आमच्यासारखे आम्हीच (भाग 32)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

सगळ्यांनी मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला....

अनुयाने माईक हातात घेऊन सगळ्यांना थँक्स म्हटले...

कार्यक्रम संपला....

कार्यक्रम संपल्यावर जी मुले बाईक घेऊन आली होती त्यानी मुलींच्या रिक्षा सोबत  त्यांच्या हॉस्टेल पर्यंत जायचे ठरवले जेणेकरून त्यांच्या क्लासच्या मुली सुरक्षित हॉस्टेलला पोहोचतील....

प्रज्वल आणि रोहन देखील बाईक वर आले होते... ते ह्या चौघीसोबत हॉस्टेल पर्यंत गेले....

हॉस्टेल वर आल्या आल्या अनुया एकदम कॉट वर पहुडली....

अनुया :नेहा!!मला तर आजचा दिवस संपूच नये असं वाटत आहे...
खरंच,आज माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल डे होता😍😍... मला रात्रीपासून नुसता नशा चढला आहे.... हा नशा उतरूच नये असे वाटत आहे...नेहा खूप खूप खूप खूप थँक्स... तूझ्या मुळे माझा बर्थडे खूप स्पेशल झाला...

नेहा : हो का?? प्रज्वलचा काही रोल नाही का यात??🤔😉

अनुया : तसं नाही गं.... पण तू त्याला मदत केली म्हणून तर सगळं पार पडलं ??... माझा बर्थडे मला एक सुंदर स्वप्नच वाटत आहे...

नेहा : जागे व्हा मॅम... हे सत्य आहे..

अनुया : नेहा!!by the way हे पार्सल तू कुणासाठी घेतलं...

नेहा :🤦‍♀️ अनुया!!बरं झालं आठवण केलीस... हे पार्सल घे आणि आपल्या वॉर्डन मॅमला देऊन ये...त्यानी आपल्याला  धिंगाणा घालू दिला म्हणून आपण एंजॉय करू शकलो...

अनुया : 😊हो लागलीच देऊन येते... नेहा!! काहीही म्हण पण ज्यावेळेस तू आई होशील ना एकदम परफेक्ट आई होशील 😉

नेहा : बरं बरं 🙄लवकर जा,नाहीतर वॉर्डन मॅम चं जेवण होऊन जाईल...

अनुया लागलीच वॉर्डन मॅम च्या रूमवर गेली.... मॅम ला पार्सल दिले...

वॉर्डन मॅम : अरे हे माझ्यासाठी 🤔 ईतका कशाला त्रास घ्यायचा...

अनुया : त्रास नाही मॅम... उलट हे देताना आनंद होत आहे...

वॉर्डन : थँक्स... आणि wish you happy birthday...

अनुया : थँक्स मॅम!!😊मी येते...

अनुया निघून गेली....मी वॉर्डन झाल्यावर आतापर्यंत हजारो बर्थडे सेलेब्रेट झाले असतील पण माझा विचार फक्त या मुलीने केला... खरंच या चारही मुली खूप गोड आहेत... वॉर्डन मॅम च्या डोळ्यात अश्रू 🥺होते....

सायली :गीतिका!! अनुयाची बर्थडे पार्टी किती मस्त झाली ना 😍😍😍

गीतिका : हो.... सगळेच जण सेलेब्रेशन पाहून अवाक झाले... तू अंजलीला पाहिलंस का??तीचा  किती जळफळाट होत होता...

सायली : हो 😂😂... आणि गीतिका!!खूप छान वाटलं तूला मोकळं नाचताना बघून....

गीतिका!! :😊 तू यास्मिनला बघितलं का?? काय सुंदर डान्स करत होती ती...

सायली : हो, खरंच....  पार्टीची धुंदी सगळ्यांनाच चढली असणार.

तितक्यात अनुया च्या मम्मा चा फोन आला... अनुयाने काय खरेदी केली आणि कसं सेलेब्रेशन केलं हे तिच्या मम्माला सांगितलं....
अनुया : मम्मा!!डॅडाला फोन दे...

अनुयाची मम्मा :हं फोन स्पीकर वर केलाय बोल... डॅडा!!तूम्ही दिलेल्या क्रेडिट कार्ड मुळे मी खूप छान बर्थडे चं सेलेब्रेशन केलं... पण तुम्हा दोघांना मी खूप miss केलं 🥺

अनुयाचे डॅडा : तू एंजॉय केलंस ना...

अनुया :हो डॅडा!!

अनुयाचे डॅडा : मग आता बोर होऊ नकोस..

