आमच्यासारखे आम्हीच (भाग 83)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................
मोबाईल मेसेंजरची बीप वाजली... आता कुणाचा मेसेज आला आहे... असा विचार करत अनुयाने तीचा मोबाईल चेक केला...

ही कसली link पाठवली आहे प्रज्वलने... असा विचार करत अनुयाने link ओपन केली... ओ कसलीतरी बातमी आहे ही... हा प्रज्वल ना काही पण पाठवतो... कदाचित मला miss 😍😍करत असेल... पण जर miss करत असेल  तर सरळ सरळ सांगायचं ना....

काय हेडींग आहे हे...😳

एका प्रेमी युगुल जोडप्यामुळे वाचले एका स्त्रीचे प्राण.

पानशेत जवळच असणाऱ्या शेतात एक स्त्री घरगुती हिंसाचाराची जवळ जवळ बळी ठरली होती पण तीचं नशीब चांगलं म्हणून एका जोडप्याने तिला तीचे सासू सासरे आणि नवरा मारहाण करताना बघितलं...

 स्वतः पकडले जाऊ याची भीती न बाळगता त्यांनी जवळच उभ्या असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला सांगितलं...

पोलीस कॉन्स्टेबलने तिथे होणाऱ्या हिंसाचारापासून त्या स्त्रीची सुटका केली...तेव्हा त्या स्त्रीला ते सगळे मिळून विहिरीत ढकलून देणार होते पण ऐनवेळी कॉन्स्टेबल तिथे पोहोचल्या मुळे त्याला पाहून ते लोकं तिथून पळून गेले...
त्या पोलीस कॉन्स्टेबलने पत्रकारांना सांगताना अनोळखी जोडप्याला धन्यवाद दिले...

अनुया : नेहा!!😳 तू बरोबर म्हणालीस... तूझ्या मामाने माझं आणि प्रज्वलचं काय नातं आहे ते ओळखलं...

नेहा : 🤔 कसं काय??

अनुया : हे बघ ही news वाच...
असं म्हणून अनुयाने तीचा मोबाईल नेहाच्या हातात दिला...

नेहा : अरे वा, मामाने चक्क तूमची स्तूती केली आहे... आणि आता पर्यंत तर माझं माझ्या मामाशी बोलणं देखील झालं नाहीये...

अनुया : बरं झालं त्यांनी थोडं सकारात्मक घेतलं... नाहीतर मला वाटलं होतं की घरी जाईपर्यंत माझे डॅडा माझ्या स्वागतासाठी तयार असतील...

नेहा : अनुया!! इन केस जर  समजा तूझ्या डॅडा ला हे कळालं असतं तर...

अनुया : नेहा!! प्लीज नको ना असं बोलू...ऍटलीस्ट माझं बी ई complete होईपर्यंत... मग मला चांगला स्टॅन्ड घेता येईल... तो पर्यंत घरी कळूच नये या साठी मी देवाला प्रार्थना करते.

नेहा : मग काल तुम्ही अजून काय काय मज्जा केली गं

अनुया : कसली मज्जा आणि कसलं काय नंतर आम्ही सरळ सरळ हॉस्टेललाच आलो... खूप घाबरलो होतो... तू विचार कर ना तो कॉन्स्टेबल मला डायरेक्ट म्हणाला..तू अनुया ना....

नेहा : हो... बरं चला आता... बाकी गप्पा बस मध्ये मारू..

अनुया :अगं बस ने कशाला जायचं.... आपण कॅब बुक करू खर्च चौघी मिळून वाटून घेऊ... बस पेक्षा थोडा जास्त खर्च येत आहे... पण आपल्याला बस स्टॅन्ड पर्यंत जायला देखील खर्च येणारच... कॅब आपल्या हॉस्टेल पर्यंत येईल...

नेहा : अरे हो अनुया!!चांगली आयडिया आहे... तू अँप वर चेक कर बरं...

अनुया : वन वे ट्रिप चे बाराशे रुपये होत आहेत....per head 300rs फक्त....

