किती सांगायचं मला (भाग 81)

आशिष : हो का 😳?? छान केलं तुषार तू त्या जीपचा नंबर नोंद करून ठेवला... आता त्या माणसाला कशी जेल ची हवा खायला पाठवतो बघ.... रॉंग साईडने गाडी चालवतो ना.... 

तुषार :आशिष !!कुठलंही काम रॉंग साईडने केलं की त्याचे परिणाम उलटेच होणार?? 

आशिष : तुषार !!कळाला बरं का तूझा टोमणा.... 

तुषार : नाही आशिष!! मी तूला टोमणा नाही मारला.... मी सत्य परिस्थिती सांगत आहे.... तूला टोमणा वाटला असेल तर सॉरी.... 

सॉरी??🤔 मी किती खराब वागलो याच्याशी.... 
माझ्यामुळे याला नौकरीवरून काढून टाकलं गेलं....
पण त्याच्या चेहऱ्यावर तसा एक लवलेशही दिसत नाही....
खरं तर मला त्या नलिनीला अडकवायचं नव्हतं पण केवळ ती तुषारची प्रेयसी होती म्हणून मी तीला लीगल नोटीस📃 पाठवली....
त्याच्यासोबत मी त्या समायराला देखील नौकरीवरून काढून टाकलं..... 
किती वाईट वागलो.... तरीदेखील हाच "सॉरी" म्हणत आहे.... आपण चुकलो खरंच आपण खूप मोठी चूक केली.... 

आशिष असा विचार करत असतानाच अस्मि आणि पूर्वी कश्या आहेत आता मार्थाचा घाबरलेला आवाज ऐकायला आला...... 

ईतक्या संकटांमध्ये टोनीने देखील मार्थाला प्रथमच इतकं घाबरलेलं पाहिलं होतं.... कितीही केलं तरी सून आणि नात होती ना.... 

आशिषने आता तुषारच्या बाबतीत ज्या ज्या चूका केल्या होत्या त्या सुधारायच्या ठरवल्या.....

 दिवाकरला देखील आपली अस्मि तुषार मुळेच सुखरूप  राहिली....आणि आपण त्याचाच गेम करत होतो याचे वाईट वाटले..... 

अस्मि आणि पूर्वी दोघीही शुद्धीवर आल्या.... 

नर्सने त्या शुद्धीवर आल्याचा निरोप दिला.... सगळेच जण मग अपघात विभागाकडे पळाले.... 

पूर्वीचा डावा हात फ्रॅक्चर झाला होता तर अस्मिचा डावा पाय... दोघांचेही ऑपेरेशन करायचे ठरले.... 

तुषार आणि समायरा चे रक्तदान करून झाले.... दोघेही बाहेर आले..... दोघांनीही मार्थाची भेट घेतली... मार्थाने दोघांचीही पाठ थोपटली...... 

मार्था : तूम्हाला मी काल कामावरून काढलं.... मी सॉरी म्हणेल अशी अपेक्षा बिलकुल करू नका😠..... कारण खोटं बोलून तूम्ही मला फसवलं आहे... 

तुषार : सॉरी मार्था !!

समायरा : सॉरी मार्था !!

टोनी : मॉम !!आता तरी यांना माफ कर गं.... 

मार्था :  its ok 😊 

तितक्यात आशिष अस्मिच्या केबिन मधून बाहेर आला.. ...

मार्था : मी जरा अस्मिला भेटून येते.... 

मार्था अस्मि कडे गेली.... आणि टोनी पूर्वीला भेटायला गेला... 

तुषार : आता अस्मिची तब्येत कशी आहे ?? 

आशिष : डाव्या पायाचे हाड मोडले आहे.... त्याचे ऑपेरेशन आहे.... तूम्ही त्यांना वेळेवर आणलं म्हणून त्या दोघी वाचल्या.... आशिषच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू😢 होते.... 

तुषार : आशिष !!आता का दुःखी होतो आहेस.... मोठं संकट गेलं ना.... 

आशिष : तुषार !!तू त्या जीप चा नंबर नोंद केला आहेस ना तो दे बरं?? 

तुषार : आशिष !!त्या साठी तूला माझ्यासोबत एक डील करावं लागेल..... 

 डील 😳कसलं डील?? मी तर तुषारला खूप साधाभोळा समजत होतो🙄....असे असंख्य प्रश्न आशिषच्या मनात येऊन गेले.... 

तुषारच्या त्या बोलण्याने समायरा आणि दिवाकर देखील गोंधळून गेले होते.. .... 

तुषार :काय झालं आशिष?? काय विचार करत आहेस🤔.... 

आशिष : काही नाही.... बोल कसलं डील करायचं आहे?? 

तुषार : तू जी नलिनीला लीगल नोटीस 📃पाठवली आहे ती मागे घे... आणि माझ्याकडून जीपवाल्याचा नंबर घे...

तुषारचे ते डील ऐकून आशिष, समायरा आणि दिवाकर तिघांनीही सुस्कारा सोडला😊😊😊.... 

आशिष : 😃😃😇ही डील होय?? Done 

तुषार : तूला कसली वाटली?? 🤔 प्रॉपर्टी वगैरे मागतो की काय?? 😉

ते ऐकून आशिष जरा खजील🙄 झाला.....

सगळेच जण एक एक करून अस्मि आणि पूर्वीला भेटून घेतले .... आशिष दिवाकर आणि जेनी तिघेही हॉस्पिटलला थांबले..... 

