नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे...
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल.....
"माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा "
...................................................................
" श्रीगणेशा "
एक, दो तीन चार चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार.. हे जणू त्या चौघींचे ब्रीदवाक्यच झाले होते.
अगदीच बारावी पासून त्या घट्ट मैत्रिणी होत्या... सोबतच अभ्यास करत असत , सोबतच क्लासेस आणि कॉलेज करत असत कधी कंटाळा आला तर कॉलेज बंक देखील करत...
दहावीत चौघीना खूप चांगले मार्क्स पडले होते म्हणून या चौघींच्या आईवडिलांचा त्यांच्या मैत्रीवर खूप विश्वास होता...
अनुया, सायली, गीतिका आणि नेहा अशी त्यांची नावे होती....
तसं पाहिलं तर या चौघींच्या आर्थिक परिस्थिती मध्ये प्रचंड तफावत होती ... पण त्यांच्या मैत्री मध्ये कधीच त्यांची आर्थिक परिस्थिती आली नाही....
"अनुया "एका धनाड्य बिल्डर ची मुलगी होती...
तर "सायली" उच्च मध्यमवर्गीय," गीतिका "एका मध्यमवर्गीय तर नेहाच्या घरची परस्थिती जेमतेम होती.....
चौघींचा पुण्यातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये संगणक शाखेत नंबर लागला होता....
आता सगळ्याजणी वसतिगृहात जाण्याची तयारी करत होत्या...
चौघींच्याही पालकांना आपली मुलगी आता आपल्याला सोडून वसतिगृहात राहणार याची काळजी लागली होती...
पण चौघीही सोबतच एकाच कॉलेज आणि हॉस्टेल मध्ये सोबत राहणार असल्यामुळे सगळ्या पालकांची काळजी जरा मिटली होती...
चौघीनांही मनासारखी कॉम्प्युटर ब्रँच मिळाल्याने चौघीही खूप खूष होत्या.... त्यांच्या आयुष्याची एक दिशा ठरली होती.....
आणि तो दिवस उजाडला....
एकाच दिवशी कॉलेज मध्ये ऍडमिशन ची प्रोसेस पूर्ण करून त्याच दिवशी हॉस्टेल मध्ये रूम मिळणार होती.....
ठरल्याप्रमाणे दोन चारचाकी गाड्या होत्या, एक इनोव्हा गाडी होती तर दुसरी टाटा सुमो टाटा सुमोमध्ये सगळे सामान होते आणि दोघींचे वडील बसले होते तर दुसऱ्या इनोव्हा गाडीत चौघीही जणी आणि दोघींचे पप्पा बसले होते......
निघता निघता सकाळचे दहा वाजून गेले होते... सगळ्यांचा नाश्ताआपआपल्या घरी झाला होता.... त्यामुळे आता नॉनस्टॉप जाण्याचे ठरले....
सगळ्यांचा प्रवास सुरु झाला... सगळ्यांच्याच हृदयात एक वेगळ्या प्रकारची कालवा कालव सुरु झाली होती...
अनुया, सायली गीतिका आणि नेहा यांना आपलं घर आपलं शहर सोडून जाताना भरून आलं होतं तर चौघींच्या आईवडिलांचे मन बेचैन झालं होतं....
पण आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी सगळ्या पालकांनी आपलं मन घट्ट केलं होतं....
तब्बल तीन तासांच्या प्रवासानंतर कॉलेज आलं......
कॉलेज पाहून सगळ्यांचेच डोळे दिपून गेले......
तसं सगळ्यानीच कॉलेजच्या वेबसाईट वर कॉलेज कॅम्पस चे फोटो पाहिले होते पण कदाचीत ते जुने असावेत.....
कारण आता त्यांचं कॉलेज खूप भव्य आणि दिव्य दिसत होते.... मध्येच हिरवळ होती...
झाडांची विविध आकारात कटाई केलेली होती.... कॉलेजचे वातावरण कसे एकदम प्रसन्न होते.....
बघता क्षणी त्या कॉलेजच्या प्रेमात पडावं असं त्या कॉलेजचे वातावरण दिसत होते....
दोन्हीही चारचाकी कॉलेजच्या पार्किंग एरिया मध्ये लावल्यावर सगळेच जण ऍडमिशन ची कागदपत्रे हातात घेऊन ऑफिसकडे निघाले....