नेहा : मस्तच... मी एकदा गीतिका आणि सायली तयार झाल्या का ते बघते... मग आपण कॅब बुक करू....

ईतकं बोलून नेहा गीतिका आणि सायलीच्या रूम मध्ये गेली...

अंजली तिथे आली....

अंजली : काय घरी जायला निघालात??🤔

नेहा : हो, तू नाही जाणार??

अंजली : मी जाणार ना पण दोन तीन दिवसांनी जाणार... ते काय आहे ना विकी आणि माझ्या बाकी डेट्स बाकी आहेत 😉

नेहा : बाकी डेट्स??

अंजली : हो... थोडा थ्रीलिंग एक्सपेरियन्स😉...

नेहा :म्हणजे 😳आता तू काय करणार आहेस??

अंजली : डोन्ट वरी,मी काही तारा नाही... असलं तसलं काही नाही करणार... पण माझी पब, डिस्क डेट राहिली आहे... ती मस्त enjoy करणार... वेगवेगळे ड्रिंक्स try करणार... मग जाईन घरी....

नेहा : बापरे 😳अंजली!!पण तू तूझ्या आईवडीलांना काय सांगणार....

अंजली : मी सांगणार की मी आणि माझ्या काही मैत्रिणी दोन तीन दिवस ग्रुप स्टडी  करणार आहोत.

नेहा :अंजली!!ईतकं खोटं बोलताना तुला भीती नाही का वाटत...

अंजली : त्यात काय घाबरायचं??🤔 तू असं म्हणतेस की जसं काय तू कधीच खोटं बोलत नाहीस...

नेहा : तसं नाही गं... पण ईतकं बेधडक खोटं??🤔

अंजली : बेधडक असो की आणखी कुठलं असो... खोटं ते खोटंच ना...

अंजलीशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही हे नेहाच्या लक्षात आले.....नेहा शांत झाली...

अंजली : आता गप्प का?🤔? काहीच उत्तर नाही ना तुझ्याजवळ?

नेहा : हो अंजली!!तुझंच खरं आहे... सायली गीतिका आवरलं का... मी अनुयाला लागलीच कॅब बूक करायला सांगते....

हो हो आवरलं आमचं... तू अनुयाला लागलीच कॅब बुक करायला सांग... कधी एकदा घरी जाण्यासाठी निघतोय असं झालं... बॅग ची चेन लावत सायली म्हणाली....

रोहन :प्रज्वल!!कशी झाली बाईक राईड??

प्रज्वलने त्याची बाईक राईड, पोलीस कॉन्स्टेबल संपूर्ण  दिवसभरातले किस्से रोहनला सांगितले...आणि मोबाईल वर ची बातमी देखील दाखवली 

रोहन :😳 प्रज्वल!! तूमची राईड तर तुम्हाला एकदम आयुष्यभर लक्षात राहील अशी झाली आहे..

प्रज्वल : हो ना...

हे बघ... सायलीने काय काय लिहिलं आहे?स्लॅमबूक प्रज्वलच्या समोर करत रोहन म्हणाला...

प्रज्वल : ओहो स्लॅमबूक हं... Good going, keep it up..

रोहन : आता पी एल... अन काय keep it up?🤔...

प्रज्वल : अरे रोहन!! म्हणून तर मनापासून धन्यवाद मान... हे स्मार्ट फोन शोधणाऱ्याचं... त्याच्या मुळे तरी आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये राहता येतं....

रोहन आणि प्रज्वल देखील आपापल्या घरी जाण्याची तयारी करत होते....

क्रमश :
 :
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. Khupch chhan. Mi kal pahilyanda vachayala suruvaat keli ani aaj complete pan zal. Phar chhan.

    उत्तर द्याहटवा
  2. Plz,पुढिल भाग लवकरuplodकरा ना फारच सुंदर कथा आहे उत्सुकता लागली आहे पुढे काय असेल याची

    उत्तर द्याहटवा