तुषार :आई !!मार्थाचा फोन 📳आला आहे... मला आज ऑफिसला बोलावलं आहे....
तुषारची आई : आता कशाला बोलावलं आहे.... काल नौकरीवरून काढून पोट भरलं नाही का तिचं....
तुषार : अगं आई !!कदाचीत टोनीचं आणि तिचं बोलणं झालं असावं... समायराला देखील बोलावलं आहे....
तुषारचे काका : इतकं सगळं घडून गेलं पण चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नाही.... खरं आहे देवा निर्लज्जम सदा सुखी 😏
हे वाक्य ऐकताच तुषार जाम भडकला 😡 तो काही काकांना बोलणार ईतक्यात तुषारचा पुन्हा फोन📳 वाजला...
समायराचा फोन📳 होता....
समायरा :हॅलो तुषार !! मार्थाचा फोन 📳आला होता.... तूला काही कारण सांगितले की कश्यासाठी बोलावलं आहे ते...
तुषार : नाही गं... मला काहीच नाही सांगितलं... तू तयार झाली आहॆस का?? मी तूला घ्यायला येतो....
समायरा : हो, तू निघ.... मी रेडी होते....
तुषार : ठीक आहे....
आई निघतो मी, तू काळजी घे 😉... फोन📳 ठेऊन तुषार त्याच्या आईला म्हणाला.....
ईकडे आशिष आणि दिवाकर ऑफिसला पोहोचले
आशिष आणि दिवाकर ऑफिसला पोहोचल्या पोहोचल्या मार्थाने त्यांच्यासोबत मिटिंग भरवली....
नलिनीने केलेल्या दहा लाखांच्या अफरातफरी बद्दल मार्थाने आशिषला विचारले....
आशिष : बाकीचे पैसे मी तीला कॅश 💵पेमेंट केले😏... मी नलिनीला दिलेल्या कॅश पेमेंट 💵 च्या नोटांचे नंबर मी नोंद केले आहेत...तुम्हाला आणखीन काय पुरावा हवा आहे...
टोनी :पण आपण कॅश पेमेंट 💵करत नाही ना....
आशिष : टोनी!! माझ्याकडे आठ लाख कॅश होती.....म्हणून मी ती तीला देऊन टाकली....
आशिषचे बोलणे मार्थाला पटले.... टोनी मात्र पुरता गोंधळून गेला होता....
आता या चक्रव्युव्हातून नलिनीची सुटका होणं मात्र अवघड दिसत होतं.....
तुषार समायराच्या घरी पोहोचला.... समायरा तयारच होती.......
आई!!बाबा !!तुषार आला आहे.... निघते मी असं म्हणून समायरादेखील निघाली.....
समायरा आणि तुषार सोबत मोटरसायकलवर निघाले...काय झालं असेल?? टोनीने मार्थाला सगळं सांगितलं असेल का?? मार्थाला ते पटलं असेल का?? असे असंख्य प्रश्न दोघांच्याही डोक्यात येत होते......आणि अचानक.......
अचानक तुषारने मोटरसायकलचा ब्रेक करकचून दाबला.... मोटरसायकल पडता पडता वाचली....
समायरा :अरे तुषार !!हळू.....
तुषार : अगं अचानक समोरून जीप आली तीही रॉंग साईड ने.... ओह नो समायरा !! जीपचा नंबर म्हणून MH___.... लक्षात ठेव, त्याने समोरच्या ऍक्टिव्हा वाल्याना उडवलं....
तुषारने काहीही विचार न करता त्याची मोटरसायकल ऍक्सीडेन्टच्या ठिकाणी वळवली....
ऍक्सीडेन्टच्या ठिकाणी लोकांचा खूप गर्दा झालेला होता..... जो तो त्या जीपवाल्याच्या नावाने शिव्या देत होता...पण तो जीपवाला तिथून पळून गेला होता....
समायरा : अरे तुषार !!ही तर अस्मि आणि ही छोटीशी मुलगी कोण आहे?? दोघेही बेशुद्ध दिसत आहेत... चल आपण यांना हॉस्पिटलला🏥 घेऊन जाऊ...
तुषारने लागलीच बाजूला उभ्या असलेल्या टॅक्सीला🚖 बोलावून लोकांच्या मदतीने अस्मि आणि त्या छोटया मुलीला टॅक्सी मध्ये टाकलं..... समायरा त्यांच्यासोबत टॅक्सी 🚖मध्ये बसली आणि तुषार मोटरसायकल वर हॉस्पिटल 🏥मध्ये निघाला...
टॅक्सी🚖 मध्ये बसल्या बसल्या समायराने टोनीला फोन📳 लावला.... पण टोनीचा फोन📳 बिझी येत होता..... समायरा हॉस्पिटलला🏥 पोहोचली.... पोहोचल्या पोहोचल्या हॉस्पिटलच्या 🏥अपघात विभागात दोघीनाही नेण्यात आलं.... डॉक्टरांनी👨⚕️ दोघीनाही तपासले.... प्राथमिक उपचार केले... दोघींचे अर्जंट रक्त तपासण्यात आले... पोलीस केस असल्यामुळे त्याची नोंद करण्यात आली....
तितक्यात टोनीचा समायराला फोन📳 आला...
टोनी :अगं समु !!फोन 📳करत होतीस... सॉरी अगं माझा अमेरिकेचा एक मित्र भारतात आला आहे म्हणून मी जरा त्याच्याशी बोलत होतो....
समायरा : टोनी !!ऐक ना मी हॉस्पिटल 🏥मध्ये आहे..... अस्मि आणि तिच्यासोबत एक छोटीशी मुलगी त्यांना अपघात झाला... योगायोगाने मी आणि तुषार तिकडून जात होतो.... त्यांना आपल्या जिल्हा हॉस्पिटलला🏥 घेऊन आलो .....
