किती सांगायचं मला (83)

टोनी :आशिषदादा !!असे मनात गैरसमज करून घेण्यापेक्षा आपण मॉम शी क्लिअरकट बोलून घेऊ ना... 

आशिष : टोनी !! मला योग्य नाही वाटत

टोनी : आशिषदादा !!  तूला माहिती आहे का?? आपल्या कंपनीची अँप तूलाच ऐनवेळी सरप्राईज देऊन लाँच करायला लावायचं असं माझं आणि मॉमचं प्लॅनिंग चालू होतं.... त्यावरून तरी तूला वेगळं समजलं जातं असा गैरसमज करून घेऊ नकोस.....

आशिष : 😳 काय?? सरप्राईज 🤔.... 🤦‍♂️ अन मी.... 

टोनी : हो, आशिष दादा !!आपल्याला डॉक्टर 👨‍⚕️आवाज देत आहेत.... 

आशिष : बोला डॉक्टर 👨‍⚕️साहेब!!... 

 डॉक्टर👨‍⚕️ : त्यांना दोघांना आम्ही आता ऑर्थो वॉर्ड मध्ये शिफ्ट करत आहोत... आज त्या दोघींच्याही काही रक्ताच्या तपासण्या करून सकाळीच ऑपेरेशन करता येईल.... 

टोनी : हो डॉक्टर👨‍⚕️ !!तूम्हाला जसं योग्य वाटेल तसं....फक्त पूर्वीच्या बाबतीत एकदा तिच्या मम्मी पप्पाना बोलून घ्या... ते जरा घरी गेले आहेत.... आले की त्यांना तुमच्या केबिन मध्ये पाठवतो.... 

 ठीक आहे.... असं म्हणून डॉक्टर👨‍⚕️ तिथून निघून गेला.... 

आशिष : आपल्या कंपनीचं "अँप "लॉंच उद्या करायचं आहे ना... 

टोनी : अँप लॉन्च?? 🤔उद्या करायचं ठरलं होतं.... पण आता उद्या अस्मि आणि पूर्वीचं ऑपेरेशन असताना कसं काय करणार?? .... 

आशिष : 😳टोनी !! तू.... 

टोनी : अरे आशिषदादा !!असं काय करतोस... अस्मि माझी वहिनी आहे आणि पूर्वी भाची.... आणि अँप मागे 
 तूझी केवढी मेहनत आहे.... अन जेव्हा अँप लॉन्च तुझ्याच हाताने करायचं ठरलं आहे तेव्हा आपण एखादा दिवस उशिरा करूच शकतो ना....

टोनीचे ते वाक्य ऐकताच आशिषचे गैरसमजाचे मळभ  दूर झाले.... त्याच्या डोळ्यातून अश्रू 🥺वाहू लागले.... आपल्याला या कुटुंबात अगदीच पुढचं स्थान दिलं गेलं आहे आणि आपण आपल्याच लोकांबाबत खूप गैरसमज करून घेतले होते... आपला महामूर्खपणा होता... मार्था आँटीनी तेव्हा आपली साथ दिली होती जेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्याला घराबाहेर काढले... आणि आपणच..... 

टोनी :आशिषदादा !!काय विचार🤔 करत आहेस?? 

आशिष : अं, काही नाही....

तितक्यात जेनी घरून परत आली..... 

जेनीला डॉक्टरने👨‍⚕️ काय सांगितलं ते सांगून एकदा डॉक्टरच्या👨‍⚕️ केबिनमध्ये आशिषने जायला सांगितलं... 

टोनी पूर्वीजवळ गेला... 

टोनी :काय चॅम्प?? किती फाईट केलीस.... 

पूर्वी :काय हो मामा !!कसली फाईट... पण मला त्या जीप वाल्याशी😡 फाईट 👊👊करायची आहे... wrong साईडने गाडी चालवतो काय?? एकदा ठीक होऊ दे मग चांगला धडा शिकवीन त्याला 

टोनी : बापरे 😳... आमची पूर्वी तर चांगली लढायची तयारी करत आहे  ..... बरं हे घे चॉकोलेट 🍫🍫 मम्मी ला दाखवू नकोस बरं... अन take care...मी जरा तूझ्या अस्मि मामीला भेटून येतो....

टोनी :अस्मि वहिनी !! आता बरं वाटत आहे ना?? 

अस्मि : हो, आता पेनकिलर  इंजेक्शन दिल्यावर त्रास कमी झाला आहे... 

टोनी : मॉम घरी एकटीच आहे... मला आता निघावं लागेल...वहिनी !! take care  

अस्मि :हं... 

नलीनीच्या घरी नलिनी आणि तीचे बाबा खूप टेन्शन😒 मध्ये होते.... तितक्यात नलिनीला तुषारचा फोन आला.... 

