आमच्यासारखे आम्हीच (भाग 52)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
........................................................................

               " HAPPY NEW YEAR" 2021

चौघीही खूप थकल्या होत्या... चौघीनाही शारीरिक आणि मानसिक थकवा जाणत होता... जाम भूक लागल्यामुळे डोकं दुखत होतं,रूमवर गेल्यावर चौघीनींही शांततेने पावभाजी खाल्ली आणि थकल्यामुळे लागलीच आपापल्या जागेवर झोपी गेल्या....

प्रज्वल : रोहन!! काय झालं आज तूझा चेहरा पडलेला का  दिसत आहे...

रोहन : काही नाही प्रज्वल आज दुपारी  लेक्चरला सायली आली नव्हती... म्हणजे तसं पूर्ण चौकडीच गैरहजर होती...

प्रज्वल : अरे ईतकंच ना... मग मला विचारायचं की...

रोहन : अच्छा... म्हणजे तूला माहिती होतं?

हो, अनुया ने सांगितलं होतं  असं म्हणून नेमकं काय झालं हे प्रज्वल ने रोहन ला सांगितलं...

रोहन :प्रज्वल!! सायलीच्या मनात काय आहे हे अनुयाने तूला सांगितले का??

प्रज्वल : नाही.. पण तीने सायलीचा अंदाज घेतला आहे. आज ती मला भेटून सर्व सांगणार होती पण अचानक त्यांना  सलमासाठी तीला हॉस्पिटलला जावे लागले...

रोहन : पण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ईतकं तरी कळालं का??

प्रज्वल : नाही रे ... ते पण नाही कळालं...पण उद्या विचारतो 

रोहन : ओह😒....नक्की विचार....

प्रज्वल : अरे रोहन!! बहुतेक तूझा फोन📳 वाजत आहे 

रोहन : हो... त्या विकीचा फोन📳 दिसत आहे....हं बोल विकी!!

विकी :रोहन!! तू काय ठरवलं आहेस....

रोहन : कश्या बद्दल??

विकी : कश्या बद्दल म्हणजे काय....अंजली बद्दल??

रोहन : अंजली बद्दल काय??🤔 तीने मला थोडीच विचारलं??

विकी : मी विचारत आहे ना??

रोहन: तू काय तिचा वकील आहेस का??

विकी : वकील नाही पण खास मित्र आहे म्हणून विचारलं...

रोहन :  मग ऐक!! मला तिच्यात काडीमात्र इंटरेस्ट नाही... समजलं ना...

विकी : पण का??

रोहन : विकी!! मला वाटतं की मी तूला कारण सांगण्याची काही एक गरज नाही...ठेऊ फोन 📳

विकी : हूं...

हा विकी प्रत्येक वेळी नुसतं डोकं उठवत असतो... याचं काहीतरी करायला पाहीजे....चिडूनच 😡 रोहन प्रज्वलला म्हणाला...

प्रज्वल : कसं आहे ना रोहन!! काही जणांना उगाचच मध्ये मध्ये करण्याची सवय असते... तशीच सवय या विकी ची आहे...

रोहन : मला तर या विकीची एक ही गोष्ट खरी वाटत नाही...

सकाळीच सलमाचे आईवडील वार्डन सरांना भेटले... त्यांच्या समोर नेहा, सायली गीतिका आणि अनुयाचे खूप कौतुक केले.... कृपा करून त्यांच्या पेरेंट्स कडे त्यांची तक्रार करू नका.... उलट त्या नसत्या तर सलमाचे काय झाले असते.... तुम्ही जर त्यांची तक्रार केली तर अश्या इमर्जन्सी मध्ये कुणीच मदतीला धावून येणार नाही....

वॉर्डन : 😊नाही नाही.... मी तक्रार करणार नव्हतोच... मला कालच रेक्टर मॅम ने या मुली खरं बोलत आहेत ते सांगितलं होतं... पण कसं आहे ना त्यांना त्यांच्या  जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी जरा कडक वागलो...