 तुषार आणि समायरा आज तूम्ही घरी जा.... आराम करा.... उद्यापासून पुन्हा ऑफिस जॉईन करा... its my order.... मार्थाने त्यांना सुनावलं..... 

मार्थाच्या बोलण्याने टोनी, समायरा आणि तुषार खूप खूष झाले..... 

आशिष : आँटी !!मी नलिनीवर घेतलेली लीगल एक्शन मागे घेत आहे.... 

मार्था : 😳 कसं काय?? 

आशिष : ती तुषारची प्रेयसी आहे 😉....

मार्था : काय 😳??  बरं आहे.... तूमची आजची पिढी ..... बायको काय👩‍❤️‍👨.... प्रेयसी काय 👩‍❤️‍👨... बरं म्हणून, तू लीगल ऍक्शन मागे घेणार आहे काय?? 

पूढे आशिष काही मार्था समोर कबुली देणार तितक्यात तुषार म्हणाला :मार्था !!तसं आमचं डील आहे.... 

मार्था : डील?? 

तुषारने आशिषसोबत काय डील केले हे सांगून मुख्य फ्रॉडचा  विषय वळवला होता.. .  

कसा आहे हा?? तुषारने चक्क मला मी केलेला गून्हा देखील कबूल करू दिला नाही... आणि मी??  मी त्याला नौकरीवरून काढून टाकू लागलो होतो.... खरंच या तुषारच्या बाबतीत मी नको नको ते गैरसमज करून घेतले होते.... आशिष विचारात मग्न झाला... 

मार्था : तुषार !! ....प्रेमासाठी👩‍❤️‍👨 काहीपण हो ना?? 

तुषार :😊😍

मार्था : आशिष!!जेनी!! मी घरी निघते..... टेन्शनने जरा थकल्यासारखं झालं आहे..... 

मार्था गेल्यावर आशिषने तुषारला विचारलं तू मला मार्थासमोर मला नलीनीच्या नोटीस 📃बद्दल का बोलू दिलं नाही.... 

तुषार : तू लीगल नोटीस📃 मागे घेणार आहेस ना ... मग बाकीच्या गोष्टी कश्याला...... मग उगाचच मार्थाचं मन कश्याला दुखवायचं.... 

आशिष मात्र आता पुरता भावनीक झाला होता.... ज्या तुषारवर तो खूप चिडला होता पण आता  त्याच्या मनात त्याच्या विषयी  आदर निर्माण झाला होता... 

टोनी आणि समायरा हॉस्पिटलच्या बाहेर गप्पा मारत बसले होते.... 

समायरा : टोनी !!आज खूप रिलॅक्स वाटत आहे....ना कुठला खोटेपणा.... न कुठलं लपवा लपवीचं टेन्शन.... 

टोनी : हो, आता फक्त आशिषदादाचं जे ऑफिस फ्रॉड प्रकरण आहे ते एकदा सोडवलं की मग सगळंच सुरळीत होईल....

चला मी तुम्हाला घरी सोडतो.... तुषार चल तूझी मोटरसायकल मी ड्राईव्हर ला सोडायला सांगतो.... तूला अशक्त पणा वाटत असेल ना.... तुषारला हॉस्पिटल बाहेर बोलावून टोनी म्हणाला.... 

तुषार : विशेष असं काही नाही... तू समायराला सोड.... मी जातो बाईक वर... 

टोनी : तुषार !!बस क्या🤔.... दोघेही चला... असं म्हणून तुषारच्या बाईकची चावी त्याने ड्राइव्हरला दिली..... आणि तुषारच्या   घराचा पत्ता दिला 

टोनी आधी तुषारच्या घरी गेला.... घरी तुषारची आई आणि त्याचे काका होते.... 

तिघांना पाहून तुषारच्या आईला आश्चर्य वाटले..... 

तुषार, समायरा आणि सुहास?? ... आता ईथे.... 

सुहास : काकू !!तूमचा तुषार खूप गुणी आहे बरं का? असं म्हणून सुहासने तुषारवर कौतुकाचा वर्षाव करत नेमकं काय घडलं हे सांगितलं....

सुहास घडलेली एक एक गोष्ट तुषारच्या आईला सांगताना त्याच्या काकाचा चेहरा मात्र पांढरा फटक पडला होता🙄.... तुषारचं होणारं कौतुक त्यांच्या सहनशक्तीच्या बाहेर होतं.... त्यांचा नुसता जळफळाट होत होता.... 

तुषारचे काका : मी जरा बाहेर जाऊन येतो.... 

 काका !!कुठे चालला आहात?? मी तुम्हाला माझ्या बॉसची ओळख करून देतो....तुषारने मुद्दाम त्याच्या काकांना थांबवलं...... 

बॉसची 🤔ओळख ???  सुहास तुषारच्या त्या बोलण्याने आश्चर्यचकित झाला.... 
क्रमश :
भाग 82 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. नक्कीच तुषार व समु व नलिनीच्या मागचे अरिष्ट टळेल ना! जीपचा नं. व जीपवाला काही रामायण घडवणार नाही ना आशीष नक्कीच सुधारला आहे ना? असंख्य प्रश्नांचा भुंगा डोक्यात घोंघावत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. Khup sundar.. me 2 divsat read keli.. sglech part khup chhan ahet.. excited to read next part.. thanks for amazing story

    उत्तर द्याहटवा