टोनी : 😳काय??? ठीक आहे... ठीक आहे मी येतो....
मॉम मी जरा अर्जंट जाऊन येत आहे....
मार्था : टोनी !!काय झालं....
टोनी :एक महत्वाचे काम आले आहे...
मार्था :ईतके कसले महत्वाचे काम??
टोनी :मॉम !!मी आल्यावर सांगतो
तितक्यात तुषारने देखील आशिषला फोन लाऊन कळवले...
लॅबचे रिपोर्ट आले... अस्मि आणि ती छोटीशी मुलगी दोघांनाही रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे रक्त द्यावं लागणार होतं.... हॉस्पिटल मध्ये रक्त उपलब्ध होतं पण ते रक्त मिळण्यासाठी तिथे असा नियम होता की रक्त लावायचं असेल तर नातेवाईकांपैकी कुणीही एकाने रक्त दान करावं लागेल....
वेळ न दवडता तुषार आणि समायरा रक्तदानासाठी तयार झाले....
लागलीच अस्मि आणि त्या छोटया मुलीला रक्त लावण्यात आले....
आशिष, दिवाकर आणि टोनी धावत पळत हॉस्पिटलला आले.... आशिष सोबत एक अनोळखी जोडपं देखील होतं....
अस्मि आणि ती मुलगी आता स्थीर झाले होते.... त्यांना अगदीच वेळेवर रक्त मिळाल्याने त्यांच्या तब्यतीत सुधारणा होताना दिसत होती....
आल्या आल्या टोनीने डॉक्टरची 👨⚕️भेट घेतली... अस्मि आणि त्या छोटया मुलीची चौकशी केली....
दोघांचीही तब्येत आता चांगली आहे... त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने दोघीही वाचल्या.... नाहीतर त्यांचे काहीच खरे नव्हते कारण तेवढ्या कमी वेळात खूप रक्तस्त्राव झाला होता.... बरं त्या छोटया मुलीचं नाव वगैरे जरा माहिती होती...ज्यांनी त्यांना आणलं ते हिला ओळखत नाहीत...... असं त्या डॉक्टरने 👨⚕️सांगितलं.....
तिचं नाव" पूर्वी " तिच्याबद्दल माहिती दिल्यावर टोनीने डॉक्टरला विचारलं.... डॉक्टर !!यांना आणणारे ते दोघे कुठे आहेत....
डॉक्टर : ते तिकडे रूम नंबर सोळा मध्ये दोघेही रक्त दान करत आहेत....
टोनी, आशिष, दिवाकर आणि ते जोडपं सगळेच जण रूम नंबर सोळा मध्ये गेले.... तुषार आणि समायरा दोघेही रक्तदान करत होते....
गेल्या गेल्या त्या जोडप्याने आणि आशिषने त्यांच्यासमोर हात जोडले🙏🙏🙏.....
आशिष : मी कुठल्या तोंडाने तुम्हाला धन्यवाद म्🙏हणू....
तुषार : त्यात काय?? हे तर आमचे कर्तव्यच होते....
समायरा : आता दोघेही कसे आहेत?? टोनी !!ती छोटी मुलगी कोण आहे??
टोनी : दोघांचीही तब्येत सुधारत आहे....
ती मुलगी पूर्वी आहे...माझ्या बहीण जेनीची मुलगी.... ही जेनी आणि हा तीचा नवरा... आशिष म्हणाला....
समायरा : अच्छा....
जेनी : मी खूप आभारी आहे तूमची..... तूम्ही पूर्वी आणि अस्मिला वेळेवर हॉस्पिटलला 🏥आणलं.....
आशिष :अस्मि !!पूर्वीला त्यांच्या घरी सोडायला चालली होती.... पण मध्येच हा अपघात..... बरं तुषार !!तूला माहिती आहे का?? हा अपघात कसा झाला आहे ते... कारण अस्मि खूप सांभाळून गाडी चालवते....
तुषार : हो, अस्मि ची काहीच चूक नव्हती एक जीप रॉंग साईडने जोऱ्यात आली तीने आम्हाला कट मारल्यामुळे माझं तिच्याकडे लक्ष गेलं... आणि त्या नंतर सरळ ऍक्टिवा ला जाऊन धडकली....
आम्ही त्या जीपचा नंबर पण नोंद करून ठेवला आहे .....
क्रमश :
भाग 81 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®Swanubhavsaptarang
11 टिप्पण्या
Kiti diwas chalnar ajun story lawkar sampwa na.
उत्तर द्याहटवाकंटाळा आला आहे का? 🤔
हटवाNahi kantala nahi aala pan roj wait karawa lagto new part sathi. Wait karnyacha kantala yetoy. Otherwise story chhan ahe.
हटवाOk ok thanks
हटवाFinish naka karu. Savay zali ahe roj navin Bhag vachaychi.... Mast story.... 😊
उत्तर द्याहटवाOk, ok धन्यवाद.... कथा अगदी योग्य वेळेवर पूर्ण होणार.... रटाळ वाटणार नाही याची मी खात्री देते...
हटवाखुप रंगतदार कादंबरी नेहमीच पुढच्या भागाची उत्सुकता ताणून धरणारी! 👍👍
उत्तर द्याहटवाWow उज्वला मॅम, आज तुमचं कंमेंट ईथे वाचायला मिळालं... धन्यवाद dear मॅम
हटवाKhup chaan story....pan tumala jamel tas aka ch divshi taka stori 3...4...karn khup vat pahavi lagte o tai plss
उत्तर द्याहटवाhttp://www.swanubhavsaptarang.com/2020/08/58.html
हटवाअजून links हव्या असतील तर सांगा
हटवा