आमच्यासारखे आम्हीच (भाग 21)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

अंजलीच्या सोबतीने आपल्याला गीतेश सरांना बाहेर भेटता देखील येता येईल असा विश्वास आता गीतिकाला वाटायला लागला... 

गीतेश सरांसोबत भेटण्याचे स्वप्न रंगवत गीतिकाला झोप लागली.... 

हे काय साधा GM चा मेसेज सुद्धा नाही.... काल पूर्ण दिवस मेसेज नाही, फोन नाही तरी बरं या सरांना करमत आहे 😏... आणि मी?? माझं तर पिक्चर मध्ये देखील मन लागलं नाही.... ठिक आहे नाही तर नाही... जा आता मी तुम्हाला बोलणार नाही... असा मनाशीच बोलत गीतिका कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली.

कॉलेज कॅम्पस मध्ये देखील गीतिकाची नजर गीतेश सरांनाच शोधत होती. सोबतच्या मौत्रिणींच्या गप्पांकडे गीतिकाचे अजिबात लक्ष नव्हते... 

पण सर काही दिसले नाही.... 

अस्स का??  बघुयात ना माझ्यापासून किती दूर पळत आहेत. आज त्यांचे लेक्चर आहे... तेव्हा तर क्लास मध्ये यावेच लागेल ना😡..... 

नेहा : आज किती दिवसांनी अभ्यासाचे वातावरण सुरु होईल नाही...या निवडणुकांमुळे मी तर अभ्यासात जरा माघेच पडले... 

सायली : हो आता आपल्याला अभ्यासात सिरीयस व्हावेच लागेल... आपल्या टेस्ट सुरु होणार आहेत आणि फर्स्ट टर्म एक्साम काही जास्त दूर नाही... 

अनुया : अगं सायली !!समोरून रोहन आणि प्रज्वल सोबत येत आहेत.... हे काय नेहमी सोबतच असतात का? 

अंजली : अगं रूम पार्टनर आहेत ते... 

अनुया :अंजली 😳 तूला बरं माहिती 🤔... 

अंजली : अगं निवडणुकाच्या वेळी विकी ने सांगितलं... 

नेहा : कुणी 🤔 त्या झेंडूने 😂😂

अंजली : हूं....काय झेंडू म्हणता गं त्याला... बिचारा चांगला आहे. 

नेहा : अगं मी कुठे म्हणाले तो वाईट आहे म्हणून...

लेक्चर्स सुरु झाले. पण आज इलेक्ट्रॉनिक्सचे लेक्चर झालेच नाही... गीतेश सरांनी त्यांची सुट्टी एक दिवस वाढवून घेतली होती... 

ही गीतेश सरांची ट्रिक होती.... एखादी त्यांना हवी असणारी मुलगी त्यांच्याकडे आकर्षित झाली की मुद्दाम ते भेटत नसत जेणेकरून ती भेटी साठी बेचैन होईल.... आणि अजून गुंतत जाईल 

गीतिकाचं देखील असं काहीसं झालं होतं...हॉस्टेल वर आल्यावर गीतिकाने गीतेश सरांना फोन 📳लाऊन बघितला.. अजूनही फोन स्विच ऑफ येत होता... 

आता मात्र गीतिका चिडचिड करायला लागली...उगाचच छोटया छोटया गोष्टीवरून चिडायला लागली होती... 

नेहा, सायली आणि अनुयाला गीतिका अशी चिडचिड का करत आहे हे मात्र समजत नव्हते. 

गीतिकाला तीचे मन मोकळे करायला आता अंजलीच योग्य आहेअसे वाटू लागले... 

गीतिका :सायली !!मला अंजली सोबत काही महत्वाचे बोलायचे आहे. मी जरा तिच्याकडे जाऊन येते... 

सायली : काय बोलायचे आहे...

 ते तूला मी नंतर सांगते म्हणून गीतिका अंजलीच्या रूम मध्ये गेली....

आता मात्र गीतिकाला ईथेच आवरावे लागेल नाहीतर नंतर फार अवघड होईल हे सायलीच्या लक्षात आले.... 

