किती सांगायचं मला (भाग 87)

कितीही झालं तर येणारे विघ्न काही संपत नाही... आता आई नाराज वाटत आहे... तिचं म्हणणं  पण बरोबर आहे.... त्यामुळे आता शांत बसनेच योग्य राहील... तुषार असा विचार करत असतानाच तुषारच्या आईचा फोन📳 वाजला.... 

फोन 📳नलीनीच्या बाबांचा होता.... 

तुषारची आई : हॅलो... 

नलिनीचे बाबा : नमस्कार तुषारची आई !!

तुषारची आई : नमस्कार... 

नलिनीचे बाबा : खरं तर माझ्या घरी मी जे तुमच्याशी वागलो... मला तूम्हाला एकदम फोन 📳करायची हिम्मतच नाही झाली... पण नलिनीची आई मला म्हणाली... असं कसं नलिनी फोन 📳करून सांगेन.... जसं आपल्याला वाटतं सगळं काही रीतसर व्हावं... तुषारच्या आईला वाटत नसेल का??  मला ते पटलं म्हणून मी तुम्हाला लागलीच फोन📳 लावला.... आम्ही उद्या यावं ना मग?? 

तुषारची आई :  हो हो या ना.... अगदी जेवण्यासाठीच या... लग्नाची बोलणी करून टाकू.... आता उशीर नको....

आईचं फोन वरचं संभाषण ऐकून तुषार खूप खूष😊😍 झाला.. म्हणायला लागला देवा ¡¡🙏आई, समायरा आणि नलिनी काय कमी होते तू देखील माझी फिरकी घेतलीस 😇... पण खरं सांगू का... फिरकी घेतल्यानंतर मला जो आनंद😊 मिळतो तो मात्र खरंच द्विगुणित असतो...

मुख्य म्हणजे आता तुषारच्या आईच्या मनासारखं झाल्यामुळे आता तुषारवर देखील कसलंच दडपण नव्हतं...

तुषार ला समायराचा फोन 📳आला 

समायरा : हॅलो तुषार !! एक आनंदाची बातमी आहे... 

तुषार : हो का... माझ्याकडे पण एक आनंदाची बातमी आहे.... 

समायरा : ठीक आहे तू आधी सांग?? 

तुषार : नाही तू आधी सांग . .. 

समायरा : आपण काय सिनेमा मधल्यासारखं तू आधी, तू आधी करत बसणार आहेत का?? जाऊ दे मीच तूला आधी सांगते.... माझं टोनीसोबत लग्न 👩‍❤️‍👨ठरलं आहे....

तुषार :😳 काय... अभिनंदन अभिनंदन😊.... मला वाटतं आता नक्कीच आपल्या दोघांच्याही मागची साडेसाती संपली आहे.... उद्या नलिनीचे आई बाबा येणारआहेत आमचं लग्न ठरवायला.... 

समायरा :😳 काय?? ही तर खूप आनंदाची बातमी आहे.... पण नलिनीचे बाबा तयार कसेकाय झाले?? एकदम अशी काय जादू  झाली?? .....  

तुषार: सकाळी आशिषने बोलावून नलीनीच्या घरी एम्प्लॉयी म्हणून नेलं आणि तिथे काय घडलं ते सगळं समायराला सांगितलं..... 

समायरा : वा😊😍... तुषार !! दोन दिवसांपूर्वी आपण दोघेही किती टेन्शन 😒मध्ये होतो.... आणि आज अचानक चित्र पालटलं.....अगदीच पंधरा दिवसांनी माझं लग्न आहे... 

तुषार : अरे वा... पुन्हा एकदा अभिनंदन.... 

समायरा : चल मी फोन 📳ठेवते मला "मार्था मॉम" ने ब्युटीशिअन ला फोन 📳करायला सांगितला आहे.... 

तुषार :ओ हो😊 " मार्था मॉम " हं... गूड 

समायरा : हो आता त्यांनीच" मॉम" म्हणायला सांगितले 😊 चल बाय... 

तुषार : बाय... 

आई !!समायरा आणि टोनीचं 👩‍❤️‍👨लग्न ठरलं आहे... अगदीच पंधरा दिवसानंतरचा मुहूर्त आहे... 

तुषारची आई : हो का? ही तर आनंदाची बातमी 😊आहे... 
बरं तुषार!! ऐक उद्या आता नलिनीच्या घरातील ते तिघे आणि गंगाबाई धरून आपण चौघे असा सात जणांचा स्वयंपाक करावा लागणार आहे.... तर उद्या सकाळीच तू शेजारच्या भाजी मंडीत जाऊन भाज्या आण.... श्रीखंड ठेऊ... ते पण आणावे लागेल... बाकी पुलाव करते.... 

