सुहास : भावनांच्या भरात आपण कुणाचा स्वाभिमान दुखावतो आहे हे माझ्या लक्षातच आले नाही... पुन्हा एकदा सॉरी...
तुषार : सुहास !! आता सॉरी म्हणून मला लाजवायला लावू नकोस बरं... ते जाऊ दे काय म्हणते तूझी डान्स प्रॅक्टिस??
सुहास : अरे तो कोरिओग्राफर काहीपण करायला लावत आहे...
तुषार : सुहास !! मज्जा कर...हेच दिवस नंतर गोड आठवण बनून राहतात....
सुहास : हं
तुषार : चल मी आता जाऊन कामाला लागतो... रजनी वाट पहात असेल 😇
सुहास : ठीक आहे... निघतो मी...
तुषार त्याच्या जागेवर जाऊन बसला त्याने त्याचे काम सुरु केले...
काही वेळाने मार्था देखील ऑफिसला आली....
आल्या आल्या मार्थाने गणेश करवी तुषारला केबिनमध्ये बोलावले....
केबिन मध्ये मार्था व्यतिरिक्त हॉटेल lake view चा मॅनेजर बसला होता....
तुषार : अरे हॉटेल मॅनेजर तूम्ही.... त्याने हॉटेल मॅनेजर सोबत हस्तांदोलन केले....
मार्था : टोनीशी तुझं बोलणं झालं आहे ना?? तूझ्या लग्नाच्या इव्हेंट साठी तू काय ठरवलं आहे....
हॉटेल मॅनेजर : लग्नाचा इव्हेंट?? तुषारचा... पण याचं लग्न आधीच झालेलं आहे ना🤔??
मार्था आणि तुषार त्याच्याकडे बघून हसायला लागले 😂😂😂
हॉटेल मॅनेजर मात्र चांगला गोंधळून गेला....
मार्थाने तुषार आणि समायरा बद्दल सगळी स्टोरी त्याला थोडक्यात सांगितली....
मार्था : तुषार !! तू उत्तर दिलं नाहीस🤔?? ....
तुषार : सॉरी मार्था !! माझ्या स्वाभिमानी मनाला अश्या प्रकारे लग्नाचा इव्हेंट करणं मान्य नाही.....
हॉटेल मॅनेजर : इतकंच ना... तुषार !! जर मी तूझ्या इव्हेंटला स्पॉन्सर केलं तर??
तुषार : नाही, नको ईतकी मेहेरबानी नको... मला ते योग्यच वाटत नाही.... आधीच आम्हाला उटी ट्रिप मिळाली आहे ते काय कमी आहे?? ...
हॉटेल मॅनेजर : तुषार !! तूला काय वाटतं?? 🤔मी तुझ्यावर उपकार करत आहे.... अरे तसं नाही... तूला माहिती आहे का आज मी ईथे कश्यासाठी आलो आहे??
तुषारने नकारात्मक मान हलवली.....
हॉटेल मॅनेजर : मी माझा व्यवसाय पाच पट वाढल्याने तूला उटी ट्रिप स्पॉन्सर केली होती.... राईट??
तुषार : हं
हॉटेल मॅनेजर : तू मला उटीला काही स्वच्छतेच्या अगदीच बारकाव्याने ट्रिक सांगितल्या..... तू सांगितल्या प्रमाणे त्या ट्रिक वापरून त्या पद्धतीने मी माझ्या हॉटेलची जाहिरात केली....
तूला सांगतो तुषार अगदीच दुसऱ्या दिवशी पासून माझ्या हॉटेलच्या फ्रँचाइजी आजूबाजूच्या शहरात सुरु झाल्या... त्या नंतर आता रोज एक नाहीतर दोन फ्रँचाइजी उघडत आहेत.... त्याचा विस्तार आता मला महाराष्ट्रातही करायचा आहे.... तूझ्या लग्नाचा ग्रँड इव्हेंट होईल आणि माझ्या प्रोजेक्टची जाहिरातही.... आणि बाकीच्या तयारीसाठी आमचे इव्हेंट ऑर्गनायझर आहेतच....
तुषार : आता मी काय बोलणार😇?? ठीक आहे मी तयार आहे😊....
हॉटेल मॅनेजर :होकार दिल्याबद्दल धन्यवाद... तुषार !!
तुषार :😊
नलीनीच्या बाबांना बोलावून घेऊन तुषारने हॉटेल मॅनेजरची भेट करून दिली....
हॉटेल मॅनेजरला भेटल्यावर नलीनीच्या वडिलांना आपण तुषारला नकार देत होतो ही केवढी मोठी घोडचूक होती हे लक्षात आलं....
आता चारही घरी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं.... सगळी धूम होती... बरोबर पंधरा तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी न भूतो न भविष्यती असा तुषार आणि समायराचा लग्नसोहळा पार पडला ... 😳असं बघताय काय... 😉 तुषारचे नलिनीशी आणि सुहास (टोनी ) चे समायराशी असं म्हणायचं होतं मला😂😂😂....
समाप्त 🙏🙏🙏
प्रिय वाचक आता मी काही गोष्टी तुमच्याशी share करणार आहे... जेव्हा हे कथानक लिहायला सुरु केलं तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मी तुषार आणि समायराची जोडी दाखवावी....
पण माझ्या कथे मध्ये असं होतं की समायरा आणि तुषार हे सहवासाने एकमेकांचे खूप चांगले मित्र होतात....
प्रेमरुपी आकर्षण त्यांच्यात नसते....
तुषार आणि समायराचं नशीब हे एकसारखंच लिहून ठेवलेलं आहे.... म्हणून सोबतच मित्र होतात सोबतच नौकरी करतात आणि सोबतच लग्न देखील होते......