अनुया, गीतिका , सायली आणि नेहा कॉलेज कॅम्पस बघून खूप आनंदी होत होत्या पण त्यांनी सभोवताली नजर फिरवली की कॉलेज मधील आजूबाजूची मुले त्यांच्याकडे एकटक बघताना दिसत होती.... त्यांच्या नजरेतील कुत्सितपणा😏 चौघींच्याही हृदयाची धडधड वाढवत होता.....
कुणी मुद्दाम त्यांच्या बाजूने चालत होतं.... मुलामुलींचे घोळके आणि त्यांनी जाणूनबुजून मोठ्याने हसणे 😂 खिदळणे , चित्र विचित्र आवाजकरणे हे सगळं पाहून आणि समजून देखील त्यांचे पालक दुर्लक्ष करत होते....
ऑफिस मध्ये गेल्यावर चौघींचे कागदपत्रे सबमिट करून त्यांचे ऍडमिशन करण्यात आले....
अनुयाचे डॅडी : मुलींनो !! चला आता एकदाची प्रिन्सिपॉल ची भेट घेऊ.....
अनुया : गीतिका, नेहा, आणि सायली चला प्रिन्सिपॉल केबिन मध्ये जाऊन येऊ....
अनुया : excuse me सर !!प्रिन्सिपॉल केबिन कुठे आहे??
ऑफिस क्लार्क : उजव्या बाजूने जा... तिथेच आहे...
" May i come in sir" प्रिन्सिपॉल केबिन च्या दरवाजावर चौघीही उभ्या राहील्या....
प्रिन्सिपॉल : नवीन ऍडमिशन??
चौघीही एकसुरात : yes sir
प्रिन्सिपॉल : come in, come in..... अच्छा तुमचे पेरेंट्स पण दिसत आहेत या या सर्वच जण या.... प्रिन्सिपॉलने बेल वाजवली.... राजू यांना बसायला खुर्ची आण बरं...
राजुने खुर्ची आणून दिली.....
नेहाचे बाबा : नमस्कार सर, आम्ही "कळंबोली "वरून आलो आहोत... ही माझी कन्या नेहा आणि ह्या तिच्या मैत्रिणी अनुया, सायली आणि गीतिका... सगळ्याच अभ्यासात अतिशय हुशार आहेत पण घर सोडून कधीच एकट्या राहिल्या नाही.... त्यामुळे आम्हाला थोडी धाकधूक वाटत आहे.....
प्रिन्सिपॉल : एकंदर इथलं वातावरण खूप सुरक्षित आहे...मुलींनो तुम्हाला काही अडचण आली तर बिनधास्त आम्हाला भेटा.... पालक वर्ग तूम्ही अगदीच निश्चिन्त रहा....
गीतिकाचे बाबा : सर धाकधूक म्हणजे आमचा रोख रॅगिंग कडे होता....
प्रिन्सिपॉल :तूमची काळजी मी समजू शकतो.... पण ईथे येणारा प्रत्येक पालक अशीच काळजी घेऊन येतो... आणि नंतर निश्चिन्त होतो.... तसंच बाकीची व्यवस्था ही चोख आहे... तूम्ही हॉस्टेल बघितलं आहे काय??
अनुयाचे डॅडी : नाही, आता तुम्हाला भेटून आम्ही हॉस्टेल कडेच जाणार होतो....
प्रिन्सिपॉल : ठीक आहे... मग तूम्ही आज हॉस्टेल बघून घ्या तिथेच लागून मेस आहे.... तिथे जेवण करून तुम्हाला जेवणाची क्वालिटी पण बघता येईल.....
प्रिन्सिपॉलशी बोलून झाल्यावर सगळेच जण हॉस्टेल कडे निघाले
त्या नंतर हॉस्टेल मध्ये गेल्यावर एकीला दोन या प्रमाणे रूम अलॉट करण्यात आल्या....
नंतर सगळ्या पालकांना आणि मुलींना हॉस्टेल दाखवण्यात आलं... कॉलेज हॉस्टेल देखील खूप भव्य दिव्य असे होते... त्याची स्वछता कमालीची होती.... सुरक्षा देखील भक्कम होता...
