉफी☕️ सेलेब्रेशन केलं.... सोबतच वकिलामार्फत नलिनीला नोटीस पाठवली....

ऑफिसच्या बाहेर पडल्या पडल्या टोनीने समायराला फोन लावला.... समायरा आणि तुषार अजूनही  बीचवर होते 

समायरा !!तिथेच थांबा.. मी येत आहे.... असं म्हणून टोनी बीचवर गेला....

टोनीला पाहताच समायराला एकदम लहान मुलासारखं रडायला 😭आलं... तो आल्या आल्या भान हरवून त्याच्या गळ्यात पडली आणि रडायला😭 लागली.... 

टोनी : समु !! अगं ईतकी का पॅनिक होते आहॆस.... सगळं ठीक होईल... तू नको काळजी करू... 

समायरा : टोनी !!सगळं ठीक होईल ना.... 

टोनी : हो ठीक होईल☺️.... पण मला हे कळत नाहीये हे मॉमला आज कसं काय कळालं.... .... 

तुषार : मार्थाला आशिषने सांगितलं.... रजनीच्या एंगेजमेंटच्या दिवशी त्याने आपल्या चौघांचं बोलणं लपून ऐकलं होतं.... 

टोनी :😳 काय?? पण तूला हे कसं कळालं?? 

तुषारने त्याचं आणि प्रमोदचं फोन वरचं संभाषण टोनीला सांगितलं.... 

टोनी :बरं नलिनीबद्दल काही माहिती आहे का?? तीने अँपचं पेमेंट 💵किती घेतलं ते? 

तुषार : नलिनीने आशिष कडून फक्त नी फक्त दोन लाखांचा चेक घेतला आहे ते सांगितलं.... 

टोनी : ईतकी तफावत😳... मला तर आई सांगत होती की तीने दहा लाख रुपये उचल केला आहे म्हणून.... 

तुषार : टोनी!! त्या साठी तूला माझ्यासोबत बँकेत यावे लागेल.... 

टोनी : बँकेत 🤔 ठीक आहे काय गोंधळ आहे ते नक्की बघावेच लागेल.... 

तुषार :समायरा !!तू नलिनीला फोन 📳लाव आणि तीला काहीच न सांगता तीचे अकाउंट कुठल्या कुठल्या बँकेत आहे आणि तीने तो चेक क्लिअरिंग साठी कुठे टाकला इतकंच विचार.... तीने काही विचारलं तर ऑफिस च्या कामासाठी माहिती हवी होती ईतकंच तीला सांग.... मग ती कुठलाच ताण घेणार नाही.... 

 ठीक आहे, असं म्हणून समायराने नलिनीला फोन 📳लाऊन बँक डिटेल्स घेतले.... थोड्याच वेळापूर्वी नलीनीने तो चेक बँकेत जमा केला होता.... 

तुषार : टोनी!! चल आपण बँकेत जाऊ.... समायरा !!तू बँकेत येणार आहॆस का?? 

समायरा : नाही... मी जरा नलिनीकडे जाते... तिच्याशी बोलल्याशिवाय मला घरी जाण्याची हिम्मत होणार नाही... 

तुषार : समायरा !! तू चालली आहॆस खरी पण नलिनीला जास्त काही सांगू नकोस... ती उगाचच ताण घेईल... 

समायरा :तुषार !!ती तूझी प्रेयसी असली तरी माझी तूझ्या आधीपासूनची खास मैत्रीण आहे समजलं ना😠.... 

तुषार :बरं बाई !!चुकलं... निघतो आम्ही.... 

असं म्हणून दोघेही बँकेत गेले....त्याच बँकेत मार्था, टोनी, आशिष सगळ्यांचेच बँक खाते होते.... बँक मॅनेजर टोनीच्या चांगल्या परिचयाचा होता..... 

तुषारने बँक मॅनेजरला नलिनी, आशिष आणि मार्था यांचे बँक डिटेल्स काढायला सांगितले.... टोनी सोबत असल्यामुळे बँक मॅनेजरने ते ताबडतोब दिले...... 

तुषार : हे बघ टोनी !!हे नलिनीचे अकाउंट.... यात आता आशिषच्या अकाऊंट वरून चेकने नलिनीच्या अकाऊंट मध्ये दोन लाख रुपये क्रेडिट झाले आहेत.... आता तू मार्थाचे अकाऊंट बघ... अगदीच दोन दिवसांपूर्वी मार्थाच्या अकाऊंट मधून आशिषच्या अकाऊंटमध्ये दहा लाख रुपये जमा झाले आहेत..... आणि आता आशिषच्या अकाऊंट मध्ये बघ.... बॅलेन्स भरपूर आहे पण दोन लाख रुपये डेबिट झाले आहेत.... 