सायली लागलीच नेहा आणि अनुया कडे गेली आणि तीने गीतिका अंजलीकडे गेल्याचे सांगितले... 

नेहा : गीतिका आणि अंजलीकडे🤔.... खरं सांगावं तर माझा आता अंजलीवर बिलकुल विश्वास नाही.... ती स्वार्थी देखील वाटते... त्यात तीचा पॅनल निवडून येऊन देखील गर्ल्स representative होऊ शकली नाही याचा राग असणारच...... वेळीच हे सगळं सावरायला हवं... नाहीतर,  पुढे काय घडेल याचा मी विचारच करू शकत नाही....

सायली : हो नेहा !! गीतिकाला आपण असताना अंजलीची गरज भासावी🤔.... हे जरा विचार करण्यासारखे आहे... 

अनुया : हो ना... मला तेच जास्त खटकत आहे... असं काय आहे की हे गीतिका अंजली जवळ बोलू शकत आहे. आणि आपल्याजवळ नाही.... 

नेहा : ते काही नाही... लपाछपीचा हा खेळ आता बंद... फार तर फार गीतिका नाराज होईल आपल्याशी बोलणार नाही...गीतिकासोबत नेमकं काय घडत आहे ते कळायला हवं... 

अनुया : मला एक आयडिया सुचली... मी बोलू का गीतिकाशी... तीला विश्वासात घेऊन मी बोलते.... पण तूम्ही गैरसमज करून घेऊ नका.... 

नेहा : म्हणजे?? 🤔

अनुया : म्हणजे मी तीला गीतेश सरांच्या बाजूने बोलते... मगच मला कळेल की नेमकं तिचं काय चाललं आहे... 

अरे वा गीतिका आज ईकडे काशीकाय वाट चुकलीस... अंजली गीतिकाला पाहून आश्चर्याने म्हणाली....

शू 🤫मी ईथे अभ्यास करत आहे.. माझी उद्या टेस्ट आहे... तूम्ही दुसरीकडे जाऊन गप्पा मारा.. अंजलीची सिनियर  रूम पार्टनर म्हणाली.

अंजली :ठीक आहे दी 

अंजली गीतिकाला घेऊन टेरेस वर गेली....

अंजली :काय म्हणते आहेस गीतिका?? 

गीतिका : बोर होत आहे गं... बघ ना गीतेश सरांची कालपासून काहीच बातमी नाही.. फोन 📳पण लागत नाही.. 

अंजली : हूं... म्हणजे फोनपर्यंत 😳....

गीतिका :हूं... 

अंजली : हे कुणा कुणाला माहिती आहे?? 🤔

गीतिका : नाही कुणालाच नाही... अजून तरी नाही.... 

 कुणाला सांगू पण नकोस... हे बघ नेहा, अनुया आणि सायली हे कधीच accept करणार नाही.... अंजली मुद्दाम त्या तिघींच्या विरोधात बोलली... 

गीतिका : पण तू कसं काय accept केलंस गं 🤔

अंजली :अगं मी दोन्ही बाजूनी विचार केला....आणि गीतेश सरांना ईतक्या दिवसापासून बघत आहे... मला तरी कधीच फालतू वाटले नाही.... 

गीतिका : फालतू वाटत नाही ना... मला पण.... उलट किती डॅशिंग आहेत.....मला तर त्यांनी त्यांच्या आधीच्या बायकांबद्दल सगळं सांगितलं आहे... 

अंजली :😳 बापरे, गाडी इथपर्यंत पोहोचली का?? गीतिका तू सिरीयस आहेस का?? 

गीतिका : हूं...सध्या तरी मी काहीच विचार केला नाहीये...

प्रज्वलने नेहाला फोन📳 केला.... 

प्रज्वल : hi नेहा तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे... 
प्लीज मला उद्या भेटशील का?? 

नेहा : अच्छा ठिक आहे.... 

आजकाल मला फोन करण्याऐवजी नेहा काय?? 😏 अनुयाचा परत एकदा तीळपापड झाला... 

क्रमश :
भाग 22 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या