आशिष आणि तुषार घरून निघून गेले.... पण नलिनीचे बाबा त्यांच्याकडे पाहून स्तब्ध उभे राहून विचार करत होते...
नलिनीचे बाबा : नलिनी !! मला अजूनही विश्वास बसत नाही.... समायरा???
नलिनी : बाबा !! तूम्ही सांगा ना... असं वागून समुला दुसरं काय मिळणार होतं.... ती वेळ चुकीची होती.... त्या वेळी तीने निभावून नेलं....
नलिनीचे बाबा : हं.... तूला काय वाटतं?? खरं खरं सांग तूला तुषार आवडतो 😍का??
नलिनी : बाबा !! तूम्ही रागावणार नसाल तर एक सांगू.... माझं तुषारवर प्रेम😍 आहे....
नलिनीचे बाबा : 😳काय?? मग तू आतापर्यंत कधी मला बोलली नाहीस....
नलिनी : बाबा !! मला तूमचा तुषारवर असलेला राग पाहून खूप भीती वाटायची.... आणि तूम्ही माझ्याजवळ जी एक वडील म्हणून तूमची काळजी व्यक्त केली ती पूर्णपणे पटली होती.... म्हणून मी ठरवलं होतं तूम्ही जसं म्हणाल तसंच वागायचं....
नलिनीशी आपण कितीही कडक वागलो.... पण तीला माझ्या मतांचा किती आदर आहे.... तुषारवर प्रेम असूनही तीने माझा शब्द खाली पडू दिला नाही असा विचार करून त्यांना गहिवरून आलं🥺....
मार्था आणि टोनी अचानक न सांगता समायराच्या घरी गेले...
अमोघ त्यांना पाहून समायराच्या रूम मध्ये गेला...
अमोघ : अग दी !!जीजू आणि तूझ्या बॉस आपल्या घरी आल्या आहेत....
समायरा : काय?? 😳मार्था ईथे....
तू त्यांना बसव....आई बाबाना सांग मी तयार होऊन येतेच...
मार्था ईथे कश्याला आल्या असतील... कालच्या अस्मिच्या अपघाताने त्यांना काही वाटलं असेल म्हणून कदाचीत त्या आल्या असतील....
तयार होऊन समायरा हॉल मध्ये आली.... तीचे आई बाबा आधीच हॉल मध्ये येऊन बसले होते....
समायराची आई : थांबा मी पाणी घेऊन येते....
मार्था : समायराची आई !!तूम्ही जरा थांबा... मला जरा महत्वाचे बोलायचे आहे....
ते ऐकून समायराची आई समोर सोफ्यावर बसली....
मार्था : मला घुमवून फिरवून बोलता येत नाही... मी जरा सरळच बोलते... मी माझ्या टोनी साठी तुमच्या समायराचा हात मागायला आले आहे ...
समायरा :😳
समायराचे बाबा : काय?? 🤔इतक्या लवकर....
मार्था : इतक्या लवकर म्हणजे?? 🤔
समायराचे बाबा : काही नाही... अगदी कालच आम्हाला या दोघांबद्दल👩❤️👨 कळाले.... आणि आज एकदम??..
मार्था : अच्छा... मग तुमचं काय म्हणणं आहे??
समायराचे बाबा : आमची समु एवढ्या मोठया घरात जात आहे.... आम्हाला तर त्याचा आनंदच 😊आहे....
मार्था : ठीक आहे, ठरलं तर मग....पंधरा दिवसात त्यांचं लग्न उरकून टाकू.... काळजी करू नका लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू... फक्त तूम्ही तुमचे मेंबर्स किती आहेत ते कळवा...
समायराचे बाबा : अहो मार्था मॅम !!तूम्ही असं कसं म्हणता आहात.... मुलीचे वडील म्हणून आमचं काही ना काही योगदान राहू द्या.....
मार्था : तुमचं योगदान आधीच आहे... मी जो लग्नाचा खर्च करणार आहे तो समायराने आमच्या कंपनीला मिळवून दिलेल्या नफ्यातून..... तसंही आम्हाला अश्या इव्हेंटला sponser भरपूर भेटतात 😉.... ग्रँड सेलेब्रेशन करू....
समायराचे बाबा :अच्छा ठीक आहे मग... मी अगदीच दोन ते तीन दिवसात किती मेंबर्स आहेत ते कळवतो....