अनुयाची मम्मा : चल बेटा आता लवकर झोपा आज थकली असशील ना...

अनुया :  हो मम्मा!!गूड नाईट...

अनुयाचे मम्मा आणि डॅडा :गूड नाईट बेटा....

प्रज्वल आणि रोहन त्यांच्या रूमवर पोहोचले....

रोहन :  प्रज्वल!! सायली काय गायली ना...

प्रज्वल : तू तर यमक जुळवलास की 😉... मै कभी कवी, ना बन जाऊ,तेरे प्यार मे, ए कविता😂😂😂...कविता नाही... सायली😂😂...

रोहन : काय रे प्रज्वल!! का चिडवतोस😒... पण तू तर भलताच छुपा रुस्तम निघालास...

प्रज्वल : का काय झालं??

रोहन : किती सुंदर गाणं गायलंस तू... पण का रे...
रोहन एकदम शांत झाला... विचारू की नको... जाऊदे नाहीच विचारत...🤔..

प्रज्वल : रोहन!! बोलता बोलता का थांबलास.... बोल ना..

रोहन :नको तू रागावशील??

प्रज्वल :आता जर तू बोलला नाहीस तर मी रागावेन....

रोहन : तू गायलेलं गाणं नक्की कुणासाठी होतं?? नेहा साठी की अनुया साठी....

प्रज्वल : 😂😂😂🤦‍♂️ऑफकोर्स "अनुया "साठी..... पण तूला तसं का वाटलं.... अच्छा आता लक्षात आलं... अरे मी आणि नेहा भेटत होतो...कारण मला अनुयाला बर्थडे चं सरप्राईज द्यायचं होतं.....

असं म्हणत प्रज्वल ने काय सरप्राईज दिलं ते रोहनला सांगितलं....

रोहन : 😳 हो का....छान सरप्राईज प्लॅन केलं..
पण हे कधीपासून चाललंय 🤔... मला कसा काहीच अंदाज आला नाही....

प्रज्वल :थांब रोहन!!तूला मी पहिल्यापासूनच सांगतो....

मी अनुयाला अगदी अकरावी पासून ओळखतो.... इनफॅक्ट ह्या चौघीना देखील सोबतच मी सायकल वर कॉलेज आणि क्लासेसला जाताना मी त्यांना बघितलेलं  .....

मला तेव्हापासूनच अनुया खूप आवडायची... येता जाता आम्ही एकमेकांकडे खूप बघायचो.... प्रपोजही करणार होतो.....

पण नंतर एक दिवस अचानक मला कळालं की अनुया आपल्या सोसायटीच्या बाजूला रहात आहे... आणि एका मोठया बिल्डरची मुलगी आहे.... मग मात्र माझे धाबे दणाणले...

मी अनुयाला प्रपोज केलं नाही.... नंतर काही दिवसांनी माझे वडील वारले आणि मला ती सोसायटी सोडावी लागली....

पण सोसायटी सोडताना त्या चौघीच्या एका मित्राने अनुयाला मी आवडतो हे मला सांगितले होते ....
तूला सांगतो रोहन!! ते ऐकून खूप डिस्टर्ब झालो होतो मी.... पण नशिबाने पुन्हा एकदा आमची भेट घडवली...

रोहन :अरे वा, प्रज्वल!!या साठी ते वाक्य सिद्ध होतं..  .  अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है...

प्रज्वल : 😊... खरं सांगू का अजूनही परिस्थितीतील फरकाची मला भीती वाटतेच... पण अनुया समोर आली की मी हे सगळं विसरून जातो...

रोहन : म्हणजे आता आपण दोघेही आता चौकाडीचा भाग झालो 😜😜

प्रज्वल :😂😂 हो....

हसत हसत प्रज्वल ने त्याचा फोन हातात घेतला... आणि मेसेंजर ओपन केला.... अनुयाचा मेसेज होता...

अनुया : थँक्स अ लॉट प्रज्वल!!माझा बर्थडे ईतका स्पेशल करण्यासाठी.... आज तूझे एक्सट्रा ओरडीनरी गुण समजले... खूप सुंदर गातोस तू....पुन्हा एकदा थँक्स, गुडनाईट, स्वीट ड्रीम्स....

अनुयाचा मेसेज पाहून प्रज्वल स्मित 😊करत होता....

रोहन : चला तूझी गाडी तर रुळाला लागली.... पण माझ्या बाबतीत सायलीचा अजून काडीमात्र अंदाज नाही 😥

 क्रमश :
भाग 33 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
 कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या