तुषार : आई !! गंगाबाई किती वाजेपर्यंत येणार.... 

तुषारची आई  : हो ती येईल नऊ वाजेपर्यंत.... नलिनीचे आई बाबा साधारण अकरा साडेअकरा पर्यंत येतील... बारा वाजेपर्यंत जेवायला बसतील..... 

तुषार : ठीक आहे. पण स्वयंपाकाचं जास्त दगदग होईल असं करू नकोस...वाटल्यास काही पदार्थ विकत आणू... 

तुषारची आई : अश्या आनंदाच्या😊 क्षणात ही स्वयंपाकांची होणारी दगदग उलट एक वेगळाच उत्साह घेऊन येते... ...

तुषार :बरं !!सकाळी मला भाज्यांची लिस्ट दे.... मी घेऊन येईन.... 

तुषारचे काका मात्र निमूटपणे😏 तुषार आणि तुषारच्या आईचं संभाषण बघत होते..... 

अस्मि आणि पूर्वी अजूनही हॉस्पिटल मध्येच होत्या... त्यांचे इंजेक्शनचे डोस अजूनही पूर्ण झाले नव्हते.... ते संपल्यावर त्यांना सुट्टी मिळणार होती...पण ऑपेरेशन नंतर दोघीही लवकर सावरल्या होत्या.... रॉड टाकल्या मुळे दोघीनाही जरा दुखायचं पण त्यांना पेनकिलर औषधं सुरु असल्याने त्रास कमी होत होता..... 

आशिषने आता त्या जीपवाल्याची माहिती काढली.... पोलीसकेस तर तशीही झालीच होती... आता त्या जीपचा नंबर त्याने पोलिसांना दिला होता... 

ती जीप शहरातील एका बड्या कार्यकर्त्याची होती.... अपघाताच्या दिवशी त्या कार्यकर्त्या सोबत पगारावरून ड्राइव्हरशी वाद झालेला होता... त्या कार्यकर्त्याने त्याच्या कडून चावी घेण्याच्या आत तणतण करत तो निघून गेला... 

त्या कारणामुळे तो कार्यकर्ता देखील त्याच्या ड्राईव्हरवर चिडला होता.... 

त्या ड्राईव्हर वर कार्यवाही झाली.... त्याला शिक्षा व त्याच्या मालकाला दंड झाला..... 

ईकडे टोनी आणि मार्था घरी आले.... 

मार्था : टोनी !! खूष ना?? 

टोनी : मॉम !! मला कधी तूला काहीच मागण्याची गरज पडली नाही.... i love you मॉम.😍... 

मार्था : मी मॉम आहे तूझी... फक्त तुझीच नाही तर आशिष आणि जेनीची सुद्धा..... टोनी !! अस्मि आणि पूर्वी घरी कधी येणार आहेत?? 

टोनी :अजून दोन दिवसांनी.... 

मार्था :बरं ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळेल त्या दिवशी आपण एक छोटंसं get togather ठेऊ.... त्या दिवशी आपल्या सगळ्यांमध्ये तूझ्या लग्नाची ऑफिशिअल anouncement करू.... आणि आपल्या कंपनीच्या अँपचं लॉन्चिंग त्याच्या दुसऱ्या दिवशी आशिषच्या हस्ते करू.... 

टोनी :मॉम !! खूप छान प्लॅनींग आहे.... 

मार्था :बरं तो तुषार जॉईन झाला का?? 

टोनी  : अगं हो मॉम !!त्याच्याबद्दल तूला सांगायचं राह्यलं.... तो आणि आशिष आज सकाळी नलिनीच्या घरी गेले होते.. आशिषने नोटीस 📃मागे घेतली... आणि नलीनीच्या वडिलांना आशिषने तुषार बद्दल खूप छान प्रकारे समजावून सांगितले.... म्हणून उद्या नलीनीचे आई बाबा तुषारच्या घरी जाणार आहेत...... त्या मुळे तुषार काही ऑफिशिअली जॉईन झाला नाही.... कदाचीत उद्या पण नाही.... 

मार्था : अच्छा....

क्रमश :
भाग 88 वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या line वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. खूपच छान, प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघत असते..

    उत्तर द्याहटवा
  2. किती छान नक्कीच तुषार नलिनी आणि समू यांचे आयुष्य असेच सुरळीत होवू दे रे बाबा टोणी तुच खरा विघ्नहर्ता!..

    उत्तर द्याहटवा