हॉस्टेल मध्ये कुठल्याही पुरुषाला जाण्याची परवानगी नव्हती..... पण फक्त सुरुवातीला काय सोयी आहेत हे पाहण्यासाठी एकदाच रूम बघण्याची ते देखील हॉस्टेल "रेक्टर" सोबत असताना आणि एका विशिष्ट वेळेतच पुरुष पालकांना पाहण्याची परवानगी होती......
सगळीच व्यवस्था चोख असल्यामुळे चौघींचे पालक आता जरा निश्चिन्त झाले होते....
अनुयाच्या पप्पानी ड्राईव्हरच्या मदतीने चौघींचेही सामान टाकून घेतले.....
अनुयाचे डॅडी : रेक्टर मॅम !!तुमच्या हॉस्टेल च्या रूम्स खरंच खूप छान आहेत स्वच्छता पण खूप चांगली आहे....पण ईथे रॅगिंगचा प्रकार तर घडत नाही ना??
रेक्टर : नाही नाही सर !! ईथे मी रेक्टर असताना रॅगिंग घेण्याची कुणाची मजाल आहे..... तसं काही वाटले किंवा कुणी त्रास दिला तर मुलींनो मला सांगा....
चौघीनींही होकारार्थी माना हलवल्या....
नेहाचे बाबा : रेक्टर मॅम !! आमच्या या मुली आम्हाला सोडून पहिल्यांदाच बाहेर राहात आहेत....आम्हाला त्यांची काळजी वाटत आहे.... प्लिज, त्यांचा सांभाळ तुमच्या मुली असल्यासारखा करा.....
रेक्टर : अर्थातच, या हॉस्टेलवर असणारी प्रत्येक मुलगी माझी लेक आहे.... थांबा मी काही सिनियर मुलींना बोलावते.... दिव्या, मीना, केतकी ईकडे या गं.....
रेक्टरच्या हाकेने तिघीही रेक्टरच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या "yes मॅम "
रेक्टर : ह्या तुमच्या ज्युनिअर आहेत.... आपल्या ईथे रॅगिंग सारखा प्रकार होता कामा नये😡....
केतकी : मॅम!! रॅगिंग नाही पण ओळख होण्यासाठी introduction फक्त 🤔
रेक्टर :👍 हा introduction ठीक आहे....
केतकी : मॅम !!आता आमचे lecture आहे... आम्ही निघतो...
रेक्टर : ठीक आहे निघा.... बाकी मुलींना पण सांगा बरं का...
केतकी : हो मॅम !!
रेक्टर : सर!! तूम्ही आता निश्चिन्त रहा..... ईथे सगळ्या मुली मिळून मिसळून राहतात....
गीतिकाचे पप्पा :अनुया,नेहा सायली आणि गीतिका एक गोष्ट लक्षात ठेवा.... तूम्ही सतत सोबत रहा.... त्या मुळे तुम्हाला कोणी त्रास देण्याची हिम्मत करणार नाही... तसं काही वाटलंच तर रेक्टर मॅम ना सांगा....खूपच गरज वाटली तर आम्हाला फोन लावा....
रेक्टर : मला वाटत नाही तुम्हाला फोन लावण्याची गरज पडेल.....
रेक्टरची भेट झाल्यावर सगळा ताफा मेस कडे वळाला... मेस मध्ये देखील समाधानकारक जेवण होतं...
पाहुणे म्हणून पालकांना गरम गरम जेवण वाढणे चालू होते... फुलाबाई तर मुलींना काय हवं काय नको ते प्रेमाने विचारत होत्या.... सगळ्यांनी पोटभर जेवण केले.....
आता वेळ आली निरोप घेण्याची.....एका सुरक्षित छत्रछायेच्या कवचातून आता त्यांची बाहेर पडण्याची वेळ आली होती....
सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू 🥺होते... पण मोठया शिताफीने सगळ्यांनी ते लपवले होते....
भाग दोन वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लाईन वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
2 टिप्पण्या
आमच्या सारखे आम्हींच या लघुकथेचा श्री गणेशा खुप छान आता आसुया लागली आहे ती या या चौकोडीच्या कॉलेजच्या श्री गणेशाची! 👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद dear मॅम तुमचे अभिप्राय मला लिहिण्यासाठी नक्कीच उत्स्फूर्त करतात
हटवा