मार्था : ठीक आहे. समायरा !!मी तूला एका ब्युटिशिअनचा नंबर देते....तीच्या कडे सगळंच कॉन्ट्रॅक्ट असतं... तूझे सगळ्या इव्हेंट चे ड्रेस, मेहेंदी, संगीत च्या डान्सची कोरिओग्राफी हे सगळंच बघते.... हे घे तिचं कार्डच घे....
समायराने त्या ब्युटीशीअन चं visiting कार्ड घेतलं ...
मार्था :तीला आजच कॉन्टॅक्ट कर.... मी पण तीला घरी गेल्यावर एकदा फोन📳 करेन....
समायरा : ठीक आहे..मार्था ....
मार्था :आता मार्था नाही "मॉम "म्हणायचं
टोनी :😊
समायरा : ठीक आहे मॉम
समायराचे बाबा :अगं कुसुम जरा चहा ☕️नाश्त्याच बघा....
समायराची आई : हो हो मी लागलीच पोहे करते...
मार्था: मला चालतील हो, तुमच्या हातचे पोहे.....किती दिवस झाले आहेत पोहे खाऊन....
समायराची आई एकदम खूष होऊन किचन मध्ये गेली.
समायराची आई : समु !! जरा किचनमध्ये येतेस....
आले आई !!असं म्हणून समायरा किचनमध्ये गेली....
तुषार आणि आशिष हॉस्पिटलकडे आले....
तुषार :आशिष !! अस्मि वहिनीचे ईतके मोठे ऑपेरेशन झाले तरी तू माझ्यासाठी....
आशिष : तुझ्यासाठी असं काहीच नाही.... मला नोटीस📃 पण मागे घ्यायची होती.....
तुषार : तरीपण थँक्स.....
आशिष : मी ज्या चूका केल्या.... त्या सुधारण्याची संधी होती ती.....
तुषार : पण मी जी चूक केली ती ईतकी सहजा सहजी मान्य झाली नसती....पण मला वाटतं आता नलिनीचे बाबा नक्कीच माझ्याबद्दल सकारात्मक विचार करतील.आणि आशिष हे केवळ तुझ्यामुळे साध्य झालं आहे....
आशिष : चल, दिवाकर आणि जेनीची आता सुट्टी करतो... मी दोघींजवळ थांबतो......
तुषार : ठीक आहे निघतो मी.... आज ऑफिसला देखील जायचं आहे.... जॉइनिंग द्यायचं आहे ना....
आशिष : गूड.....
तुषार त्याच्या घरी गेला....
घरी तुषारने त्याच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला....
तुषारची आई : पण तुषार आपला इतका अपमान झाला आहे नलीनीच्या घरी😠 तूला वाटलंच कसं की मी नलीनीला आता सून करून घेईल म्हणून......
तुषार : काय 😳?? आई !!पण त्यात माझी चूक होतीच ना.... नाहीतर त्यांनी आपलं किती छान स्वागत केलं होतं...
तुषारची आई : हो.... पण नंतर काय केलं 😡
मला वाटलं होतं आता सगळं चांगलं होईल पण आता आईचा नकार आहे😒...असा विचार तुषार करू लागला...
तुषारची आई : तुषार !! काय विचार करत आहेस?? 🤔मी म्हणते त्याचा नीट विचार कर आधी.... तूझ्या आईचा अपमान केला आहे त्यांनी आईचा अपमान....
तुषार : हूं... 😒
तुषारची आई : काय हूं😒.... 😂😂😂😂
तुषार : आई !!काय झालं??
तुषारची आई : आपल्या घरी सून म्हणून येणार ती फक्त "नलिनी " मी जरा तूझी गंम्मत करत होते....
तुषार : काय आई?? 😇 काय गं... का अशी जीवघेणी फिरकी घेतलीस गं.... मला क्षणभरासाठी वाटलं आता नलिनी माझ्या आयुष्यात येणं अशक्य.... .
तुषारची आई : असं कसं अशक्य.... आता तर कुठे सगळं कसं छान मार्गी लागत आहे असं वाटतंय.... पुढे वाचण्यासाठी या link वर क्लिक करा 👇
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
.
2 टिप्पण्या
Mastch hota part... 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा