किती सांगायचं मला (भाग 49)

समायरा : टोनी!! किती अचानक घडत आहे ना हे सगळं... मी जेव्हा मार्था सोबत तूला पाहिलं होतं तेव्हा वाटलं की संपलं आता सगळं... मला तू कधीच मिळू शकणार नाही... 

टोनी :पण मी आलो,  तेव्हा तू कुठे होतीस?? 

समायरा : वॉशरूम मध्ये लपून बसले होते... तुझ्या नावाचाही गोंधळ.. टोनी आणि सुहास... काय करणार?? 

टोनी : अगं माझ्या नावाची एक गंम्मतच आहे... माझे आईबाबा दोघेही ख्रिस्त... दोघांनीही खूप स्वप्ने पाहिली... पण लग्नानंतर बरेच वर्ष मुलबाळ काही झालं नाही.. काकाने मात्र आंतरजातीय प्रेमविवाह केला त्यांच्या मुलाचं नाव आशिष... मग मी ही काही वर्षांनी जन्मलो... आमच्यात फरक नको म्हणून माझं नाव सुहास ठेवलं.. पण आईचं खूप वर्षांपासून ख्रिस्त नाव ठेवन्याचं स्वप्न बाबांनी माझं निक नेम टोनी ठेवून पूर्ण केलं.... 

समायरा : बापरे, म्हणजे फक्त नाव ठेवण्यामागे इतकी मोठी कहानी... टोनी !! याचा अर्थ तुझ्या वडिलांनी काकासोबत आईच्या भावनांचा विचार देखील केला... ग्रेट 

टोनी : हो, पण माझी आई पण खूप समजूतदार होती... तिनेदेखील आम्हा दोघात कधीच फरक केला नाही...

समायरा  : हो, ऑफिसमध्ये दिसतं ते... पण टोनी तूला हे सगळं कळालं कसं?? 

टोनी : तुषारने काल सांगितलं... 

समायरा :😳 काय??पण मी तर तुषारला पण सांगितलं नव्हतं...नलिनीने सांगितलं असेल 

टोनी : नलिनी !!म्हणजे जी मॉल मध्ये तुझ्यासोबत होती ती... बरोबर ना?? पण तुषारला तिने कसं काय?? 

समायरा : नलिनी माझी जिवलग मैत्रीण आणि आता तुषारची प्रेयसी... 

टोनी : प्रेयसी?? ओ गर्लफ्रेंड.. 
समायरा :हो 

टोनी :तूला माहीती समायरा !!तूला वाटत असेल की मी उटीला आलो हा निव्वळ योगायोग आहे .. तर तसं नाही... मी तूझा हॅकरद्वारे फोन ट्रॅक केला आहे... 


  समायरा :😳काय?? मग तर आता तुझ्यावर केस करावी लागेल.... 

मी तर आयुष्यभर तुरुंगवास👩‍❤️‍👨भोगायला तयार आहे... टोनी लाडात येऊन म्हणाला.... 

समायरा ते ऐकून एकदम निरुत्तर झाली 😍🥰🤩

दोघांनीही मग आरामशीर गप्पा मारत जेवण केलं.... 

तुषारला तू जाणूनबुजून लिकर सेक्शन चेक करायला पाठवलं ना निघता निघता समायराने टोनीला विचारलं..

 टोनी : 😂😂 हो अगदी बरोबर मला फक्त तूला सरप्राईज द्यायचं होतं... माझ्या मनात काय चाललं आहे याचा थोडासा देखील अंदाज यायला नको म्हणून मी त्याला देखील काहीच कळू दिले नाही.... 

समायरा : अच्छा... असं आहे तर  टोनी !! तू आता या हॉटेल मध्येच थांबणार आहॆस का?? 

टोनी : संध्याकाळी परत जाणार आहे...इथून एअरपोर्ट जवळ आहे...  खरं तर आता माझी इच्छा नाही परत जाण्याची... पण माझ्या एका जिवलग मित्राची उद्या  एंगेजमेंट  आहे...... म्हणून जावंच लागेल... 

समायरा : काय रे टोनी?? आज तर कुठे जिवंत असल्यासारखं वाटायला लागलं...आणि तू ताबडतोब निघत आहेस.... 

टोनी : अगं माझे पण पाय जड झाले आहेत... आपले इतके सुंदर क्षण.... समायरा !!अजून थोडा वेळ थांब ना.😍😍... 

टोनी आजच परत जाणार म्हणून समायरा तिथेच थांबली...  नुसतेच एकमेकांकडे बघत कधी स्मित करत कधी लाजत खरंच असं घडलं आहे ना याची खात्री करत होते... 

ईकडे तुषार हॉटेल प्रिन्स ला भेट देऊन आला त्याला डुप्लिकेट लिकर कुठेही दिसले नाही... त्या मुळे तो निश्चिन्त झाला होता.... 

रूमवर आल्यावर त्याला त्यांची रूम लॉक दिसलं... समायरा कुठे गेली असेल म्हणून त्याने समायराला फोन लावला.. पण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे फोन लागला नाही... शेवटी त्याने हॉटेल मॅनेजरची भेट घेतल्यावर ती सनराईज फाईव्ह स्टार हॉटेलच्या मालकिणीला भेटायला गेल्याचे कळाले.....

असं कसं एकटीच गेली ही?? एकटं जाणं इतकं सुरक्षित आहे का?? कितीही नाही म्हटलं तरी सध्या माझ्यावर तीची जबाबदारी आहे ना... तुषार तसा गोंधळलेला पाहून हॉटेल मॅनेजर म्हणाला.. dont worry... हॉटेल सनराईज मध्ये जाणे सुरक्षित आहे... समायरा मॅम येतीलच इतक्यात.... 

टोनीची जाण्याची वेळ झाली... समायरा पण lake view हॉटेल ला जाण्यासाठी निघाली तितक्यात पुन्हा टोनी ने तीचा हात पकडला... समायराच्या डोळ्यात प्रेम मिळालं याचे आनंदाश्रू तर तो लागलीच सोडून जात आहे यांचं दुःख होते त्याचे अश्रू. असं मिश्रण होतं... समायरा पुन्हा टोनीला बिलगली.... टोनी ने ऊ हूं म्हणून नकारात्मक मान हलवली... आणि म्हणाला समायरा !!आता दुःखाचे दिवस संपले..  तू फक्त आनंदी रहा... "कारण होणार तर तू माझीच आहॆस "🤩😍🥰

टोनी जड पावलाने आणि जड अंतःकरणाने गाडीत बसला... समायराने त्याला बाय केला... गाडीतून त्याने तीला बाय केला आणि फ्लयिंग किस दिला.... 

समायरा देखील आलेल्या गाडीत बसली आणि हॉटेल lake view कडे आली.... 

तुषार हाय टी साठी बँक्वेट हॉल कडे होता... समायरा तिथेच आली... त्याच्या सोबत बसली... 

तुषार : मग झाली का फाईव्ह स्टार हॉटेल सनराईज मालकिणीची भेट... 

समायराला तुषारच्या त्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे समजतच नव्हते... मग तीला तुषारची फिरकी घ्यावीशी वाटली.... 

मालकीण कोण मालकीण??  तुषार !! तू टोनीला कश्याला सगळं सांगितलं??  तूला काय गरज होती... आणि तूझा काय अधिकार आहे माझ्या पर्सनल गोष्टींवर.... 

समायराच्या अश्या अचानक स्फोटक बोलण्याने तुषार हादरून गेला... का काय झालं?? मी काही चुकलोय का?? 
समायरा : चुकलोय का म्हणजे?? टोनी किती चिडला आहे... मला किती बोलला... 

तुषार : समायरा !! तू म्हणालीस माझा काय अधिकार आहे... मी मैत्रीच्या अधिकाराने हे पाऊल उचलले... टोनीला सांगितलं की या सर्व गोष्टींना सर्वस्वी मी जबाबदार आहे... आता त्याने काय गैरसमज करून घेतला आहे कोण जाणे.... तुषार एकदम परेशान झाला... 

समायरा : 😂😂😂 नलिनीने मला सांगितलं होतं... तुषारची जरा जरी फिरकी घेतली की तो इतकंस तोंड करतो.... 

तुषार : म्हणजे?? 

समायरा : तुषार !! Thanks a lot.... 

तुषार :🤷‍♂️... काय बोलत आहॆस?? 

समायरा : टोनीने मला पुन्हा प्रपोज केलं... 🤩🥰😍

तुषार : ओहो, congrats... काय गं तूम्हाला मीच सापडतो काय फिरकी घ्यायला..... 

समायरा : सॉरी... 

तुषार : its ok, मला आता तूम्हा दोघांकडून पार्टी पाहीजे... 

समायरा : हो नक्की देऊ.... . पण ईथे अशक्य आहे.... टोनी त्याच्या मित्राची एंगेजमेंट आहे म्हणून निघून गेला....

तुषार :👍 done.... 

क्रमश :
भाग 50 वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे .

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या