आमच्यासारखे आम्हीच (भाग 30)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

नेहा :म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे 😂😂😂

पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त...

सायली : हं...आलं माझ्या लक्षात,फोन ठेवताना प्रज्वल काहीतरी म्हणत होता.... ईकडे कुठे तरी खुणावत होता तो....

गीतिका : हो यार,एकदम करेक्ट....

नेहा : हूं बरोबर... अनुया हे घे...

एक छोटंसं हाताच्या पंजात मावेल ईतकं ग्रीटिंग होतं.... त्यावर पिवळा गुलाब होता...

ते छोटंसं कार्ड ईतकं सुंदर दिसत होतं... की सगळ्या जणी पाहतच राहिल्या...

नेहा :अनुया!! काय लिहिलं आहे त्या ग्रीटिंग मध्ये??

अनुया : दोस्तो की महफिल मे
              एक अंजानासा चेहरा हमने ढुंढ लिया
               बस उसे दोस्त कहतेही
                 कुछ खास लगने लगा है |
                           हटेला :प्रज्वल 
सायली :वाहवा, वाहवा... अनुया!! I think तो तूला आज प्रपोज करेल....

गीतिका : सायली!!आता अजून काय राहिलंय??

सायली : हो तेही आहेच म्हणा 😉

नेहा : सायली!!गीतिका!! अगं थांबा थांबा.... अजून ग्रीटिंग कार्ड आहे......

 आता हे घे.... एक गुलाबी रंगाचं छोटं ग्रीटिंग कार्ड होतं... त्यावर गुलाबी रंगाचे दोन छोटेसे गुलाब आणि मध्ये कमळ असं होतं....

अनुया : आता यावर काय लिहिलं आहे??🤔
    
        देखतेही रहगये हम
         कुदरत का ये करिष्मा
          सोचो अगर जिंदगीमे मिला
           तो जीना जन्नत ही लगा

बापरे 😳.... म्हणजे प्रज्वलला पण मी आवडते? 😍😍

नेहा : अगं अनुया!!चक्क जन्नत म्हणतोय की तो...

अनुया : बापरे 😳सायली!! मला चिमटा काढ...

सायली : हे घे...

अनुया :आ.... अरे बापरे म्हणजे मी स्वप्नात नाही... हे सगळं खरंच घडत आहे....

गीतिका : congrats dear अनुया!!शेवटी तूझा क्रश तूला मिळाला....

नेहा : अनुया!! प्रज्वलला फोन लावायचा का?? अगं टेन्शनने त्याच्या डोळ्याला डोळा लागत नसेल....

अनुया : नेहा!! नको... त्याला झोप लागली असेल... आणि खरं सांगू का या एकामागे एक धक्क्याने मी जरा जास्तच गोंधळून गेले आहे.... मला थोडं सावरू दे.... मी आता प्रज्वलला काहीच बोलू शकणार नाही... हे बघ माझे हात देखील थरथरत आहेत.....

नेहा : बरं बाई.... तू म्हणशील तसं.... बरं चला आता झोपायला ,रात्रीचे दोन वाजले आहेत.अजून उशीर झाला तर सकाळी जाग येणार नाही .....

सगळ्याजणी झोपायला गेल्या... अनुयाला मात्र झोप लागलीच नाही... प्रज्वलच्या पहिल्या फोन 📳पासून जे जे घडलं त्या गोष्टीची क्रमवारीने आठवून मनोमन सुखावत होती.....

सकाळी सकाळी अनुयाला झोप लागली... जाग आली ते तिच्या मम्मा आणि डॅडाच्या फोनने.... आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला...

कॉलेज मध्ये गेल्या गेल्या वर्गात देखील जो अनुयाला  भेटेल तो तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होता... आणि प्रत्येकाला ती तिच्या वाढदिवसाचं एक फॉर्मल इन्व्हिटेशन देत होती....

 प्रत्येकाकडून त्यांचा whatsapp नंबर विचारून घेत होती....ते इन्व्हिटेशन फॉर्मल या साठी होतं की तीने अजून कुठलाही कॅफे बूक केलेला नव्हता.... तीची शॉपिंग देखील राहिली होती...

तीने तिच्या बर्थडे पार्टीसाठी एक तात्पुरता  व्हाट्सअँप  ग्रुप तयार केला होता....

एक लेक्चर अटेंड करून नेहा आणि अनुया कॉलेजच्या बाहेर पडल्या.... नेहाने सोबत प्रज्वलला बोलावले....

प्रज्वलने त्यांच्या कॉलेज हॉस्टेल पासून जवळच एक कॅफे होता तो कॅफे त्यांना दाखवला....

अनुयाने तो कॅफे बूक केला....

प्रज्वल : अनुया!! मला वाटतं आपण कॅफे बूक करण्यात घाई तर नाही केली....

अनुया : मला तसं नाही वाटत... पण तूला तसं का वाटत आहे??

प्रज्वल : अगं चक्क 50,000 खर्च सांगितला आहे... थोडं अजून दूर गेलो असतो तर 20,000 मध्ये झालं असतं सगळं...

अनुया : पण आपल्या क्लास मधले सगळेचजण येऊ शकले नसते..... प्लस ईथे कराओके पण आहे...त्या निम्मिताने आपल्या क्लास मधले मुलं गातील... डी जे आहे... डान्स ही करतील..
. मज्जा येईल....

प्रज्वल : अनुया मॅम!!मी तुमचा क्लासमेट नाही हे विसरलात वाटतं....

अनुया :😊 नाही....पण तूझी आणि माझी ओळख या कॉलेज मध्ये येण्याच्या आधीपासून आहे....म्हणून तू येणार आहेस समजलं ना....

प्रज्वल : जशी आपली आज्ञा.....😉

अनुया :🥰

नेहा : राणीसरकार म्हणायचं का तूला 😜??

अनुयाने हलकेच नेहाला ठोसा लगावला...

प्रज्वल : कॅफे तर बूक झाला आहे... तुम्हाला शॉपिंगला पण जायचं आहे ना....

नेहा : हो...

प्रज्वल : मी कॉलेज मध्ये परत जातो... तसंही आता महत्वाचे लेक्चर आहे...

अनुया : ठीक आहे... जा... आणि परत एकदा थँक्स... तुझ्यामुळे ईतक्या लवकर आणि इतक्या जवळ कॅफे मिळाला...

प्रज्वल : तो ऑटो दिसत आहे... त्यात तुम्हाला जाता येईल...

अनुया : मी कॅब बूक केली आहे... पाच मिनिटातच येईल ....

प्रज्वल : अच्छा... चला निघतो मी... प्रज्वलने त्याची बाईक वळवली...

नुसती बर्थडे पार्टी 50K ची... आपण अनुयाला प्रपोज करतोय ते चुकीचं तर नाही ना.., तीची खर्च करण्याची पद्धत....🤔बडे बाप की बडी बेटी....प्रज्वल बेटा be careful.... नाहीतर उद्या पश्चाताप व्हायचा....

 मला तर आधीपासून हे देखील माहिती होतं ना की ती एका धनाढ्य बिल्डरची मुलगी आहे म्हणून...पण ती समोर आली की हे काहीच दिसत नाही....

दोघीही कॅबमध्ये बाकीची शॉपिंग करण्यासाठी गेल्या... अनुयाने मनसोक्त शॉपिंग केली...नेहा तीला शॉपिंग करण्यात मदत करत होती....शॉपिंग झाल्यावर अनुयाने ब्युटी पार्लरची पार्टीसाठी अपॉइंटमेंट घेतली....

क्रमश :
भाग 31 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

था सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या