तुषारने त्याच्या काकांना सुहासची ओळख बॉस म्हणून करून दिली...
त्यावर सुहास काही बोलणार ईतक्यात समायराने सुहासकडे बघून डोळे मिचकावले....
तुषार मुद्दाम त्याला बॉस म्हणत आहे.... आता हे सुहासच्या लक्षात आले... मग तोही शांत बसला...
काकांचा जळफळाट पाहून, " सुहास "किती श्रीमंत आहे आणि किती मोठया कंपनीचा मालक आहे हे तुषार त्याच्या काकांना भरपूर रंगवून सांगत होता....
काकाना शांतपणे ते ऐकण्याशिवाय आता पर्याय नव्हता....
तुषारच्या आईने चहा☕️ केला.. चहा ☕️झाल्यावर टोनी आणि समायरा निघाले.... निघताना दोघेही तुषारच्या आईच्या पाया पडले.... लवकरच तुमचं शुभमंगल होवो असा आशीर्वाद तुषारच्या आईने त्यांना दिला....
टोनी आता समायराला घेऊन तिच्या घरी सोडवायला निघाला....
टोनी : काय ग समु !!मघाशी तुषार मला त्याच्या काकांसमोर बॉस बॉस करत होता तेव्हा मी काही बोलणार होतो....तू डोळे का मिचकावले....
समायरा : टोनी !! त्याचे काका खूप खराब आहे.... ते नलीनीच्या घरी काय झालं हे आता त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं आणि काल त्याची नौकरी पण गेली म्हणून ते काही ना काही बोलत होते.... तू बघितलंस ना, तू केलेली तुषारची स्तूती त्यांना सहन होत नव्हती म्हणून चक्क घराबाहेर निघाले होते....
टोनी :अरे हो !!. खरंच की.... त्या वेळेस ही गोष्ट मला माहिती हवी होती....त्यांची चांगली मज्जाच घेतली असती मग....
जिथे नेहमी" टोनी" समायराला सोडवायचा ती जागा आल्यावर समायराने टोनीला ईथेच थांब असं सांगितलं....
नाही !!आज तूझ्या घरासमोर गाडी 🚗थांबवतो.....असं म्हणून टोनीने गाडी😊 समोर घेतली.....
समायराच्या आईला एक मोठी आलीशान महागडी कार🚗 आपल्या दरवाजात आली आहे असं आतूनच दिसलं.... कारमधून🚗 कोण उतरत आहे याचा अंदाज घेत असतानाच समायरा उतरताना दिसली...
समायराची आई: समु 😳 आपली समु?? अहो !!आपली समु बघा ना??
समायराचे बाबा : काय झालं कुसुम !!समु तर ऑफिसला गेली होती ना??
समायराची आई: अहो !!ती बघा ना समोर.... त्या आलिशान महागड्या गाडीतून🚗 उतरत आहे....
बघू बघू कुठली आलिशान गाडी🚗. आहे असं म्हणून अमोघ देखील हॉल मध्ये पळतच आला..
अमोघ :अगं आई !! मर्सिडीज कार 🚗 आहे 😳 आणि सोबत कुणीतरी मुलगा दिसत आहे...
तितक्यात दोघेही घरात आले....
समायरा : आई!!बाबा !! हा... टो.. .. सुहास... आमच्या ऑफिसच्या बॉस आहेत ना मार्था !! त्यांचा मुलगा
सुहास :नमस्कार काका !!नमस्कार काकू !!
समायराची आई : अगं समु !!तू ऑफिसला गेली होतीस ना??
समायरा : नाही आई !! काय झालं माहिती आहे का?? असं म्हणून अस्मिच्या अपघाताची गोष्ट समायराने तिच्या आईबाबाना सांगितली....
सुहास : समायराने नुकतेच रक्तदान केले... म्हणून मग मी तीला गाडी🚗 मध्ये घेऊन आलो...
समायराची आई : बसा तूम्ही मी चहा☕️ करते....
समायरा :अगं आई !!तुषारच्या घरी चहा ☕️झाला आहे...
सुहास : नाही मी जरा लवकर निघतो... मला पून्हा हॉस्पिटलला 🏥जायचे आहे.... तिकडे पुढचं ऑपेरेशन चा काय प्लॅन आहे.... ते मला बघावं लागेल...
समायराचे बाबा : हो ते काम जास्त महत्वाचे आहे...
चला निघतो मी...असं म्हणून सुहास तिथून निघून गेला...
अमोघ : ताई !!कसली भारी गाडी🚗 आहे ही... ही गाडी🚗 तीच का?
समायराने एकदम अमोघ कडे पाहून डोळे 😳वटारले....
पण ते समायराच्या बाबांनी बघितलं....
समायराचे बाबा :समु !!काय खाणाखुणा चालू आहेत... अमोघ !! कुठली तीच गाडी🚗 रे...
आता आपण पकडले गेलो आणि आता हीच सांगायची योग्य वेळ आहे हे समायराच्या लक्षात आले....
समायरा : आई !!बाबा !!तूम्ही रागावणार नसाल तर एक सांगू??
समायराचे बाबा : रागावण्यासारखं काही आहे का??
समायरा : माहिती नाही😒.... आई !!बाबा !!माझं टोनीवर प्रेम 😍आहे... त्याचही माझ्यावर तितकंच प्रेम 😍आहे....
समायराची आई :काय 😳?? प्रेम😍... आणि हा टोनी कोण आहे आता??