टोनी : म्हणजे?? हे सगळे पैसे, आशिषने हडपले .... मी कसा विश्वास ठेऊ.... पण त्याला काय गरज आहे हे सगळं करण्याची..... टोनीला बसलेला  हा एक जबरदस्त धक्का होता 

तुषार : म्हणूनच मी तूला बँकेत घेऊन आलो.... कारण मी नुसतं सांगितलं असतं तर तू माझ्यावर बिलकुलच विश्वास ठेवला नसता.... 

टोनी : हो, कारण माझा दादावर खूप जास्त विश्वास होता...पण मला अजूनही समजत नाहीये यात नलिनी कसंकाय अडकली  

तुषार :ते त्यांच्या साठी सोप्प होतं.... त्यांनी अँप च्या कॉन्ट्रॅक्ट पेपर वर नलिनीची सही घेताना दोन कोऱ्या व्हाउचर वर तिच्या नकळत आधीच सही घेतली.... 

टोनी :असं आहे तर... "त्यांनी"... म्हणजे आशिषदादा सोबत अजून कुणी आहे का?? 

तुषार :हो आशिषसोबत  दिवाकर पण यात सामील आहे... 

टोनी :काय 😳?? 

तुषार :हो... 

टोनी : तूला हे लक्षात केव्हा आलं?? 

तुषार :अगदीच नौकरीच्या पहिल्या काही दिवसातच....मला तर याची कमाल वाटते की बुकिंग डिटेल्सचे रजिस्टर पाहिल्या पाहिल्या हे कुणाच्याही लक्षात येईल की ईथे फ्रॉड होत आहे.... मग आपल्या ऑफिसच्या बाकी लोकांना लक्षात आलं नसेल का?? 

टोनी : हं त्या सगळ्या एम्प्लॉयीनी स्वतःची कंपनी म्हणून काम केलं तर त्यांच्या हे लक्षात येईल ना.... 

 तुषार : हं, तसं असेल कदाचीत, पण आम्ही नौकरीला लागल्यापासून आशिषला मिळणारी वरची कमाई जवळजवळ बंदच केली होती.... आज त्याने त्याचा बदला घेतला....

टोनी :पण माझी मॉम तर आशिषदादालाच वारसदार करणार होती... मलाही त्यात काही अडचण नव्हती... मग हे त्याला करायची गरजच काय?? 

तुषार : सरळ सरळ सगळं झालं असतं तर त्यातून  दिवाकरला काय मिळालं असतं मग??

टोनी :म्हणजे?? 

तुषार :खरा गुन्हेगार आशिष नाही... दिवाकर आहे.... मला तर इतकं कळालं की त्याच कारणासाठी दिवाकरने  आशिषला जावई बनवलं आहे....

टोनी : हां, हे असू शकतं.... मला दिवाकर अंकल कधीच तितकेसे आवडले नाही... पण मॉम च्या विश्वासातील माणूस म्हणून मी पण त्यांना कधीच अश्या नजरेने पाह्यलं नाही....

तुषार :आज मला जे होतं ते चांगल्यासाठी होतं याची प्रचिती आली.... आमची नौकरी गेली म्हणून आपण बँकेत  वेळेवर येऊ शकलो.... नाहीतर माहिती असूनही आम्ही तूला आशिषबद्दल पटवून देऊ शकलो नसतो.... 

ईकडे समायरा नलीनीच्या घरी गेली..... 

नलिनी : समायरा !! तू आत्ता इथे?? ते ही ऑफिस सोडून.... 

नलीनीच्या प्रश्नाने समायराच्या डोळ्यातून अश्रू 🥺वाहायला लागले... 

नलिनी :अरे, काय झाले..... चल बरं तू आधी माझ्या बेडरूम मध्ये चल.... 

नलिनीने समायराला बेडरूम मध्ये बसवून किचन मधून तिच्यासाठी पाणी घेऊन आली.... 

नलिनी : समायरा !!तू आधी पाणी पी पाहू... व्यवस्थित बस आणि सांग मला काय झालं ते?? 

समायराने पाणी पिऊन ऑफिसमध्ये घडलेला प्रकार नलिनीला सांगितला.... 

नलिनी : काय यार?? आपल्या चौघांनाही नक्कीच कुणाची तर नजर लागली☹️.... एकामागून एक संकटांची शृंखला चालू आहे.... 

समायराने डोळे पुसले.... खोट्यापासून सुरुवात केली म्हणून थोडा त्रास आम्हाला सहन करावा लागणार याची आम्हा दोघांनाही जाणीव होती.... पण त्याचे परिणाम ईतके मोठे होतील हे मात्र स्वप्नात देखील वाटले नव्हते..
क्रमश :
भाग 77 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या