नलीनीने फोन 📳बघितला 

नलिनी : तुषार !! 😳 घरी आधीच इतकं टेन्शन चालू आहे... आणि तुषार डायरेक्ट फोन 📳 करत आहे... त्याला कसं काहीच वाटत नाही...बाबा काय म्हणतील?? 
असा विचार करत बाजूला बाल्कनीत जाऊन नलीनीने 📳फोन घेतला.... 

तुषार : नलिनी !! तूला वकिलाच फोन 📳आला होता का??

 नलिनी : वकिलाचा फोन 🤔 नाही.... का? 

तुषार : मग येईल... आशिषने लीगल नोटीस 📃मागे घेतली... 

नलिनी :काय 😳...कसं काय?? 

 तुषारने दिवसभरात काय घडलं ते सगळं नलिनीला सांगितलं.... 

नलिनी :💃💃 खरंच खूप मोठी आणि चांगली बातमी आहे ही.... .... 

तुषार :चल मी पण जरा थकलोय... मी फोन 📳ठेवतो....

पण मी बाबाना काय सांगू... तुषारचा फोन 📳होता ते... नाही नको.... उद्या जेव्हा वकील फोन करतील तेव्हाच सांगणे योग्य राहील....
आता काहीतरी फोन 📳चा विषय टाळायला हवा... असा विचार करत असतानाच नलिनीला समायराचा फोन आला 📳

समायरा : नलिनी !!अभिनंदन... आशिषने नोटीस📃 मागे घेतली.... 

नलिनी : हो, हो थँक्स...आताच तुषारचा फोन 📳येऊन गेला 

समायरा : डायरेक्ट फोन 📳....🤔 बातमीच ईतकी छान होती की त्याला राहवलं नसेल.... 

नलिनी :हं....असेलही कदाचित.... आता तू पण आराम कर... थकली असशील ना .... 

समायरा : हो गं, खूप थकले पण तूला ही गूड news देऊन आराम करणार होते... चल बाय... 

नलिनी : बाय... 

आता समुचा फोन 📳आला असं सांगून बाबांना सांगायला काहीच हरकत नाही... विचार करत नलिनी म्हणाली :बाबा !! एक आनंदाची बातमी आहे... 

नलिनीचे बाबा : काय?? 🤔

नलिनी :आशिषसरांनी नोटीस📃 मागे घेतली.... 

नलिनीचे बाबा : काय 😳??  असं एकदम अचानक..... 

नलिनी : मला तितकंसं माहिती नाही....आपल्याला नक्की काय झाले ते उद्या कळेल..... 

नलिनीचे बाबा : हं... पण लेखी हातामध्ये पडेपर्यंत काहीच खरं नाही.. 

सॉरी बाबा तिथे काय घडले हे मला सगळेच माहिती आहे पण तूमची तुषारवर असणारी नाराजी मला तूम्हाला खरं सांगता येत नाही... जाऊदे उद्या तुम्हाला कारण कळेलच नलिनी विचार करत होती...

घरी गेल्यावर मॉमशी तीला न दुखवता आणि आशिषचे जूने उद्योग तिच्यासमोर न आणता कसं बोलता येईल याचा टोनी विचार करायला लागला शेवटी एकदा अस्मिवहिनी आणि पूर्वीचे ऑपेरेशन पार पडू  देत मग या विषयावर मॉम शी बोलता येईल असे एकदाचे टोनीने ठरवले...... 

दुसरा दिवस उजाडला.... अस्मि आणि पूर्वीचे दोघांचेही ऑपेरेशन व्यवस्थित पार पडले.... आता सगळ्यांचा ताण जरा कमी झाला होता.... 

सगळं काही स्थीर झाल्यावर आशिषने दिवाकरला रात्री टोनीशी काय बोलणं झालं ते सांगितलं.... 

दिवाकर :आशिषराव !! मग आता तूम्ही काय ठरवलं आहे

 आशिष :सध्या मी टोनी काय म्हणत आहे त्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं आहे 

दिवाकरला आपली एकुलती एक अस्मि खूप मोठया संकटातून वाचली....कुणाचे तरी पुण्य असावे नाहीतर आपण एकही चांगले काम केले नाही .... यांच्या प्रॉपर्टी मध्ये काही नाही मिळालं तरी चालेल पण माझी अस्मि ठीक झाली पाहीजे..... असंच दिवाकरला वाटायला लागलं.... 

आशिष : बाबा !!आता जरा तूम्ही अस्मि जवळ थांबल का?? मी एक महत्वाचे काम करून येतो... असं म्हणून आशिष निघाला
क्रमश :
भाग 84 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या