अंजली पळत पळतच नेहाच्या रूम मध्ये आली....

नेहा!!अनुया!! तुम्ही काही ऐकलं का??

अंजली : आपल्या हॉस्टेल मधली सगळ्यात सिनियर तारा... खूप सिरीयस आहे... तिला हॉस्पिटलला ऍडमिट केलं आहे म्हणे...

नेहा : तारा 🤔 कोण तारा 🤔 मी तर तूझ्या तोंडून पहिल्यांदाच तिचं नाव ऐकत आहे... आम्ही तीला पाहिलं आहे का??

अंजली : मी पण तीला हॉस्टेलला दोन ते तीन वेळेसच पाहिलं आहे... ती आय सी यू मध्ये ऍडमिट आहे म्हणे..

नेहा : 😳 हो का नेमकं काय झालं होतं..

अंजली : तीने स्वतःच ऍबॉर्शन करण्याचा प्रयत्न केला म्हणे... काय म्हणतात ते इलीगल ऍबॉर्शन..,.

नेहा : बापरे 😳 असं पण काही घडू शकतं का??

अंजली : तेच ना मला तर सुरुवातीला विश्वासच बसला नव्हता...पण आमच्या आजूबाजूच्या रूम मध्ये तीच चर्चा चालू होती....

अनुया :  omg... देव करो असं कुणासोबत नाही व्हायला पाहीजे

अंजली : फालतू असल्यावर तिच्या सोबत असंच होणार ना... कश्याला असले धंदे करायचे....कश्याला आपल्या मर्यादा ओलांडायच्या....

नेहा : अंजली!!प्लीज... आपल्याला त्या ताराबद्दल कुणालाच काही माहिती नाही.. त्या मुळे असं तिच्या बद्दल बोलणं योग्य नाही....

अंजली : नेहा!! तू काय नेहमी समजूतदारपणाचा आव आणतेस...

नेहा : तसं नाही गं...

तितक्यात रेक्टर मॅम ने हॉस्टेलच्या हॉल मध्ये सगळ्या मुलींना गोळा व्हायला सांगितलं...

सगळ्या जणी हॉल मध्ये जमा झाल्या.... संपूर्ण हॉल मध्ये तारा चीच चर्चा चालू होती...

तितक्यात रेक्टर मॅम आल्या.... आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली....

माझ्या प्रिय मैत्रिणींनो आज एक भयंकर घटना घडली आहे. मला वाटतं ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे..

रेक्टर मॅम : हे जे काही घडलं हे फारच चुकीचं आहे.. तुम्ही मुली भोळेपणाने असा कुणावर ही विश्वास ठेवता आणि मग अश्या काहीतरी चूका करून बसता... बरं ती एक चूक लपवण्यासाठी आणखी नवीन चूका करतात... त्याचा परिणाम तारासारखा होतो....

नेहा : म्हणजे मॅम... तुम्ही काय म्हणत आहात हे आम्हाला काहीच कळत नाहीये.....

रेक्टर मॅम : ताराच्या बाबतीत काय घडलं होतं ते मी तुम्हाला सांगते... ताराचं एका मुलासोबत प्रेम प्रकरण झालं... भावनेच्या आहारी जाऊन तीने मर्यादा ओलांडल्या आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला... ताराला दिवस गेले...मग ते लपवण्यासाठी तीने ऍबॉर्शन कसे करावे ह्याचा मोबाईल वर ईकडे तिकडे शोध घेतला.... वेगवेगळ्या वेबसाईट वर बघून स्वतःच्या शरीरावर नको ते प्रयोग केले...आणि परीणामी तिचा अर्धवट गर्भपात तर झाला पण त्याचे इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरले....आणि आता ती मृत्यू शी झुंज देत आहे....

नेहा : बापरे 😳

क्रमश :
भाग 53 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
:
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या