जेव्हा कशाचीही सुरुवात खोट्याने होते त्याचा परिणाम काय होतो?? ...
या कथे मध्ये मुख्य खलनायक ही तुषार आणि समायराची परिस्थिती आहे... आशिष हा तात्पुरता का होईना निव्वळ गैरसमज झाल्यामुळे थोडा खलनायकी स्वरूपाचा आहे...
. जेव्हा कशाचीही सुरुवात खोट्याने होते त्याचा परिणाम काय होतो
ह्या कथे मध्ये संशय,किंवा अविश्वास असा कुठेही दिसून येत नाही...जसं की टोनी ने तुषार आणि समायराची मैत्री समजून घेतली....
समायरा तिच्या बाबांच्या जास्त जवळची असते आणि नलिनी तिच्या आईच्या... पण नलीनी नंतर बाबांच्या देखील तितकीच जवळची होते.....
मला जेव्हा तुमचे माझ्या कथेच्या भागाला केलेले कंमेंट्स मिळायचे तेव्हा खूप वाटायचं की जितकं विस्तृत तूम्ही कंमेंट केलं तितकच विस्तृत उत्तर द्यावं... पण मग मला भीती वाटायची की माझ्या या उत्तराने पुढे कथे मध्ये काय येईल त्याचं रहस्य तुम्हाला कळून जाईल.... म्हणून मग फक्त धन्यवाद म्हणून पुढे चालायचे... त्या साठी मी वाचकांची मनापासून माफी मागते.....
पण खरं सांगू तुमचं इतकं छान समीक्षण असायचं की मला कथेचा पुढील भाग लिहिण्याचा हुरूप यायचा......
ईतक्या भागांची कादंबरी स्वरूपात मी ही पहिलीच कथा लिहिली आहे. ... आणि त्यासाठी तूमचा भरभरून मिळालेला प्रतिसाद त्या साठी मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
43 टिप्पण्या
खूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवामैडम, एकदम छान कथा होती.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाछान शेवट होता.. अडथळे होते खूप. अवघड प्रसंग पण होते. पण शेवट चांगला झाला.. सर्वांच्या real life मध्ये पण असा शेवट झाला तर जीवन किती आनंदी होईल..
उत्तर द्याहटवाखरं आहे, धन्यवाद
हटवाKhupp khuppp thanks.. evdhi chhan katha vachayla milali tyasathi.. khup sundar lihli ahe story.. 👌🏻👌🏻 keep it up.. !!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKhup chan story. End pan mastch zala
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाShevat chaan hota...pan dukhh zale mala khup😔😔 story sampli shevti....mi pahilyapasun te shevti paryant khup utsuktene vachli story
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏...
हटवाजिथे आणि जसे मी ठरवले होते बरोबर तिथेच शेवट केला.. अजून वाढवली असती तर कदाचीत कंटाळवाणी झाली असती??
हटवाKhup mast aahe story
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप सुंदर कथा ....मॅडम, नवीन स्टोरी चालू करा लवकर......तुमच लिखाण उत्तम आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवानक्कीच, सध्या काही blogs येतील आणि मग कथा
हटवाखूप छान कथा होती। आनंदी शेवट। खूप छान लिहिता तुम्ही!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाStory was Beautiful.....pn ajun bhag asyla have hote mg end zala Asta tr ajun avdle aste ....mla roj new bhag vachyla avdt hote
उत्तर द्याहटवाधन्यवाद, आता अजून भाग वाढवले असते तर ते कंटाळवाणे झाले असते... जिथे ठरवला होता तिथेच कथेचा शेवट केला
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा??
हटवाखूप छान कथा आहे, खूप छान लिहिले आहे तुम्ही, asech लिखाण चालू ठेवा,
उत्तर द्याहटवाKathecha end pn मस्त आहे.
नक्कीच, धन्यवाद
हटवाखूप छान लिहिले आहे तुम्ही,
उत्तर द्याहटवाछान कथा hoti,
असेच लिखाण करत रहा नेहमी,
Kathecha end pn मस्त ahe
धन्यवाद
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाफायनली उत्सुकता संपली.. खूप छान कथा
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूपच सुंदर कथा ...अजून पुढे लीहायची होती...अजून भाग वाचायला मीळाले असते तर छान वाटल असत
उत्तर द्याहटवाधन्यवाद, कथा जास्त रटाळ होऊ नये. याकडे माझा कल होता
हटवाखूप सुंदर कथा होती. प्रत्येक भागाची मी वाट बघायची.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNjoyed reading this story..
उत्तर द्याहटवाप्रिय सुजाता किती सांगायचे मला हि आपली 90भागाची कादंबरी मी वाचली कथेचा आशय खुप छान परीस्थिती मानसाला काय करायला नाही भाग पाडत? याचे उत्तम उदाहरण हि कादंबरी. कादंबरीतील सर्व पात्राशी मी समरस झाले होते. पुढच्या भागाची नेहमीच अतुरतेने वाट पहायची. एक डॉ. पेशातील लेखिका मनापासून भावली. अंतिम भाग वाचताना उगाच आपली भेट ईथवरच का? हि हुरहुर मनाला लागली. खात्री आहे नक्कीच अजून अशीच वेगळी दर्जेदार कादंबरी घेऊन नक्कीच तु आम्हाला भेटशील? नक्की ना! खुप छान लिखाण पुढील साहित्यिक प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि आभार सुध्दा! 👍👍🙏🙏
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद mam 🙏
हटवाKharach khup chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKhara cha khup chann. Ajun post karava
उत्तर द्याहटवाउद्यापासून एक नवीन कथा घेऊन येत आहे, धन्यवाद
हटवाखूप च सुंदर
उत्तर द्याहटवा