दैव जाणीले कुणी (भाग 23)

सुरुवातीपासून मात खाणारे सूर्याचे पारडे आता जड झाले होते. आणि वाईट मार्गाने का होईना आपण चांगलंच काम करत आहोत याचं त्याला एक वेगळं समाधान मिळालं होतं.
आपलं जिच्यावर मनापासून प्रेम आहे तिचा जीव आपल्या षडयंत्रमुळे वाचला याचं त्याला अप्रूप वाटायला लागलं होतं...

आपण मिस्टर ब्लॅक च्या षडयंत्राचा भाग होतो म्हणून आपण आज अन्विताला वाचवू शकलो होतो..

पण आता मिस्टर ब्लॅक ला चुकूनही आपला संशय येऊ न देता मिस्टर ब्लॅक अन्विताला मारण्याच्या पाठीमागे का होता...

 त्या साठी त्याने आपली, मोहित, भाल्या, टिड्या अशी निवड का केली असावी...

जर त्याला कुणावरच विश्वास नव्हता तर असं गोलगोल प्लँनिंग का केलं असावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता मला मिळाल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही... आणि सॉरी डिअर अन्विता तो पर्यंत तुझी सुटका देखील नाही....
कारण तू सुटली की तुझ्या जीवाला धोका आहे....आणि प्रदीप??

 प्रदीप ने खरंच खूप चांगलं काम केलं... तुला योग्य रीतीने किडनॅप केलं...आणि अश्या ठिकाणी ठेवलं की तिथे आजूबाजूला ओसाड जागा आहे...

अन्विताने पळण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती पळू शकणार नाही... सूर्या कॉफी घेत त्याच्या आराम खुर्चीवर विचार करत बसला होता...

तितक्यात सूर्याच्या मोबाईलची बीप वाजली.... हे काय?? ऍप इन्स्टॉल करावी लागेल का... अच्छा ही केली... अरे वा cctv कॅमेरा? अन्विता दिसत आहे 😃😃😃 अरे हे काय तिच्या समोरचं ताट तसंच... ही जेवली नाही का?? काय करावं हिचं.... तिला तर एका खुर्चीला बांधून ठेवलंय...

सूर्याने प्रदीप ला फोन लावला...

सूर्या : प्रदीप!! अन्विता जेवलेली दिसत नाहीये...

प्रदीप : हो ना... जेवण्यासाठी थोडी दमदाटी केली मी... पण तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागल्या... काय सूर्या?? कधी वाटलं होतं का की आपल्याला असलं काही काम करावं लागेल ते?

सूर्या : प्रदीप!! ईथे भावनांशी संबंध नको... आपण अन्विताचा जीव वाचवला हे महत्वाचे नाही का??

प्रदीप : पण ती अशी उपाशी राहणं??..

सूर्या : प्रदीप तू नको काळजी करू... आपण काय करू?? लवकरात लवकर अन्विताला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करू... एकदा तिला आपल्यावर विश्वास बसला की मग सगळं सोपं होईल...

प्रदीप : पण हे करणार कसं??

सूर्या :  तोच विचार मी करतोय... तो मोहित... बॉस जवळ असताना मास्क मध्ये असतो... त्या मुळे शूटिंग घेऊन काही फायदा नाही... आणि मी समोर असताना मोहित शक्यतोवर तिथे बोलण्याचं देखील टाळतो...

प्रदीप : हं माझं आणि त्याचं छत्तीस आहे...

सूर्या : हं... प्रदीप आपण काहीतरी सुवर्ण मध्य साधू... नाहीतरी आपण आज खूप मोठं काम केलं आहे....

मोहित अन्विताच्या घरी पोहोचला... त्याने परत अन्विताच्या आईवडिलांजवळ अन्विताची चौकशी केली... अन्विता अजूनही घरी पोहोचली नव्हती... तिचा फोन अजूनही स्विच ऑफ लागत होता...

मोहित : आई!! अन्विताचा काही फोन पण आला नाही का?

अन्विताची आई : नाही रे मोहित... पण तू ईतका का चिंतीत दिसत आहेस... नेमकं काय झालं आहे?? तुम्हा  दोघांचं काही भांडण वगैरे झालं आहे का?

मोहित : नाही ना... पण खरं सांगू का मी अन्विताला कुठल्या टिळक चौकात वगैरे बोलवलं नव्हतं आणि ती तिथे मला भेटली पण नाही.... म्हणून जरा तिची काळजी वाटत होती... बरं फोन म्हणावं तर तिचा फोन स्विच ऑफ येतोय...

अन्विताची आई : तू नको काळजी करूस....एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल....संध्याकाळपर्यंत येईल....

मोहित :अशी... ईतकी बेजबाबदार....

अन्विताची आई : 😃😃 😃 हे तुझं अन्वितावरचं प्रेम बोलतंय बरं का?? आली ना ती की तिला ईतकं झाप की ती परत अशी बेजबाबदार वागली नाही पाहिजे...

मोहित : हं 😡... बरं अन्विताचे बाबा कुठे आहेत ते दिसत नाही.  ...


अन्विताची आई : ते  होय... ते त्यांच्या सिक्रेट मिशन वर.... या वेळेस स्वतःची लॅब नाही म्हणे...

मोहित : मग??

अन्विताची आई : मग... कुठे गेले?? कसे गेले... मला काहीच माहिती नाही... फक्त त्यानी त्यांची बॅग भरली आणि मग निघाले... तसं पोहोचेपर्यंत त्यांनाही कुठे माहिती असतं?? सगळं काही गोपनीय तर असतं ना...

मोहित : हं...ठीक आहे... अन्विता आली की आल्या आल्या तिला कॉल करायला सांगा....

मोहित तिथून निघून गेला....

रात्रीचे आठ वाजले... अजूनही अन्विताचा पत्ता नव्हता.... आता मात्र अन्विताच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली... अन्विताच्या आईने अन्विताला फोन लावला...

फोन स्वीच ऑफ....कदाचीत अन्विता बेला कडे गेली असेल... बेला ला फोन लावते..असा विचार करून अन्विताच्या आईने बेला ला फोन लावला...

बेला : नाही काकू!!आज सकाळ पासूनच अन्विताचा आमच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही... ती आज कॉलेज ला आलीच नाही..

आता मात्र अन्विताच्या आईचे धाबे दणाणले... अन्विता खरंच कुठे गेली??... अजूनपर्यंत घरी यायला पाहिजे होती... त्या मोहित ला कसली शंका येत आहे... अन्विता सोबत काही विपरीत तर घडलं नसेल ना??...

 देवा... नेमकं आत्ताच अन्विताचे बाबा सिक्रेट मिशन वर गेलेले आहेत....त्यांच्याशी संपर्क होणार नाही...काय करू??काय करू?? विचार करत करत अन्विताच्या आईने मोहितला फोन लावला आणि अन्विताचा शोध घेण्यासाठी काहीतरी कर म्हणून विनवणी केली..
क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. छान लेख आहे पण वाचावि लागतील सर्व
    मांडणी पण छान आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद, सध्या खूप busy असल्यामुळे लिहायला उशीर होत आहे.. गैरसोईबद्दल क्षमस्व

      हटवा