समायरा : "टोनी " म्हणजे सुहास... मला आता सोडवायला आला होता तो....
समायराची आई : काय 😳?? ईतके मोठे लोकं... समु !!हे खरं आहे का?? नाहीतर तो तूला फसवायचा... मोठे लोकं आहेत....
समायराचे बाबा :समु बेटा !! त्याचं खरं प्रेम आहे का तुझ्यावर.... आणि हा तूला कधी भेटला
हो, बाबा !! त्याचं खरं प्रेम आहे.... असं म्हणून टोनी मॉल मध्ये कश्या पद्धतीने भेटला आणि नंतर त्याने प्रपोज केलं ते सांगितलं....
समायराची आई : समु बेटा !! मी पुन्हा म्हणते... अंथरून पाहून पाय पसरावे....
अमोघ : ताई !!सॉलिड... जीजू ईतके लॉर्ड...
समायरा :अं, लागलीच जीजू 😄...अगं आई !!आज त्याला वेळ देता आला नाही म्हणून तूझ्या मनात शंका येत आहेत...
समायराचे बाबा : समु !! तूला मुलगा चांगला वाटतो ना... खात्रीचा आहे ना....
समायरा : हो....
समायराचे बाबा : समु बेटा !! आम्हाला काहीच अडचण नाही.... पण बेटा तू विचार कर.... खरंच त्यांच्या आणि आपल्या परिस्थितीमध्ये जमीन आसमान चा फरक आहे.... तूमची ती बॉस "मार्था "तीने तूझा स्वीकार करायला हवा.....
समायरा : बाबा !! मार्था आमचा स्वीकार करतील अशी टोनी ला खात्री आहे.... तसंही तूम्हा सर्वांची मान्यता मिळाली तरच आम्ही पुढे जाणार.....
टोनी हॉस्पिटल🏥 मध्ये पोहोचला....
टोनी : जेनी दी !! तू आणि जीजू घरी जाऊन फ्रेश होऊन या... येताना पूर्वीचं तीला लागत असलेलं काही सामान घेऊन ये... तीच्या खाण्यापिण्याचं सामान लागेल ना ते घेऊन ये मी तिच्याजवळ थांबतो .....
जेनी : ठीक आहे... मी लागलीच जाऊन येते.... आशिष !!तूझा आणि अस्मि चा डब्बा पण आणते तूम्ही निवांत ईथे थांबा...
आशिष : ठीक आहे....
टोनी : दिवाकर अंकल कुठे दिसत नाहीयेत ते घरी गेले का??
आशिष : हो मीच त्यांना घरी पाठवलं.... सगळेच जण एका वेळी कशाला थांबायचं म्हणून.....
टोनी : अच्छा, आशिष दादा !!मला तुझ्याशी थोडं महत्वाचे बोलायचे आहे.... चल आपण त्या समोरच्या बेंचवर बसून बोलू.... म्हणजे आपल्याला बोलताही येईल आणि अस्मि आणि पूर्वीवर लक्षही ठेवता येईल......
दोघेही बेंच वर बसले.... टोनी :आशिष दादा !! माझ्यावर रागावणार नसशील तर एक विचारू??
आशिष : बोल ना....
टोनी : दादा !! नलिनीच्या लीगल नोटीसची 📃नेमकी काय भानगड आहे.... तीने ते दहा लाख रुपये घेतले नाही ना???
आशिष : टोनी !! मला तुषारचा खूप राग 😡आला होता.... म्हणून मी नलिनीला लिगल नोटीस📃 पाठवली होती... पण मग मला कळालं की ती माझी खूप मोठी चूक होती.... म्हणून मी नोटीस 📃मागे घेतली....
टोनी : आशिषदादा !!या छोटया छोटया गोष्टी जाऊ दे... मी जरा मुद्द्यावर येतो.... दादा !! राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी तूझ्या नावावर हवी आहे का?? तसं असेल तर सांग...
आशिष : टोनी !!तू विषय छेडलास आहेस तर सांग... तू शिकत असताना दिवसरात्र मेहनत करून मी ती कंपनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला.... आणि तूझी इंटर्नशिप पूर्ण झाली की तू माझा बॉस म्हणून बसणार.... मला कसं सहन होणार
टोनी : आशिष दादा !! मग ईथे नक्कीच तूझा गैरसमज झाला आहे.... तूला वाटतं का?? माझी मॉम इतकं सहजा सहजी मला त्या कंपनीचा बॉस करेल....
आशिष : पूर्ण कंपनीत तशी चर्चा चालू आहे.....
टोनी : चर्चा चालू असू देत ना?? ते तर आपल्या कंपनीत काम करणाऱ्या एम्प्लॉयीचे विचार आहेत... पण दादा तूझी कमाल आहे... तू मॉमला ओळखलं नाहीस का?
आशिष : म्हणजे?? 🤔
टोनी : आशिषदादा !! मॉमने आपल्या दोघांमध्ये कधीच काही फरक केला नाही.... मला इतकं तर नक्कीच माहिती आहे की मॉमने या बाबतीत आपल्या दोघांचाही समसमान विचार केला असणार ...
क्रमश :
भाग 83 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®Swanubhavsaptarang
4 टिप्पण्या
Khup chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवामॅम सगळे आनंददायी वाटेवर सरकत आहे. काय शेवट करताय का कादंबरी चा? खुप प्रश्न अनुत्तरित आहेत हं!
उत्तर द्याहटवाधन्यवाद dear मॅम
हटवा